Sunday 30 March, 2008

मुंबईत ओळखपत्र लागू करणे काळाची गरज

महाराष्ट्राची राजधानी मुंबई हिंदुस्थानातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे एकमेव शहर आहे. देशाच्या एकूण उत्पन्नाच्या ४०% उत्पन्न देशाला केवळ एका मुंबईमधूनच मिळते. उद्योग, देशातील सर्वात मोठा शेअर बाजार, चित्रपटसॄष्टी, वेगवेगळ्या बड्या कंपन्यांचे मुख्यालये आणि बरीचसी ऐतिहासिक स्थळे या शहरात आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी संस्कृतीची आगळी वेगळी टाच या शहराला आहे.

उद्योगांचे शहर तसेच इथे काम केल्याने हमखास चांगला पैसा मिळत असल्याने देशातील इतर प्रांतातील लोकांचे लोंढे या शहरावर धडकायला लागले. यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या मागासलेल्या राज्यातील लोकांचे प्रमाण नक्किच काळजी करण्यासारखे आहे. त्यामुळे इथल्या प्रशासनाला मुंबईवर नियंत्रण करणे अवघड झाले आहे. आज मुंबईची अवस्था एकदम बकाळ झालेली आहे. मुंबई मराठी माणसाची असूनही इथे स्थानिक मराठी माणूस आज केवळ ४० टक्क्यांवर आला आहे. इथे ३० लाखापेक्षा जास्त बांग्लादेशी आणि इतर प्रांतातील लोकांचे प्रमाण ६० टक्के इतके आहे.

वाढणार्‍या लोंढ्यांच्या विरोधात शिवसेना अनेक वर्षे लढा देत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या राष्ट्रवादी विचारतून मुंबईच्या भल्यासाठी या शहरात 'परमिट सिस्टम' लागू करण्याची मागणी केली.समाजातील अनेक स्तरांतून या मागणीला पाठिंबा मिळत आहे. या सिस्टमचे अनेक फायदे बाळासाहेबांनी सांगितले आहेत. जर याची अंमलबजावणी झाल्यास हे मुंबईसाठी क्रांतिकारक निर्णय ठरणार आहे.

मुंबईची पर्यायाने महाराष्ट्राची आज लोकसंख्या किती आहे ते कोणीच सांगू शकणार नाही. सरकार दरबारी सगळी अनागोंदी सुरु आहे. मुंबईच्या अनेक फसव्या योजना येत आहेत. मुंबईला शांघाय करायचे स्वप्न पाहिले जातात आणि उत्तर प्रदेश आणि बिहार मधून सर्वाधिक गरीबरथ इथे सुरू करतात. हि किती मोठी विसंगती! खरेतर आज मुंबईसाठी कोणतीही योजना राबवायची असेल तर त्यापूर्वी लोंढ्यांचे काहितरी करावे लागेल. जो पर्यंत या लोंढ्यांवर नियंत्रण येत नाही तो पर्यंत इथे कितीही करोड खर्चाच्या योजना येऊ द्या सगळा पैसा राजकारण्यांच्या खिशातच जाणार. आणखी अतिशय महत्त्वाचे म्हणजे जर प्रामाणिकपणे या परिस्थित कोणतीही योजना सुरू केली तर त्याचा बट्ट्याबोळ होणार हे नक्कीच. याचे उदाहरण शिवशाही सरकारमध्ये बांधलेल्या ५५ उड्डाणपुलांचे देता येईल. रस्त्यांवरील रहदारी सुरळीत होण्यासाठीच्या ह्या चांगल्या योजनेमुळे मुंबईच्या वाहतुक व्यवस्थेचा पाहिजे तेवढा परीणाम दिसत नाही. कारण एकच रोज वाढणारी गर्दी आणि लोंढे. यात वाया जातोय तो फक्त महाराष्ट्राचा पैसाच!

याच साठी 'परमिट सिस्टम' म्हणजेच ओळखपत्र योजना त्वरीत अंमलात आणावी लागेल. अशा प्रकारच्या योजना परदेशात यशस्वी झालेल्या आहेत. अमेरिकेत सोशल सर्व्हिस नंबर शिवाय आपण हॉस्पीटलमध्येही प्रवेश करू शकत नाही. मुंबईत अशा प्रकारच्या योजनेने बांग्लादेशी घुसखोर, देशातील इतर प्रांतातील लोंढे आणि आतंकवादावरही नियंत्रण येवू शकेल.

जेव्हा एखादी योजना मुंबईसाठी लागू करण्याची मागणी केली जाते तेव्हा तिच्याआड येणारी बरीच लोक असतात. अर्थात त्यांचा येथील मुंबईकरांशी काहिही देणेघेणे नसते. समाजकंटक पक्षांच्या नेत्यांना तर यातील काहीही कळत नाही. केवळ मतांसाठी अशा योजनांना कचर्‍याचा डब्बा दाखविला जातो. मला वाटते अशा योजने बाबतीत मुंबईकरांनी जागृत असणे आवश्यक आहे.

मित्रांनो विचार करा जर आपण मुंबईत अधिकृतपणे राहतो, आपण सुखाने आणि आपल्या कररूपाने भरलेल्या पैशाचे हक्कांची अपेक्षा करत असू तर या योजना जेव्हा पुढे येईल तेव्हा जरूर पाठिंबा द्या. मुंबईतील लोकलवरील ताण कमी व्हावा असे वाटत असेल, जर आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित व्हावे असे मनापासून वाटत असेल ओळखपत्र योजनेचा आपण स्विकार कराल यात वादच नाही. मान्य आहे इतर प्रांतातील आणि अनधिकृतपणे राहणार्‍या लोकांना मुंबई सोडावी लागेल. सर्वांना मुंबईत प्रवेश मिळणार नसेल तर हिंदुस्थानातील प्रत्येक प्रांतातिल सत्ताधार्‍यांना त्यांच्या राज्याच्या विकास करावाच लागेल आणि एक विकसित देश म्हणून आपला देश ओळखला जाईल.

मित्रांनो आपली मते नक्कीच कळवा.

Sunday 23 March, 2008

एक निस्वार्थी नेतृत्व - बाळासाहेब

बाळासाहेब ठाकरे - आमचे लाडके साहेब, राजकारणात असूनही राजकारणापलिकडे निर्णय घेणारे एकमेव निस्वार्थी नेते।राष्ट्रवादीचे दत्ता मेघे यांनी पक्ष सोडण्याची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती, तेव्हा त्यांनी सांगितले कि, शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उद्धवजींजवळ चर्चा झाली होती. उद्धवजींनी बाळासाहेबांना विचारून सांगतो असे म्हटले. बाळासाहेबांचे उत्तर आले, जर मेघे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला शरद पवारांची हरकत नसेल तर तुम्ही प्रवेश करू शकता.

इथे प्रश्न पक्ष प्रवेश करण्याचा किंवा शरद पवारांच्या हरकतीचा नसून एक पक्षप्रमुख एका नेत्याला प्रवेश नाकारतो कारण त्या नेत्याच्या पक्ष प्रमुखाला आवडणार नाही।आजचे राजकारण हे फक्त तोडफोडीचेच सुरू असताना शिवसेनाप्रमुखांनी घेतलेला निर्णय खरोखरच क्रांतीकारक आहे. इथे रोज कोणीतरी पक्ष सोडतोय आणि पत्रकार परिषदांमधून बोंबाबोंब करत सुटतोय.

दोन वर्षापूर्वी नारोबाला शिवसेनेतून हाकलल्यानंतर नारोबा रोज दोन-चार पत्रकारांना जमा करून छाती बडवून सांगत असे त्याच्यावर कसा अन्याय झाला आणि त्याच्याबरोबर सेनेचे ४२ आमदार आणि १० खासदार आहेत. पण आता प्रत्यक्षात किती गेले ते सर्वांना माहितच आहे. तसेच हि सगळी थेर केवळ काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री करावे यासाठी होती हे सुद्धा उघड आहे।

त्यानंतर काही महिन्यांनी राज ठाकरेनी शिवसेना सोडताना घोषणा केली, विठ्ठलाच्या आजुबाजुचे दोन-चार बडवेच शिवसेनेत राहतील बाकी सगळे शिवसेना सोडतील। झाले ते याउअलट! त्याच्याबरोबर शिवसेना सोडून गेलेले राजा चौगुले किंवा जितेंद्र जनावळे सारखे शिवसैनिक काही दिवसात परतलेच परंतु नंतर जवळजवळ ४०% लोक शिवसेनेत पुन्हा आले. त्यानंतर शिवसेनेने रामटेक लोकसभा, श्रीवर्धन विधानसभा, मुंबई, ठाणे, नासिक, पुणे, नागपूर अशा महानगर पालिका निवड्णूकांमध्ये प्रचंड यश मिळवून राज ठाकरेला त्याची जागा दाखवून दिली.

आताच काहि महिन्यांपूर्वी काँग्रेसचे कर्नल सुधिर सावंत यांनी पक्ष सोडताना ४० काँग्रेजी आमदार आणि ५ खासदार सोबत असल्याची घोषणा केली।(आकडे नारोबांच्या जवळपासचेच, कोकण पॅटर्न असावा!).

पक्ष सोडणार्‍या या तथाकथित पुढार्‍यांना वाटत असावे कि आम्ही पक्ष सोडला म्हणजे तो पक्ष संपला, आणि हे ज्या पक्षात जाणार असतात किंवा पक्ष काढतात तो एकमेव लोकांसाठी काम करणारा पक्ष असतो। प्रत्यक्षात अशा लोकांना जनता भिक घालत नाहीच कारण लोकांना माहित असते हे आपल्या पक्षासाठी काही करू शकले नाहीत आमच्यासाठी काय करणार?

पण दत्ता मेघेंनी पक्ष सोडण्याच्या पत्रकार परिषदेतच पक्ष न सोडण्याचा निर्णय सोडण्याचा निर्णय घेतला कारण त्यांचे त्यांच्या नेत्यावर असणारे प्रेम, आणि बाळासाहेबांनी घेतलेल्या क्रांतीकारक निर्णय हेच आहे। दत्ता मेघे सेनेत आले असते तर विदर्भात सेना आणखी मजबूत झाली असती कदाचित विरोधकाना विदर्भातून हद्दपारही केले असते याची साहेबांना पूर्णपणे कल्पना होती. पण जवळचा माणूस पक्ष सोडून गेल्याने ज्या वेदना होतात त्याची कल्पना असल्यानेच शरद पवारांचे ५० वर्षाचे सोबती दत्ता मेघेंना शिवसेना प्रवेश नाकारला असावा.

खरच साहेब तुम्ही महान आहात हे पुन्हा एकदा समोर आले. तुम्हाला लाख लाख सलाम!

Monday 10 March, 2008

साहेबांचे छायाचित्र

साहेबांचे छायाचित्र संग्रह विडियो स्वरूपात युट्युबवर आहे. यामध्ये बरेचशे अविस्मरणीय छायाचित्रांचा संग्रह आहे जे खरच छान आहेत. तुम्हीच बघा ना!


Sunday 9 March, 2008

शेतकरी कर्जमाफीचे राजकारण!

मागिल महिन्याच्या २९ तारखेच्या अर्थसंकल्पात ५ एकर पेक्षा कमी जमिन असणार्‍या शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी रुपये ६० हजार कोटीची तरतूद करण्यात आली। ज्या शेतकर्‍यांकडे ५ एकर पेक्षा कमी जमिन आहे, ज्यांनी वित्तियसंस्थांकडून कर्ज घेतले आहे अशांनाच याचा फायदा होईल हे स्पष्ट आहे। मग तो शेतकरी विदर्भ किंवा इतर आत्महत्या करणार्‍या भागातील असो अथवा नसो. पण इथे मुख्य मुद्दा येतो सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांचे काय? विदर्भातील सर्वाधिक आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांनी सावकारांकडून कर्ज घेतली होती त्यांचे काय? किंवा असे बरेचसे शेतकरी आहेत ज्यांची जमिन ५ एकरपेक्षा जास्त आहे. पण त्यातील अर्धिअधिक नापिक आहे त्यांच्या कर्जाचे काय? कर्जमाफी दिली म्हणजे खुप मोठे काम केले असे महाराष्ट्रातील कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारला वाटत आहे.

कर्जमाफीची घोषणा होण्याअगोदर काही तासांपूर्वीच यांचे होर्डींग्ज तयार होते। कारण यांना भीती होती ती शिवसेनेची! शेतकरी आत्महत्यांवर शिवसेना आणि उध्दवसाहेब गेली दोन वर्षे रान उठवत आहेत. गावोगावी शेतकरी मेळावे घेऊन शेतकर्‍यांना एकजुटीचे आवाहन कले. आणि शेतकरी एकत्र यायला लागला याचा परिणाम व्हायचा तो झालाच आघाडी शासन असो किंवा युपीए असो शिवसेनेच्या झेंड्याखाली जमलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीची घोषणा करावी लागली.

सगळ्यात शरमेची बाब म्हणजे गेल्या ८ वर्षापासून शेतकरी आत्महत्या करताहेत आणि कॉग्रेस राष्ट्रवादी वाले श्रेय उपटण्याचे मेळावे घेत आहेत। यांना थोडीतरी लाज असायला हवी। एवढ्या आत्महत्या झाल्या काही महिन्यापुर्वी आमच्या कृषीमंत्र्यांना कोणीतरी विचारले तर ते म्हणत होते कर्जमाफी करणे शक्य नाही कारण सरकारी तिजोरीवर खुप मोठा भार पडेल. मग आता कर्जमाफी कशी दिलीत? वरून श्रेय कसले घेता. श्रेय लाटण्यासंदर्भात उध्दवसाहेबांना विचारले गेले तेव्हा त्यांचे उत्तर होते, शेतकर्‍यांच्या एकजुटीमुळेच कर्जमाफी झाली. याला म्हणतात माणुसकी!

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा!

Wednesday 5 March, 2008

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी आजच्या 'सामना' मधील पेश केलेले चुटकुले

" एक बिहारी, सौ बिमारी,
दो बिहारी, लडाई कि तैयारी,
तीन बिहारी, ट्रेन हमारी,
पाच बिहारी, सरकार हमारी,
चक दे फत्ते, बिहारी भगाओ,
पंजाब बचाव!"

हिंदुस्थानातील काही विद्वान इस्लामाबादेत जाउन मुशर्रफमियांना भेटले व त्यांनी प्रस्ताव ठेवला कि, "आम्ही तुम्हाला काश्मिर द्यायला तयार आहोत पण आमच्या देशाच्या काही अटी आहेत." मुशर्रफ हुरळून गेले व त्यांनी विचारले, "बोला, मला सर्व अटी मंजुर आहेत. काश्मिरसाठी मी काहीही करायला तयार आहे." यावर हिंदुस्थानच्या वतीने सांगण्यात आले, "काश्मिर मिळेल, पण सोबत बिहार घ्यावा लागेल!" यावर मुशर्रफ गडबडले आणि लोटांगणच घातले. "मला काश्मिर नको, अजिबात नको."

नरकात एमटीएनएल ने टेलिफोन सेवा सुरु केली. राज्याराज्यातील नेत्यांनी नरकातील टेलिफोन सेवेची खातरजमा केली. महाराष्ट्राच्या विलासरावांनी फोन केले त्याचे बिल ५०० रुपये आले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी फोन केला त्यांना ४०० रुपये बिल आले. अशा तर्‍हेने सर्व राज्यातील नेत्यांना ३०० ते ४०० रुपये बिल आले. बिहारच्या लालूने फक्त एक रुपयात फोन केला. लालूने विचारले हे कसे? त्यावर टेलिफोन ऑपरेटरने सांगितले, "सरजी हा लोकल कॉल आहे."

साभार : सामना.कॉम