Monday 29 December, 2008

पाकिस्तानी शाळांमधून शिकवला जाणारा इतिहास.

आरिफ मोहम्मद खान यानी लिहिलेले हे लेख छापयची टाइम्स ऑफ़ इंडिया ला २७ दिसम्बर २००८ च्या वर्त्तमानपत्रात छाप बुद्धि झाली म्हणजे अप्रुप म्हणायला हवे . जोपर्यंत बहुसंख्या सामान्य हिन्दू मरत होते तेंव्हाची हिन्दू नेस्तनाबूत करण्याचे विचार उच्चभ्रू , परकीय नागारिकांवर हल्ले झाले तेंव्हा अचानक बदलून गेले. गाढवाच्या तोंडी गीता आली. जे इतके दिवस हिंदुत्ववाद्यांना चुकीचे म्हणत होते त्याना अचानक साक्षात्कार झाला म्हणायचे.

ढोंगी बुद्धिजीवी आणि हिन्दुना अक्कल शिकवणारे, वागणूकीचे धडे देणारे आणि पाकिस्तानात भारता बद्दल खुप चांगली भावना आहे म्हाणणारे यांना ही चपराक आहे. पाकिस्तानात शाळांमधे असा इतिहास शिकवला जातो की ज्या मुले लहान वया पासुनाच "धार्मिक आधारावर" असमानता आणि द्वेष याची शिकवण मिळत राहते. १९७७ पासून पकिस्तान मधे असणारी शाला मधील पुस्तकात भारता बद्दल आणि विशेषत:हिंदूं बद्दल द्वेष शिकवला जातो.

पकिस्तान शिक्षण आणि समाज शात्र या अनिवार्य (compulsory)विषयात इतिहासचा अपलाप करून मोडून तोडून कशी मने आणि विचार घडवले जातात त्याचे हे उदहारण आहे.

इयत्ता ६ वि च्या पुस्तकाच्या प्रस्तावानेतच पाकिस्तानी शिक्षण पद्धतीच्या धेया बद्दल सांगितले गेले आहे ."सामजिक अभ्यास या विषयाला पाकिस्तानी शैक्षणिक धोराणात विशेष महत्त्व दिले गेले आहे कारण सामाजिक समानते ची मूलभूत विचारधारणा तिचा स्वीकार आणि प्रत्यक्षत अमलबजावणी या आधार बळकट होवून व्यक्तिमत्व विकास व्हावा." "सामाजिक एकात्मता " म्हणले आहे राष्ट्रीय एकात्मता " नव्हे.

इयत्ता ५ वि चे पुस्तकात आहे....की हिन्दुनी ब्रिटिशांना त्यांची सत्ता भारतात प्रस्थापितसाठी मदत केली. "ब्रिटिशांना हिंदुस्थानात सत्ता प्रस्थापित करायची होती म्हणुन म्हणुन त्यानी हिन्दुना सामिल करून घेतले आणि हिन्दूना त्याना मदत करण्यात अतिशय आनंद होत होता.ब्रिटिश एक बाजूला संपूर्ण उपखंडात सत्ता प्रस्थापित करून लूट करत होते तर दुसरीकडे हिन्दुन्शी हात मिळवून मुसलमानांना दाबुन टाकत होते."

इयत्ता ८ वि च्या पुस्तकात लिहिले आहे.."मुस्लिम संतांच्या शिकवणीतुन हिंदूंच्या कित्येक अंधश्रद्धा दूर झाल्या आणि वाईट प्रथा बंद झाल्या आणि अश्या प्रकार जुनाट हिन्दू धर्माचा शेवट झाला."

भारत -पाक युद्धा बद्दल : ही पुस्तके खुलेपणाने "जिहाद "आणि "शहादत" यांचा पुरस्कार करतात आणि त्यांचे विस्तृत वर्णन करतात आणि मुलांना "मुजाहिद" बनवून भारता बरोबर कोणतेही संबंध, भावी मैत्री ना ठेवण्याबद्दल सांगतात .


इयत्ता ५ वि चे पुस्तक म्हणते."१९६५ साली पाकिस्तानी सैन्याने भारताचा बराच भूभाग जिंकुन घेतला होता आणि जेव्हा ते हरु लागले तेंव्हा त्यानी यूनो मधे धाव घेतली आणि युद्ध बंदी आनावली. १९६५ नंतर पूर्व पाकिस्तानातीलआणि आपल्या पासून पूर्व पकिस्तान तोडून टाकण्यात आला.म्हणुन आपणा सर्वानी दुश्मन शी लढण्या साठी सैनि हिन्दू नी तिथल्या लोकाना पश्चिम पाकिस्तान तिल लोकंविरुद्ध भाडकवुन अखेरीस दिसम्बर १९७१ मधे पूर्व पाकिस्तानात कब्जा मिलावाला.की शिक्षण घेतले पाहिजे."

**************************************
हा लेख ऑर्कुटवरील एका मित्रांने पोस्ट केलेल्या लेखाची प्रत आहे.

Friday 26 December, 2008

२६ नोव्हेंबर - शिवसैनिकांचे योगदान!

मुंबईत गेल्या महिन्याच्या २६ नोव्हेंबर ला इस्लामी आतंकवाद्यांनी धुमाकुळ घातला होता. कुलाब्याच्या नरिमन हाऊस मध्ये जेव्हा गोळीबार सुरू झाला त्यावेळेस तिथेच असणारे शिवसेना शाखाप्रमुख श्री. विजय सुर्वे यांनी त्यावेळी आपल्या शिवसैनिकांना घेऊन निशस्त्र असूनही पोलिस येईपर्यंत आतंकवाद्यांशी निडरपणे लढा दिला. यात दुर्दैवाने तरूण शिवसेना गटप्रमुख हरिश गोयल यांचा गोळी लागून मृत्यु झाला.

दि. २५ डिसेंबरच्या सामनामध्ये याबद्दल एक लेख आलेला आहे. आपण तो इथे क्लिक करून वाचू शकता.

शिवसैनिकांच्या या कामगिरी बद्दल इथे आपल्या प्रतिक्रिया कळवा

Wednesday 24 December, 2008

संघर्ष करा! महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणा!!

"संघर्षाचा काळ कधीच संपत नसतो. प्रसंगानुसार त्याकडे पहावं लागतं. किती झालं तरी, दारूगोळा उगीच फुकट कशाला घालवायचा याचाही विचार करावा लागतो. मी तर सतत संघर्षच केला. संघर्षातून ही आज दिसतेय ती शिवसेना उभी राहिली. संघर्षातूनच ती आणखी पुढे जाईल."

"आपल्या शिवसेनेवर निष्ठा आहेत, जिद्द आहे. ती महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी हिमतीने वापरा. कडवटपणाने वापरा. त्यात तुम्ही कुठेही कमी पडणार नाही याची मला स्वत:ला खात्री आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आणायची म्हणजे आणायचीच. त्या निष्ठेने आजपासून कामाला लागा. अशी मी आपणास नम्र विनंती करीत आहे."

साहेबांनी आज आपणा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती केलेली आहे ती आपण सर्वशक्तीनिशी महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी वापरायची आहे.

साहेबांच्या मुलाखतीचा आजचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

एकच लक्ष्य! विधानसभा २००८

Tuesday 23 December, 2008

"मेणबत्त्या हे शस्त्र आहे काय?" साहेबांचा सवाल

हिंदूंचा दहशतवाद? मला बरे वाटले असते!

हिंदूंमध्ये सुद्धा दहशतवादी निर्माण झाले पाहिजेत, असं वाटायला लागलय मला. नाहितर हे अत्याचार झाले नसते. हिंमत झाली नसती पोलिसांची. हे कसलं लक्षणं? मेणबत्त्या जाळणा-या महिला त्या. त्यांनी कधी कसली आंदोलने केलीत? देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महिला, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील महिलांनी केलेली आंदोलनं या महिलांनी पाहिलेली नाहीत. आमच्या शिवसेनेच्या रणरागिणीही महागाईविरूद्ध, अन्यायाविरूद्ध रस्त्यावर उतरतात. त्याला म्हणतात आंदोलन. मेणबत्त्या कसल्या पेटवता?

शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेबांची ज्वलंत मुलाखत वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

बाळासाहेबांची विशेष मुलाखत : भाग १ - आणीबाणी पुकारा!


नपुंसक आणि भडवे देश काय चालवणार?

इराक मध्ये त्या बुशवर का बूट मारला ते समजून घ्या. त्या बूटातून इराकी जनतेचा देशाभिमान, स्वाभिमान दिसतो. बुशला मारलेला जोडा म्हणजे इराकी जनतेचा संताप आहे. पण त्यांच्या अभिमानाचे आपल्याला काय करायचेय? इकडे आमच्या देशाबद्दल आम्हालाच अभिमान नाही.

शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेबांची ज्वलंत मुलाखत वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Monday 22 December, 2008

टाटा इंडिकॉमचा खोड्साळपणा

काहिच महिन्यापूर्वी रिलायंन्स ने आपल्या वेबसाईटवर मुंबई राज्य दाखवले होते. शिवसैनिकांनी त्यांना त्याबद्दल वठणीवर आणले असतानाच "टाटा इंडिकॉम" च्या वेबसाईटवर हाच खोडसाळपणा करण्यात आलेला आहे. आपण स्वत: खालील चित्र पाहू शकता.


आपणास अधिक सोपे जावे यासाठी मी एक लिंक देत आहे आपण स्वत: त्या लिंकवर जाऊन खात्री करून घ्या.
http://www.tataindicom.com/t-personal-internet-plug2surf.aspx

आणी महत्वाचे म्हणजे त्यांनी कोलकाता शहरामधील उपनगरांसाठी "वेस्ट बंगाल" शब्द वापरला असून बंगालमधील इतर शहरांसाठी "रेस्ट ऑफ वेस्ट बंगाल" असे शब्द वापरले आहेत. महाराष्ट्रातील इतर शहरांचीही माहिती देण्यासाठी त्यांनी "रेस्ट ऑफ महाराष्ट्र" असे म्हंटले आहे.

Saturday 8 November, 2008

चार वर्षे 'विलासा'ची, महाराष्ट्राच्या वनवासाची! (भाग-१)

चार वर्षे 'विलासा'ची, महाराष्ट्राच्या वनवासाची!
आघाडी सरकारच्या निष्क्रियतेवर हल्लाबोल!अस्तित्व शुन्य असलेल्या राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. या चार वर्षात वेळोवेळी सरकारची निष्क्रियता जनतेसमोर आली. या शासनाच्या नाकर्तेपणामुळे विरोधीपक्षनेते मा. रामदासभाई कदम यांनी सरकारचे वाभाडे काढणारी पुस्तिका नुकतीच प्रकाशित केली, तिच पुस्तिका जशीच्या तशी या ब्लॉगवरून सादर करत आहे.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या
गेल्या ५ वर्षात राज्यातील ४८५० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच घडल्या!
शेतकर्‍यांच्या कर्जमाफी पॅकेजचे श्रेय लाटणार्‍या सरकारने या आत्महत्यांची जबाबदारीही स्विकारायला हवी.

शेतकर्‍यांचा घोर अपमान
कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे वजन वाढवण्यासाठी कापसात दगड, धोंडे आणि पाणी टाकतात. असा आरोप करीत एका समारंभात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शेतकर्‍यांची टिंगल केली आणि कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या जखमेवर मिठ चोळले. याच समारंभात केंद्रिय वस्त्रोद्योग मंत्री शंकरलाल वाघेला यांनी महाराष्ट्रातील शेतकरी तंबाखू चोळण्यात वेळ घालवतात, ते आळशी आहेत अशी टवाळी केली. या बेताल आरोपांमुळे आणि टिंगलीने महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संतप्त झाले. अखेर मुख्यमंत्र्यांनी निर्लज्जपणे माफी मागितली.

शेतकर्‍यांची अशीही फसवणूक
शेती क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या शेतकर्‍यांना शासनातर्फे कृषिभूषण पुरस्कार दिला जातो. परंतु पुरस्कारप्राप्त शेतकर्‍यांना देण्यात येणारे सुवर्णपदक बनावट होते. शेतकर्‍यांची हि घोर फसवणूक कशासाठी? स्वाभिमानी शेतकर्‍यांनी ही सुवर्ण पदके शासनाला परत केली. पण या निर्लज्ज आणि कोडग्या सरकारला ना खंत ना खेद! शेतकर्‍यांचा या सरकारने छळवाद चालविला आहे. नाईलाजास्तव शेतकर्‍यांना आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागला. इतकेच नव्हे तर आदिवासींच्या योजनेच्या नावाखाली बनावट मंगळसूत्र वाटण्याचे पाप या सरकारने केले.

शेतकरी विरोधी सरकार आणि काँग्रेसी नेते

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पॅकेज लाटले
शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे केंद्रबिंदू असलेल्या विदर्भातील जिल्ह्यात पंतप्रधान व मुख्यमंत्री विशेष पॅकेजचा खर्‍या लाभार्थींऐवजी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनीच फायदा घेतला. पॅकेजनुसार गायी किंवा म्हशींच्या एकूण खरेदी रकमेपैकी ५० टक्के रक्कम राज्य शासनाने सोसावयाची होती. पण यवतमाळ जिल्हा पशु संवर्धन विभागाच्या उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसारः

* काँग्रेसचे माजी खासदार उत्तमराव पाटील व त्यांच्या नातेवाईकांनी १० गायी लाटल्या.
* दिग्रसचे विद्यमान आमदार संजय देशमुख यांची पत्नी व आई यांच्या नावे प्रत्येकी एक गाय.
* नागपूरचे माजी पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या जवळच्या नातेवाईकाने ८ गायी 'मिळवल्या'.
* वणीचे माजी आमदार वामनराव कासावर यांच्या नातेवाईकांनी ८ गायी मिळवल्या.
* काँग्रेसचे नेते सुरेश लोणकर यांनी ६ गायी लाटल्या.
* गायींचा पुरवठा करणारे ठेकेदार अमोल क्षीरसागर हे स्वतः लाभार्थी होते. त्यांनी दोन गायी प्राप्त केल्या.
* १४००० किंमतीच्या हजारो दुभदुभत्या गायी वितरित करूनसुद्धा दुधाचा साठा कमी झाल्याचे दाखवण्यात आले आहे.

कापूस उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक
पंतप्रधानांनी विदर्भातिल शेतकर्‍यांसाठी २००० साली विशेष पॅकेज जाहिर केले. पण त्याची अंमलबजावणी मात्र धडपणे झाली नाही. उलट त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार झाला. पंतप्रधान विदर्भाच्या दौर्‍यावर असतानाही शेतकर्‍यांचे आत्महत्यासत्र सुरूच होते.
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनीच सरकारी प्रशासनाचे पितळ उघडे पाडले आहे. महालेखा परिक्षकांनी पंतप्रधान पॅकेजमधील लाभधारकांच्या मूळ आकडेवारीबाबतच शंका घेतली आहे. पंतप्रधानांनी विदर्भातील १३ लाख ४८ हजार शेतकर्‍यांसाठी ३७५० कोटी रूपयांचे पॅकेज दिले. लाभार्थींची आकडेवारीच संशयास्पद असल्याचे महालेखा परीक्षकांचे म्हणणे आहे. पंतप्रधानांचे हे पॅकेज केवळ सहा जिल्ह्यांपुरतेच मर्यादित नव्हते. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना त्याचा फायदा मिळायला हवा होता. बँकानी ९ लाख २९ हजार प्रकरणात व्याजमाफिचा दावा करूनही ४ लाख ४५ हजार प्रकरणात नविन कर्जे देण्यात आलेले नाही. बँकांनी २८ कोटी ९५ लाख रुपयांची चुकिची कर्जमाफि दिली आहे. कारंजा कृषी अधिकार्‍यांनी ११० ऐवजी ३४९ शेतकर्‍यांना बैलखरेदीस कर्ज दिले.
इतकेच नव्हे तर एकूण लाभार्थींपैकी ८५% शेतकर्‍यांकडे शासनाचे प्रतिनिधी पोहचलेच नाहीत. शेतकर्‍यांच्या समस्यांबाबतीत महाराष्ट्र सरकार मुळीच गंभीर नाही हे वारंवार स्पष्ट झालेले आहे. शेतकर्‍यांना खताचा वेळेवर पुरवठा झाला नाही. सरकारने दिलेली आश्वासने केवळ कागदावरच राहिली. अखेर शेतकर्‍यांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारल्याने सरकारला जाग आली पण शेतकर्‍यांच्या अडचणींकडे सरकार मुळीच लक्ष देत नाही हे जनतेसमोर आले.

Wednesday 5 November, 2008

शिवसेना कार्याध्यक्ष मा. उद्धवजी ठाकरे यांची म.टा. मधील मुलाखत.

शिवसेनाप्रमुख पक्ष संघटनेची सुत्रे आपल्याकडे सुपर्द करतील हे अपेक्षित होते काय?
शिवसेनाप्रमुख कोणताही महत्वाचा निर्णय अनपेक्षितपणे जाहीर करतात हेच त्यांचे वैशिष्टय आहे.

कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली तेव्हाच आपण शिवसेनाप्रमुखांचे राजकीय वारस होणार हे स्पष्ट झाले होते,? शिवसेनाप्रमुखांच्या नव्या निर्णयामुळे काय फरक पडला?
सहा वर्षापूर्वी महाबळेश्वर अधिवेशनात कार्याध्यक्ष म्हणून आपल्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून आपण पक्षबांधणीचे काम प्रामाणिकपणे करीत आहोत. निर्णय घेताना व ते राबवताना आपण आपली क्षमता व कुवत अनेकदा सिध्द करून दाखवली आहे, पण त्याचे आपण कधीच भांडवल केले नाही, तसा आपला स्वभावही नाही. पक्षाच्या दैनंदिन कारभारात अनेक निर्णय आपण घेत असलो तरी शिवसेनाप्रमुखांना विचारूनच आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच आपण निर्णय घेत आलो आहोत. शाखा प्रमुखांची नेमणूक करतानाही येणा-या शिफारसी शिवसेनाप्रमुखांच्या नावाने करा, असे आपले सांगणे असते. एखाद्या विषयावर प्रतिक्रिया आपण तत्काळ देऊ शकतो पण धोरणात्मक निर्णय शिवसेनाप्रमुखच घेत असतात.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयारी काय झाली?

या दोन्ही निवडणुकांकडे आपण फार मोठे आव्हान म्हणन बघत नाही. लोकसभा व विधानसभा अशा दोन निवडणुका असल्या तरी दोन्हीकडे मतदार एकच आहेत. दोन्ही निवडणुकीतील मुद्दे वेगवेगळे आहेत पण केंद आणि राज्य सरकारच्या विरोधात लोकांमध्ये फार मोठा असंतोष आहे. केंदातील युपीए आणि राज्यातील लोकशाही आघाडी सरकारच्या विरोधात जनतेचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. युतीच्या काळात आम्ही साडेचार वर्षे पाच जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवले होते. गरीबांसाठी एक रूपयांत झुणका भाकर दिली. मुंबईत ५५ फ्लॉय ओव्हर उभारले. मुंबईत ट्रॅफीकची एवढी मोठी कोंडी आहे पण सरकार नाका तिथे नव्हे तर नको तिथे फ्लाय ओव्हर उभारत आहे. आम्ही वांदे चे नरिमन पॉईंट सागरी मार्ग योजना आखली. दहा वषेर् होत आली पण वरळी ते वांदे सी लिंग या सरकारला पुरा करता आला नाही. कृष्णा खोरे कामाला गती दिली, मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे उभारून दाखवला. लोकांना दिलेला वचननामा अमलात आणला. उलट आमच्यानंतर आलेल्या काँग्रेस सरकारने लोकांना बाता मारल्या, लोकांची फसवणूक केली. लोकांच्या तोंडाला पाने पुसली. मुंबईतले आणि राज्यातले मोक्याच्या जागेवरील प्लॉट सोडविण्यातच देशमुख सरकार बिझी आहे. नुसते एफएसआय वाढविण्याची कामे केली. शेकडो उत्तुंग इमारती उभ्या राहत आहेत पण पाण्याचे काय? ड्रेनेजचे काय? रस्ते कुठे आहेत? मोफत वीज देता सांगून मते मिळवली पण नंतर मोफत सोडाच पण वीज नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. नंतर प्रभा राव म्हणाल्या प्रिटींग मिस्टेक होती तर विलासराव म्हणाले, निवडणुकीच्या वेळी अशा गोष्टी कराव्या लागतात. गेली चार वर्षे तर आघाडी सरकारने निव्वळ चालढकल केली.


सन २०१२ साली महाराष्ट्र विजेच्या बाबतीत परिपूर्ण असेल असे विलासरावांनी म्हटले आहे.
तेव्हा आमचे सरकार असेल. आज पाच ते सहा हजार कोटी मेगावॅटची तूट आहे पण गेल्या दहा वर्षात एक मेगा वॅट वीज निर्माण झाली नाही, त्याविषयी या सरकारला काहीच वाटत नाही. राज्यात आठ ते बारा तास लोडशेडिंग आहे, सरकारला त्याचे काही गांभीर्य वाटत नाही. लोकांना फसविण्यासाठी ते नुसते वायदे करीत वेळ काढत आहेत. खरे म्हणजे निवडणुकीत खोटी आश्वासने दिल्याबद्दल त्यांच्यावर खटला भरायला हवा.

मुंबई मेकओव्हर ही देशमुख सरकारची जमेची बाजू आहे असे वाटते काय?

एकट्या मुंबईतून देशाला ४० टक्के प्राप्तीकर जमा होतो, यंदाच्या वषीर् १ लाख ९ हजार कोटी रू. प्राप्तीकर देशाच्या तिजोरीत या एका शहरातून जमा झाला. शिवाय सीमा शुल्क व अबकारी कर वेगळा. सर्वाधिक निर्यात मुंबईतूनच होते पण त्या बदल्यात केंद सरकार मुंबईला काय देते? दिलेल्या करापैकी २५ टक्के रक्कम मुंबईच्या विकासाला द्या, अशी आमची मागणी आहे, पण केंद मुंबईचा पैसा अन्य राज्यासाठी वापरते. मुंबई महापालिकेचे बजेट १७ हजार कोटी रू. त्यातले ७० टक्के रक्कम वेतन व प्रशासकीय कामावर खर्च होते. रूपयातील २१ पैसे विकासाला शिल्लक राहात असतील तर मुंबईचा झपाट्याने विकास कसा होणार? मुंबईला दरवर्षी २५ हजार कोटी रूपये मिळाले तरी काही कामांना गती येऊ शकते. उंच इमारतीत लोक महागडे फ्लॅट घेतात पण सर्वसामान्य माणसाला ज्या दराने पाणी दिले जाते, त्याच दराने फ्लॅटमधील लोकांना दिले जाते. लोकांनी महागडे फ्लॅट घेण्याने मुंबई महापालिकेचा किंवा मुंबईचा कोणताच फायदा होत नाही.


एमएमआरडीने मुंबईचे रंगरूप बदलले आहे असे वाटत नाही का?
मुंबईसाठी किती यंत्रणा राबवायच्या याचा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे. महापालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीए, म्हाडा, रेल्वे, एअरपोर्ट अॅथॉरिटी शिवाय नगरविकास मंत्रालयाचा रिमोट आहेच. एकाच यंत्रणेकडे सारी मुंबई सोपवण्याची गरज आहे.

मुंबईचा कितीही विकास केला तरी कमीच पडणार. सर्व दुखण्याचे मूळ वाढती लोकसंख्या व आदळणारे परप्रांतीयांचे लोंढे आहे असे वाटत नाही का?
आपल्या राजधानीचा व राज्याचा विकास करणे हे प्रत्येक राज्याचे कर्तव्य आहे. लालू किंवा राबडी बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर पंधरा वषेर् होते, पण त्या राज्याच्या विकासाची त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? पंतप्रधान महाराष्ट्रातील घटनांची गंभीर दखल घेतात तेव्हा महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या लालू यादवांना, त्यांनी त्यांच्या काळात बिहारचा किती विकास केला, किती उद्योग आणले, किती रोजगार निर्माण केला असे प्रश्न खडसावून का नाही विचारत? काँग्रेसने दरवर्षी देशात एक कोटी रोजगार देण्याचे जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते, गेल्या साडेचार वर्षात किती नोकऱ्या दिल्या, किती रोजगार दिला, हे सांगावे. घटनेचा आधार घेऊन येणारे लोंढे रोखता येणार नाहीत असे सांगितले जाते पण एवढ्या लोकसंख्येला किमान नागरी सेवा व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत का? मुंबईत मराठी शाळांची संख्या कमी होत आहे आणि उर्दू शाळांची संख्या वाढत आहे हे कशाचे लक्षण आहे?


शिवसेनेची आंदोलने थंडावली आहेत त्याचे कारण काय?

आंदोलने चालूच आहेत शेतकरी आत्महत्येच्या मुद्यावर, शेतकरी प्रश्नावर, लोडशेडिंग, महागाई, युएलसी, एसईझेड अनेक मुद्यांवर आम्ही मोर्चे काढले. जनतेच्या प्रश्नावर शिवसेनाच आवाज उठवते हे वेळोवेळी सिध्द झाले आहे. मात्र प्रत्येक वेळी मारामा-या करून प्रश्न सुटत नाहीत. चर्चेने प्रश्न सुटतात हे आम्ही दाखवून दिले आहे. एअर इंडिया किंवा जेट एअरवेजमधील कर्मचा-यांनी आम्ही चर्चेतूनच न्याय मिळवून दिला.

दिल्लीत महाराष्ट्र सदनावर, जमशेटपूरला टाटाच्या मराठी अधिका-यांवर किंवा पाटण्यात मराठी महिला आयएएस अधिका-यांवर तेथील लोकांनी हल्ला चढवला यावर सेनेची भूमिका काय?
हे सर्व हल्ले त्या त्या प्रांतातील लोकांनी केले आहेत. अन्य प्रांतात मराठी लोकांनी घुसखोरी करून तेथील भूमिपुत्रांवर अन्याय केलेला नाही. बिहारमध्ये किंवा अन्य राज्यात मराठी लोकांना नोक-यांत प्राधान्य द्यावे अशी आम्ही मागणी केलेली नाही. प्रत्येक राज्यातील भूमिपुत्रांना प्राथमिक नोक-यांत प्राधान्य मिळाले पाहिजे. स्थानिक लोकांना अग्रक्रम देणे हे प्रत्येक राज्य सरकारचे कर्तव्य आहे. मराठी लोकांवर अन्य प्रांतात हल्ले झाले उद्या अन्य भाषिकांनाही परराज्यात त्याची झळ बसू शकेल. पंजाब, आसाम आदी राज्यात बिहारी आक्रमणाविरूध्द आंदोलने झाली. शिवसेनाप्रमुख भुमिपुत्रांचा मुद्दा १९६६ पासून मांडत आहेत तेव्हा त्यांना प्रांतवादी, संकुचित ठरविण्यात आले. आज हाच मुद्दा अन्य प्रांतात प्रखरपणे मांडला जात आहे.

साध्वी प्रज्ञासिंग यांच्या पाठिशी शिवसेनेचे उभे राहण्याचे कारण काय?
साध्वीला त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. कोणावरही संशय घ्यावा आणि तुरूंगात टाकावे ही पोलिसांची मनमानी बंद झाली पाहिजे. आमीर्तले अधिकारीही पकडले जात आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे पण पकडलेल्या लोकांसंबंधी पुरावे सापडले नाहीत तर पोलिस काय करणार आहेत? आरोप खोटे निघाले तर तु्म्ही ( सरकारने ) विष पेरण्याचे काम केले असा त्याचा अर्थ निघेल. कर्जतला दोन मुले पकडण्यात आली, लोकलमधून पडून तरूणाचा मृत्यू झाल्याप्रकरणाचा त्यांचा संबध असल्याचा काही पुरावा मिळाला नाही. मग त्यांची बदनामी कशासाठी, त्यांना कोठडीत कशाला डांबून ठेवले? मुंबईतील कुर्ला येथे बेस्ट बसमध्ये झालेल्या एन्काउंटरविषयी गळे काढणारे, दिल्लीतील बटाला हाऊसमध्य झालेल्या चकमकीत पोलिस इन्स्पेक्टर शर्माच्या मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त करणारे कर्जतची लहान मुले पकडल्यावर गप्प का बसले आहेत ?


शिवसेनाप्रमुखांना पक्षाची संपूर्ण सुत्रे आपल्या हाती दिल्यानंतर आपल्या भूमिकेत काय फरक पडला?
मला काही शिवसेनाप्रमुख करण्यात आलेले नाही. काळानुसार नवीन पिढीकडे सुत्रे यावीत, हा बदल त्यांनी स्वीकारला आहे. मला दुहेरी जबाबदारी पार पाडायची आहे. एक म्हणजे पुत्र कर्तव्य आणि दुसरे म्हणजे पक्षकर्तव्य. कोणत्याही पित्याला आपल्या पुत्राच्या कर्तृत्वाबाबत अभिमान वाटला पाहिजे, शिवसेनाप्रमुखांना तसा अभिमान वाटेल असे काम करण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यांनी उभारलेला पक्ष मजबूत करायचा आहे, त्यांनी आपल्यावर व्यक्त केलेला विश्वास मला सार्थ करून दाखवायचा आहे.
मराठी मते फोडण्याच्या प्रयत्नात अमराठी मतेही काँग्रेसच्या पारड्यातून बाहेर पडत आहेत. आता त्यांनी कितीही सावरासावर केली तरी त्याचा त्यांना उपयोग होणार नाही. बॉम्बस्फोट असो, जातीय दंगे असो वा पूरपरिस्थिती असो...संकटाच्या समयी शिवसेनाच धावून येते हे मराठीच नव्हे तर अमराठींनाही चांगलेच ठाऊक आहे. अमराठी मतदारांनाही त्यांचे सण अंधारातच साजरे करावे लागतात.

Tuesday 4 November, 2008

प्रेक्षकांना उल्लू बनविण्याचा धंदा....

आजच्या सामना मधील अग्रलेख वाचला आणि कुठेतरी साहेबांनी प्रत्येकाच्या मनातील भावनाच बोलून दाखविल्यासारखे झाले. हा लेख आपण इथे क्लिक करूनही वाचू शकता. आपल्या कडच्या इलेक्ट्रॉनिक मिडियाला खरे तर इलेक्ट्रिक शॉक ट्रिटमेंट देण्याची गरज आहे. नको तिथे तोंड उघडणे हेच यांचे धंदे बनले आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ यांना म्हटले जाते. पण जिथे लोकशाहीचेच कुणाला पडलेले नाही, मग हा स्तंभही आपले काम विसरला. वास्तविक आज बरेचसे मिडियावाले हे राजकिय पक्षांना विकले गेल्यासारखेच वागत आहेत. ज्या पक्षाची हे बाजू घेतात त्याच्या विरोधकाला नेस्तनाबूत करणे हे एकमेव ध्येय्य यांचे ठरलेले आहे. सर्व सामान्यांनी कोणाचे ऐकावे हेच एक मोठे कोडे बनून राहिले आहे.

फक्त एकच उदाहरण मला द्यावेसे वाटते, कि काही दिवसांपूर्वी जेव्हा राज ठाकरे यांचे अटकनाट्य सुरू होते तेव्हा स्टार वाहिनीच्या स्टार माझा आणि स्टार न्यूज या दोन्ही वाहिन्यांवर परस्पर विरोधी बातम्या दाखविल्या जाताना असे वाटले की काय बाजार मांडला आहे या लोकांनी. राज ठाकरे यांचे दांडा (माइक) गरम होवेस्तोवर स्तुती करण्यात स्टार माझा सगळ्यांच्या १०० पाऊल पुढेच असतो. पण त्याच मालकाच्या स्टार न्यूज वर राज ठाकरे यांना गुंडा म्हटले जात होते. आता प्रेक्षकांनीच विचार करा कि यांना काय म्हणावे. एकच मालक आपला धंदा वाढावा, खुप प्रेक्षक मिळावा म्हणून असल्या मुद्द्यावर स्वताचे गल्ले भरून घेतो पण आमचा मराठी माणूस हा विचार करत नाही कि हे चॅनेलवाले आपलीच कशी वाट लावतात.

साहेबांनी आजच्या अग्रलेखामध्ये उल्लेख केलाच आहे कि, यात मराठी मालकांचे चॅनेल किती आहेत? मग हे पत्रकार लोक आपल्या मालकाला हव्या तशा बातम्या बनवतात त्या सुद्धा प्रेक्षकांना उल्लू बनवण्यासाठीच ना! तसेच आपण ज्या हिंदी न्यूज चॅनेलवर आगडपाखड करतो त्याचे पत्रकारही बरेचसे मराठीच असतात ना?मग विचार करा!

Monday 3 November, 2008

मी बाळासाहेबांची धाकटी सून

बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी जास्तीत जास्त वाचायला , जाणायला लोकांना आवडतं . राजकारण , त्यांचे छंद , बाळासाहेबांची किंवा त्यांचा भाचा .. त्यांच्याशी संबधित प्रत्येक गोष्ट सतत चर्चेत असते . चर्चेत नसतात त्या रश्मी ठाकरे . शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टीत असलेल्या पण दृश्यपटलावर नसलेल्या रश्मी , शिवसेनेचे युवा नेते उद्धव ठाकरे यांची ताकद असलेल्या रश्मी सांगत आहेत त्यांच्या आणि उद्धवच्या नात्याविषयी .

उद्धव ठाकरेशी माझं लग्न झालं १३ डिसेंबर १९८८ ला. त्याअगोदर दीड वर्ष आमचा साखरपुडा झाला होता . त्यादरम्यान आम्ही एकमेकांना भेटत होतो. त्यावेळी उद्धव शिवसेनेचे मुखपत्र ‘ सामना ’ काढण्याच्या तयारीत गुंतलेले होते. त्या कामासाठी मीसुद्धा त्यांच्याबरोबर जायचे. त्याचवेळी मला जाणवलं की , उद्धव अत्यंत मितभाषी आहे. संयत आणि थेट असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या पारदर्शक डोळ्यात मला नेहमीच प्रामाणिकपणा दिसतो.

उद्धव यांच्या प्रत्येक गोष्टींत मी सहभागी व्हावं असा त्यांचा आग्रह असायचा. मी सहभागी झालेही मात्र , तसा माझा सहभाग कधी लोकांच्या समोर आला नाही. साखरपुड्यानंतरच दीड वर्ष कसं गेलं ते कळलंही नाही आणि एक दिवस ठाकरे घराण्याची सर्वात धाकटी सून म्हणून मी ‘ मातोश्री ’ त पाय ठेवला।

या नावाचा मोठा दबदबा आहे. तेव्हाही होता आणि आजही आहे. त्यात आजपर्यंत तरी फरक पडलेला नाही. जितके ठाकरे परिवारावर प्रेम करणारी माणसं आहेत तितकेच त्यांना विरोधकही आहेतच. जेव्हा सून म्हणून मी या घरात पाय ठेवला तेव्हा बाळासाहेबांविषयी माझ्या मनात आदरयुक्त भीती होती. असं वाटत होतं की त्यांच्या घरातलं वातावरण काही वेगळंच असेल. त्यामुळेच मातोश्रीवर प्रवेश करण्याचं मला काहीसं टेन्शनच होतं. पण , आई मीनाताई आणि उद्धव हे दोघेही मला शक्तिस्तंभासारख्याच होत्या. या घरात रुळायला त्यांनीच मला मदत केली. स्वयंपाकघरात आईंना मदत करणं , येणा-या जाणा-यांचे आदरातिथ्यं करणं , उद्धवबरोबर बाहेर जाणं या सा-यांत माझा दिवस निघून जायचा. त्यावेळी उद्धव एक जाहिरात एजन्सी चालवायचे. १९९० च्या निवडणूकांसाठीची शिवसेनेच्या प्रचाराची थीम उद्धवनेच तयार केली होती.

मी मध्यमवर्गीय कुटुंबातच राहिले वाढले आहे. त्यामुळे मला वाटतं होतं की , ठाकरे परिवारात मिसळायला मला जड जाईल. पण खरं सांगायचं तर , असं काही झालं नाही. सासरची संस्कृती आणि परंपरा या गोष्टी लक्षात घेऊन प्रत्येक मुलीला थोडे बदल करावे लागतात. मी त्यांच्यात मिसळून गेले. त्यामुळेच ठाकरे परिवाराचाच एक भाग होण्यात मला काही अडचण आली नाही. त्रास झाला नाही.


आमच्या लग्नानंतर साधारण महिनाभरात बाळासाहेबांनी ‘ सामना ’ सुरू केला. त्याची जबाबदारी उद्धववर देण्यात आली. मी फ्कत त्याला सोबत म्हणून त्याच्याबरोबर जायचे. आवृत्ती निघेपर्यंत आम्ही तिथे थांबायचो. सामनाशी आमचं जवळंच नातं होतं. हळू हळू तिथे शिवसैनिकांची वर्दळ सुरू व्हायला लागली. उद्धव त्यांना भेटायला लागले. ओळख वाढत गेली. अजाणताच उद्धव यांच्या राजनैतिक वाटचालीची सुरवात झाली आणि मी त्यांच्या सोबत राहिले।

आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. खूप. सर्वसामान्य माणूस त्याच्या आयुष्यात इतका एकटा असत नाही जितका ते राजकारणात एकटा असतो. राजकारणात उतार - चढाव , ऊन-सावली , आनंद- दु : ख अशा अनेक स्थित्यंतरांमधून जावं लागतं. या सा-या बदलांमध्ये नव-याला ताकद द्यायची जबाबदारी बायकोला घ्यावीच लागते. ती ताकद बनण्याचा मी प्रयत्न करते. स्वत : उद्धव खंबीर आहेतच. घरातलं शेंडेफळ असूनही मीनाताईंचं निधन आणि मोठा भाऊ बिंदा याचा अचानक मृत्यूनंतर वडिलांना उद्धवनेच सावरले. विस्कळीत झालेलं घरही त्यांनी पूर्वपदावर आणले. कितीही कठीण परिस्थितीत न डगमगणं आणि विनोदबुद्धी शाबित ठेवणं या त्यांच्या गुणांवर मी फिदा आहे।

एकदा कसलीतरी अडचण घेऊन एक बडे उद्योगपती आले होते. त्याने सहज बोलताना सांगितले की , सध्या परिस्थिती मोठी कठीण आहे. आम्हाला परदेशी कंपन्यांशी स्पर्धा करायला लागतेय. त्यावर हजरजबाबीपणे उद्धव लगेच उत्तरले , तुम्हालाच का आम्हालाही परदेशी व्यक्तिंशी स्पर्धा करायला लागते आहे. उद्धवचा इशारा त्यावेळी सोनिया गांधींकडे होता. त्यांच्या विनोदी स्वभावाचे असे अगणित किस्से आहेत.


ठाकरे परिवारातल्या अनेकजणांचा स्वभाव असा विनोदी आहे. विशेषत : बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांवरील टिप्पणी ऐकणे आणि वाचणे अनेकांना आवडते. ठाकरे परिवारातल्या व्यक्तिंचे पशु , पक्षी आणि झाडांवर मनापासून प्रेम आहे. जेव्हा मी लग्न होऊन या रात आले तेव्हा घरात तीन ग्रेट डॅन कुत्रे होते. आता फक्त एक कुत्रा आहे. फिश टँकमध्ये रंगीबिरंगी मासे होते आणि कुंड्यांमध्ये झाडे होती. उद्धवला जंगलात फिरायला आवडतं. ड्रायव्हिंग आणि फोटोग्राफी या गोष्टींवर त्यांचं बेहद प्रेम आहे. त्यांना वेळ मिळाला की ते मला लाँग ड्राइव्हवर घेऊन जातात. तेव्हा फक्त आम्ही दोघेच असतो. जबाबदारी वाढल्यापासून अर्थातच आता असे क्षण कमीच वेळा वाट्याला येतात..
ठाकरे परिवार आस्तिक आहे , पण घरात पूजा-पाठ केले जात नाहीत. बाळासाहेब सकाळी काही तास १५ ते १६ पेपर वाचतात. काही लेख आणि बातम्यांना अंडरलाइन करून ते उद्धवकडे पाठवतात. त्यांनी वाचावं म्हणून. माझ्या मुलांनी किंवा मी वाचावं असं काही असेल तर ते आमच्या रूमपर्यंतही येतच. ते इतके शिस्तीचे आहेत की , अव्यवस्थितपणा त्यांना अस्वस्थ करतो.

लहान-सहान आजारांसाठी त्यांना अॅलोपथीच्या गोळ्या घ्यायला आवडत नाही. होमिओपथीचे उपचार घेण्याकडेच त्यांचा अधिक कल असतो. बाळासाहेबांचे खाणे अगदीच कमी आहे आणि खाण्यासाठी त्यांनी कधी काही फर्माइश केलेली मी ऐकलेली नाही. सध्या तर ते खूपच कमी आहार घेत आहेत. त्यांच्या नातवांच्या बाबतीत तर ‘ आज्जा ’ खूपच संवेदनशील आहे. थोडासा पाऊस पडत असला तरी ते मला विचारतात की , आज या मुलांना शाळेत पाठवणं गरजेचं आहे का ? ‘ नातवांसाठी पुस्तकं आणणं त्यांना सर्वाधिक आवडतं काम आहे.


बाळासाहेब ठाकरे या नावाच्या ताकदीचा मी कित्येकदा अनुभव घेतला आहे. एकदा आम्ही अमेरिकेच्या ट्रीपला गेलो होतो. तिथे आमचे इमिग्रेशनचे पेपर तपासणारी महिला अमेरिकन भारतीय होती. उद्धवचे पेपर तपासताना तिने उद्धव बाळ ठाकरे असं नाव पाहिलं आणि ती एकदम चकित झाली. तिने आमच्याकडे बाळासाहेबांविषयी विचारपूस केली आणि आमची तपासणी केल्याशिवायच आम्हाला जाऊ दिले. असे अनेक प्रसंग मला सांगता येतील. मात्र आम्ही कधीही या गोष्टीचा गैरफायदा घेतला नाही. माझी मुलं सामान्य मुलांप्रमाणेच शाळेत जातात. मी सुद्धा खरेदीसाठी कोणत्याही बाजारात जाते. पार्ल्याच्या बाजारातल्या कोळीणींशी गप्पा मारायला मला आवडतं.

वीस वर्ष हा खूप मोठा काळ आहे. विशेषत : ज्या कुटुंबावर सतत नजरा रोखलेल्या असतात अशा कुटुंबासाठी तर तो निश्चितच मोठा काळ आहे. शिवसैनिकांसाठी मातोश्री एखाद्या श्रद्धास्थानापेक्षा कमी नाही. दिवस-रात्र लोकांचे जाणे-येणे असते. नवीन लग्न होऊन आले तेव्हा मी मातोश्रीवर शिवसैनिकांचे , अन्य पक्षांच्या नेत्यांचे , कितीतरी बड्या मंडळींचे जाणे-येणे पाहिले आहे. एका परिवाराशी , कुटुंबाशी समरस झालेला शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. शिवसेनेची बांधणी , जडण-घडण आणि विस्तार सारे काही ठाकरे परिवाराशी जोडलेले आहे. ठाकरे आणि शिवसेना दुधात साखरेसारखे मिसळलेले आहे. आमचे घरदेखील पक्षाच्या कार्यालयासारखेच आहे.


मीनाताई किती प्रेमाने शिवसैनिकांचे स्वागत करायची ते मी पाहिले आहे. त्या त्यांचे सुख-दु : ख समजून घ्यायच्या. त्यांच्या घरातली पूजा , लग्न अशा अनेक प्रसंगांना त्या उपस्थित असायच्या. शिवसेनेत नसूनही त्या शिवसेनेचा मोठा हिस्सा होत्या. या नात्याला तुम्ही काय म्हणाल ? काय तुम्ही असं म्हणाल की , त्यांना राजकारणात प्रवेश करण्याचा मोह होता. हे सारं त्या राजकारणात सामिल होण्यासाठी करत होत्या ? मी पण तेच करतेय ज्याची ठाकरे कुटुंबाला गरज आहे. कोणी याला राजकारण म्हणू दे किंवा राजकीय महत्वकांक्षा. मला त्याने फारसा फरक पडत नाही.


काहीजणांनी उद्धवच्या फोटोग्राफीच्या छंदावर टीका केली. जसं काही फोटोग्राफी करणं हा गुन्हाच आहे. ठाकरे परिवाराला कलेची देणगीच आहे. बाळासाहेब कार्टूनिस्ट आहेत. उद्धव यांना फोटोग्राफीची आवड आहे. खूप कमीजणांना माहितेय की ते सुंदर पेंटिंग्जही काढतात. आमचा मोठा मुलगा आदित्य कविता करतो. छोट्या तेजसला पशु-पक्षी यांची आव़ड आहे. त्याच्याजवळ पशु-पक्ष्यांची माहिती देणारी २०० ते ३०० पुस्तकं आहेत. आम्ही सिंगापूरला प्राणीसंग्रहालय पाहायला गेलो होतो तेव्हा त्याने प्रत्येक प्राण्याविषयी आम्हाला पूर्ण माहिती दिली होती. मुंबईतल्या झाडांविषयीची त्याची माहिती विस्मय करायला लावणारी आहे. जेव्हा आम्ही बाहेर फिरायला जातो तेव्हा उद्धव आणि तेजस निसर्गात हरवून जातात. विमानप्रवासात मुलं उद्धव यांच्याकडून पेंटिंग्ज करवून घेतात. तेव्हा आम्ही अगदीच वेगळ्या जगात असतो आणि असे दौरे मला फार आवडतात. पण..ते लवकरच संपतात आणि आम्ही ‘ मातोश्री ’ च्या जगात परत येतो.


संकट येवोत किंवा आनंदाचे क्षण , उद्धव दोन्ही परिस्थितीत सामान्याप्रमाणेच असतात. त्यांची तटस्थता मला एखाद्या संतासारखी वाटते. मागच्या वर्षीची पालिकेची निवडणूक उद्धवसाठी अग्निपरिक्षेसारखीच होती. आपल्याच लोकांनी केलेले प्रहार , राजनैतिक लोकांनी केलेले आणि मोठाल्या आव्हानांनी घेरलेलं असतानाही त्यांनी यश खेचून आणलं. त्यांच्यासाठी यापेक्षा मोठा आनंदाचा आणि गर्वाचा क्षण असू शकत नाही. पण शिवसेनेत मोठी फूट पडली तेव्हा उद्धव जितके शांत होते तितकेच शांत ते तेव्हाही होते।

मालवण आणि राजापुरमधील विधानसभा उपनिवडणुका हरल्यानंतर शिवसेनेत कमालीची मरगळ होती. हताशपणा होता. तो काळच वाईट होता. चारी बाजूंनी उद्धववर वार होत होते. मीडियातूनही त्यांच्या क्षमतेबाबत शंका व्यक्त केली जात होती. कोणतीच चांगली गोष्ट ऐकायला मिळत नव्हती. ‘ शिवसेना जिंदाबाद ’ असं ऐकायला माझे कान अगदी आसुसले होते. म्हणूनच श्रीवर्धनची उपनिवडणूक जिंकल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. रामटेक लोकसभा उपनिवडणूकांच्या विजयानेही मी भावविभोर झाले होते , पण उद्धववर त्याचा फारसा परिणाम नव्हता. हरण्या-जिंकण्यात त्यांचे फक्त डोळे बोलतात. हलक्या भु-या रंगाचे त्यांचे डोळे हा त्यांच्या मनाचा आरसाच आहे जणू ! त्यांच्या डोळ्यांतून आजपर्यंत ना कोणाविषयी द्वेष दिसलाय ना निराशा. कधीच नाही. आपल्या लोकांनी त्याच्यावर बिनबुडाचे आणि घाणेरडे आरोप केले तेव्हाही नाही।

कोणाला ऐकून खरं वाटणार नाही , पण गेल्या २० वर्षात उद्धव माझ्याशी मोठ्या आवाजात कधीही बोललेले नाहीत. कधीही त्यांनी एखाद्या गोष्टीवर त्यांची नाराजी दाखवली नाही. मुलांवरही त्यांचे खूप प्रेम आहे. उद्धव कधीही त्यांना ओरडत नाहीत. इद्धव अंतर्मुख आहे तर मी बहिर्मुख. म्हणूनच कदाचित आम्ही एकमेकांसाठी बनलो आहोत. संकटात आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ असतो. वाईट काळ जाण्याची वाट पाहतो. आम्हाला माहितेय की , जगात कोणतीच गोष्ट शाश्वत नाही. आमचे त्रासही नाहीत।

याबाबत मी गेल्या तीन-चार वर्षांचा उल्लेख करेन. उद्धवच्या राजनैतिक आयुष्यात जे वादळ आले त्यामुळे बडे बडे नेतेही हलले असते. पण उद्धव जराही विचलित झाले नाहीत. बाळासाहेबांचा आदर्श तर त्यांच्याबरोबर होताच. पण सगळ्यांशी टक्कर उद्धव यांना एकट्याने द्यायची होती. त्याबाबतीत ते अगदी एकटे होते. आपल्याच लोकांनी केलेले आरोप त्यांना सहन करायचे होते. चारित्र्य हननही सहन करायचे होते. मोठा कसोटीचा काळ होता तो. उद्धवने शांत राहून वार झेलले. आरोपांना उत्तर देण्याऐवजी आत्मविश्वासाने पार्टीला पुन्हा उभे राहण्यासाठी सारी उर्जा वापरली. मी कितीतरी वेळा चिडायचे. ओरडायचे. पण ते मला सांगायचे की , आपण त्यांच्याइतकं खालच्या पातळीवर नाही उतरू शकत. जर आपण त्यांना उत्तरे दिली तर आपल्याला भडकावण्याचा त्यांचा हेतू साध्य होईल. म्हणूनच शांत राहण्यातच समजूतदारपणा आहे. खरोखरीच उद्धव खूपच परिपक्व आणि धैर्यवान आहेत. याबाबतीत त्यांच्यासारखे कोणीही नाही।

लोक मला विचारतात की , तुमच्या मुलालाही तुम्हाला राजकारणातच पाहायला आवडेल का ? यावर माझं उतर असतं उद्या कोणी पाहिलायं ? त्यांना ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्रात जाऊ दे पण आमची इच्छा इतकीच आहे की त्यांनी चांगली व्यक्ती बनावं. आदित्य मागच्या वर्षी दहावी झाला. दहावीतही त्याला इकॉनॉमिक्स शिकवायचे. तेजस लहान आहे. त्याचा गृहपाठ मीच घेते. आदित्यच्या स्कॉटिश शाळेने एकदा साफ-सफाई मोहिम चालवली होती. त्याच्या शिक्षकांकडून मला कळलं की , पहिला झाडू आदित्यने उचलला होता. मला खूप आनंद झाला ते ऐकून. सध्या तो सेंट झेवियर्समधून पॉलिटिकल सायन्स घेऊन बी.ए करतोय. त्याच्या वागण्यातून तो बाळासाहेबांचा नातू असल्याचे कधी जाणवूनही देत नाही.

आयुष्यात मी संतुष्ट आहे. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागतं. नावाबरोबरच जिथे प्रतिष्ठा , ओळख आणि लोकप्रियता मिळते तिथेच जबाबदा-याही स्विकाराव्या लागतात. त्याचवेळी तुमच्या स्वातंत्र्याची रेषही आखली जाते. नाव आणि प्रतिष्ठेसाठी तुम्हाला स्वत : ला काही बंधनात बांधून घेणं आवश्यक असतं. मी आपखुशीने स्वत : ला काही आवश्यक त्या मर्यादेत बांधून घेतलंय. फक्त परिस्थितीच नाही ,
तर परिस्थितीच्या आरपार पाहणेही आता शिकले आहे।

साभार - मटा. ऑनलाईन

हिंदुंनो साध्वी प्रज्ञाच्या पाठीशी उभे रहा - साहेब


राष्ट्राच्या मुळावर उठणा-या कुठल्याही दहशतवादाला आम्ही कधीच पाठिंबा दिलेला नाही. किंबहुना, अशा दहशतवादाचा निषेधच व्हायला हवं. पण मुस्लिम धर्मांधांना खुश करण्यासाठी होतकरू तरुणांना ' हिंदू दहशतवादी ' ठरवण्याचा उफराटेपणा काँग्रेसनं चालवला आहे. अशावेळी साध्वी प्रज्ञा, समीर कुलकर्णी आणि मेजर रमेश उपाध्याय यांच्या पाठीशी हिंदू समाजानं खंबीरपणे उभं राहायला हवं, असं आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलंय.

हिंदूंनी नामर्द आणि गांडू बनून जगावं आणि इस्लामी आक्रमकांनी आमच्या पिढ्याच्या पिढ्या नष्ट कराव्यात हेच काँग्रेसवाल्याचं धोरण असेल तर या तिघांचं काय चुकलं ? मुसलमानी मतांसाठी येथील राज्यकर्त्यांनी जे कृपाछत्र धर्मांधांवर धरलं आहे, ते दूर झालं तर हिंदूही आपल्या आईच्या दुधाची ताकद दाखवून देईल. देशातील बेगडी निधर्मीवाद्यांना अफझल गुरू प्यारा असेल तर आम्ही आक्रमक हिंदू तरुणांवर प्रेम का करू नये ?, अशी पाठराखण बाळासाहेबांनी ' सामना ' च्या अग्रलेखातून केली आहे.

दरम्यान, या तिघांना कायदेशीर लढाई लढण्यासाठी शिवसेनेतर्फे मदत केली जाईल, वकील दिला जाईल, अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा हायजॅक केला असताना, आता शिवसेनेनं पुन्हा आक्रमक हिंदुत्वाची कास धरली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसनं साध्वी प्रज्ञा सिंग, समीर कुलकर्णी आणि निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांना अटक केली आहे. त्यांच्या नार्को टेस्टची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेनं आपल्या मुखपत्रातून या त्रयीला पाठिंबा जाहीर केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. पण बाळासाहेबांनी अग्रलेखातून मुस्लिमविरोधी परखड मतं मांडली आहेत.

मालेगाव स्फोटांप्रकरणी ज्या अटका होत आहेत ते सगळे सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोक आहेत. पण त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांना ' हिंदू दहशतवादी ' ठरवलं जातंय. एटीएसवाल्यांच्या म्हणण्यानुसार, या स्फोटांमागे खरोखरच हिंदू असतील तर त्यांच्यावर तशी वेळ का आली, याचा विचारही करायला हवा, असं बाळासाहेबांनी नमूद केलंय. आज हिंदू सर्वत्र मार खातोय तो सरकारी कृपेनं. हिंदू जरा कुठे उसळी मारू लागला की त्याला दाबता येईल तेवढं दाबायचं आणि मुस्लिम धर्मांधांना खुश करायचं. त्यांना जणू संदेशच द्यायचा की, ' बघा बघा, हिंदूंना त्यांच्याच देशात आम्ही कसे भरडतोय आणि चिरडतोय. उद्या निवडणुका आल्या म्हणजे विसरू नका. ' साध्वी प्रज्ञा, कुलकर्णी आणि मेजर उपाध्याय यांना अटक करण्यामागे नेमकं हेच कारण आहे, असा आरोपही त्यांनी केलाय.

अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे, हे वाक्य वारंवार ऐकायला मिळतं. पण हिंदूंचे रक्षण करू आणि बांगलादेशी किंवा धर्मांध पाकप्रेमी मुसलमानांना धडा शिकवू, असं कुणी काँग्रेसवाला बोलल्याचं आठवतंय का ? , असा सवाल बाळासाहेबांनी केलाय। सरकार हिंदूंच्या मागे नसेल तर, होतकरू हिंदूंच्या मागे आपणच उभं राहायला हवं आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असंही त्यांनी जाहीर केलंय.

साभार - मटा. ऑनलाईन

Thursday 4 September, 2008

"सध्याच्या राज्यकर्त्यांमुळेच महाराष्ट्र मागे'

साम मराठी' वाहिनीच्या "महाराष्ट्र कोणाचा' या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची पत्रकार राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली. त्यातील काही अंश...
राजू परुळेकर - राज्यापुढील अक्राळविक्राळ समस्या सोडविणे सोपे नाही, असे वाटते का, की समस्या ही एक संधी आहे, असे वाटते?
उद्धव ठाकरे - समाजसुधारणा, इतिहास, राजकारण, प्रबोधन कोणत्याही क्षेत्रात संपन्न अशी माणसे राज्याने दिली आहेत. अशी परंपरा असलेले राज्य दिवसागणिक मागे पडताना पाहून अंतःकरण तीळतीळ तुटते. या समस्या सुटू शकतच नाही का? या समस्या निर्माण कशा झाल्या? विरोधक म्हणून मला आगपाखड करावयाची नाही; पण प्राधान्याने गुन्हेगार कोण असतील, तर ते राज्यकर्ते आहेत.

युतीसह सर्व राज्यकर्ते जबाबदार आहेत?
युतीच्या काळात जेवढी कामे झाली, त्याच्याआधी व नंतरही एवढी कामे झाली नाहीत. गेली ८-९ वर्षे आघाडीचे सरकार आहे व विजेचे संकट खूप मोठे आहे. मी सिन्नरला गेलो होतो, तेव्हा एका शेतकऱ्याने सांगितले, की चार दिवस झाले आमच्याकडे वीजच आलेली नाही.

एन्‍रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडविण्याची चूक युतीने केली. हे कारण वीजसंकटामागे आहे का?
एन्‍रॉन हा एकमेव प्रकल्प राज्यासाठी आहे का? दुसरे कोणतेच प्रकल्प दिसत नाहीत? एन्‍रॉनमुळे किती वीज राज्याला मिळणार आहे? आम्ही काय केले? तो आम्ही बंद पाडला नाही. आधीच्या सरकारने जो करार केला होता, त्यातील राज्याला वाईट, अहितकारक गोष्टी आम्ही बदलून घेतल्या. एन्‍रॉनकडे बोट दाखवून सरकारला पापातून सुटका करून घेता येणार नाही. गेल्या ९ वर्षांत इतर किती प्रकल्प सरकारने आणले व वीजनिर्मिती केली?

शिवसेनाप्रमुखांबरोबर काम केलेल्या नेत्यांची पिढी आता उरली नाही, तर काही नेत्यांनी शिवसेना सोडली. सत्ता मिळाल्यावर शिवसेनेकडे चांगला प्रशासकीय अनुभव असलेले किती नेते आहेत?
शिवसेनेला आपण प्रबळ पक्ष समजत असल्याबद्दल धन्यवाद. गेल्या २-३ वर्षांत काहींना बाळासाहेबांनी काढले, तर काही सोडून गेले. त्यानंतर शिवसेना संपली, उद्धव ठाकरे कारकुनी करणारा आहे, हे सगळे आरोप मी सहन केले. बाळासाहेबांचे आशीर्वाद भक्कमपणे माझ्यामागे नसते व कार्यकर्त्यांचे बळ माझ्या पाठीशी नसते, तर तुम्ही मला मुलाखतीसाठी बोलावले नसते.

ज्याअर्थी तुमच्यावर जोरदार टीका होते, त्याअर्थी तुम्ही प्रबळ आहात?
शिवसैनिकांना अजून कोणी ओळखलेले नाही. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना दुःख दिले, त्यांना शिवसैनिक कधीही आपले समजत नाहीत. माफ करीत नाहीत.

प्रशासकीय ताकद असलेली माणसे पक्षाकडे नाहीत?
राहुल गांधींना जर पंतप्रधान म्हणून बघितले जाते, तर शिवसेनेकडे संशयाच्या नजरेतून पाहण्याची गरज नाही.

मराठीच्या मुद्‌द्‌यावर स्थापन झालेली शिवसेना उत्तर प्रदेशमधून येणाऱ्यांचे लांगूलचालन करीत आहे. जैनधर्मीय मराठी लोकांना घरे नाकारतात. परप्रांतीयांची दंडेलशाही वाढत आहे. याकडे तुम्ही कसे पाहता?
शिवसेना आणि मराठी माणूस यांचे नाते तुटलेले नाही व तुटणार नाही. जे कोणी असे म्हणत असेल, शिवसेनेने मराठीचा मुद्दा सोडला आहे, तर ते राजकीय आंधळे असतील. आम्ही मराठीसाठी लढतच आहोत आणि हिंदुत्वाचा मुद्दाही तेवढाच महत्त्वाचा आहे. आपण थोडेसे मागे गेलो, तर १९८७ ची विलेपार्ल्यातील पहिली पोटनिवडणूक अशी होती, की जी हिंदुत्वाच्या मुद्‌द्‌यावर जिंकलेली निवडणूक होती. आम्ही गेट वे ऑफ इंडियापुढे जाऊन कोणाला बोलावत नाही, की इकडे या आणि घरे बळकावा.

भाजप हा बनियांचा पक्ष आहे. बनियांचा अजेंडा शिवसेनेवर लादला आहे का? त्यामुळे शिवसेनेचा लढाऊ बाणा दबला गेला आहे का? रस्त्यावर शिवसेनेची ऍक्‍शन दिसत नाही?
खासगी सुरक्षा संघटनांचा विषय असेल, तर आपण त्यांची मानगूट पकडू. त्यात परप्रांतीय का येत आहेत? मराठी माणसाने यात काम केले पाहिजे व त्या जागा भरल्या, तर परप्रांतीयांना जागा मिळणार नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आज होत आहेत. खरे भूमिपुत्र ते आहेत. ते मराठी नाहीत का? ठाणे जिह्यातही कुपोषण होत आहे. तिथे सरकारी आकडेवारीनुसार २९० बालके मृत्युमुखी पडली. ते आदिवासी असले, तरी मराठी नाहीत का? त्यांना सोडून दिले आणि नुसता मराठीचा मुद्दा लावून धरला, तर काहीच होणार नाही.

नारायण राणे भाजपमध्ये जाण्याची दाट शक्‍यता आहे?
मी अजूनही माणूस शोधतोय, की जो केमिस्टकडे जाऊन डोके दुखण्याची गोळी मागेल.

शिवसेना-भाजप युती तुटली, तर शिवसेना स्वबळावर सत्ता मिळवू शकते?
युती तुटेल, असे वातावरण सध्या नाही व तसे आमच्या मनातही नाही.

युतीत तणाव असताना भाजपच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युतीसाठी बैठकी झाल्या होत्या. अशा मित्रावर विश्‍वास ठेवून सत्ताधारी आघाडीला पराभूत करणे सोपे आहे?
एक व्यक्ती म्हणजे पक्ष होऊ शकत नाही. आमचा जनतेवर अधिक विश्‍वास आहे. बाकीचे विषय गौण ठरतात. आजचा महाराष्ट्र हा गुंडागर्दीचा आहे, शेतकऱ्यांचा राहिलेला नाही, घुसखोरांचा झाला आहे. सत्ता असताना बांगलादेशींना आम्ही सरहद्दीवर नेऊन सोडत होतो. मला बॉंबस्फोटांची चिंता असून, तिकडे कोणी बघत नाही. एमआयडीसी बंद आहेत. कारखाने बंद पडत आहेत. एसईझेडच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. तुम्हाला खुर्ची हवी आहे ना, मग फर्निचरच्या दुकानातून खुर्ची आणून त्यावर मुख्यमंत्री म्हणून बसा. कोणी विचारायला येणार नाही.

गोपीनाथ मुंडे अनुभवी राजकारणी आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी ते प्रयत्न करणार. हे शिवसेनेसाठी त्रासदायक नाही का?
याची उत्तरे निवडणुकीनंतरच मिळतील.

शिवसेनाप्रमुखांनी सर्वस्व मानून कोणतीच प्रशासकीय जबाबदारी स्वीकारली नाही किंवा प्रशासकीय पद स्वीकारले नाही. तुम्ही मुख्यमंत्रिपद घेणार का?
मी पंतप्रधान, मुख्यमंत्री अशी कोणतीही वैयक्तिक स्वप्ने पाहत नाही. स्वप्नांना कोणताही आधार नसतो. भलीभली माणसे स्वप्नातून कधी जागी झालीच नाहीत व अशीच संपून गेली.

महाराष्ट्र समृद्ध करावयाचा असेल, तर प्राधान्याने करावयाच्या कोणत्या बाबी आहेत?
मुलांच्या शिक्षणापासून प्रश्‍न सुरू होतो. चांगल्या शाळेत मुलांना प्रवेश देणे, शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयात प्रवेश आणि पदवीनंतर नोकरी मिळवून देणे, हे शहरी प्रश्‍न झाले. ग्रामीण भागात वीज भारनियमनाचा मोठा प्रश्‍न आहे. दिवसभर वीजच नसते. मुलांना घरी अभ्यास करायचा असेल, तर वीज नाही. शुभंकरोती कल्याणम्‌, ही आपली परंपरा आहे; पण दिवेलागणीला घरी वीज नाही.

हिंदुत्व ब्रॅंडची ताकद प्रचंड होती व केंद्रात सरकार आले. हिंदुत्वाच्या ब्रॅंडखाली आता काय कामे सुरू आहेत?
ज्या ज्या वेळी देशावर संकटे आली, त्या वेळी महाराष्ट्रातून कोणी तरी उभा राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वा. सावरकर, डॉ. हेडगेवार अशी उदाहरणे आहेत. हिंदुहृदयसम्राट म्हणून जे देशात ओळखले जातात, ती अस्सल मराठी व्यक्ती आहे. हिंदुत्व व मराठी या गोष्टी वेगळ्या नाहीत. कॉंग्रेसने ज्या जातीपातीच्या भिंती उभ्या केल्या आहेत, त्या आता हळूहळू तुटायला लागल्या आहेत.

महापालिका आयुक्तांनी आदेश काढूनही अनेक आस्थापनांनी मराठी पाट्या बदलल्या नाहीत. शिवसेना रस्त्यावर उतरून याला उत्तर देणार की नाही?
ही जबाबदारी घ्यायला मी तयार आहेच. त्याबाबत मला लाज वाटण्याचे कारण नाही. मी शांत, संयमी आहे, असे माझ्यावर आरोप होत आहेत. हे करायला आम्ही मागेपुढे पाहत नाही; पण ज्यांना सांगून कळत नाही, त्यांना कायद्याचा बडगा आहे. प्रशासन असमर्थ ठरले, तर शिवसेना आहेच.

शिवसेनेचे किती खासदार व आमदार निवडून येतील?
जेवढ्या जागा शिवसेना लढवेल, तेवढ्या सगळ्या जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार. मी रात्रंदिवस मेहनत करीन. भगवा लोकसभा व विधानसभेवर या निवडणुकीत फडकावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.

राणे यांना शिवसेनेतून काढले. वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांनी जाहीर रीतीने केले. त्यांची माणसे पक्षातून गेली. या काळात मनाचा समतोल कसा टिकविला?
आमच्या कुटुंबीयांनीही माझ्यावर आरोप केले होते. असा शत्रू कोणाला लाभला नसेल. शिवसैनिकांचे ऋण मी जन्मोजन्मी विसरू शकणार नाही. शिवसेनाप्रमुख माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. मी खरा आहे की खोटा आहे, ते त्यांना माहीत आहे. त्यांनी मला खंबीरपणे सांगितले, तुझी भूमिका बरोबर आहे, एक ना एक दिवस जनता तुझ्या पाठीशी आल्याशिवाय राहणार नाहीत. संजय दत्त खलनायक म्हणून लोक विसरले होते. खलनायक म्हणून रोज वृत्तपत्रांतून माझेच नाव येत होते. पण घरातील सर्वांनी माझ्यावर विश्‍वास दाखविला .

शरद पवार यांनी या काळात तुम्हाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष साथ दिली?
शिवसेनेला जशास तसे आक्रमकपणे उत्तर द्या, असे ते गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या बैठकीत बोलले आहेत. मी लहान मुलांच्या टीकेकडे लक्ष देत नाही, असे ते मध्यंतरी बोलले होते. आता शिवसेनेकडे लक्ष द्या असे सांगितले आहे.

मुंबईत छटपूजा झाली पहिजे की नाही?
यावर सर्व राजकीय पक्षांनी बोलले पाहिजे. एका पक्षाला कात्रीत पकडून चालणार नाही. याबाबत बोलताना आपण आपल्या व्यवसायापासून सुरवात केली पाहिजे. बांधकाम कंपनी असेल, तर तिथे गवंडी मराठी पाहिजे. तो बिहारी किंवा परप्रांतीय चालतो आणि मग छटपूजेला मी विरोध का करतो? यासाठी स्पष्ट भूमिका पाहिजे. विरोध करायचा असेल, तर स्वतःपासून आचरण केले पाहिजे.
----------------------------------------------------------
शिवसेना संपली, उद्धव ठाकरे कारकुनी करणारा आहे, हे सगळे आरोप मी सहन केले; परंतु आरोप करणाऱ्यांची तोंडे बंद होतील.
----------------------------------------------------------

Friday 15 August, 2008

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!



जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे्
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे ।।धृ।।

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति संपदांची
स्वतंत्रते भगवति। श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती। चांदणी चमचम लखलखशी।।

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती। तूच जी विलसतसे लाली
तूं सुर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रते भगवती। अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ।।

मोक्ष मुक्ति ही तुझीच रुपें तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती। योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतंत्रते भगवती। सर्व तव सहचारी होते ।।

हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।

हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आला
होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला
सुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वां त्यजिला ।।

स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला
ही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतां
कां तुवां ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्यांची दासी झाली
जीव तळमळे, कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें दे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।

Wednesday 30 July, 2008

मतांसाठी देशावर लाचारी लादणारे राज्यकर्ते

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातच लोकशाहीतील मतांच्या राजकारणासाठी त्याच देशाच्या निरपराध नागरिकांचे मुडदे पाडले जात आहेत. देशातील मुस्लिम वोट बँक आपल्याकडेच राहावी यासाठी हे सगळे सुरू आहे. खरेतर मुस्लिम एवढी लाचार का झाले आहे याचे उत्तर सर्वसामान्य मुस्लिम सुद्धा देऊ शकणार नाही.

मागच्या आठवड्यात शुक्रवारी देशातील सर्वात मोठ्या आयटी सिटी बंगळूरु मध्ये भर दिवसा सात साखळी बॉम्बस्फोट झाले. दुसर्‍या दिवशी हिंदु नेते नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेतील अहमदाबाद शहरात तर तब्बल १७ बॉम्बस्फोट झाले. या दोन्ही शहरातील घातपातामध्ये शेकडो निरपराध लोकांचे प्राण गेले. इतके कमी म्हणूनच कि काय पुढील सलग चार दिवस जवळ जवळ २५ जिवंत बॉम्ब गुजरातमधील सुरत शहरात निकामी करण्यात सुरक्षा जवानांना यश मिळाले. विचार करा हे सगळे स्फोट झाले असते तर किती मोठी हाणी झाली असती? मागिल काही बॉम्बहल्ल्यात एक धागा समान आहे तो म्हणजे बॉम्बहल्ले भाजपा शासित राज्यात होत आहेत म्हणजेच कुठेतरी भाजपाला धडा शिकवण्याचा हा प्रयत्न आहे म्हटले तरी काहीच गैर नाही.

आतंकवादी हल्ले हे हिंदुस्थानसाठी किंवा हिंदुस्थानी जनतेसाठी नविन नाहीत. सर्वाधिक आतंकवादी हल्ले आपल्याच देशात झालेले आहेत. काश्मिर मध्ये रोजच असे हल्ले होतच असतात, किंवा पाकिस्तान सिमेवर आमचे जवान निष्कारण मारले जातच आहेत. मुंबई आतंकवाद्यांचे एक नंबरचे टारगेट आहेच. त्यानंतर देशातील इतर भागातील हिंदु मंदिरे, मार्केट आणि अपवादात्मक मुस्लिम वस्त्यांमध्ये आतंकवादी निरपराधांचे बळी घेतच आहेत.

मुंबईतील ११ जुलैच्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोटाच्या जखमा आजही तशाच आहेत. रोज रेल्वेने प्रवास करणारा मुंबईकर आपले जीव मुठीत घेऊनच आल्या दिवसाला सामोरा जात असतो. संध्याकाळी जेव्हा घरी पोहचतो तेव्हा एक एक दिवस जगल्याचे समाधान मिळते. रेल्वेमध्ये आतंकवादी कधी बॉम्ब फोडतील हे कोणालाही माहिती नाही. सुरक्षा जवान किंवा कोणीही राज्यकर्त्यांपैकी मुंबई सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. चर्चगेट रेल्वे स्थानकात मेटल डिटेक्टर लावल्याने संपूर्ण रेल्वेमार्ग कसा सुरक्षित राहिल हेसुद्धा एक न सुटणारे कोडे आहे. परवाच एका न्युजचॅनेलने रात्री रेल्वे स्थानकात जाऊन दाखविले कि सुरक्षतेचे कसे तिनतेरा वाजले आहेत. त्या स्थानकावर रात्रीच्या वेळी एकही पोलिस किंवा इतर सुरक्षा जवान नव्हता.

एनडीए सरकारच्या काळात आतंकवादाविरोधात लढण्यासाठी पोटा हा विशेष कायदा बनविला होता. नंतर जो बर्‍याच देशांनी त्यांच्या देशात असा कायदा अंमलात आणला. पण आताचे युपीए सरकार सत्तेत आल्यानंतर बहुमताच्या जोरावर रद्द करण्यात आला. यामागे सर्वसामान्य मुस्लिमांना या कायद्याने त्रास दिला जात असल्याचे कारण सांगण्यात आले. यानंतर मात्र आतंकवाद्यांनी हिंदुस्थान आंदण मिळाल्यासारखे बॉम्ब पेरण्याचे सत्र सुरू केले.

लोकशाहीचे मंदिर म्हणजेच संसद भवन उडवण्याच्या कटात सामिल असलेला आणि ज्याला सुप्रीम कोर्टाने फाशीची सजा दिलेली आहे अशा अफजल गुरूला फाशी देण्यात हे युपीए सरकार टाळाटाळ करत आहे. कदाचित येत्या सार्वत्रिक निवडणूकांपर्यंत तरी त्याला सजा मिळण्याची शक्यता कमीच आहे, आणि जर कदाचित हे युपीए सरकार पुन्हा सत्तेत आले तर हेच अफजल गुरु आपल्या देशाचे पंतप्रधानही बनतील. सर्वसामान्य निरपराध्यांचे प्राण घेणार्‍या देश द्रोह्यांच्या मागे मानवी हक्क आयोगवाले उभे राहतात पण ज्यांच्या जीवावर हे सत्ताधारी निवडून आलेत त्या जनतेच्या मागे हे उभे का राहात नाही? २० कोटी मुस्लिमांच्या मतांना एवढे महत्त्व का मिळते? बॉम्बहल्ले झाल्यानंतर पाकिस्तान आतंकवाद्यांना संरक्षण देते म्हणून बोंबलायचे आणि स्वतः मात्र मतांसाठी पकडले गेलेल्या आतंकवाद्यांना सोडायचे मग पाकिस्तान आणि आपल्यात फरक तो काय?

हिंदु बहुसंख्य असलेल्या या देशाला धर्मनिरपेक्ष देश मानले जाते मग हे सरकार धर्मनिरपेक्षासारखे वागते का? मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळणे म्हणजे निधर्मीपणा म्हणू शकतो का? आणि जर देशातील सर्वधर्मियांना समान कायदा लागू करून समान अधिकार द्यायचे नसतील तर अल्पसंख्य मुस्लिमांचे इस्लामी राष्ट्र म्हणून या देशाला मान्यता तरी द्या म्हणजे निदान आपले अधिकारच नाहीत म्हणून हिंदू आपले हात तरी पुढे करणार नाहीत. म्हणजे कसे साप पण मेला आणि लाठीही वाचल्यासारखे होईल नाही का!

अमित चिविलकर

Tuesday 8 July, 2008

नानांना विनम्र अभिवादन

|| श्रीराम समर्थ ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||


जेष्ठ निरुपणकार आणि महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे आज पुण्याच्या दिनानाथ रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. नानांच्या जाण्याने जगातील लाखो समर्थ सेवकांमध्ये शोककळा पसरली आहे.

नानांनी दासबोधाच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये बैठका चालवून आपले कार्य सुरू केले. मौखिक निरूपणाद्वारे व्यसनमुक्ती, अज्ञान, अंधश्रद्धा, स्त्रीयांवरील अत्याचार, बालसंस्कार केंद्र, प्रौढ शिक्षण आणि वृक्षारोपण आदि वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला समाजाला सन्मार्गाला नेण्याचे कार्य केले. नानांना रायगड भूषण, शिव-समर्थ, डि-लिट तसेच हल्लीच महाराष्ट्र भूषण इत्यादी पुरस्कारानी सन्मानित करण्यात आलेले आहे. कुठल्याही प्रसिद्धीशिवाय समर्थांच्या बैठका गेली ६५ वर्षे अखंडपणे सुरू आहेत.

नानांना माझ्या कुटुंबियांतर्फे भावपूर्ण आदरांजली!

Thursday 19 June, 2008

झंझावताची ४२ वर्षे..



१९ जुन १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य आणि हक्कासाठी लढणारी संघटना, शिवसेनेची स्थापना प्रबोधनकारांच्या आशिर्वादाने झाली. शिवसेनेची सर्व सुत्रे शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेबांनी आपल्याच हाती घेतली. शिवसेनेची सभासद नोंदणी सुरु झाली. त्यावेळी 'रविवारची जत्रा' मध्ये एक ओळ यायची 'शिवसेनेचे सभासद व्हा!' दर आठवड्याला हजारो लोक शिवसेनेचे सभासद होत होते. सर्व सभासदांना मार्गदर्शन करण्याचे ठरले.

सभा कुठे घ्यावी याची चर्चा सुरु झाली. अनेक सभासदांचे म्हणणे होते कुठेतरी एखाद्या सभागृहात सभा घ्यावी. पण साहेबांना जबरदस्त आत्मविश्वास होता त्यांनी सांगितले कि, ' पहिली जाहिर सभा शिवाजी पार्कलाच होईल.'

सभेची तयारी सुरु झाली. सर्वांना शंका वाटत होती सभा यशस्वी होईल कि नाही. सभेची तारीख विजयादशमीची ३० ऑक्टोबर १९६६ ठरली. त्यानंतर सर्वांना माहितच आहे एक झंझावत आजपर्यंत महाराष्ट्रात घोंघावतच आहे.

तीन वर्षापूर्वी दोन फुसक्या बारांनी शिवसेनेला हादरे देण्याचा प्रयत्न केला. स्वकियांनी केलेल्या गद्दारीचा साहेबांना जरूर प्रचंड दु:ख झाले. प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये एकच कोलाहल सुरू झाला 'आता शिवसेना संपली'. पण मराठी माणसाच्या काही वेगळेच होते. त्याला शिवसेना मनापासून हवी होती म्हणूनच राजकाराणात नविन असूनही माननिय कार्याध्यक्ष श्री. उद्धवजींनी या काळात शिवसेनेचे खंबीर नेतृत्व करून पुन्हा एकदा शिवसेनेला तेच वैभव प्राप्त करून दिले.

पक्षातून गेलेल्या गद्दारांना केवळ एकाच वर्षात त्यांची लायकी दाखवून दिली. आज शिवसेना जबरदस्त ताकदिनिशी वाटचाल करत आहे. श्रीवर्धन पोटनिवडणूकीपासून ते परवाच्या ठाणे लोकसभा पोटनिवडणूकीपर्यंत शिवसेनेची विजयी घौडदौड मा. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. नविन नविन संघटना, लोक आणि तरूण शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत. मंत्रालयावर जशी गर्दी असते किंबहुना तशीच गर्दी आज मातोश्री आणि शिवसेना भवनवर दिसते. शेतकरी मेळावे आणि इतर योजनाबद्ध आंदोलनामुळे जनतेमध्ये उद्धवजींबद्दल प्रचंड विश्वास आहे. तोच विश्वास शिवसेनेला विधानसभेत नेईल हेच संकेत आज दिसत आहेत.

शिवसेनेच्या ४२व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा!

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

Saturday 14 June, 2008

'राजाशिवाजी डॉट कॉम' संकेतस्थळ पुन्हा व्यवस्थित सुरु झाले

कालच माझ्या ब्लॉगवर लिहिलेल्या "हे महाराजांचे दुर्दैव आणि काय?" लेखाची दखल घेऊन 'राजाशिवाजी डॉट कॉम' हे महाराजांवरील संकेतस्थळ पुन्हा सुस्थितीत सुरू केले गेले आहे. म्हणून मी संचालकांचे आभार मानतो.

नक्की भेट द्या : www.rajashivaji.com

आपला,
अमित चिविलकर

Thursday 12 June, 2008

हे महाराजांचे दुदैव आणि काय?

कालच ऑर्कुटवरील शिवसेना कम्युनिटीच्या पाठपुराव्यामुळे शिवाजी महाराज तसेच मराठा साम्राज्याचा उल्लेख नसल्याबद्दलचा लेख मटा मध्ये प्रकाशित झाला. केंद्र सरकारच्या www.india.gov.in या संकेतस्थळावर know India अंतर्गत Medieval History सदरात मुघल, शिख, विजयनगर आणि इतर साम्राज्याची दखल घेतली गेली असतानाच महाराष्ट्राचे आराध्यदैवत छ्त्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याची उल्लेखही टाळला आहे.

अशाच प्रकारचा काहिसा प्रकार आज पहायला मिळाला. नेटवर सर्फिंग करत असताना सहजच 'राजाशिवाजी डॉट कॉम' या संकेतस्थळावर भेट दिली असता एकदम धक्काच बसला.ब्राउजर मध्ये www.rajashivaji.com टाईप केले असता हे संकेतस्थळ दुसर्‍याच एका संकेतस्थळाला जोडले गेले असल्याचे समजले. शिवाजी महाराजांबद्दल माहिती घेण्यासाठी येणार्‍यांची अशी निराशा करण्यामागे काय हेतू असेल?

''राजाशिवाजी डॉट कॉम' चे गेल्यावर्षी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे फोटोंचे प्रदर्शन टि.व्ही. वर पाहिले. त्याचप्रसंगी 'राजाशिवाजी डॉट कॉम' चे संचालक मिलींद वेर्लेकर यांनी या संकेतस्थळावर नेटवरील इतर कोणत्याही संकेतस्थळापेक्षा जास्त महाराजांच्या गडकिल्ल्यांचे फोटो टाकून एक जागतिकविक्रम होणार असल्याची माहिती दिल्याचेही आठवते.

'राजाशिवाजी डॉट कॉम' हे संकेतस्थळ शिवाजी महाराजांशी संबंधीत आहे. भले ते खाजगी संकेतस्थळ असेल पण जेव्हा शिवाजी महाराजांचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येक मराठी माणसाच्याभावनांचाही प्रश्न येतो. संचालकांना हे नक्किच माहित असले पाहिजे. शिवाजी महाराजांवर जर संकेतस्थळ बनविले असेल तर त्याची जबाबदारीही समजायला हवी. जरकाही अडचणी असतील तर इतर संकेतस्थळाला जोडण्यापेक्षा एखादी सुचना लिहिली असती तर खुपच चांगले झाले असते.

शिवाजी महाराजांशी संबंधीत या दोन घटना दुर्दैवी आहेत. एका ठिकाणी केंद्र सरकारचा हलगर्जीपणा. तर दुसरीकडे एक मराठी माणूस जो शिवाजी महाराजांना आराध्यदैवत मानतो आणि अशा चुका करतो....

Monday 2 June, 2008

शिवसेना ऑर्कुट सभासदांची पहिली बैठक

शिवसेनेच्या इंटरनेटवरील ऑर्कुट कम्युनिटीच्या सभासदांची बैठक काल शिवाजी पार्क येथे झाली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इंटरनेटच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी हि पहिली बैठक झाली. इंटरनेटवर हजारो शिवसैनिक ऑर्कुटसारख्या वेबसाईटवर आपली मते रोजच मांडत असतात. परंतु हि मते आणि त्यांची भुमिका फक्त इंटरनेटवरच मर्यादित न राहता प्रत्यक्ष काम कसे करता येईल तसेच आजच्या इंटरनेट्च्या युगात शिवसेनेच्या कामाला आधुनिक स्वरूपात लोकांसमोर मांडून शिवसेनेची भूमिका स्पष्ट करता यावीयासाठी अशा प्रकारच्या सभा पुढेही घेण्यात येतील.

या बैठकीत सभासदांनी काही मुद्द्यांवर चर्चा करून पुढील योजना आखल्या आहेत त्या अशा:
१. पुढील बैठकिला जास्तीत जास्त शिवसैनिकांना एकत्र आणणे. (किमान २५ तरी)
२. पुढची बैठक कुठेतरी छोट्याशा सभागॄह किंवा शाळेच्या वर्गात घेणे.
३. जास्तीत जास्त शिवसैनिकांना सोबत घेऊन उद्धवसाहेबांना याबद्दल माहीती देऊन मार्गदर्शन घेणे.
४. भा.वि.से. चे अध्यक्ष किंवा इंटरनेटवर कार्यरत असणार्‍या नेत्याशी संलग्न राहणे. (किंवा उद्धवसाहेब देतील तो नेता)
५. इंटरनेटच्या माध्यमातून सामाजिक कामे करणे.
६. एखादी वेबसाईट तयार करून त्यावर इंटरनेट शिवसेनेची कामे, बैठकांची माहिती देणे. तसेच फोरम बनविणे किंवा http://shivsena.freeforums.org वर प्रतिक्रिया देणे.

कालच्या बैठकिला उपस्थित असलेले शिवसैनिक आणि त्यांचे फोन नंबर.

१. विनोद ९३२१९२६२४४/९८२०६०९३१६-चुनाभत्ती.
२. विवेक ९८३३६२५८५२-वाशी.
३. अभिषेक ९८३३६७४९८३-कुर्ला.
४. नागनाथ टी.गजरे ९८९२८३६४१५-ऐरोली.
५. प्रतीक ९८२१७१००७३-विक्रोली.
६. सिद्ध भिडे ९८२०८१७३९७-पनवेल.
७. अमित चिविलकर ९९६९८१३२३१-मालाड.

टिप : पुढल्या सभेला उपस्थित राहणार्‍या शिवसैनिकांनी वरील कोणालाही फोन करून माहिती घेऊ शकाल.

Monday 19 May, 2008

आबा तुमचे डबडे बंद करा!

आबा पाटील म्हणजेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गॄहमंत्री आर. आर. पाटील. यांच्याकडे असलेल्या पदाशी संबधित कामे करण्याऐवजीदुसरेच काहीतरी करत बसण्यात यांना भारी आवड. सध्या ठाणे लोकसभेची पोटनिवडणूकीच्या प्रचारात तर यांनी सूर आणि तालसोडून बेताल वक्तव्य करण्याचेच ठरविलेले दिसते.

म्हणे 'शिव'वडा नावामुळे शिवाजी महाराजांची बदनामी होतेय. आबा तुम्ही म्हणताय हे? अहो, एका परदेशी जेम्स लेनने महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल घाणेरडे लिखाण लिहिले. त्याच्या मुसक्या बांधायला हव्या होत्या. पण तुम्ही त्या प्रकरणावर मला वाटते अजुन अभ्यास करत बसला असाल!

ज्या भिवंडीमध्ये तुमच्या गृहखात्याच्या पोलिसांचे धर्मांध मुसलमानांनी अक्षरशः तुकडे तुकडे केले त्यांचे तुम्ही काय वाकडे केलेत? अहो सच्चरबद्दल बोलताना म्हणता कि सच्चर साठी रस्त्यावर उतरायची तयारी दाखवता मग धर्मांध मुस्लिमांबद्दल बोलताना शेपटी घालून का बसता?

तुमच्या पक्षाची धोरणही अजबच! ज्या सोनियाला परदेशी म्हणून विरोध करता तिच्याच मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगता. (चुकिचा अर्थ घेऊ नका). तुम्हाला बंद दरवाजाच्या आतील बारबालांमुळे समाज बिघडताना दिसतो पण क्रिकेटच्या मैदानात सर्वांसमक्ष नागड्या (होय नागड्याच टिचभर चिंध्यांना कपडे कसे म्हणायचे?) नाचणार्‍या परदेशी चिअरलिडर्स चालतात.

बर्‍याच गोष्टी आहेत आबा, तुम्हालाही माहिती आहे तुमचा किती गोंधळ उडालाय ते. ठाण्यातील लोकसभा निवडणूकित तुमच्या पक्षाची अवस्था खुप वाईट आहे. कुणबी सेनेने तुमचा पाठिंबा काढून शिवसेनेला दिला. ठाण्याच्या पालकमंत्री भ्रष्ट आहे हे संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे. अशा ठाण्यात तुमचे डबडे वाजवून काहीच होणार नाही. उगाचच तुम्ही वाद निर्माण करताय. तुम्ही उद्धवजींवर वैयक्तिक पातळीवर टिका करताय कारण ह्याच उद्धवजींनी शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यांवर तुम्हाला आणि तुमच्या पवार साहेबांना पाणी पाजलेय. ठाणे लोकसभा मतदार संघ हा कायम प्रतिष्ठीत लोकप्रतिनिधीचा मतदार संघ ओळखला जातो तिथे तुमच्या गणेश नाईकचा संजिव काय दिवे लावणार आहे. उगाचच त्रास करून घेऊ नका आराम करा. कशाला स्वतःची इज्जत चव्हाट्यावर आणताय.

ताजी बातमी: आबा पाटलांच्या सुचनेची दखल घेऊन संगणक बनविणार्‍या कंपन्यांनी मेणबत्तीवर चालणारा संगणक बनवायला घेतलाय येत्या दोन वर्षात तो आबा पाटलांना समर्पित करण्यात येणार आहे.

Wednesday 14 May, 2008

राजसमर्थक राजू परूळेकरला चिन्मयचे उत्तर....

हा लेख माझा मित्र चिन्मय कुलकर्णी याने लोकप्रभा मधील एका शिवसेना विरोधी लेखनाला उत्तर म्हणून लिहिला आहे. मुळ लेख तुम्ही पुढील लिंक वरूनही वाचू शकता... http://gandharvablog.blogspot.com/2008/05/blog-post_13.html

तुम्ही तुमच्या लेखात आंबेडकर्,अत्रे यांचे वारसदार दिवाळखोर निघाले म्हटले आहे.आंबेडकरांचे राहु द्या पण अत्र्यांचे वारसदार म्हणजे आजचे पत्रकार तर नंबर एकचे दिवाळखोर आहेत.एव्हढेच नव्हे तर 'पत्रकार धर्म' विसरुन राजकीय कंपुबाजीत सगळे धन्यता मानत आहेत. राजु परुळेकरही त्यातलेच.अत्र्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातुन सतत मराठीचा मुद्दा धगधगत ठेवला.पण राजु परुळेकर मायावाती,मोदी व इतर अनेकविध विषयांवर आपली मते मांडत होते.-------------------------------------------------------


राजसमर्थक राजु परुळेकर यांस ,
आपला लोकप्रभातील 'होय हा महाराष्ट्र धर्म आहे ' हा 'अविचार' वाचला.लेख इथे वाचा -http://www.loksatta.com/lokprabha/20080509/maha.htm
लेखामधील अनेक गोष्टी बरोबर आहेत (ज्याचा मी विरोध करत नाही).अतिशय अभ्यासपुर्ण काही मुद्दे मांडले आहेत उदा.बाबासाहेब आंबेडकरांचे मुद्दे. पण ८ बरोबर मुद्द्यांमधे २ निव्वळ चुकिचे तपशील घुसवुन तेही अभ्यासपुर्ण आहेत असे भासवुन दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला आहे.मला ७०% लेखात चुक वाटत नाही.काँग्रेस नेत्यांबद्दल लिहिलेल्या गोष्टीही बरोबर आहेत.पण शिवसेनेवर केलेल्या आरोपांमधे तर निव्वळ द्वेशभावना दिसते. शिवाय सर्वात मोठा आक्षेप(जो आजकाल जवळपास सगळ्याच पत्रकारांबाबत आहे)तो म्हणजे 'राजकीय कंपुबाजी'.

तुम्ही एक वाक्य लिहिल आहे की '१९९० पासुन शिवसेनेनी महाराष्ट्र धर्माच जेव्हढ नुकसान केल आहे तेव्हढ काँग्रेसनीही केलेल नाहि'.तुमच म्हणन अस आहे की शिवसेनेनी हिंदुत्व भैय्यांसाठी पत्करल.बाळासाहेबांनी सत्तेसाठी ड्रेस बदलला. याबद्दल मी सांगु इच्छितो की बाळासाहेबांनी पुर्वीपासुनच धर्मांध मुस्लिमांविरुध्द भुमिका घेतलेली आहे. आर्.के. करंजिया यांच्या त्या काळातील प्रसिध्द 'ब्लिट्स' या साप्ताहीकाने बाळासाहेबांच्या नेहमीच्या मुस्लिम व कम्युनिस्ट विरोधी भुमिकेमुळे त्यांच्यावर अनेकदा तिखट हल्ले केले होते. बाळासाहेबांनी १९८० मधे म्हटल होत की "They [Muslims] were spreading like a cancer and should be operated on like a cancer. The...country should be saved from the Muslims and the police should support them [Hindu Maha Sangh] in their struggle just like the police in Punjab were sympathetic to the Khalistanis". १९७२ साली ए.सी.भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरावर होणार्‍या हल्ल्याविरुध्द बाळासाहेब ठाकर्‍यांकडे मदत केली होती. प्रभुपादांच्या चरित्र ग्रंथात बाळासाहेबांचा उल्लेख 'हिंदु अधिकारांसाठी लढणार्‍या नेत्यांमधील मुंबईतील सर्वात मोठा नेता' असे आहे.

तुम्ही पुढे असेही लिहिता की "हिंदुत्वाचे तुणतुणे वाजवुन शिवसेनेनी महाराष्ट्राची उर्जा दिल्ली,भैयांच्या सरंजामशाही अर्पित केली". शिवाय तुम्ही संघालाही विरोध केलेला आहेच म्हणजे एकुणच हिंदुत्व म्हणजे 'उत्तर भारतीयांपुढील लाचारी' असा तुमचा गैरसमज झालेला दिसतो.तुम्हाला मी सांगु इच्छितो की हिंदुत्व ही संकल्पनाच मुळात महाराष्ट्राने दिलेली आहे. हिंदुत्वाचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे मराठीच होते तर वासुदेव बळवंत फडकेही(father of militant nationalism and Hindutva) मराठीच होते.स्वातंत्र्यवीर सावरकरांपासुन ते हेगडेवारांपर्यंत आणि गोळवलकर गुरुजींपासुन बाळासाहेब ठाकर्‍यांपर्यंत हिंदुत्वाचे महत्वाचे नेते मराठी आहेत. लोकमान्य टिळकांनाही हिंदुत्वाचे पितामह म्हटले जाते तर तुम्ही उल्लेख केलेल्या प्रबोधनकार ठाकर्‍यांनीही 'हिंदुत्व' नावाचे पुस्तक लिहिले होते,जातीपातींच्या सीमा गाडण्यासाठी अनेक अनिष्ट प्रवृत्तींवर प्रखर टिका केली होती व त्याचप्रमाणे प्रबोधनकारांनी ख्रिश्चन मिशिनरीजच्या धर्तीवर हिंदु मिशिनरिज बनवाव्यात अशी संकल्पनाही मांडली होती.तर अशा अनेक थोर मराठी व्यक्तिमत्वांनी(बाळासाहेब ठाकरे वाचु नका) हिंदुत्व देशाला दिले.या महान लोकांच्या भुमिकेला विरोध करणे म्हणजे महाराष्ट्र धर्मालाच विरोध करणे आहे. या लोकांनी काय हिंदुत्व भैय्यांसाठी केले काय??

हिंदुत्वानीच मराठी माणुस दिल्लीवर वर्चस्व ठेवु शकतो असे मला वाटते.मागे एनडीए सरकारने काही निर्णय घेतल्यावर काँग्रेस व धर्मनिरपेक्ष पक्षांनी म्हटले होते की 'हे सरकार दिल्लितुन नाही तर नागपुर,पुण्यातुन चालते'. बाळासाहेबांनी घेतलेल्या प्रखर भुमिकेमुळे दिल्लीही हादरत असे.एक-दोन उदाहरण देतो.वाजपेयी सरकार पाकीस्तानशी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेउ लागले तेंव्हा शिवसेनेनी मुंबईतील वानखेडे स्टेडीयमचे पिच खोदले व 'मुंबईत सामना होउ देणार नाही' असे बजावले. वाजपेयींना भुमिका बदलावी लागली. दिल्ली महाराष्ट्रापुढे बिनशर्त झुकली.फारुख अब्दुल्लांच्या 'नॅशनल काँफरन्स्'ने एनडिए सरकारला पाठिंबा दिला व फारुक अब्दुला राष्ट्रपती बनवावेत अशी अट ठेवली. वाजपेयींनी ती मान्य केली. बाळासाहेब पुन्हा बरसले आणि 'ऑटोनॉमीची मागणी करणार्‍या फारुख अब्दुल्लाला राष्ट्रपती बनवु नये'. पुन्हा युपीचे वाजपेयी महाराष्ट्राच्या बाळासाहेंबांसमोर गप्प झाले. खर्‍या महाराष्ट्रप्रेमी माणसाला या गोष्टींचा आनंद होतो. अजुन एक गोष्ट सांगावी वाटते ती म्हणजे पाकिस्तानला भारताने २० दहशदवाद्यांची मागणि केल्यावर ,पाकिस्तानने 'आम्हाला बाळ ठाकरे द्या' अशी मागणि केली होती.काही पाकीस्तानी लोकांनी मला सांगितल होत की 'पाकीस्तानका बच्चा बच्चा बाल ठाकरेको जानता है और उसको गाली देता है'. भारताच्या शत्रु राष्ट्रातील लोक एका अशा माणसाला घाबरतात ज्याच्याकडे एकही पद नाही व तो माणुस माझ्या महाराष्ट्राचा आहे याचा खर्‍या महाराष्ट्रप्रेमीला अभिमान वाटतो.बाळासाहेबांच्या बोलण्याने दिल्ली तर हादरतेच पण पाकिस्तानही हादरते हे यातुन स्पष्ट होते. सरंजामशाहीची उपमा किती मुर्खपणाची आहे हे यातुन स्पष्ट आहे. तुम्ही स्वतःच लिहिता की 'उत्तर भारतावर मुघली साम्राज्याचा पगडा आहे'. मग या मुघली साम्राज्याच्या पगडा असलेल्यांसाठी बाळासाहेबांनी धर्मनिरपेक्ष राजकारण केले असते ना!!!!मुळात बाळासाहेबांनी पुर्वीपासुनच हिंदुत्व आणि मराठी हे दोन्हीही मुद्दे घेतले होते. ज्याची ज्या वेळी जास्त गरज त्याच्यावर त्या वेळी त्यांनी जास्त emphasis दिलेला आहे. तुमच्या म्हणन्याप्रमाणे जर सेनेनी मराठीत्व सोडलेच असते तर मग हिंदुत्वाच्या मुद्द्याशी फारकत घेउन प्रतिभाताईंना फक्त 'मराठी महीला' म्हणुन राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिलाच नसता.युती शासनाने परप्रांतीयांचे येणे थांबवण्यासाठी 'पर्मिट सिस्टीम'आणायचा प्रयत्न केला होता हा तपशील तुम्ही कसा काय विसरलात??बाळासाहेबांनी 'पॉप्युलॅरिस्ट पॉलिटीक्स' केलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच शिवसेना आत्तपर्यंत फक्त एकदाच शासन करु शकली आहे.हिंदुत्वाचा मुद्दा असुनही २ वर्षापुर्वी झालेल्या मुंबई बाँबहल्ल्यांनंतर ज्या मुस्लिमांनी रॅलीज काढुन हल्ल्याचा निषेध केला त्या मुस्लिमांना बाळासाहेबांनी सलाम केलेला आहे.मागच्या गणेशोत्सवात लालबागच्या गणपती समोर मुस्लिमांनी फटाके फोडून मिरवणुकिचे स्वागत केले तेंव्हा बाळासाहेबांनी अग्रलेखातुन त्या मुस्लिमांचे अभिनंदन केले होते.काही लोकांना ही बाळासाहेबांची धरसोड वृत्ती वाटते .मला वाटते 'जे मनात ते ओठात' अशी सरळ वृत्ती आहे.

आता जैनांच्या टॉवर्सचा मुद्दा.सेनाप्रमुखांनी जेंव्हा वाढदिवसाला मुंबईतील बिल्डर्सना 'टॉवर्समधील ५०% जागा मराठी माणसाला द्याव्यात' असा दम भरला होता तेंव्हा तुम्ही लोकप्रभा मधे 'शाब्दिक खेळ' करुन याला अप्रत्यक्षपणे विरोध केला होता हे विसरु नये.शिवाय त्याच लेखात तुम्ही बाळासाहेबांना नेहरुंचे उदाहरण देउन सहिष्णुतेचे धडे दिले होते. आता त्याच नेहरुंचे तुम्ही कट्टर विरोधक बनला आहात.बाळासाहेबांना सहिष्णुतेचे धडे देणारे राजु परुळेकर एकदम मनसेच्या भैयांविरुध्दच्या मारामार्‍यांना 'स्वाभिमान्,अस्मिता' म्हणुन बिनशर्त पाठींबा देतात्.अरेच्चा, मग सहिष्णुतेच काय झाल???का राज ठाकरेंना तो नियम लागु होत नाही??कृष्णा देसाई ते श्रीधर खोपकर यांच्या उदाहरणातुन तुम्ही रमेश किणीला खुबीने वगळता.हे double standards का??आता महाराष्ट्र धर्म ,संस्कृती म्हणणारे तुम्ही त्याच लेखात लिहिता की 'मुळात मराठी असो अथवा अन्य कुठली असो ,संस्कृती ही वाढते वा तिचा र्‍हास होतो.चंद्राप्रमाणे तिची अवस्था असते.ती टिकवता येत नाही.' आता राज ठाकरेंनी शिवसेनेचा मुद्दा घेतल्यावर तुम्ही त्यांना का सांगत नाही की 'संस्कृती चंद्राप्रमाणे असते ,टिकवता येत नाही.तुम्ही टिकवायचा प्रयत्न करु नका'. पण नाही आता तुमचे म्हणने आहे की मुंबईत मराठी संस्कृती टिकवली जाउ शकते. तीनच महिन्यात इतका वैचारीक फरक???

संजय निरुपम जेंव्हा सेनेत होता तेंव्हा त्यानेही भुमिपुत्रांची भुमिका जोरात मांडली होती.अनेक कार्यक्रमांमधे त्याने 'परप्रांतियांचे मुंबईत येणे रोखले पाहीजे' असे दणकावुन सांगितले होते. ते कार्यक्रम मी स्वतः बघितले आहेत्.आता पार्टी बदलली आणि तोही बदलला.उध्दव ठाकरेंनी छट पुजेला हजेरी लावली तर काही महत्पाप केले असे मला बिल्कुल वाटत नाही. आम्ही परदेशात राहुन गणेशोत्सव्,शिवजयंती साजरी करतो.त्याला परदेशी लोक उपस्थित असतात्.मग परदेशात कोणी म्हटले की 'इथे फक्त याच देशाचे सण साजरे करा' तर ते चुकिचे आहे.तुम्ही म्हणता की 'राज ठाकरे बदलणार नाहीत ना हा प्रश्नच गौण आहे'. याचा काय अर्थ आहे??तेही उद्या बदलणार असतील तर मराठी माणसाने त्यांना का पाठींबा द्यावा???शिवाय त्यांच्या पक्षाचे बदलणे आत्तच सुरु झाले आहे.खालील बातमी वाचा-http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2889253.cmsज्या वेळी भैय्यंना मारल्याच्या जखमाही भरल्या नव्हत्या त्या वेळी मनसे भैय्यांबरोबर उत्तर प्रदेशि स्टाईलमधे होळी खेळत होता.याचा तुम्ही का विरोध केला नाही??पण उध्दवने भैय्यंच्या सणाला उपस्थिती लावली तर ते चुकिचे पण राजची मनसे भैय्या स्टाईलमधे धुमधडाक्यात होळी साजरी करते ते चालते??भैया चालत नाहीत ना मग मनसेतले चौबे का कोण ते,रीटा गुप्ता,हिंदी साहित्यिक वागीश सारस्वत तुम्हाला कसे चालतात???इंडीअन एक्प्रेसला अशीही बातमी होती की मारामार्‍यांनंतर मनसेतील भैय्यांचे सदस्यत्व वाढले आहे.माझा विरोध भैय्यांबरोबर होळी साजरी करण्याला नाही पण त्याचप्रमाणे सेनेच्या नेत्यांच्या युपी सणांच्या उपस्थितीलाही नाही.

आता मराठीचा मुद्दा-भैय्या इथे येउन मराठी शिकत नाहीत ,मराठी संस्कृतीशी एकरुप होत नाहीत असा आक्षेप घेतला जातो.माझा प्रश्न असा आहे की मुस्लिमांचे काय्???ते तर इथे पिढ्यानपिढ्या रहात आहेत पण त्यांना मराठी बोलता येत नाही.८०-९०% महाराष्ट्रीय मुस्लिम उर्दुच बोलतात. मराठी संस्कृतीशी त्यांना काहीही देणघेण नाही.त्यांना फक्त इस्लामी संस्कृती महत्वाची वाटते.त्यांच्या विरुध्द तुम्ही कधीच काहीच का लिहित नाही??ज्या बाबासाहेब आंबेडकरांचे मुद्दे तुम्ही भरभरुन दिले आहेत तेच बाबासाहेब मुस्लिमांबद्दल बघा काय म्हणतात(मुळ मराठी शब्द सध्या उपलब्ध नाहीत्,अनुवादात अर्थबदल केला असा माझ्यावर आरोप होउ नये म्हणुन उपलब्ध असलेला मुळ हिंदी अनुवाद देत आहे) "मुसलमानों के लिए है कुरान गैर मुसलमान को मित्र बनाने का विरोधी है इसलिए हिन्दू सिर्फ घृणा और शत्रुता के योग्य ही हैं मुसलमानों की निष्ठा भी केवल मुस्लिम रास्त्रो के प्रति होती है इसलाम सच्चे मुसलमान हेतु भारत को अपनी मातृभूमि और हिन्दुओ को अपना निकट सम्बन्धी मानने की आज्ञा नहीं देता, संभवतः यही कारण था की मौलाना मोहमद अली जैसे भारतीय मुसलमानों ने भी अपने शरीर को हिंदुस्तान की अपेक्षा येरुशेलम में दफनाना अधिक पसंद किया कांग्रेस में मुसलमानों की स्थितियो के सम्पर्दायिक चौकी की तरह है गुंडागर्दी मुस्लिम राजनीती का स्थापित तरीका हो गया है इस्लामी कानून समाज सुधर के विरोधी हैं वे धर्मनिरपेक्षता को नहीं मानते हैं मुस्लिम कानूनों के अनुसार भारत हिन्दुओ और मुसलमानों की समान मातृभूमि नहीं हो सकती वे भारत जैसे गैर मुस्लिम देश को इस्लामिक देश बनाने में जिहाद 'आतंकवाद' का संकोच नहीं करते."आता या मुस्लिमांविरुध्द बाळासाहेबांनी आघाडी उघडली तर काय चुकल???बर तेही सोडा. मुंबईत जवळपास ५-७लाख बांग्लादेशी आहेत. त्यांना इथल्या भाषेशी ,संस्कृतीशी काहीही देणघेण नाही,ते भारताच्या (फक्त मराठी ओळख असणार्‍यांनी हा शब्द 'मराठी लोकांना' वाचावा) आंतरिक सुरक्षेला सर्वात मोठा धोका आहेत.हे मी म्हणत नाही तर सुपरकॉप के.पी.एस.गिल म्हणतात. त्यांना हाकलण्यासाठी तुम्ही कधीच का लिहित नाही???त्यांना हाकलल्यास गुन्हेगारी कमी होईल्,गर्दी कमी होईल.मराठी माणसाची भविष्यात होणारी हानी वाचेल.भारतात सध्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा मोठा प्रश्न आहे.महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. विदर्भातील शेतकरीही मराठीच आहेत्.उध्दव ठाकरे या शेतकर्‍यांची एकजुट करवुन आणत आहेत्,त्यांच्यासाठी आंदोलन करत आहेत्.पण या आंदोलनांना पाठींबा देण्याऐवजी तुम्ही तुमच्या स्तंभातुन याची 'आंदोलनांचा खेळ' म्हणुन खिल्ली उडवली आहे!!!विदर्भातील शेतकरी मराठी नाहीत का???का फक्त मुंबई-ठाण्यात मराठी माणुस रहतो???जिथे खराखुरा 'मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न' आहे तिथे तुम्ही गप्प बसता.आज विदर्भात होणार्‍या आत्महत्यांकडे महाराष्ट्र सरकारने दुर्लक्ष केलेले आहे.उध्दव ठाकरे सोडले तर कोणीही मराठी नेता त्यात 'इंटरेस्ट' घेत नाही. उद्या या वागणुकीला कंटाळुन वेगळ्या विदर्भाच्या मागणीने जोर धरला व संयुक्त महाराष्ट्र फुटला तर्???मग तुम्ही परत मोठेमोठे अभ्यासपुर्ण लेख लिहाल्.पण सध्या उध्दव ठाकरेंना पाठींबा देणार नाही.

तुम्ही तुमच्या लेखात आंबेडकर्,अत्रे यांचे वारसदार दिवाळखोर निघाले म्हटले आहे.आंबेडकरांचे राहु द्या पण अत्र्यांचे वारसदार म्हणजे आजचे पत्रकार('मर्‍हाटा'काढल्यामुळे अत्र्यांनाही पत्रकार म्हणायला हरकत नसावी) तर नंबर एकचे दिवाळखोर आहेत.एव्हढेच नव्हे तर 'पत्रकार धर्म' विसरुन राजकीय कंपुबाजीत सगळे धन्यता मानत आहेत. राजु परुळेकरही त्यातलेच.'१९९० पासुन बाळासाहेबांनी महाराष्ट्र धर्माला नख लावायला सुरुवात केली' म्हणतात्.मग तुम्ही १८ वर्ष मुग गिळून का बसला होता???राज ठाकर्‍यांनी सेना सोडण्यापुर्वी(सोडल्यानंतरही) तुम्ही अनेकदा सेनाप्रमुखांवर स्तुतीसुमने उधळली होती.तेंव्हा कुठे गेला होता तुमचा 'महाराष्ट्र धर्म'??अत्र्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातुन सतत मराठीचा मुद्दा धगधगत ठेवला.पण राजु परुळेकर मायावाती,मोदी व इतर अनेकविध विषयांवर आपली मते मांडत होते. अरे मराठीची इतकी वाईट परिस्थिती असताना तुम्हाला ती पुढे आणण्यासाठी आंदोलनाची गरजच का पडते??आंदोलन नव्हते तेंव्हा तुम्ही का लोकांना या विषयावर जागरुक केले नाही???तुमच्याकडे बंदुकिपेक्षाही घातक लेखणी नावाचे अस्त्र होते ते तुम्ही म्यानात ठेवुन 'चिल्लर' गोष्टींवर स्वतःचा स्तंभ भरवत होता.कधी राजकारण तर कधी काय. सगळ नॉन सेंस.मायमराठी भरडली जात असताना तुम्ही स्वतः त्याबद्दल लिहुन जनजागृती केली असती त्याला काही अर्थ होता.उगाच घडणार्‍या घटनांवर विश्लेशण करणे आणि याला त्याला दोष देणे फार सोपे असते.त्यात कंपुबाजी करुन 'पॉप्युलॅरीस्ट पत्रकारीता' करण तर अजुनच सोपं.सच्च्या पत्रकाराने शिवसेना मराठीचा मुद्दा सोडायला लागली असे वाटल्यावरच टिका केली असती. २ वर्षांपुर्वी राज ठाकर्‍यांनी सर्वसमावेशक धोरण घेतल त्याही वेळी 'भैय्यांना हटवायची गरज असताना सर्वसमावेशक धोरण कसल घेता??' म्हणुन राजवर हल्ला केला असता. पण तुम्ही यातल काहीच केल नाही.बहुतेक मनसेबरोबर जाउन चांगली संधी मिळेल असे तर तुमचे धोरण नाही ना??कारण पुण्यात समीरण वाळवेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी स्वतःच वृत्तपत्र सुरु करायचय असा मनोदय बोलुन दाखवला होता.मग त्याच्या संपादक पदी आपलीही वर्णी लागावी म्हणुन तुम्ही मनसेला पाठींबा करत नाही ना??मला भैय्यांबद्दल काडीचही प्रेम नाही.राज ठाकर्‍यांच्या भाषणाचा मीही फॅन आहे.त्यांच्या आंदोलनालाही माझा विरोध नाही.माझा विरोध स्वार्थी पत्रकारांना आहे.तुम्ही आधी शिवसेनेच्या कंपुत होता आता मनसेच्या कंपुत आहात. उद्या एखादा अजुन चांगला पर्याय आला तर तिकडेही जाल.अशी राजकीय कंपुगिरी करणार्‍या पत्रकारांनी सेनेला 'दिल्लीचे मनसबदार' तर शरद पवारांना 'वॉरलॉर्ड' म्हणन्याची गरज नाही.

आपला
चिन्मय कुलकर्णी

ता.क.-ज्या वेळी स्वातंत्र्याशी गरज होती आणि हिंदुविरुध्द 'डायरेक्ट ऍक्शन्स' होत होत्या त्या वेळी तमिळ लोकांनी द्रविडनाडुची मागणि केली होती.फाळणीवादी असलेल्या इतिहासातील तमिळ नेत्यांचीच करुणानिधी व समस्त कट्टर तमीळी पक्ष पिलावळ आहे.करुणानिधीने LTTE चा दोन नंबरचा म्होरक्या मारला गेल्यावर त्याच्यावर १ वर्षापुर्वी स्तुती करणारी कविता लिहुन ती प्रकाशित केली होती.महाराष्ट्राने या देशद्रोह्यांच्या पावलावर पाऊल का ठेवाव??

Friday 2 May, 2008

शिवसेनाश्रीवर्धन.कॉम


श्रीवर्धन शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांपैकी एक बालेकिल्ला. १९९५ पासून आजपर्यंत इथे शिवसेनेचा आमदार चढत्या फरकाने जिंकत आलेला आहे. २००६ च्या पोटनिवडणूकित नारोबा समर्थक शाम सावंतचा धुव्वा उडवून मा. आमदार श्री. तुकाराम सुर्वे यांनी शिवसेनेला बळ या विभागातून दिलेले आहे. बाळासाहेबांच्या २०% राजकारण आणि ८०% समाजकारणाच्या संकल्पनेतून कोकणचा १००% विकास शिवसेनेने केलाय यात कोणाचेही दुमत नाही. त्याच प्रकारे १९९५ नंतर श्रीवर्धन विकासाच्या दिशेने झेपावत आहे.

शिवसेना आमदार श्री. तुकाराम सुर्वेसाहेबांच्या संकल्पनेतून शिवसेनाश्रीवर्धन.कॉम वेबसाईट बनविली गेली आहे. मतदारसंघातील जडणघडणीची इत्यंभूत माहिती प्रत्येकाला मिळावी हाच हेतू या मागे आहे. श्रीवर्धन सारख्या दुर्लक्षित विभाग आज शिवसेनेमुळेच लोकांना माहित झालेला आहे. इथले अत्यंत आकर्षक असे पर्यटनस्थळे आज लोकांना माहित झालेत ते केवळ शिवसेनेमुळेच. कारण एखाद्या विभागाचे रस्ते आणि वाहतुक व्यवस्था सुरळीत असते तिथेच जास्तीत जास्त पर्यटकांची वर्दळ असते.

शिवसेनाश्रीवर्धन.कॉम या संकेतस्थळाचे उद्घाटन मा. शिवसेना कार्याध्यक्ष श्री. उद्धवजी ठाकरे यांच्याहस्ते २८ एप्रिल रोजी श्रीवर्धन येथे झाले.

नक्किच भेट द्या।
www.shivsenashrivardhan.com

Sunday 13 April, 2008

भुमिपुत्रांचा आधार शिवसेना

संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाल्यानंतर सुद्धा 'मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची' असं कुत्सितपणे म्हटलं जात होतं। परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी तरूणांच्या मागे ठामपणे उभे राहून इथल्या कारखान्यात, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये, व्यवस्थापनामध्ये स्थानिक भुमिपुत्रांना स्थान दिलं पाहिजे अशा प्रकारची कणखर भुमिका घेतल्यामुळेच आज अनेक ठिकाणी मराठी तरूण स्वाभिमानाने जगत आहे। भारतीय कामगार सेना असेल नाहितर स्थानिय लोकाधिकार समिती महासंघ असेल. या संघटनांनी मराठी तरूणांना त्यांच्या घामाचा आणि श्रमाचा मोबदला योग्य प्रकारे मिळवून दिला.

मुंबई महाराष्ट्राची आहे म्हणून इथल्या तरूणांचा तिच्यावर जास्त अधिकार आहे अशी वारंवार भुमिका शिवसेनाप्रमुखांनी स्पष्ट केलेली आहे। म्हणूनच एकेकाळी पंचतारांकित हॉटेलमध्ये मराठी तरूण अपवादानेच पहायला मिळत होता. परंतु शिवसेनाप्रमुखांनी कामगार सेनेच्या माध्यमातून अनेक तरूणांना पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकर्‍या मिळवून देऊन त्यांचे जीवनही पंचतारांकित केलं. मुंबईतील अनेक कारखाने आणि व्यवस्थापनामधील मराठी तरूणांची वर्णी लागली ती केवळ शिवसेनेमुळेच.

इतर प्रांतातले सत्ताधारी नेते आपल्या प्रांतातल्या लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात। मात्र महाराष्ट्रातल्या एकाही सत्ताधारी पक्षातील नेत्याला मराठी तरूणाबद्दल प्रेम वाटत नाही किंवा त्यांच्यासाठी काही केलं पाहिजे याची जाणीव होत नाही. ती जाणीव केवळ शिवसेनाप्रमुखांनीच जोपासलेली आहे. आज मुंबईतून रेल्वेला जितका पैसा मिळतो तितका खचितच इतर कोणत्याही शहरातून मिळत नाही. किंबहुना संपूर्ण देशाची रेल्वेची जितकी आवक असेल त्यातील २५% आवक हि केवळ मुंबईतूनच होते. मात्र मुंबईत रेल्वेतील कर्मचारी पाहिल्यानंतर ते परप्रांतिय असल्याचेच दिसून येते. अलिकडे दोन वर्षापूर्वी रेल्वेमध्ये पुन्हा भरती प्रक्रिया सुरु झाली. सध्या रेल्वेमंत्री पद हे लालू यादव याच्याकडे असल्यामुळे संपूर्ण बिहार प्रांतातून नोकर्‍यांसाठी मुंबईत लोंढे उलटले. ही बाब शिवसेनेच्या लक्षात येताच इथे नोकरीसाठी आलेल्या बिहार्‍यांना पळवून लावण्यात शिवसैनिकांनी पुढाकार घेतला. कारण आधी महाराष्ट्रातल्या तरूणांना रोजगार द्या आणि मग इतरांचा विचार करा हि शिवसेनाप्रमुखांची भूमिका आहे.

केवळ शिवसेना मराठी तरूणांना नोकर्‍या देऊन थांबली नाही तर वेळोवेळी व्यवस्थापनाशी कामगारांच्या हितासाठी भांडून त्यांच्यात पगारवाढ घडवून आणली. त्यामुळेच अनेक मराठी तरूणांचे कुटुंब आज स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगत आहे. ज्यांना नोकर्‍या मिळाल्या नाहीत अशा तरूणांच्या मनामध्ये आत्मविश्वास जागृत करून त्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले. शिवसेनेच्या स्थापनेच्या काही दिवसांतच शिवसेनाप्रमुखांनी लाचारीने कुणाच्या दुकानार काम करण्यापेक्षा स्वत:चे छोटे मोठे उद्योग सुरू करा अशी हाक दिली. त्यातूनच भायखळा येथे एका पदवीधर तरूणाने वडा-पावची गाडी सुरू केली. आज २५ वर्षांनंतर ग्रॅजुएट वडा-पाव म्हणून संपूर्ण मुंबई त्याला ओळखते. या वडा-पावच्या व्यवसायावरच या तरूणाचे जीवन इतके सुधारले की तो आज आपल्यासह संपूर्ण कुटुंबाचा निर्वाह तर करतोच परंतु अन्य काही तरूणांना काम देऊन त्यांच्या कुटूंबाचाही भार त्याने उचलला आहे. हे बळ फक्त शिवसेनाप्रमुखांच्या वाणीतच आहे.

साभार
: जनतेचं मंत्रालय.

Thursday 10 April, 2008

हे पहा नवनिर्माण...


"बॉम्बे" चे "मुंबई" होऊन १३ वर्षे झाली तरी इथे मनसेवाले झोपा काढत आहे. महाराष्ट्राचे हेच नवनिर्माण का? शिवसेनेने मुंबईला मराठी नाव दिले परंतु यांच्या अमराठी लोकांना त्याचा दुस्वास का?

Sunday 30 March, 2008

मुंबईत ओळखपत्र लागू करणे काळाची गरज

महाराष्ट्राची राजधानी मुंबई हिंदुस्थानातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे एकमेव शहर आहे. देशाच्या एकूण उत्पन्नाच्या ४०% उत्पन्न देशाला केवळ एका मुंबईमधूनच मिळते. उद्योग, देशातील सर्वात मोठा शेअर बाजार, चित्रपटसॄष्टी, वेगवेगळ्या बड्या कंपन्यांचे मुख्यालये आणि बरीचसी ऐतिहासिक स्थळे या शहरात आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी संस्कृतीची आगळी वेगळी टाच या शहराला आहे.

उद्योगांचे शहर तसेच इथे काम केल्याने हमखास चांगला पैसा मिळत असल्याने देशातील इतर प्रांतातील लोकांचे लोंढे या शहरावर धडकायला लागले. यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या मागासलेल्या राज्यातील लोकांचे प्रमाण नक्किच काळजी करण्यासारखे आहे. त्यामुळे इथल्या प्रशासनाला मुंबईवर नियंत्रण करणे अवघड झाले आहे. आज मुंबईची अवस्था एकदम बकाळ झालेली आहे. मुंबई मराठी माणसाची असूनही इथे स्थानिक मराठी माणूस आज केवळ ४० टक्क्यांवर आला आहे. इथे ३० लाखापेक्षा जास्त बांग्लादेशी आणि इतर प्रांतातील लोकांचे प्रमाण ६० टक्के इतके आहे.

वाढणार्‍या लोंढ्यांच्या विरोधात शिवसेना अनेक वर्षे लढा देत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या राष्ट्रवादी विचारतून मुंबईच्या भल्यासाठी या शहरात 'परमिट सिस्टम' लागू करण्याची मागणी केली.समाजातील अनेक स्तरांतून या मागणीला पाठिंबा मिळत आहे. या सिस्टमचे अनेक फायदे बाळासाहेबांनी सांगितले आहेत. जर याची अंमलबजावणी झाल्यास हे मुंबईसाठी क्रांतिकारक निर्णय ठरणार आहे.

मुंबईची पर्यायाने महाराष्ट्राची आज लोकसंख्या किती आहे ते कोणीच सांगू शकणार नाही. सरकार दरबारी सगळी अनागोंदी सुरु आहे. मुंबईच्या अनेक फसव्या योजना येत आहेत. मुंबईला शांघाय करायचे स्वप्न पाहिले जातात आणि उत्तर प्रदेश आणि बिहार मधून सर्वाधिक गरीबरथ इथे सुरू करतात. हि किती मोठी विसंगती! खरेतर आज मुंबईसाठी कोणतीही योजना राबवायची असेल तर त्यापूर्वी लोंढ्यांचे काहितरी करावे लागेल. जो पर्यंत या लोंढ्यांवर नियंत्रण येत नाही तो पर्यंत इथे कितीही करोड खर्चाच्या योजना येऊ द्या सगळा पैसा राजकारण्यांच्या खिशातच जाणार. आणखी अतिशय महत्त्वाचे म्हणजे जर प्रामाणिकपणे या परिस्थित कोणतीही योजना सुरू केली तर त्याचा बट्ट्याबोळ होणार हे नक्कीच. याचे उदाहरण शिवशाही सरकारमध्ये बांधलेल्या ५५ उड्डाणपुलांचे देता येईल. रस्त्यांवरील रहदारी सुरळीत होण्यासाठीच्या ह्या चांगल्या योजनेमुळे मुंबईच्या वाहतुक व्यवस्थेचा पाहिजे तेवढा परीणाम दिसत नाही. कारण एकच रोज वाढणारी गर्दी आणि लोंढे. यात वाया जातोय तो फक्त महाराष्ट्राचा पैसाच!

याच साठी 'परमिट सिस्टम' म्हणजेच ओळखपत्र योजना त्वरीत अंमलात आणावी लागेल. अशा प्रकारच्या योजना परदेशात यशस्वी झालेल्या आहेत. अमेरिकेत सोशल सर्व्हिस नंबर शिवाय आपण हॉस्पीटलमध्येही प्रवेश करू शकत नाही. मुंबईत अशा प्रकारच्या योजनेने बांग्लादेशी घुसखोर, देशातील इतर प्रांतातील लोंढे आणि आतंकवादावरही नियंत्रण येवू शकेल.

जेव्हा एखादी योजना मुंबईसाठी लागू करण्याची मागणी केली जाते तेव्हा तिच्याआड येणारी बरीच लोक असतात. अर्थात त्यांचा येथील मुंबईकरांशी काहिही देणेघेणे नसते. समाजकंटक पक्षांच्या नेत्यांना तर यातील काहीही कळत नाही. केवळ मतांसाठी अशा योजनांना कचर्‍याचा डब्बा दाखविला जातो. मला वाटते अशा योजने बाबतीत मुंबईकरांनी जागृत असणे आवश्यक आहे.

मित्रांनो विचार करा जर आपण मुंबईत अधिकृतपणे राहतो, आपण सुखाने आणि आपल्या कररूपाने भरलेल्या पैशाचे हक्कांची अपेक्षा करत असू तर या योजना जेव्हा पुढे येईल तेव्हा जरूर पाठिंबा द्या. मुंबईतील लोकलवरील ताण कमी व्हावा असे वाटत असेल, जर आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित व्हावे असे मनापासून वाटत असेल ओळखपत्र योजनेचा आपण स्विकार कराल यात वादच नाही. मान्य आहे इतर प्रांतातील आणि अनधिकृतपणे राहणार्‍या लोकांना मुंबई सोडावी लागेल. सर्वांना मुंबईत प्रवेश मिळणार नसेल तर हिंदुस्थानातील प्रत्येक प्रांतातिल सत्ताधार्‍यांना त्यांच्या राज्याच्या विकास करावाच लागेल आणि एक विकसित देश म्हणून आपला देश ओळखला जाईल.

मित्रांनो आपली मते नक्कीच कळवा.