Saturday 26 December, 2009

शिवसेना कॉलसेंटरचा अनुभव

हा लेख अजय सोनावणे यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिला असून शिवसेना कॉलसेंटरच्या बाबतीत लोकांनी अधिक जास्त वापर करावा या हेतून तोच लेख यावर जसाच्या तसा ठेवत आहे. अजय सोनावणेंचा ब्लॉग येथे क्लिक करून पाहू शकता
-----------------------------------------------------------------

उद्धवजी,

माझं नाव अजय सोनवणे, वय २७, मुळचा पुण्याचा. पुण्यातच एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो. काही दिवसांपुर्वी माझी कार मी एका शोरुम मध्ये सर्व्हींसींग साठी दिली असताना त्यांच्या हातुन ती ठोकली गेली व त्याची भरपाई न मिळता त्यांच्याकडुन उलट मला बरेच दिवस मनस्तापच भोगावा लागला. बरेच प्रयत्न करुनही त्या शोरुमचा मालक, जो एक उत्तर भारतीय आहे त्याच्याकडुन काहीच भरपाई न मिळाल्याने शेवटचा पर्याय म्हणुन मी शिवसेनेची मदत घेण्याचं ठरवलं. शिवसेनेच्या कॉल सेंटर ला फोन लावला आणि तक्रार नोंदविली. या तक्रारीचं काय होईल अशी मनात शंका होतीच. आतापर्यंत राजकिय पक्षांचा अनुभव तसा फारसा काही चांगला नव्हताच आणि राजकीय पक्ष एका सामान्य व्यक्तीची तक्रार किती गांभीर्याने घेतील असा सवाल होता. पण शिवसेनेच्या कॉल सेंटर ने मला तातडीने नगरसेवक सागर माळकरांचा फोन नंबर दिला आणि तिथुनच सगळी चक्र पटापटा फिरू लागली. एक नगरसेवक, ज्यांचा नी माझा कधीही काही संबंध आला नव्हता, ना मी त्यांच्या मतदारसंघातला मतदारही नव्हतो, तरीही त्यांनी अत्यंत जबाबदारीने आणि कुशलतेने हे प्रकरण हाताळलं आणि मला योग्य तो न्याय मिळवुन दिला. भरपाई आणि त्याचबरोबर माझी गाडी ही मला मिळवुन दिली. एका सामान्य व्यक्तीसाठी एक नगरसेवक स्वत:चा वेळ आणि पैसा खर्च करुन एवढं काही करतो याच्यावर खरंच विश्वास बसत नव्हता. लोकशाहीमध्ये लोकांसाठी लोकप्रतिनिधीं असतो हे मला आज पहायला मिळालं.

ज्या पद्धतीने शिवसेनेच्या कॉल सेंटरच्या लोकांनी आणि नगरसेवक सागर माळकरांनी हे प्रकरण शेवटपर्यंत लावुन धरत मार्गी लावलं त्याला तोड नाही. शिवसेनेच्या कॉल सेंटरच्या लोकांनी दररोज मला स्वताहुन फोन करुन हा प्रश्न सोडविण्यासाठी मोठी भूमिका बजावली. असा अनुभव मला कदाचित पहिल्यांदाच येत होता. सत्तेत नसताना एखादा पक्ष सामान्य लोकांची एवढी कामे करत असेन तर सत्तेत आल्यावर काय करु शकेन याचा आता लोकांनाही विचार करावा. माझ्या ब्लॉगच्या माध्यमातुन मी लोकांपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवेन.
या कॉल सेंटरमागच्या कल्पनेला, सगळ्या अ‍ॅडमीनीस्ट्रेशनला, लो़कांची कामं करण्याच्या तुमच्या भावनेला आणि सागर माळकरांसारकख्या लोकप्रतिनिधींना माझा सलाम.

उद्धवजी, शिवसेनेचा भगवा तुमच्या हातुन असाच फडकत राहो. या कामी आमची तुम्हाला सदैव साथ राहीनच. आता तरी माझ्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा !
आपण या इ-मेल ला रिप्लाय देऊन मला याची पोचपावती द्यावी ही विनंती.

जय महाराष्ट्र !

-अजय सोनवणे
+९१-९८९०३०००४७

Tuesday 15 December, 2009

Monday 30 November, 2009

ज्यांनी दिला मान-सन्मान त्यांचाच केला अपमान!

हा लेख दिनांक ३० नोव्हेंबर २००९ च्या ’संध्याकाळ’ मध्ये रोहिणी खाडीलकर यांनी लिहिला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आणखी किती दु:ख सहन करावे लागणार? कोण जाणे! छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे केवळ महत्वाकांक्षा आणि मोहापायी शिवसेना सोडून गेले! त्यानंतर राज ठाकरे बाहेर पडले आणि आता स्मिता ठाकरे यांची ’घुस’मट होत आहे. शिवसेनेने कॉंग्रेसवर कायम टिका केली! त्याच पक्षात प्रवेश करण्याचा विचार स्मिता ठाकरे करत आहेत. मराठी अस्मितेचा मुद्दा वापरण्यासाठी आणि शिवसेनेतील दुखावलेली मने कॉंग्रेसकडे वळवण्यासाठी स्मिता ठाकरे यांचा उपयोग केला जाऊ शकतो. मनसेला दाबण्याकरीता स्मिता ठाकरे यांना पुढे केले जाऊ शकेल! हा राजकिय खेळच घाणेरडा व गलिच्छ आहे! पण राजकारण असेच असल्याने आम्ही राजकिय नेत्यांना दोष देत नाही!

मात्र आम्हाला आज अपार दु:ख होत आहे! कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादामुळे ठाकरे घराण्याचा नाव वापरून स्मिता ठाकरे यांनी बरेच काही मिळवले! मान-सन्मान, पैसा-प्रसिद्धीने पायावर लोळण घातली. या सर्व गोष्टींचा विसर पडणे व महत्वाकांक्षेच्या मोहाला बळी पडणे योग्य नाही!

शिवसेनेचे कार्याध्यक्षपद उद्धव ठाकरेंकडे कसे आले?

शिवसेनाप्रमुख यांचा सर्वात मोठा मुलगा बिंदुमाधव ठाकरे यांचा अकाली अपघाताने मृत्यु झाला. या अपघातामुळे शिवसेनाप्रमुख हादरून गेले! अत्यंत कणखर भूमिका घेऊन, वाघाच्या ताकदीने गरूडाची झेप घेणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुलाच्या मृत्यूमुळे खचून गेले! आजही ’मातोश्री’ बंगल्यात जेथे तेथे मीनाताई ठाकरे आणि बिंदुमाधव ठाकरे यांच्या तसबीरी आहेत! इतक्या तसबीरी प्रत्येक भिंतीभिंतीला लावलेल्या आढळतील की, त्यांची गणतीच होणे अशक्य आहे! प्रत्येक तसबीर अत्यंत सुंदर, अत्यंत कलाकुसरीने तयार केलेली आहे! मुख्य दरवाजा उघडताच किमान सहा फूट उंचीची मुख्य तसबीर दिसते. या तसबीरीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या चेहऱ्यावर प्रकाश झळकतो! हा प्रकाश तसबीरीवर फेकण्यात आला नसून तो तसबीरीच्या मागून आपोआप उजळतो. ही तसबीर पाहिली कि, शिवसेनाप्रमुख व मीनाताई ठाकरे चालत आपल्याकडे येतात, असाच आभास होतो! मग आहे ती बिंदुमाधव ठाकरे यांची तसबीर! या तसबीरीमुळे दु:खाचा अंदाज येतो!

पहिला मुलगा मरण पावला आणि दुसरा मुलगा जयदेव ठाकरे यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कधीही पटले नाही! त्यामुळे जयदेव ठाकरे यांनी ’मातोश्री’ बंगला सोडला. मात्र आपल्या वडीलांच्या इच्छेखातर त्यांनी कधीही निवडणूक लढविली नाही. असे म्हणतात की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे जयदेव ठाकरे गेले होते! राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात त्यांना प्रवेश हवा होता. पण शरद पवार यांनी आपल्या लाडक्या मित्राकरीता म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या करिता जयदेव ठाकरे यांना राष्ट्रवादीत प्रवेश नाकारला. त्यानंतर जयदेव ठाकरे यांनी आपली राजकिय महत्वाकांक्षा कायमची बाजूला सारली!

या सुमारास जयदेव ठाकरे यांनी घटस्फोटाचा अर्ज केला! जयदेव ठाकरे यांचे तीन विवाह झाले आहेत. पहिली पत्नी जयश्री यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी स्मिता ठाकरे यांच्याशी विवाह केला! मग ’मातोश्री’ बंगला सोडल्यावर त्यांनी स्मिता ठाकरे यांच्या बरोबर असलेला आपला विवाह मोडायचे ठरवून पुन्हा घटस्फोटाचा अर्ज केला! जयदेव ठाकरे यांना समजविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण जयदेव ठाकरे ऐकायला तयार नव्हते. अशावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्मिता ठाकरे यांना आधार दिला! स्मिता ठाकरे यांना ’मातोश्री’ मध्ये राहण्याची परवाणगी देण्यात आली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची लाडकी सुन म्हणून लोक स्मिता ठाकरे यांना ओळखायला लागले! पुढे निवडणूक हरल्यानंतर स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांचा रितसर घटस्फोट झाला! ज्यावेळी युतीचे सरकार सत्तेवर होते, तेव्हा मोठे-मोठे उद्योगपती, बिल्डर आणि नेतेमंडळी ’मातोश्री’वर ये-जा करीत असत. तेव्हा स्मिता ठाकरे यांची भेट घ्यावीच लागत असे! इतका मान आणि प्रतिष्ठा बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेमुळे त्यांना मिळाला होता! किंबहुना एका पंचतारांकित हॉटेलात साधी रिसेप्शनीस्टची नोकरी करणाऱ्या स्मिता ठाकरे यांना केवळ जयदेव ठाकरे यांच्याशी विवाह केल्यामुळे मान, पैसा व प्रसिद्धी मिळाली होती! त्याचा विसर कसा पडला?

स्मिता ठाकरे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपले नाव नशिब आजमावून पाहण्याची इच्छा दर्शविली. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सुनेच्या इच्छेला मान दिला आणि ’हसिना मान जायेगी’ या चित्रपटाची निर्मिती झाली. या चित्रपटात संजय दत्त, करिश्मा कपूर, गोविंदा यांच्यासारखे सुपरस्टार होते! स्मिता ठाकरे यांनी अनेक कार्यक्रम, टिव्ही मालिका, चित्रपत इ. गोष्टीत रस घेतला. आणि आयोजनाची जबाबदारी पार पाडली. एकेकाळी चित्रपटसृष्टीत असा एकही मोठा कार्यक्रम नव्हता, जिथे स्मिता ठाकरे यांना आमंत्रण केले जात नव्हते! किंबहुना डिजायनर पेहरावात स्मिता ठाकरे वावरताना अनेकदा अनेकदा छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत! मोठ-मोठे स्टार्स आपापले प्रश्न घेऊन ’मातोश्री’वर ये-जा करीत असत. आणि त्याचा फायदा स्मिता ठाकरे यांना होत असे! आज या सर्व गोष्टींचा विसर स्मिता ठाकरे यांना का पडला?

बिंदुमाधव ठाकरे यांच्या मृत्यूनंतर मानसिकरित्या खचलेल्या शिवसेनाप्रमुख हे जयदेव ठाकरे यांच्या घर सोडल्यामुळे अधिकच दु:खी झाले! त्यांचा तिसरा मुलगा उद्धव ठाकरे हे मात्र सर्वकाळ शिवसेनाप्रमुखांबरोबरच होते. प्रत्येक दु:खातून सावरण्याकरिता उद्धव ठाकरेच पुढे धावले होते! त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनाप्रमुखांचा जास्त कल असणे स्वाभाविक आहे! उद्धव ठाकरे शांत स्वभावाचे असल्याने त्यांना शत्रू कमी आहेत! म्हणूनच शिवसेनाप्रमुख यांनी आपल्या शिवसेनेचे कार्याध्यक्षपद उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविले! तीघा मुलांपैकी एकटे उद्धव ठाकरेच ’मातोश्री’वर राहिले होते! त्यामुळे तसे म्हटले तर शिवसेनाप्रमुखांकडे चॉईसच नव्हता!

चित्रपटसृष्टीत वावरल्यानंतर स्मिता ठाकरे यांनी समाजसेवेत रस घेतला! ’मुक्ती फाऊंडेशन’ची स्थापना त्यांनीच केली. आज या फांऊंडेशनने बरेच काम केले आहे! एडससारख्या घातक रोगावर मात करण्यासाठी फाऊंडेशनने केलेले काम कौतुकास्पद आहे! मात्र एखादी नविन संस्था स्थापन करणे आणि संस्थेतर्फे भरभरून काम करण्यासाठी लागणारे भांडवल जमवणे महाकठीण आहे! हे भांडवल निव्वळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेमुळे ’मुक्ती फाऊंडेशन’कडे सहजी चालत आले होते. याची जाणीव स्मिता ठाकरे विसरल्या का?

भाजपा नेते आहेत कुठे?

शिवसेना-भाजप यांची युती आहे. भाजपाने नेहमी ’परिवार’ची भाषा केली! पण आज भाजपाने एकदाही धावत येऊन स्मिता ठाकरे यांना समजविण्याचा प्रयत्न केला नाही! परिवाराचा अर्थ हाच का? केंद्रात तुकडे-तुकडे पडलेला भाजप जिवंत राहण्यासाठी कसाबसा धडपडत आहे! भाजपाचे सर्वात जेष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे एक पाऊल जरी भाजपात असले तरी दुसरे पाऊल केव्हाच बाहेर पडले आहे! त्यांची स्वत:ची स्थिती अतिशय बिकट आहे. अशा परिस्थित ते स्मिता ठाकरे यांना काय समजवणार?

रविवारचा सुट्टीचा मजेचा दिवस अतिशय बेकार गेला! कारण त्यादिवशी प्रत्येक टिव्ही चॅनेलवर स्मिता ठाकरे यांच्या बंडखोरीचे वृत्त अधिक मसालेदार करून दाखविले जात होते! राज्यसभेवर जाण्याची स्मिता ठाकरे यांची इच्छा होती. पण त्यांच्याऐवजी भारतकुमार राऊत यांना राज्यसभेवर पाठविले गेले! खासदारकी गेली, मग आमदारकीही गेली म्हणून स्मिता ठाकरे नाराज झाल्या असे म्हणतात! आमदार अथवा खासदार होण्यासाठी अनेकजण ’मातोश्री’च्या पायऱ्या चढल्या असतील आणि त्यातील जवळजवळ सर्वांनी हजारोवेळा स्मिता ठाकरे यांना त्यावेळी मस्का मारला असेल! असे अनुभव आले असताना आमदारकी आणि खासदारकी इतकी म्हत्वाची कशी वाटते? आमदार होऊन किंवा खासदार होऊन जितका पैसा कमावणे शक्य आहे, त्याच्या अनेकपट अधिक पैसे त्यांनी कमविले असतील! साधी रिसेप्शनिस्ट असताना आज जुहू येथे स्वत:चा बंगला घेऊन स्मिता ठाकरे रहात आहेत! आमचे इतकेच म्हणणे आहे की, ज्यांनी हे सर्व दिले, ते आता थकले असताना त्यांच्या हृदयावर आणखी घाव घालू नयेत! आणखी किती घाव पचवायचे राहिले आहेत?

राजकिय खेळी बेकार!

कॉंग्रेसची विचित्र खेळी सुरू आहे! भाजपा स्वत:च्या कृत्यामुळे तुकडे तुकडे होऊन कोसळत आहे! डोलारा कोसळावा आणि भग्न अवस्थेतील राजवाडा तसाच उरावा, अशी भाजपाची परिस्थिती आहे! विधानसभा निवडणूकीत मिळालेल्या पराजयामुळे शिवसेना पक्ष थकला आहे! लोकसभेत निव्वळ आठ जणांना निवडून आणता आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न भंग झाले आहे! अशा स्थितीत कॉंग्रेससारखा एकमेव शक्तिशाली पक्ष लोकांच्या नजरेसमोर आहे आणि याच शक्तिला लहान मोठे ठोसे देण्याची ताकद फक्त मनसे पक्षात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकिय पक्षाला भरपूर वाव मिळाला तो कॉंग्रेसमुळेच! युतीची मते गिळण्याचे काम मनसेमुळे झाले! पण आता मनसेची महत्वाकांक्षा वेळीच चेपण्यासाठी स्मिता ठाकरे यांचा उपयोग इस्पिकच्या एक्क्याप्रमाणे होणार आहे! ठाकरे घराण्याची अत्यंत लाडकी-गाजलेली, सुप्रसिद्ध व हुशार सुन जर कॉंग्रेसकडे आली, तर मराठी माणसाची तुटलेली मने स्मिता ठाकरे यांच्या मार्गाने कॉंग्रेसकडे वळतील! या बहुमुल्य कामगिरीसाठी स्मिता ठाकरे यांची खासदार किंवा आमदार होण्याचे स्वप्न कॉंग्रेस नक्कीच पुर्ण करेल! म्हणूनच आम्ही खुले आम आमचे स्वत:चे मत व्यक्त करू इच्छित आहोत. दुसऱ्याच्या हातातले खेळणे होण्यापेक्षा स्वताच्या मर्जीने स्वत:चा मान-सन्मान ठेवून घराण्याची मर्यादा राखणे अधिक चांगले!

एकेकाळी केवळ स्मिता ठाकरे यांनी वारंवार सांगितल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाकरिता नारायण राणे यांच्या नावाचा विचार केला होता! मनोहर जोशी यांचा राजिनामा घेऊन नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते! आज नारायण राणे कॉंग्रेसमध्ये आहेत. मुख्यमंत्री होण्यासाठी भरपूर धडपडत आहेत! तथापि कॉंग्रेसमध्ये ४० ते ६० वर्षे कॉंग्रेसची सेवा केलेले नेते असताना बंडखोरी केलेल्या नारायण राणेंना मुख्यमंत्रीपद कसे द्यायचे? असा सवाल पुढे आला त्यामुळे नारायण राणे यांना आजवर मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. हे चित्र डोळ्यासमोर असताना स्मिता ठाकरे यांना त्यांची राजकिय महत्वाकांक्षा कॉंग्रेसपक्षात जाऊन पूर्ण होईल, असे कसे काय वाटेल? विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, नारायण राणे, पतंगराव कदम, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, जयंत पाटील... इतक्या दिग्गजांना ओलांडून त्या मुख्यमंत्री होऊ शकतील का?

तेव्हा सर्व खेळ उघड आहे! राज ठाकरे यांची शक्ती खच्ची करण्याकरिता स्मिता ठाकरे यांचे हत्यार पुढे करण्यात येत आहे! राज ठाकरे यांच्या मदतीने युतीला धक्का देण्यात आला आणि स्मिता ठाकरे यांची मदत घेऊन पुन्हा तोच खेळ खेळला जात आहे!!

मराठी अस्मितेचा पता वापरला जाणार आहे! महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले होते की, "जर स्मिता ठाकरे यांना कॉंग्रेसचा विचार प्रवाह मान्य असेल तर आम्ही कोणतीही हरकत घेणार नाही. मात्र त्यांच्यासाठी खास गालिचा अंथरला जाणार नाही!" याचा अर्थ काय? माणिकराव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेत सारे काही आले नाही का?

भाजपाने पूर्वी कॉंग्रेस पक्षाच्या गांधी-नेहरू घराण्याला छळण्याकरिता मनेका गांधी यांना पुढे करून सोनियावर मात करण्याचा प्रयत्न केला होता! राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढायला लागताच वरूण गांधी यांचा प्रचार करून त्यांना पुढे आणले होते. मनेका गांधी आणि वरूण गांधी यांच्यामुळे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भरपू दु:ख सहन करावे लागले आहे! आज काहिसा तसाच प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे! जर घराण्याच्या शक्तिविरोधात लढता येत नसेल तर घराण्यातील एखाद्या व्यक्तिला बाजूला करून याचेच हत्यार बनविले जाते!

Monday 12 October, 2009

२२ ऑक्टोबर.. विधानसभेवर भगवा फडकणारच! .. असेल हिंमत तर अडवा!!


काहीच तासात मतदान सुरू होईल, आणि महाराष्ट्राचे भविष्य तुमच्या हातून घडणार आहे. मतदान करण्यापूर्वी महत्वाचे आहे की कोणी काय काम केले हे समजून घेणे.

लोकसभा निवडणूकीनंतर झोपी गेलेले राजूसुपारी ऐन निवडणूकीवेळेस झोपेतून उठतात. आणि बकबक भाषण सुरू होते. इतके दिवस तुम्ही कुठे होतात? लोकसभा निवडणूका झाल्यावर, आपण कुठलेही मुद्दे हातात घेताना दिसला नाहीत? असे विचारता, म्हणतात.. महाराष्ट्राची "ब्लू प्रिंट" बनविण्यात बिझी असल्याने मुद्दे घेऊ शकलो नाही... बरं का! ह्यांची ब्लू प्रिंट (वचकनामा) रद्दी पेपरसारखी ४ पानांची काल प्रकाशित केली. जशी कॉंग्रेसने सरळ सरळ कॉपी शिवसेना-भाजप च्या वचननाम्याची केली, तशीच शिवसेना वचननाम्यातील चार लाईन चोरी करून स्वत:चा रद्दी "वचकनामा" मनसेने बनविला. आणि ह्यांच्या वचकनाम्यामध्ये शेतकरी आत्महत्यांबद्दल पहिल्या लाईन वर नसून सगळ्यात खाली सहाव्या लाईनवर दिसून येतो. यातच समजून येते की, यांना शेतकऱ्यांची किती काळजी आहे... बरं का! मागच्या काही महिन्यांत घडलेले बलात्कार, खंडणीवसूली या सगळ्या कामावरून दिसून येतेय की, काय नवनिर्माण हे करत आहेत.
मागिल १० वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेवर असून महाराष्ट्र जिथे बऱ्याच क्षेत्रात एक नंबर वर होता आता तिथे सहाव्या नंबरवर जाऊन पोहचला आहे. शेतकरी आत्महत्या, लोडशेडींग, महागाई सगळ्या विषयांवर या लोकांनी दुर्लक्ष केले आणि सत्ता भोगली असले हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार.

अजमल कसाबला गेट वे समोर फाशी दिली पाहिजे हे आपले सगळ्यांचे मत आहे. कसाब तर बाहेरचा आतंकवादी आहे. अगोदर जे घरात लपून असले आहेत ते राष्ट्रवादीच्या शरद पवारांसारख्यांना फाशी लावली पाहिजे. केंद्रात कृषीमंत्री असून हयांनी काय उत्पन्न केले? जसे "गोष्ट छोटी डोंगराएवढी" चित्रपटात पेट्रोलची खाण असल्याचे फसवून गावात आणून त्याला राबविले जाते अगदी तसेच कृषीमंत्र्यासोबत आमच्या शेतकऱ्यांनी करायला हवे होते. एकेकाळी साखर हिंदुस्थानातून इतर देशात निर्यात केली जात होती, पण शरद पवारांच्या कृपेने आता ३० मिलीयन मेट्रीक टनहून अधिक साखर आपल्याला परदेशातून आयात करावी लागत आहे. कृषीमंत्री असताना यांनी हरितक्रांती करायला हवी होती पण काय केलं यांनी?

या सगळ्या चोरांची गर्दी एकीकडे आणि उद्धवसाहेब एकीकडे. गरीबांचे, शेतकऱ्यांचे दु:ख जाणुन घ्यायला दिवस-रात्र एक केली. एकदा नाही तर दोनदा अख्या महाराष्ट्राचा दौरा केला; आणि इतक्या कमी वेळात ७०० पेक्षा जास्त सभा कोणतीही निवडणूक नसताना ग्रामीण महाराष्ट्रात घेऊन एक आगळा विक्रम केलाय. महागाई असो की लोडशेडींगचा मुद्दा, रस्त्यावर उतरतो तो फक्त शिवसैनिकच!

"माझे सरकार, माझा वचननामा" हा एक अनोखा वचननामा पहिल्यांदाच जनतेने बनविलेला वचननामा आहे तसेच या वचननाम्याच्या पूर्तीसाठी एक वेगळे खातेही बनविण्याचा उद्धवसाहेबांचा मानस आहे. एक दारिद्र्यमुक्त आणि विकसीत महाराष्ट्राचे स्वप्न आहे.

"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" मधले काही वाक्ये पुन्हा सांगावेसे वाटतात...

कडे-कपाऱ्या दऱ्या-खोऱ्यातून, निधड्या छातीने घोड्याच्या टापा ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या, त्या शिवबाचे वारसदार असे हतबल होऊन स्वत:च्या मराठीपणाची लख्तरं गुढी उभारल्यासारखी महाराष्ट्राच्या वेशीवर टांगलीय. याचसाठी केला का केला होता अट्टाहास, हिंदवी स्वराज्याचा? मर्द मावळ्यांच्या राज्याचा? आई भवानीचा आशिर्वाद आणि जिजाऊंचा लढावू बाणा घेऊन, रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली, ती हाच दिवस पाहण्यासाठी? तुम्हाला मराठी असण्याची लाज वाटते हे ऐकण्यासाठी?

मराठी माणूस आज स्वत:च्या कर्तुत्वाने मागे राहिला आहे. "आमची कुठेही शाखा नाही" असे अभिमानाने सांगता तुम्ही, अहो त्या गोष्टीची लाज वाटायला हवी, त्या अभिमानाची पाटी कसली लावता? मराठी माणसाला मान नाही कारण हि स्थिती तुम्हीच स्वत:वर ओढवून घेतलीय. स्वत:च्या नाकर्तेपणाचे दोष परप्रांतियांवर लादू नका.

जागे व्हा आणि पुन्हा आपल्या धमन्यात खेळवा मर्द मराठ्याचा सळसळता रक्त. सर्व क्षेत्रांत मराठ्यांचे प्रभुत्व स्थापित करा. वेडात मराठे वीर दौडले सात. आजच्या काळात त्या गाण्याचा बदल करायला हवा. माझा लाखो, करोडो लोकांचा मुलुख आणि वेडात मराठे वीर दौडले फक्त सातच? आता म्हणा वेडात मराठे वीर दौडले सात नाही एकसाथ.. आणि मग पुन्हा एकदा म्हणता येईल.. दिल्लीचा तख्त राखितो महाराष्ट्र माझा!

Saturday 26 September, 2009

श्रीवर्धन आणि महाडमध्ये शिवसेनेचे भगवे वादळ!

काल शिवसेनेच्या दक्षिण रायगड मधील श्रीवर्धन आणि महाडमधील शिवसेनेचे उमेदवार अनुक्रमे आमदार तुकाराम सुर्वे आणि रा.जि. बांधकाम सभापती भरतशेट गोगावले यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धवसाहेबांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे रायगडावर भगवा फडकविण्याचे स्वप्न लोकसभेच्या माध्यमातून साकार करून दाखविले आहे. आता या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा फडकविण्याचे स्वप्न सर्व शिवसैनिकांना पूर्ण करायचेय.

बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार आहे यात वादच नाही, परंतु हे स्वप्न पूर्ण करताना शिवरायांच्या राजधानीत रायगडामध्ये खास करून दक्षिण रायगडमधील दोन्ही जागा शिवसेनेने जिंकणे अतिशय महत्वाचे आहे. त्याप्रमाणे काल शिवसैनिकांनी दाखविलेल्या झळकीनेच दोन्ही ठिकाणचे राष्ट्रवादीचे(भ्रष्ट्रवादी खरे तर म्हणावे लागेल) दोन्ही उमेदवार हादरले असतील यात वादच नाही.

श्रीवर्धन मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. श्रीवर्धन, म्हसळे, माणगाव, तळे आणि रोहा असा विखुरलेला मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण भागाचा असा मिश्र मतदारसंघ आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणूकीमध्ये इथून शिवसेनेकडे ८००० आघाडी आहे. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणूका पूर्णपणे वेगळ्या असल्याने यात फरक आहेच. गोरेगांव अर्बन बँक, रोहा-अष्टमी बँक, चंडिका पतपेढी या संस्थांमधील जवळजवळ २१० कोटी रुपयाला चुना राष्ट्रवादी आणि त्यांच्या चेल्यांनी लावलेला आहे. लोकांमध्ये प्रचंड चिड आहे. तटकरे यावेळेस पुन्हा नकोय अशी भावना स्थानिक लोकांमध्ये असल्याने सुर्वे साहेबांना हि निवडणूक तशी जड जाणार नाही. परंतु कुठल्याही प्रकारे स्वस्थ न बसता शिवसैनिकांनी लक्ष देऊन काम करणे गरजेचे आहे.

भरतशेट गोगावले यांच्या बद्दल खुप काही सांगण्याची गरज नाही. मतदारसंघातील जवळ जवळ सगळ्या गावात फिरलेला हा माणुस लग्न, नामकरण समारंभासारख्या छोट्या मोठ्या सुख दुखात सहाभागी होणारा शिवसैनिक म्हणून या विभागात ख्याती आहे. रायगड जिल्हापरिषदेत बांधकाम सभापती म्हणून काम करताना लोकांच्या कामाकडे कुठल्याही प्रकारे जनतेची कामे झालीच पाहिजे इकडे भरतशेट खास करून लक्ष देत असतात. सुनिल तटकरेप्रमाणेच गोरेगांव अर्बन बँकेला बुडविण्याचा हात माणिक जगतापचाही असल्याने याचेही काही खरे नाही. कालच्या भरतशेटच्या अर्ज भरण्याच्या वेळेस जवळ जवळ पूर्ण महाड शहर लोकांनी गजबजून गेला होता. काही स्थानिकांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या कि, एवढी गर्दी अर्ज भरण्यासाठी प्रथमच होत आहे आणि भरतशेट हे नक्की जिंकलेले आहेत.

तर एकूण हे दोन मतदारसंघ शिवसेना जिंकून आपले रायगडमधील भगवा झेंडा अखंड फडक्त ठेवतील यासाठी शिवसैनिक नक्कीच काम करत आहेत.

Tuesday 22 September, 2009

पाणी गाळा, नारू टाळा!

गोरेगाव गटप्रमुख मेळावा विडीयो!





महाराष्ट्राचा लालू

हल्ली निवडणूका असल्याने कोण काय बोलेल काय नाही याचा पत्ता नाही. पण देशाचे माजी रेल्वे मंत्री म्हणजे काही औरच! महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत रामदास आठवले यांना महाराष्ट्राचे लालू म्हटले जायचे, पण आता नविन लालूही तयार आहे. काल महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहिर करताना असेच उसणे अवसान आणून लालूछाप जोक मारून खिदळत होता.

म्हणे विक्रोळीमध्ये आमचा जास्त जोर असल्यानेच शिवसेनेने पहिली प्रचारसभा तिथे घेतली. काय म्हणावे याच्या मडक्याला? कांदे-बटाटे महाग झाल्याने याचे मडके रिकामेच असले पाहिजे. होय! कॉंग्रेस शिवसेनेचा एक नंबरचा शत्रू आहे हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही. कारण शिवसेना महाराष्ट्रातील एक नंबरचा विरोधी पक्ष आहे. शिवसेना सत्तेच्या दिशेने पाऊल टाकत आहे. शिवसेनेला कुठल्याही उमेदवाराला पाडायचे नसून कॉंग्रेसला गाडायचेय. शिवसेनेने काय करावे काय करू नये हे सांगणारा तु कोण टिनपाट? तुझे काय संबंध शिवसेनेशी? काही नाही ना! मग थोबाड बंद कर. उद्धवसाहेबांनी मागे काही प्रश्न विचारले होते त्याची उत्तरे शोधली नाही आणि चालला आपला पुढे पुढे करायला!

काही दिवसांपूर्वी आदित्यचा गोरेगाव मध्ये केलेला सत्कार पाहून याच्या भुवया ताणल्या गेल्या म्हणे मला हेच आवडत नाही. तुझ्या आवडी-निवडीशी आम्हाला काय करायचेय. पण एवढ्याशा आदित्यचा तु कशाला धसका घेतो आहेस? त्याने निदान विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलेल आहे, तुझं काय? तु लक्ष दे तो निरुपम काय बोलतोय तिकडे. कारण त्याच्याकडे लक्ष दिले नाहीस तर तुला कॉंग्रेस पैसे देणार नाही. विधानसभेला लाखा-लाखाने घेतलेस ना, आता कोटी-कोटी घ्यायचेत ना?

म्हणे करायला चाललाय महाराष्ट्राचे नवनिर्माण! हे कसले नवनिर्माण हे तर मराठी माणसाचे महानिर्वाण आहे. होय मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करायला निघालेल्या कॉंग्रेसचे जातीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी, शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठीच तुझी निवड कॉंग्रेसने केलेली आहे. कॉंग्रेसने स्क्रिप्ट लिहायची आणि तु त्याप्रमाणे चालायचे. आणि मराठी माणसाला सांगायचे "आंदोलने कशाला हवीत? धमक्या दिल्यानेही प्रश्न मिटतात?" मग असे किती प्रश्न मिटवले तु? किती लोकांना काम दिले? शिव उद्योग सेनेच्या नावात उद्योग असताना नोकऱ्यांसाठी पैसे घेतले त्यातले कितीजण अजून काम करत आहेत?

नुसती बडबड करणारा लालू आणि या महाशयांमध्ये कितीसा फरक आहे? सगळीकडे हशा चाललाय, तेही मराठी माणसाच्या दुर्दशेवरच!

Monday 21 September, 2009

शिवसेनेचे बंडोबा!

आज सकाळी सामना हातात पडला. शिवसेनेच्या उमेदवारांची यादी आजच्या सामनामध्ये जाहिर केली होती. तमाम शिवसैनिकांना हि निवडणूक जिंकून साहेबांचे स्वप्न पुर्ण करायचे असल्याने या उमेदवार यादी बद्दल उत्सुकता होती. बाळासाहेब आणि कार्यप्रमुख उद्धवसाहेबांनी यावेळेस कुणाला संधी दिली आहे हेही पाहण्यात शिवसैनिकांना नक्कीच रस असतो, परंतु मेहनत घेऊन शिवसेनेच्या प्रत्येक निवडणूकीत आपले घाम गाळणाऱ्या शिवसैनिकांचा साहेबांनी दिलेल्या उमेदवाराला कधीच आक्षेप नसतो त्याचप्रमाणे आताही नाही.

परंतु विधानसभेचे बाशिंग बांधलेल्या बंडोबांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली. आपले नाव या यादीत नसल्याने आपले काय होणार या भितीने अस्वस्थ होऊन आगडपाखड करून आम्हाला काम करून शिवसेनेने संधी दिली नाही याचे तुणतुणे सुरू झाले. मुंबईतील काही नगरसेवक शशिकांत पाटकर, राहुल शेवाळे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची भाषा केली आहे. उपविभागप्रमुख सिताराम दळवी यांनाही उमेदवारी हवी होती. परंतु कुठल्याही गोष्टींचा आणि अगदी बाळासाहेबांच्या स्वप्नांचा विचार न करता बंड सुरू झाले.

यातील काही नगरसेवक असूनही पुन्हा यांना विधानसभेची घाई लागलेली दिसतेय. शिवसेनेत बंडखोरी होत नाही असे म्हटले जायचे कारण शिवसेनेतील प्रत्येक शिवसैनिक हा जसा निष्ठावान समजला जातो तसेच शिस्तीचा सैनिक म्हणूनही गौरव केला जातो. पण या आमच्या महापुरूषांना याच्याशी काहीही देणेघेणे नाही. ज्या पक्षाच्या, शिवसेनाप्रमुखांच्या आशिर्वादाने आणि शिवसैनिकांच्या मेहनतीने हे नेगरसेवक पदाची फळे चाखत आहेत त्यांना सोयीस्करपणे विसरून गेले.

सर्वसामान्य शिवसैनिकांचा विचार यांनी केलेला आहे का? तर नक्कीच नाही. रंगशारदा मध्ये उद्धवसाहेबांनी स्पष्ट विचारले होते की, साहेबांनि दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत का तर सर्वांनी एकासुरात हो म्हटले असतानाही यांना पक्षापेक्षा स्वार्थच मोठा वाटला. सर्वसामान्य शिवसैनिक यांच्याकडे आदराने विश्वासाने बघतो परंतु बंडोबांना याचे सोयरेसुतक नाही.

आता पाहू या, एकदा पक्षाकडून यांची मनधरणी केली जाईल असे वाटतेय. पण तरीहि जर यांना माघार घ्यायचीच नसेल तर त्याला काही पर्याय एकच आहे. प्रत्येक शिवसैनिकांनी आपली असलेली ताकद वापरून कसेही करून यांना घरी बसवायचे बस्स!

शिवसेनेचे १२६ उमेदवारांची यादी

) दहिसर - विनोद घोसाळकर
) मागाठणे - अशोक नर
) जोगेश्वरी (पूर्व) - रवींद्र वायकर
) गोरेगाव - सुभाष देसाई
) अंधेरी (पूर्व) - रमेश लटके
) विलेपार्ले - विनायक राऊत
) अणुशक्तीनगर - तुकाराम काते
) वांद्रे (पूर्व) - प्रकाश (बाळा) सावंत
) कुर्ला - मंगेश कुडाळकर
१० ) वरळी - आशीष चेंबूरकर
११ ) शिवडी - दगडू सकपाळ
१२ ) भायखळा - यशवंत जाधव
१३ ) मुंबादेवी - अनिल पडवळ
१४ ) श्रीवर्धन - तुकाराम सुर्वे
१५ ) महाड - भरत गोगावले
१६ ) दापोली - सूर्यकांत दळवी
१७ ) गुहागर - रामदास कदम
१८ ) चिपळूण - सदा चव्हाण
१९ ) राजापूर - राजन साळवी
२० ) कुडाळ - वैभव नाईक
२१ ) सावंतवाडी - शिवराम दळवी
२२ ) आंबेगाव - सौ. कल्पना आढळराव-पाटील
२३ ) खेड-आळंदी - अशोक खांडेभराड
२४ ) इंदापूर - भीमराव भोसले
२५ ) बारामती - ऍड. राजेंद्र काळे
२६ ) पुरंदर - विजय शिवतारे
२७ ) भोर - शरद ढमाले
२८ ) चिंचवड - श्रीरंग बारणे
२९ ) कोथरूड - चंद्रकांत मोकाटे
३० ) हडपसर - महादेव बाबर
३१ ) भोसरी - सौ. सुलभा रामभाऊ उबाळे
३२ ) कोपरगाव - अशोक काळे
३३ ) पारनेर - डॉ. विजय आवटी
३४ ) अकोले - श्री. तळपाडे
३५ ) नगर (शहर) - अनिल राठोड
३६ ) करमाळा - सूर्यकांत पाटील
३७ ) बार्शी - विश्वास बारबोले
३८ ) सोलापूर (शहर-मध्य) - पुरुषोत्तम बर्डे
३९ ) पंढरपूर - दीपक भोसले
४० ) सांगोला - बाळासाहेब वाळके
४१ ) फलटण - बाबूराव माने
४२ ) वाई - पुरुषोत्तम जाधव
४३ ) कोरेगाव - संतोषभाऊ जाधव
४४ ) कराड (उत्तर) - वासुदेव माने
४५ ) पाटण - शंभुराज देसाई
४६ ) राधानगरी - सूर्यकांत भोईटे
४७ ) करवीर - चंद्रदीप नरके
४८ ) कोल्हापूर (उत्तर) - राजेश क्षीरसागर
४९ ) शाहूवाडी - सत्यजित पाटील
५० ) हातकणंगले - डॉ. मिणचेकर
५१ ) सांगली (इस्लामपूर) - अनंतराव पवार
५२ ) खानापूर - गणेश सुबराव निकम
५३ ) धुळे (ग्रामीण) - प्रा. शरद पाटील ,
५४ ) धुळे शहर - गोपाळराव केले
५५ ) जळगाव : चोपडा - डी. पी. साळुंके
५६ ) भुसावळ - ऍड. राजेश झाल्टे
५७ ) जळगाव (शहर) - सुरेशदादा जैन
५८ ) जळगाव (ग्रामीण) - गुलाबराव पाटील
५९ ) एरंडोल - चिमण आबा पाटील
६० ) पाचोरा - आर. ओ. पाटील
६१ ) नांदगाव - संजय पवार
६२ ) मालेगाव (बाह्य) - दादा भुसे
६३ ) येवला - माणिकराव शिंदे
६४ ) निफाड - अनिल कदम
६५ ) दिंडोरी - धनराज महाले
६६ ) नाशिक (मध्य) - सुनील बागूल
६७ ) देवळाली - बबनराव घोलप
६८ ) इगतपुरी - रामदास घारे
६९ ) बुलढाणा - विजयराज शिंदे
७० ) सिंदखेडराजा - डॉ. शशिकांत खेडेकर
७१ ) मेहेकर - संजय रायमूलकर
७२ ) अकोट - संजय गावंडे
७३ ) अकोला (पूर्व) - गुलाबराव गावंडे
७४ ) कारंजा - राजेंद्र पाटणी
७५ ) बडनेरा - सुधीर सूर्यवंशी
७६ ) तिवसा - संजय बंड
७७ ) दर्यापूर - अभिजीत आनंदराव अडसूळ
७८ ) अचलपूर - अनंत गुढे
७९ ) हिंगणघाट - अशोक शिंदे
८० ) वर्धा - रवी बालपांडे
८१ ) वणी - विश्वास नांदेकर
८२ ) दिग्रस - संजय राठोड
८३ ) पुसद - डॉ. आरती फुफाटे
८४ ) रामटेक - ऍड. आशीष जैस्वाल
८५ ) भंडारा - नरेंद्र भोंडकर
८६ ) गोंदिया - रमेश कुथे
८७ ) आरमोरी - श्रावण रंधये
८८ ) राजुरा - अरुण नवले-पाटील
८९ ) वरोरा - सुरेश (बाळू) धानोरकर
९० ) भोकर - भीमराव क्षीरसागर
९१ ) नांदेड (दक्षिण) - हेमंत पाटील
९२ ) लोहा - प्रा. मनोहर धोंडे
९३ ) देगलूर - सुभाष साबणे
९४ ) मुखेड - संपुटवाड
९५ ) बसमत - डॉ. जयप्रकाश मुंदडा
९६ ) कळमनुरी - गजानन घुगे
९७ ) जिंतूर - हरिभाऊ लहाने
९८ ) परभणी - संजय (बंडू) जाधव
९९ ) पाथरी - सौ. मीरा कल्याण रेंगे-पाटील
१०० ) घनसावंगी - अर्जुन खोतकर
१०१ ) जालना - भास्कर आंबेकर
१०२ ) बदनापूर - संतोष सांबरे
१०३ ) कन्नड - नामदेवराव पवार
१०४ ) औरंगाबाद (मध्य) - विकास जैन
१०५ ) औरंगाबाद-पश्चिम - संजय शिरसाट
१०६ ) पैठण - संदीपान भुमरे
१०७ ) गंगापूर - अण्णासाहेब माने
१०८ ) वैजापूर - आर. एम. वाणी
१०९ ) बीड - प्रा. सुनील धांडे
११० ) लातूर (शहर) - श्रीपाद (पप्पू) कुलकर्णी
१११ ) औसा - दिनकर माने
११२ ) उमरगा - ज्ञानेश्वर चौगुले
११३ ) उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर
११४ ) परांडा - शंकरराव बोरकर
११५ ) पालघर - सौ. मनीषा निमकर
११६ ) नालासोपारा - शिरीष चव्हाण
११७ ) वसई - विवेक पंडित
११८ ) शहापूर - दौलत दरोडा
११९ ) भिवंडी (पूर्व) - योगेश पाटील
१२० ) अंबरनाथ - डॉ. बालाजी किणीकर
१२१ ) कल्याण (ग्रामीण) - रमेश म्हात्रे
१२२ ) ओवळा माजिवडा - प्रताप सरनाईक
१२३ ) कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे
१२४ ) ठाणे - राजन विचारे
१२५ ) कर्जत - देवेंद्र साटम
१२६ ) ऐरोली - विजय चौगुले

Saturday 19 September, 2009

शिवसेनेच्या मतदार संघाची जिल्हावार यादी

नंदूरबारः अक्कलकुवा (अनुसूचित जमाती), नंदूरबार (अनुसूचित जमाती).

धुळेः धुळे ग्रामीण, धुळे शहर.

जळगावः चोपडा (अनुसूचित जमाती), भुसावळ (अनुसूचित जाती), जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा.

नाशिकः नांदगांव, मालेगाव बाह्य, कळवण (अनुसूचित जमाती), येवला, सिन्नर, निफाड, दिंडोरी (अनुसूचित जमाती), नाशिक मध्य, देवळाली (अनुसूचित जाती), इगतपुरी (अनुसूचित जमाती).

बुलडाणाः बुलडाणा, सिंदखेडराजा, मेहकर (अनुसूचित जाती).

अकोलाः अकोट, अकोला पूर्व

वाशिमः कारंजा.

अमरावतीः बडनेरा, तिवसा, दर्यापूर (अनुसूचित जाती), अचलपूर.

वर्धाः हिंगणघाट, वर्धा.

यवतमाळः वणी, दिग्रस, पुसद.

नागपूरः काटोल, नागपूर दक्षिण, रामटेक.

भंडाराः भंडारा (अनुसूचित जाती).

गोंदियाः गोंदिया.

गडचिरोलीः आरमोरी (अनुसूचित जमाती)

चंद्रपूरः राजुरा, वरोरा.

नांदेडः हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, देगलूर (अनुसूचित जाती), मुखेड.

हिंगोलीः वसमत, कळमनुरी.

परभणीः जिंतूर, परभणी, पाथरी.

जालनाः घनसावंगी, जालना, बदनापूर (अनुसूचित जाती).

औरंगाबादः कन्नड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम (अनुसूचित जाती), पैठण, गंगापूर, वैजापूर.

बीडः बीड.

लातूरः लातूर शहर, औसा.

उस्मानाबादः उमरगा (अनुसूचित जाती), उस्मानाबाद, परांडा.

ठाणेः डहाणू (अनुसूचित जमाती), पालघर (अनुसूचित जमाती), बोईसर (अनुसूचित जमाती), नालासोपारा, वसई, शहापूर (अनुसूचित जमाती), भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, अंबरनाथ (अनुसूचित जाती), कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, मुंब्रा-कळवा, ऐरोली.

रायगडः पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड.

रत्नागिरीः दापोली, गुहागर, चिपळूण, राजापूर.

सिंधुदूर्गः कुडाळ, सावंतवाडी.

मुंबई उपनगरः दहिसर, मागाठाणे, विक्रोळी, भांडुप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, चांदिवली, मानखूर्द- शिवाजीनगर, अणुशक्ती नगर, कुर्ला (अनुसूचित जाती), वांद्रे पूर्व.

मुंबई शहरः धारावी, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मुंबादेवी.

पुणेः जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, चिंचवड, भोसरी, वडगाव शेरी, कोथरूड, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट (अनुसूचित जाती).

अहमदनगरः अकोले (अनुसूचित जमाती), संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर (अनुसूचित जाती), पारनेर, अहमदनगर शहर.

सोलापूरः करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ (अनुसूचित जाती), सोलापूर शहर मध्य, सोलापूर दक्षिण, पंढरपूर, सांगोले.

साताराः फलटण (अनुसूचित जाती), वाई, कोरेगाव, कराड उत्तर, पाटण.

कोल्हापूरः चंदगड, राधानगरी, कागल, करवीर, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले (अनुसूचित जाती), शिरोळ.

सांगलीः इस्लामपूर, शिराळा, पळूस-कडेगाव, खानापूर, तासगांव-कवठे महंकाळ.

महाराष्ट्राच्या विजयाची "भगवी बँड"


Tuesday 15 September, 2009

शपथ घेतो की...


गोरेगांव गटप्रमुखांच्या मेळाव्यात सर्व शिवसैनिकांनी घेतलेली शपथ...

आम्ही सर्व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आज शिवसेनाप्रमुखांना वचन देतो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या भगव्याच्या साक्षीने शपथ घेतो की, या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा भस्मासूर गाडून महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेले सरकार आणण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. त्यासाठी आम्ही जीवाचे रान करू आणि शेतकरी, कष्टकरी आणि कामकऱ्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवशाही स्थापन करू. मंत्रालयावर भगवा फडकविण्याचे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्यासाठी या क्षणापासून आम्ही कामाला लागत आहोत.

उतणार नाही, मातणार नाही, भगव्याची साथ कदापी सोडणार नाही.

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

Sunday 13 September, 2009

धनुष्य बाण हाच उमेदवार!

आजच्या गटप्रमुखांच्या मेळावा जबरदस्त झाला.. हॉल पूर्णपणे भरून वाहत होता. या मेळाव्याचे खास आकर्षण उद्धवसाहेबांसह आदेश बांदेकर, अभिजीत सावंत आणि आदित्य ठाकरे होते.

आदेशजींचे भाषण अतिशय सुंदर झाले खास करून १००% काम करायचेय म्हणून १००% एकच रंग असलेला भगवा निवडला.... लहानपणापासून जो आवाज ऐकत होतो तोच आताही ऐकताना भारावून जातो...

या मेळाव्यात भगव्या बॅंडचे लोकार्पण सुद्धा करण्यात आले. प्रत्येक शिवसैनिकांनी ती हातावर बांधून भगव्याच्या विजयाला हात्भार लावायचाय...असे उद्धवसाहेब म्हटले तसेच उमेदवारांच्या नावाच्या घोषणॆबद्दल बोलताना म्हणाले की, धनुष्यबाण हाच शिवसेनेचा उमेदवार असेल तेव्हा कोणीही उभा का असेना धनुष्यबाणालाच निवडून द्यायचेय...

मेळाव्यातील सर्व शिवसैनिकांना उद्धवसाहेबांनी बाळासाहेबांची शपथ दिली.

उघडा डोळे बघा नीट!

आजकाल मिडीयामध्ये सर्वाधिक चर्चा कुठल्याविषयावर होत असे तर ती राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीच्या बिघाडीबद्दल. वेगवेगळी मंडळी आपल्या मनात येईल तशी प्रतिक्रिया देऊन आपले घोडे दामटवण्याचे काम करत आहेत. पण प्रश्न आहे लोकांचा, लोकांना काय हवेय? महाराष्ट्राच्या साडे आठ कोटी जनतेला या आघाडी वाल्यांना एक एक करून मारायचेय की दोघांना एकत्रच हा उरला आहे.

गेली १० वर्षे महाराष्ट्राला उतरती कळा लागलेली आहे. शिवसेना-भाजप युतीच्या काळातील काही महत्वाकांक्षी प्रकल्प सोडल्यास यांनी काय केले हे जनतेला माहित नाही. सतत गरीबी हटावचे नारे देऊन वेगवेगळे नेत्यांची प्रत्येक वेळी गरीबी जोमाने हटली परंतु सर्वसामान्य माणसाला काय मिळाले याचे उत्तर कुणाकडेच नाही. शेतकरी आत्महत्या, महागाई, भ्रष्ट्राचार, जामिनी घोटाळे, गहू घोटाळे हे सगळे या १० वर्षात जनतेने पाहिले. प्रत्यक्षात काहीही न करता निवडणूकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पाडणे हे एकमेव काम या लोकांनी केलेल आहे आणि निवडणूकांनंतर या सगळ्या घोषणा म्हणजे प्रिंटींग मिस्टेक म्हणून बोलायलाही हे कमी नाहीत. कुणाचे हे दुर्दैव?

’जसा राजा तशी प्रजा’ असे म्हटले जाते. मग आपण काय समजायचे? की प्रजाच तशी आहे म्हणून असे राज्यकर्ते मिळाले का? तर नाही. जनतेने कुठेतरी प्रगती होईल, शिवसेना-भाजप युतीच्या कामांपासून धडा घेऊन हे कॉंग्रेसवाले काहीतरी करतील म्हणून नाही तर आमच्याच सर्वसामान्य मराठी माणसाने मला काय त्याचे दुसरे आहेत ना असा विचार करून निवडणूकीच्या वेळेस मतदान न केल्यामुळे हे घडले. १० वर्षे महाराष्ट्राच्या बोडक्यावर हे बिघाडी शासन आले.

परवा केंद्रसरकारने खर्च कपातीचा निर्णय म्हणून परदेशी जाणाऱ्या मंत्र्यांना बिजनेस क्लास ऐवजी इकॉनॉमीकल क्लास ने प्रवास करण्याची विनंती केली. तिथे आमचा "अजाणता राजा" भडकला. म्हणतो कसा की मला प्लेन मध्ये काम करायचे असते फाईल बघायच्या असतात तर हे सगळे काम इकॉनॉमी क्लास मध्ये कसे होणार? केवढा हा गंभीर प्रश्न! या अजाणत्या राजाला ऑफिस मध्ये बीसीसीआयचे एवढे काम असते की वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून विमानामध्ये बसून जनतेची काम करतो. (काय करणार तेवढाच वेळ जनतेसाठी देता येते म्हणून तर एवढ्या आत्महत्या झाल्या त्या कळल्या नाहीत).

पुन्हा निवडणुका आल्यात जनतेला पाच वर्षातून एकदाच यांना धडा शिकवण्याची संधी मिळते त्या संधीचे सोने केले तर भविष्य नक्कीच चांगले आहे. पण जर पुन्हा येरे माझ्या मागल्या झाले तर काही खरे नाही. उगाच स्वत:चे डोके आपटत बसण्यापेक्षा या आघाडीवाल्यांनाच का आपटत नाही?

Thursday 10 September, 2009

सांगलीचा निरो

सामनामध्ये श्रीराम मांडवेकरांचा प्रकाशित झालेला हा लेख वाचा!

Monday 7 September, 2009

अफजलखान तुमचा कोण लागतो?

आजच्या संपादकीय मध्ये हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी मिरजेतील धर्मांधांविषयी मांडलेले विचार





Sunday 6 September, 2009

मनसे सरचिटणीस शिवसेनेत!


मनसेचे सरचिटणीस श्री संजय घाडी आणि त्यांच्या पत्नी आणि महिला विभागसंघटक सौ संजना घाडी यांनी शिवसेना कार्यप्रमुख मा. उद्धवसाहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

सौ संजना घाडी यांनी २००७ च्या महानगर पालिकेची निवडणूक दहिसर विभागतून लढविलेली होती. तसेच संजय घाडी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे अत्यंत निकटवर्ती म्हणून समजले जात होते. श्री संजय घाडी हे येत्या विधानसभा निवडणूकीत मनसे कडून निवडणूक लढविणार असेही म्हटले जात होते.

संजय घाडी यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसे आणि राज ठाकरे यांना श्वेता परूळकर यांच्या नंतरचा सर्वात मोठा धक्का बसला आहे.

Saturday 5 September, 2009

महाराजांनी खानाचा कोथळा काढला होता?

यावर ऑर्कुट शिवसेना कम्युनिटी सभासद नचिकेत गुरव यांचा लेख पुढीलप्रमाणे :
वास्तवात आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला गेला. खरेतर शिवराय अणि अफझलखान यांच्यात काका-पुतण्याचे नाते होते. पुतन्याच्या भेटीच्या ओढीनेच अफझलखान विजापूरहून शिवरायाना भेटायला प्रतापगडावर आला होता. शिवरायाना पाहताच त्याला प्रेमाचा उमाला आला व त्याने गलाभेटीसाठी शिवरायाना आलिंगन दिले. शिवरायांचा मुळात स्वभावच विनोदी होता. त्यानी खानास गुदगुल्या करण्यास सुरवात केली. खानाचे शारीर प्रचंड असल्याने त्याला कोलेस्ट्रोलची समस्या होती. त्यामुले अति हसण्याने त्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यात त्याचा मृत्यु झाला. हा खरा इतिहास आहे.

दूसरा प्रसंग शाहिस्तेखान बाबत आहे. याची बोटे शिवरायानी छाटली असे म्हंटले जाते ते ही चुकीचे आहे.

खरेतर येथे ही खान व शिवराय यांच्यात मामा-भाच्याचे नाते होते ( मित्र औरंग्याचा मामा तो आपला मामा या नात्याने ). येथेही अपनास असे चुकीचे शिकवले गेले की खानाने शिवरायांचे घर बलकावले. आता मामा भाच्याच्या घरी राहणार नाही तर कोणाच्या घरी राहणार ? त्याचा तो हक्क नाही का ? असो मग एक दिवस शिवराय मामाला भेटायला लाल महालात गेले. जेवण व हवा-पाण्याची चर्चा झाल्यावर, शिवरायानी मामाला तलवारीचे दावपेच शिकाविन्याचा अग्रह केला. आता भाच्याचे मन मोडवेना म्हनून मामने दावपेच शिकवन्यास प्रारंभ केला त्यात एक डाव शिकवताना चुकून शिवरायांची तलवार खानच्या बोटाला लागली त्यात त्याची बोटे तुटली. शिवरायानी यावर धावपळ करुन मामासाठी चांगला वैद्य अनन्यासाठी मामाच्या छावनी बाहेर धाव ही घेतली होती. पण चांगला वैद्य मिळाला नाही म्हनून मामाला आता कसे तोंड दाखवू म्हनून ते परत मामाच्या छावनित गेले नाही.

हा खरा इतिहास आहे. म्हनुनच अफझलवधाचा प्रसंग अपल्या सरकारने पाठ्यपुस्तकातून वगळला.

आदेश बांदेकर शिवसेनेत!

तमाम महाराष्ट्रातील वहिणींचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांनी काल शिवसेना कार्यप्रमुख उद्धवसाहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्यासह त्याच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांनीही सेनेत प्रवेश केलाय.

लहानपणापासून शिवसेना शाखेशी संबंधित असल्यामुळे शिवसेनेतील हा प्रवेश फक्त औपचारिकता असल्याचे त्यांनी सांगितले तसेच शिवसेना कार्यप्रमुख उद्धवसाहेबांनी सांगितले कि श्री. बांदेकर यांना त्यांच्या योग्य जबाबदारी लवकरच सोपविली जाईल.

Tuesday 1 September, 2009

माझे सरकार... माझा वचननामा!

आजच शिवसेना कार्यप्रमुख मा. उद्धवसाहेब यांनी एक विशेष घोषणा केलेली आहे. येत्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना आपला वेगळा वचननामा काढणार आहे आणि हा वचननामा जनता ठरवणार आहे. शिवसेना हेल्पलाईन आणि शिवसेनेच्या वेबसाईट्च्या माध्यमातून हि जनतेची मते घेतली जातील असेही श्री. उद्धवसाहेबांनी सांगितले आहे.

शिवसंवाद दौऱ्यात जनतेशी थेट संपर्क साधताना जनतेचे प्रश्न बघता जनताभिमुख वचननामा असला पाहिजे अशी संकल्पना समोर आली म्हणून शिवसेना जनतेच्या मतांचा विचार करून हा वचननामा बनवेल तसेच युतीचे सरकार आल्यावर वचननामा पूर्ण करण्यासाठी विशेष खाते सुरू करण्यात येईल. असेही श्री. उद्धवसाहेबांनी सांगितले आहे.

शिवसेनेच्या वेगळ्या पद्धतीने जनता आपली कामे शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्यासाठी पुढे येऊन पूर्ण करून घेऊ शकेल. तसेच जनतेची मते यात घेतली जाणार असल्याने येणारे युतीचे सरकार हे जनताभिमुख असेल असेही यातून दिसते.

सगळीकडे शिवसेना, शिवसेना आणि शिवसेनाच!

महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते राज ठाकरे यांना सध्या शिवसेनेशिवाय चैनच पडत नाही आहे. पक्ष सोडून जाऊन तीन वर्षे झाली तरी शिवसेनेचे नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नसावा असेच दिसतेय. हल्ली त्यांनी शिवसेनेचा धसकाच घेतला असला पाहिजे असेच काही आहे.

मुळात लोकसभेला जे मतदान झाले त्याने तसे राज ठाकरे हवेतच आहेत. आंदोलन न करता धमक्या दिल्याने जनतेचे प्रश्न सुटतात असे आजकाल त्यांना वाटू लागले आहे. असे आहे तर महाराष्ट्रात अनेक असे प्रश्न आहेत जे सुटणे आवश्यक आहे त्याबद्दल ते कधीच धमक्या देताना दिसत नाही. हे असे का? (सोप्पे कॉंग्रेसने स्क्रिप्ट दिल्याशिवाय आजकाल यांचे पानही हलत नाही).

म्हणे शिवसेनेत आता आक्रमक पणा उरलेला नाही! अहो पण आता तुम्ही शिवसेनेची काळजी कशाला करताय? तुमचा पक्ष आहे त्याची काळजी करा. तुमच्या पक्षात एवढा आक्रमकपणा आलाय की आज रस्त्यावरून चालणाऱ्या आयाबहिणींना तुमच्या लोकांपासून सुटका मिळण्याची गरज आहे. चोऱ्या, लुट, गाड्या जाळणे आणि बलात्कार करणे एवढेच काम तुमचे कार्यकर्ते सध्या आक्रमकपणे करत आहेत तर जरा तिकडे लक्ष द्या. आमचे उद्धवसाहेब आहेत पक्षाचे काय करायचे ते बघायला आणि हो आमचा ढाण्या वाघ सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहेच.

महाराष्ट्रात एवढे प्रश्न आहेत. गेली १० वर्षे जनता कॉंग्रेसच्या कामाने त्रस्त आहे आणि ते तुम्हाला दिसत असून गॉगलच्या आत वेगळेच काही चालले आहे. आज सर्वसामान्य माणसालाही हे कळते आहे. तुम्ही कॉंग्रेसचे पिल्लू आहात. तुम्ही कॉंग्रेसने सांगितल्याशिवाय काहीच करत नाही कारण काय? अर्थकारण की शिवसेना संपवण्याचा अफजलखानी विडा की मराठी माणसाला रस्त्यावर आणण्यासाठी?

तुम्ही शिवसेनेचा जप करत आहात याबद्दल मुळीच राग नाही आहे कारण तुम्ही जे बोलता ते आम्ही सत्य मानायला आम्ही तुमचे कार्यकर्ते नाही आहोत किंवा जनताही तुमच्यासारखे कॉंग्रेसच्या ताटाखालचे मांजर नक्कीच नाही. तुम्ही टिका करा शिवसेनेवर हवी तेवढी करा... शिवसेना नेत्यांवरही करा पण एक विसरू नका मागच्या १० वर्षातल्या ७ वर्षे तुम्हीही शिवसेनेचे नेते होतात तेव्हा काय तुमची दातखिळी बसली होती का? एकूण काय शिवसेनेवर टिका करताना तुमचा नालायकपणाच तुम्हीच जनतेसमोर मांडताय... मांडा आणखी मजा येईल तुमचा लाफ्टर शो बघायला!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका १३ ऑक्टोबरला!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका येत्या १३ ऑक्टोबर रोजी होणार आहेत, म्हणजेच येत्या दिवाळी नंतर महाराष्ट्रात नविन सरकार अस्तित्वात येणार आहे. या निवडणूकीची अधिसुचना १८ सप्टेंबर रोजी जारी होईल त्याच दिवशी उमेदवार अर्ज भरण्याची सुरूवात होणार असून २५ सप्टेंबर हि शेवटची तारीख असणार आहे, २६ सप्टेंबर ला अर्जांची छाननी होईल २९ सप्टेंबर अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. मतमोजणी दिवाळीनंतर लगेचच म्हणजेच २२ ऑक्टोबरला पार पडणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी ७ कोटींहून अधिक मतदार आपले बजावू शकणार आहेत.

Saturday 15 August, 2009

गोविंदाची हि वेगळी ओळख

कालच्या दहिहंडी संदर्भात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला जवळ जवळ सगळ्याच पक्षांनी चांगला प्रतिसाद दिला. विशेषकरून मोठ मोठ्या दहिहंडी आयोजकांनी या बदल्यात जे उपक्रम राबविले त्याने महाराष्ट्राची आणखी अनोखी ओळख देशात पोहचली आहे.

मराठी माणूस तसा उत्सवप्रेमी आहे हे नविन सांगण्याची गरज नाही. परंतु स्वाईन फ्लू मुळे जे काही घडतेय किंवा घडलेय ते नक्कीच कुठल्याही संवेदनशिल माणसासाठी अतिशय दु:खदायक आहे. त्यातूनच उद्धवसाहेबांनी सर्व मोठ्या दहिहंडी आयोजकांना यंदाची दहिहंडी पारंपारिक पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन केले तसेच बक्षिसरुपाने ठेवलेल्या रकमेचे सामाजिक कार्यासाठी वापर करण्यास सांगितले त्याप्रमाणे शिवसेनेच्या सर्व दहिहंडी आयोजकांनी कुणी मास्क वाटले, कुणी वैद्यकिय उपकरणे इस्पितळांना भेट दिली कुणी आणखी काय केले? यात जितेंद्र आव्हाड सुद्धा आलेच!

काही दिवटे असेही होते जे स्वत: बिहारी असून मुंबईच्या बाबतीत कधीही काही न बोलणारे मराठी माणसाच्या सणाचे महत्व पटवून देत होते किंवा स्वाईन फ्ल्यु बद्दल भिती बाळगू नये असे पाळपूद लावून आपले निवडणुकी अगोदर शक्ती प्रदर्शन करण्यात गुंतले होते. परंतु आज आपण विचार केल्यास ज्यांनी दहिहंडी आयोजन नाही केले त्यांचे योगदान यांच्यापेक्षा लाखमोलाचे आहे हे नक्कीच!

उत्सव बंद करणे कधीहि योग्य नाही परंतु जर वेळ तशीच आली तर आम्ही असे वेगळे काही करू शकतो हे कालच्या या काही घटनांवरून नक्कीच लक्षात आले!

Monday 27 July, 2009

उद्धवसाहेब - तरूणांचे आदर्श नेतृत्व

आजच्या देशाच्या राजकारणात फारच कमी आदर्श म्हणावेत असे नेते उरलेले आहेत. जे काही उरले आहेत ते आपल्या आयुष्याच्या उत्तारार्धात आहेत. भविष्याच्या राजकारणात सध्या तरी "आदर्श नेता" कोणी होईल असे चित्र नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातही काही वेगळे दिसतेय असे वाटत नाही. परंतु एक सच्चा माणूस हि पोकळी भरून काढण्याच्या दिशेने चालला आहे, नव्हे ती पोकळी निदान महाराष्ट्रापुरते म्हटल्यास भरून काढलेली आहे. ज्याला गोरगरीबांचे अश्रू दिसतात, शेतकऱ्यांची दारूण अवस्था पाहवत नाही, मुंबईतील गरीबांची दशा कळतेय, सर्वसामान्यांना नक्की काय हवेय याची संपूर्णपणे जाण आहे. तसेच स्वकर्तुत्वावर विश्वास असलेला माणूस आहे आणि तो म्हणजे आम्हा तरूण शिवसैनिकांचे लाडके उद्धवसाहेब!

शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून उद्धवसाहेबांना नक्कीच "मातोश्री" मध्ये बसून शिवसैनिकांना आदेश देऊन काम करता आले असते. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून शिवसेना वाढवण्याचे काम करत आहेत. शिवसैनिकांसह वेगवेगळ्या आंदोलनांत स्वत: सहभागी जनतेच्या कामांचा आवाज सरकारसमोर मांडत आहेत. शेतकरी आत्महत्यांविरोधात पुकारलेल्या जबरदस्त आंदोलनासमोर सरकारला झुकवून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिली परंतु नालायक सरकारच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. शेतकरी आत्महत्या, देता की जाता, वीजभारनियमन, युएलसी आणि म्हाडा विरोधातील मोर्चा, रिलायन्स भाववाढीच्या विरोधातील आंदोलन अशा आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. सध्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणमंत्र्यांनी घातलेल्या गोंधळाला सामंजस्याची भूमिका वारंवार सुचना देऊनही शेवटी व्हायचा तो गोंधळ झालाच.

उद्धवसाहेबांचे व्यक्तीमत्व प्रत्यक्ष भेटणाऱ्याला चांगले कळते असे मला वाटते. महाराष्ट्राचे आणि मुंबईचे प्रश्न सच्चेपणाने आज फक्त उद्धवसाहेब मांडत आहेत. केवळ दगडफेक करून मराठी माणसांची मने भडकवणे सोप्पे आहे पण त्याच्या गरजांवर आवाज उठविणे सोप्पे नाही हे चित्रच सध्या आहे. महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी, विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी, भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आज मराठी माणसांची नौका फक्त आणि फक्त उद्धवसाहेबच किनाऱ्याला लावू शकतात. शिवसेनेची सता असताना शिवसेनेने काय केलेले विचारणारे स्वत:च्या तुंबड्या भरून झाल्यावर हे प्रश्न निर्माण करीत आहेत. म्हणूनच एकदा उद्धवसाहेबांच्या हाती सत्ता आल्यास त्याची उत्तरे मिळतील किंबहुना सत्ता नसतानाही त्याची झळक मिळाली आहे.

आजच्या उद्धवसाहेबांच्या वाढदिवशी आपण सर्वांनी शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विधानसभेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी, एका सुसंस्कारीत, सुशिक्षित, आदर्श नेत्याकडे महाराष्ट्र सोपविण्यासाठी प्रत्येक तरूणांनी उद्धवसाहेबांचे मागे उभे राहावेच लागेल!

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

Monday 22 June, 2009

वांद्र्याची आग आणि बिल्डर

परवा वांद्रे येथील पूर्वेकडील बेहराम पाडा झोपडपट्टीत लागलेल्या आगीमागे आता बिल्डराचा हात असल्याचा लेख आजच्या सामनामध्ये आलेला आहे तो लेख आपण इथे क्लिक करून वाचू शकता.

नविन बांधलेल्या स्कायवॉकवरून प्रवास करताना सहज नजर उजव्या बाजूला टाकली तरी तिथे ५-६ मजली झोपड्या दिसायच्या. मुंबईतील इतर खासकरून हिंदूबहुल वस्त्यांमध्ये असे प्रकार नाहीतच किंवा १४ फुटापेक्षा जास्त उंची जात असल्यास पोलिस तिथे कारवाईला हजर असतात. आजही आपण वांद्रे पश्चिमेला स्टेशनच्या बाजूला नजर टाकल्यास ३-४ मजली झोपड्या दिसतील.

मतांवर डोळा ठेवून राज्यशासन वेगवेगळ्या योजना मुस्लिमांसाठी आणत असतानाच आजच्या सामनामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे या झोपडपट्टीला तात्काळ एसआरए मध्ये कसे घेण्यात आलेय हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. बघू या काय काय घडतेय पुढे..!

Sunday 21 June, 2009

साहेब आता आयसीयू तून बाहेर!

गुरूवारी लिलावतीमध्ये श्वसनाच्या त्रासाने दाखल झालेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत जलद गतीने सुधारणा होत असल्याच्या बातम्या येतच आहेत. त्यातच आज साहेबांना आयसीयु मधून व्हीआय्पी वार्डामध्ये आणण्यात आलेले आहे. शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी जनता आणि साहेबांच्या चाहत्यांसाठी हि अतिशय आनंदाची बातमी आहे तसेच येत्या मंगळवार पर्यंत साहेबांना मातोश्रवर आणले जाईल असे बोलले जात आहे.

शिवसेनाद्वेष्ट्यांनी दोन दिवस अफवांच्या घातलेल्या धुमाकुळीमुळे किंवा देव पाण्यात बुडवून ठेवलेल्यांसाठी हि खुपच धक्कादायक अशीच बातमी म्हणू शकतो. शिवसैनिकांना मानसिकरित्या त्रास देण्याचे काम या लोकांनी केलेले आहे. तेव्हा आता शिवसैनिक कसल्याही अफवांवर विश्वास ठेवूच शकणार नाही!

भवानी माते आमच्या साहेबांना लवकर पूर्णपणे बरे कर आणि शिवसेनेवरचे संकट दूर कर!

Tuesday 2 June, 2009

शरद पवारांचे घड्याळ बिघडले!




साभार : मिलिंद पंडीत

Wednesday 20 May, 2009

शिवसेनेचे शत्रु अनेक आहेत पण शिवसेनेचा शत्रु क्रमांक एक हा कॉंग्रेस आहे

शिवसेनेचे कार्यकारीप्रमुख माननीय श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी सर्व विजयी खासदारांबरोबर पत्रकार परिषद घेतली. उद्धवसाहेबांनी सर्व यशस्वी खासदारांचे अभिनंदन केले आणि सर्व खासदारांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. ह्या वेळी शिवसेनेचे नेते व विरोधी पक्ष नेते श्री.रामदासभाई कदम, शिवसेनेचे नेते श्री. मनोहर जोशी सर, शिवसेना सचिव अनिलजी देसाई, खासदार श्री. संजय राऊतसाहेब, आमदार श्री.सुभाषजी देसाई व सौ.निलमताई गोरे आणि अनेक शिवसेनेचे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, जिल्हाप्रमुख, नगरसेवक, शाखाप्रमुख आणि गटप्रमुख उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत उद्धवसाहेब नेमके काय काय बोल्लेत हे पुढीलप्रमाणे...

उद्धवसाहेब म्हणाले कि मुंबई मध्ये शिवसेनेने असे काय कमी केले कि मुंबईकरांनी कॉंग्रेसला साथ दिली...पण आमचा मुंबईकरांवर विश्वास आहे. आगामी निवडणुकीत हा विश्वास फळाला येईल.

अपयशाने खचुन न जाता शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागण्याची गरज आहे असा संदेश उद्धवसाहेबांनी त्यांचा शिवसैनिकांना दिला.

ते पुढे म्हणाले कि कोणत्याही स्टार शिवाय आणि जनतेचे प्रश्न ह्या मुद्यांवर आम्ही निवडणुक लढवली.

उद्धवसाहेब पुढे म्हणाले कि मागच्या लोकसभेच्या वेळी पक्षामध्ये अमर, अकबर, ऍंथनी सर्व होते...तेव्हा महाराष्ट्रामध्ये सेनेच्या १२ जागा आल्या... आता हे अमर,अकबर,ऍंथनी निघुन गेले तरी सेनेला ११ जागा मिळाल्या.मुंबईची एक सिट कमी झाली.अर्थात ह्यात काय आनंदाची गोष्ट पण नाही आहे. अशाप्रकारे उद्धवसाहेबांनी राज ला जोरदार टोळा लगावला.

ते पुढे म्हणाले कि रामटेक जागा आम्ही थोडक्यात हरलो... धाराशिव मध्ये ही तेच झाले.ग्रामिण भागात शिवसेनेने चांगली कमाई केली असं ते म्हणाले.

उद्धवसाहेब म्हणाले कि निकाल हे निकाल असतात... त्यांचं खापर कोणावर फोडणं हे योग्य नाही. विधानसभेवर भगवा फडकणारच असा जोरदार आत्मविश्वास उद्धवसाहेबांनी दाखवला.

ते पुढे म्हणाले मुंबईकरांनी कॉंग्रेसवर विश्वास दाखवला ह्याचं मला आश्चर्य़ वाटते. २६/११ च्या हल्ल्यात शिवसैनिक मदतकार्य करत होते,तरी मुंबई कॉंग्रेसला कशी भुलली? असा प्रश्न त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे शत्रु अनेक आहेत पण शिवसेनेचा शत्रु क्रमांक एक हा कॉंग्रेस आहे असे उद्धवसाहेब बोलले.

डोळ्यदेखत भगवा खाली उतरणं यासारखं दुसरं दु:ख ते कोणतं? मतविभागणी होऊ नये ह्याची काळजी आम्ही आगामी निवडणुकीत घेऊ असे उद्धवसाहेबांनी पत्रकारांना सांगीतले.

पुढे ते म्हणाले खासदार विजयी झाले ते माझ्या मुळे नाही तर शिवसेनाप्रमुखांच्या आणि शिवसैनिकांच्या मेहनती मुळे झाले.

एका निवडणुकीवर दुसरया निवडणुकीचे निकाल अवलंबून नसतात असे ते म्हणाले.मागच्या लोकसभेत देखिल शिवसेनेचे फक्त मोहन रावले हे खासदार निवडुन आले.पण त्या नंतर विधानसभेवर अनेक सेनेचे आमदार निवडुन आले आणि महानगर पालिकेत पुन्हा सत्ता ही आली.

मनसेविषयी बोलताना उद्धवसाहेब म्हणाले...जी मराठी मतं विरोधकांच्या दिशेने गेली ती मतं परत येणार ह्याचा ठाम विश्वास आहे. पत्रकारांनी जेव्हा विचारले कि मनसेशी युती करणार का?...त्यावर उद्धवसाहेब म्हणाले कि शिवसेनाप्रमुखांनी त्यांचे मत सांगीतलेले आहे आणि त्यांचे प्रत्येक विचार,मतं आणि आदेश ह्याचे पालन करणे आमचे कर्तव्य आहे.जे शिवसेनाप्रमुख सांगतील आम्ही तेच करणार.शिवसेना प्रमुखांनी ठाम मत दिलेलं आहे..आता मला नाही वाटत कि कोणाच्या मनात काही शंका उरली असणार.जिथे आम्ही कमी पडलो ति उणीव आम्ही भरुन काढु असे उद्धवसाहेब पुढे म्हणाले.

’हमने दो ही मारा..पर सॉलिड मारा’ ह्यावर जेव्हा पत्रकाराने उद्धवसाहेबांना प्रतिक्रिया दिली कि कोणाला मारतायेत त्याचा विचार करा...शिवसेनेने मराठी माणसासाठी आपल्या स्वार्थाचा विचार कधीच केला नाही किव्हा मराठी माणसाचा स्वतासाठी कधीच उप्योग केला नाही....बाळासाहेबांच्या शिवसेनेला ठोसा मारणारा अजुन पर्यंत कोणी जन्मला आलेला नाही आणि भविष्यातही कोण जन्मला येऊ शकणार नाही असे ठणकाहुन उद्धवसाहेबांनी विरिधकांना बजावले.

उद्धवसाहेब पुढे म्हणाले कि ’पंतप्रधानपदावर मराठी माणुस बसु शकला नाही याचे नक्कीच दु:ख आहे पण जो मराठी माणुस तुम्हाला पंतप्रधानपदी हवा होता,त्याच्याबद्दल बिल्कुल दु:ख वाटत नाही’ असा जोरदार टोळा उद्धवसाहेबांनी शरद पवारांना लगावला.

परिषद आटपता उद्धवसाहेब म्हणाले कि मुंबई मध्ये माझं लक्ष्य कमी झालं हे खरंच आहे पण ग्रामीण भागात आमचा पाया मजबूत झाला.आतापासुन जोमाने कामाला लागा...विधानसभेवर भगवा नक्कीच फडकेल असा आदेश त्यांनी कार्यकरत्यांना दिला.

साभार : शिवसेना अपडेट्स

Monday 13 April, 2009

शेतकऱ्यांचा दावा आहे, उद्धव ठाकरे छावा आहे!

शिवसेनेचा ढाण्या वाघ प्रचारात उतरल्याबरोबर लगेचच विरोधकांची पळापळ सुरू झालेली आहे. शरद पवार, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, सोनियाबाई, परमपुज्य पंतप्रधान मनमोहन सिंग या सगळ्यांचा पर्दाफाश मा. उद्धवसाहेबांनी केलेला आहे. उद्धवसाहेबांच्या सवालांचे जवाब देताना या आघाडी वाल्यांची पळती भूई थोडी झालेली आहे.

कालच्या दिवसातील शिवसेना कार्यकारीप्रमुख मा. उद्धवजीनी केलेली महत्वाची वक्तव्ये पुढीलप्रमाणे:

कुही
प्रियंका म्हणते, मी कुठे म्हातारी दिसते? पण माझ्या देशातील जनता म्हातारी दिसते आहे, ते का? कारण जनतेच्या रक्ताचे शोषण करून कॉंग्रेसने आपले तारूण्य टिकून ठेवले आहे.

बारशिवणी
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बायका-मुलींनीही जीवन संपवले. ते तरूण नव्हते काय? या नेत्यांच्या म्हातारपण आणि तरूणपणापेक्षा आम्हाला दिसते ते आया-बहिणींचे दु:ख.

सावनेर
पाणी मागणाऱ्या जनतेवर कॉंग्रेसने लाठ्या चालवल्या. खेड्यापाड्यातील लोकांच्या पिढ्या बरबाद झाल्या. तुमच्या नशिबावर असा वरवंटा फिरवणाऱ्या कॉंग्रेसवर आतातरी वरवंटा फिरवा.

नरखेड
जातपात आम्ही मानत नाही. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्नेही होते. हेच बाळकडू आम्हाला मिळाले. चला शिवशक्ती-भिमशक्ती एक करूया.

कोंडाळी
मनमोहन नावाचे दुबळे बुवा पुन्हा पंतप्रधान म्हणून डोक्यावर घेऊ नका. दळभद्री कॉंग्रेसला याच मातीत गाडून टाका. नाहीतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे तडफडणारे आत्मे तुम्हाला जाब विचारतील.

तिवसा
शास्त्रीजींनी ’जय जवान...जय किसान’ नारा दिला होता. पण दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान मरतो आहे, तर किसान आत्महत्या करतो आहे. त्यांची कुर्बानी याद करा आणि नाकर्त्या कॉंग्रेसचा फैसला करा.

अचलपूर
तुम्ही ज्यांना दिल्लीत पाठवले, ते सोनियाची लाचारी करत बसले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत महाराष्ट्र नंबर वन. लोडशेडींग पण इकडेच जास्त. हे सगळे आपले, तिकडे दिल्लीत जाऊन झोपले.

Wednesday 8 April, 2009

कॉंग्रेस सरकार म्हणजे अराजक! - उद्धवसाहेब

मुंबईतील पवित्र शिवतीर्थावर नारळ वाढवून शिवसेना भाजप युतीच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आणि त्यापाठोपाठ शिवसेनेचा भगवा झंझावत पहिल्या प्रथम मराठवाड्यात येऊन दाखल झाला. परभणीचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार गणेश दुधगावकर यांच्या प्रचारार्थ स्टेडीयम मैदानावर उद्धवसाहेबांची अतिविराट सभा झाली.

उद्धवसाहेब म्हणाले, " नांदेडहून निघालो तेव्हाच पावसाची रिपरिप सुरू होती. पण मी मात्र मनातल्या मनात प्रार्थना केली. एकवेळ या पावसामुळे माझी सभा नाही झाली तरी चालेल, पण तहानेने व्याकुळलेल्या माझ्या जनतेला पाणी तरी मिळेल. त्यासाठी तरी हा पाऊस पडू देत. सभा झाली नसती तरी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी लोटलेला हा भगवा जनसागर शिवसेनेलाच मतदान करणार याची मला ठाम खात्री आहे. मी मनोरंजनासाठी सभा घेत नाही आहे. माझ्या महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्याला मी मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. हा निर्धार करूनच यावेळी घरातून बाहेर पडलो आहे."

"कॉंग्रेसचे सरकार म्हणजे अराजक! देशात आता पुन्हा हे खिचडी सरकार नकोय. कुठलेच निर्णय न घेणार नाकर्त्या कॉंग्रेसच सरकार जर पुन्हा आलं तर या देशात अराजकच निर्माण होईल." असा इशारा यावेळी उद्धवसाहेबांनी दिला. " शेतीतलं तुम्हाला कळत ना! मग शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये देशात महाराष्ट्रच नंबर एक कसा?" असा भेदक सवाल कृषीमंत्र्यांना केला.
=============================================================
आम्ही म्हणे देशद्रोही...
कसाबला वकिल मिळू नये हा आमचा देशद्रोहीपणा ठरतो. गृहमंत्री जयंत पाटीलच तसे म्हणतात आणि मृत्यूला कवटाळले पण कसाबला सोडले नाही, त्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या शिवसैनिक भावाला अटक करून डांबले जाते. हे असे असेल तर पवारांनी सांगावे कोणाचे हात बरबटले आहेत ते.
=============================================================
विलासराव काठोड्याला गेले नाहीत
बीड जिल्ह्यात काठोडा येथे शेतकरी वस्तीवर भयंकर दरोडा पडला. नराधम दरोडेखोरांनी महिलांवरही अत्याचार केले. विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. पण ते मात्र काठोड्याला गेले नाहीत. कारण रामगोपाळ वर्माला त्यावेळी वेळ नव्हता किंवा या विषयावर पिक्चर बनू शकत नव्हता.
=============================================================

Friday 20 March, 2009

साहेब - मराठीचा मान आणि हिंदुत्वाचा अभिमान.

हा लेख 'मातृभूमी' या मासिकात प्रकाशित झालेला आहे, संपूर्ण मासिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

'बाळासाहेब ठाकरे' हे महाराष्ट्राचे एकमेवद्वितीय व्यक्तिमत्व आहे. एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार ते हिंदूत्ववादी नेते असा साहेबांचा प्रवास आहे.

महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे तसेच तरूणांचे आदर्श आहेत साहेब. ज्यांनी राजकारणात चालून आलेली पदे सर्वसामान्यांना दिली, त्यांना मोठे केले पण स्वतः मात्र सत्तेच्या राजकारणापासून चार हात दूर राहिले. साहेब आज देशातील लाखो हिंदूंचे आधारस्थान आहेत. महाराष्ट्रातील खास करून मुंबईत जो काही मराठी माणूस आज ताठ मानेने उभा आहे त्याचे संपूर्ण श्रेय साहेबांनाच जाते. साहेबांनी आजपर्यंत सर्वात जास्त प्रेम शिवसैनिकांवर केले आणि साहेबांचा शिवसैनिक असण्याचा मला खुप खुप अभिमान आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्राचे मोठ- मोठे नेते आपले कार्यरत असताना बाळासाहेब कुंचल्याच्या फटकार्‍यांनी महाराष्ट्रद्रोह्यांवर आसूड ओढत असत. जवाहरलाल नेहरू, मोरारजी देसाई, सदोबा पाटलांसारखे महाराष्ट्रद्रोह्यांनाही साहेबांनी सोडले नाही. पुढे १९६० च्या दशकात मुंबईत मराठी माणसांवर होणार्‍या अन्यायाने साहेब खुपच अस्वस्थ झाले. त्यांनी मार्मिक साप्ताहिक सुरू केले. 'वाचा आणि थंड बसा' या लेखमालिकेतून मराठी माणसावरील अत्याचारांना वाचा फोडली. शिवसेनेच्या माध्यमातून अन्यायाची जाण मराठी तरूणांना करून दिली, त्यांची मने पेटविली आणि मराठी तरूण जागा झाला. त्याला आपल्या हक्कांची जाणिव झाली आणि अन्यायाविरोधात लढू लागला.

साहेबांनी सुरू केलेल्या लढ्याला मराठी माणसाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या गावोगावी शिवसेनेच्या शाखा सुरू होऊ लागल्या, साहेबांच्या विचारांची देवाणघेवाण शिवसेना शाखांमधून होऊ लागली, सर्वसामान्यांची गार्‍हाणी-समस्या ऐकून घेऊन सोडवली जाऊ लागली. काही वर्षातच शिवसेनेने महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटवला. साहेबांनी केलेल्या प्रत्येक आवाहनाला मराठी माणूस खंबीर उभा राहू लागला. परंतु साहेबांच्या लढ्याला काही मराठी माणसे व वेगवेगळ्या पक्षांचे नेते, पत्रकार, विचारवंत विरोध करत असत. त्यावेळी साहेबांच्या बाजूने वडील प्रबोधनकार ठाकरे, त्यांची स्वतःची हिंमत, मराठी जनतेबद्दलचा जाज्वल्य अभिमान व समर्थ कुंचला हिच शक्तिस्थाने होती.

हिंदुस्थानमध्ये हिंदुत्वाची चळवळ फार पूर्वीपासून सुरू होती. तरीसुद्धा हिंदुत्वाची चळवळ तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम बाळासाहेबांनीच केले आहे. १९९२-९३ ची मुंबईतील दंगल असो किंवा मालेगाव मध्ये सतत गणपती विसर्जनावर होणारी धर्मांध मुस्लिमांची दगडफेक असो. महाराष्ट्रात आणि देशात प्रत्येक ठिकाणी हिंदू मार खात होता तेव्हा प्रत्येक वेळी साहेबांनीच हिंदूंना धीर दिला. धर्मांधांविरूद्ध लढण्याची ताकद आणि बळ दिले. आणि त्यांची पाठसुद्धा थोपटली.

१९९२ साली बाबरी मशीद पाडली तेव्हा काहींनी हात झटकून हे काम शिवसैनिकांनी केले असे सांगू लागले तेव्हा साहेब म्हणाले "हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे." साहेबांनी आयुष्यात कधीही आपले शब्द मागे घेतलेले नाहीत. जी भूमिका मांडली ती रोखठोक!

१९९३ च्या मुंबईतील जातिय दंगलीमध्ये जागोजागी हिंदूंची कत्तल करण्याचे काम धर्मांधांनी सुरू केले, जोगेश्वरीच्या बने कुटुंबातील लोकांना जाळले गेले, हिंदू आया-बहिणींच्या इज्जतीला हात घालण्यापर्यंत या लोकांची मजल गेली तेव्हा साहेबांनी चिडून उठून शिवसैनिकांना याच्या विरोधात जशाच तसे उत्तर देण्याचे आवाहन केले. शिवसैनिकांनीही साहेबांचे आवाहन शिरसावंद्य मानून रस्त्यावर आपल्या हिंदू माता-भगिणींची इज्जत वाचवण्याचे काम केले. मस्तावलेल्या धर्मांधांची मस्ती जिरवली. हे केवळ साहेबांमुळेच घडले. मुंबईतील हिंदू समाजाला तेव्हाच साहेबांची ताकद कळून आली आणि तेव्हापासून देशभरातील हिंदूंना साहेबांचा आधार वाटू लागला.

गोध्रामधील धर्मांधांच्या मस्तीला जशास तसे उत्तर देणार्‍या गुजरातचे मुख्यमंत्री माननिय नरेंद्रजी मोदी यांच्यावर देशातील मिडीया तुटून पडली, भाजप मधूनही मोदींना एकाकी पाडण्याचे काम सुरू झाले होते तेव्हा मित्रपक्ष म्हणून अडवाणींना साहेबांनी मोदींना मुख्यमंत्री म्हणून पुढेही ठेवण्याचे सांगितले. आज आपण सगळे पाहतोच आहोत कि आजचा गुजरात हा एक आदर्श राज्य म्हणून देशात नाव कमावत आहे. हि सुद्धा एक प्रकारची साहेबांची जादू मानल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

गेल्या वर्षी सर्वाधिक गाजलेल्या मालेगांव बॉम्बस्फोटात अडकविलेल्या हिंदू प्रज्ञा साध्वीवर केवळ हिंदू म्हणून अतिशय घाणेरडे अत्याचार करण्यात आले. कोणतेही आरोप सिद्ध न करता महाराष्ट्र एटीएस साध्वींना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न करीत असतानाच साहेब साध्वीच्या मागे खंबीर उभे राहिले आणि काँग्रेसचे हस्तक बनून देशात हिंदू आतंकवाद वाढत आहे असे दाखविणार्‍या एटीएस वाल्यांना साहेबांनी जबरदस्त पद्धतीने उत्तर दिले.

साहेबांचे हिंदुत्व हे सर्वच मुसलमानांच्या विरोधातले नाही. जे जात्यंध मुसलमान आहेत, ज्यांचा आजही पाकिस्तानला पाठिंबा असतो, जे देशद्रोही आहेत अशांना कुठल्याही परिस्थितीत साहेब सोडत नाहीत. अंधश्रद्धेच्या विरोधात असणारे साहेब फक्त हिंदूंच्या अंधश्रद्धा बंद करून मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातील अंधश्रद्धांना तशाच ठेवणार्‍या 'अंधश्रद्धा निर्मुलन समिती' वरही बरसतात. आपल्या संस्कृतीत बरेच चांगले उत्सव असताना परकिय 'वेलेंटाईन डे' सारखे दिवस साजरे करणार्‍या आजच्या तरूण पिढीला आपली संस्कृतीची योग्य माहिती व्हावी आणि वेलेंटाईन डे सारखी थेर बंद व्हावीत असे साहेबांना ठामपणे वाटते.

"हिंदुत्व" हेच राष्ट्रीयत्व मानणारे आमचे साहेब म्हणूनच लाखो हिंदूंचे "हिंदूहृदयसम्राट" आहेत.

Friday 30 January, 2009

जेव्हा साहेब दिघेसाहेबांवर चिडतात..

विधानसभेची १९९९ ची निवडणूक आजही आठवते. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. ठाणे जिल्ह्यातही कॉंग्रेस आघाडी विरुद्ध शिवसेना-भाजप युती असा सामना चांगला रंगात आला होता. जिल्ह्यातील युतीचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यावर सोपवण्यात आली होती. सुनियोजित तंत्र वापरून जिल्ह्यातून तेरापैकी आठ आमदार निवडून त्यांनी निवडून आणले होते.

या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पालघरच्या आमदार सौ. मनीषा निमकर यांच्या प्रचारासाठी आले होते. वेळ खूप कमी होता. राज्यात दौरे करून ते काहीसे थकले होते. मात्र, दिघे यांच्या आग्रहाखातर अगदी शेवटच्या टप्प्यात ते पालघरच्या सभेसाठी आले होते. अर्थात ते कसे आले, कसे "अडकले', याचा किस्सा खूपच गमतीदार आहे. बाळासाहेबांना तब्बल एक दिवस "कोंडून' ठेवण्याची हिंमत दिघे यांनी दाखविली होती. तो किस्सा असा घडला होता...

दिघे यांच्या हट्टापुढे बाळासाहेबांना माघार घ्यावी लागली होती. आपल्या पूर्वनियोजित जाहीर सभांना कात्री लावणे त्यांना भाग पडले होते. अखेर त्यांचा हिरवा कंदील मिळाला आणि पालघरसारख्या ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात साहेब येणार, या वृत्तानेच वातावरण भारले गेले. शिवसैनिकांची एकच धावपळ सुरू झाली. ते कुठे थांबणार? त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचे काय? असे प्रश्‍न होते. परंतु दिघे असल्याने साहेब आणि शिवसैनिक तसे निर्धास्तच होते.

२५ मार्च १९९९ रोजी सांयकाळी शेकडो गाड्यांचा ताफा पालघरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नंडोरे या आदिवासी गावात घुसला. आजूबाजूला वस्तीही नव्हती. चिकूच्या वाडीत असलेल्या एका कॉंग्रेस नेत्याच्या बंगल्यात बाळासाहेबांची थांबण्याची व्यवस्था केली होती. बाळासाहेब पोचले आणि काही वेळात वीज गेली. विजेची पर्यायी कोणतीच सोय नव्हती. त्यातच बंगल्यातील नळाला पाणीच येईना. साहेब अस्वस्थ झाले होते. बाळासाहेब म्हणाले, "आनंद कुठे आहे?'

दिघे त्यांच्यासमोर हजर!
""काय रे! मला कुठे आणून ठेवले आहेस? मला काय हवे, काय नको, हे तुला माहीत नाही का?'' ते चिडले होते.
चुकलो! साहेब!

काय चुकलो म्हणतोस! सभेची तयारी झाली का? चला आता...

दिघे गप्पच. साहेबांना कळेच ना. ते प्रश्‍नार्थक नजरेने बघू लागले.

चल म्हणतोय ना... साहेब गुरकावलेच.

दिघे सावरून म्हणाले, ""साहेब! सभा उद्या संध्याकाळी आहे.''

काय? उद्या संध्याकाळी सभा? मग आज कशाला आणलेस?

साहेब भडकलेच. सभा उद्या असताना या खेड्यात मला उगीचच चोवीस तास अगोदर आणले आहे, यामुळे ते संतापाने थरथर कापू लागले. त्यांचा हा पवित्रा पाहून नजरेला नजर भिडवण्याची ताकदच कुणात राहिली नाही...

सुधीर (जोशी) कुठे आहे?

आलो, साहेब!

दिघे आणि जोशी यांची धारदार शब्दांत खरडपट्टी सुरू झाली. आपला संताप बाहेर काढल्यानंतर धुमसणारे बाळासाहेब शेवटी शांतपणे खुर्चीवर बसले. क्षणभरानंतर आपल्या नेपाळी सहायकास ते म्हणाले, "चल! आताच मुंबईला निघायचे.'

आवराआवर सुरू झाली. बाळासाहेब एक शब्दही न बोलता खुर्चीवर रेललेले.

दुसरीकडे दिघे हे जोशींना म्हणाले, ""भाऊ, काही करा; पण साहेबांना थांबवा!''

जोशी म्हणाले, ""आनंद, मी काही बोलणी खाणार नाही. तू असे केलेच का? आता तुझे तू बघ. त्यांना कोणी आता थांबवू शकणार नाही?''

दिघे म्हणाले, ""माझ्यासाठी शेवटचा प्रयत्न करा?''

शक्‍य नाही, बाबा! माझी हिंमत नाही, जोशींनी पुन्हा नकार दिला.

शेवटी मनाचा हिय्या करून दिघेच तोफेच्या तोंडी आले. बाळासाहेबांसमोर लवून पण नेटाने उभारले.
"हवं तर उद्याच मला शिवसेनेतून काढून टाका? पण तुम्ही जाऊ नका! ही सभा व्हायलाच हवी! एका आदिवासी महिलेचा प्रश्‍न आहे. साहेब! तुम्ही थांबलेच पाहिजे.''

पाच फूट उंच, डोळ्यांत तेज, दाढीवरून सतत हात फिरविणाऱ्या या छाव्याकडे सिंहाने जळजळीत नजर टाकली. डोळ्यांत संताप धुमसत होता; पण कुठे तरी राग शांत झाल्याच्या खुणा चेहऱ्यावर झळकत होत्या. त्यातच दिघेचे ते शब्द साद घालणारे होते. क्षणभर सुन्न शांतता होती. त्याचा भंग करीत बाळासाहेब बोलले.

"ठीक आहे, तू म्हणतोस तर थांबावेच लागेल!''

या शब्दांनी दिघेंवरील सर्व दडपण गळून पडले. सभा होणार, हे नक्की झालेले असते. साहेबांचे चरणस्पर्श करून त्यांनी लगेचच बंगला सोडला. फक्त एक तासाच्या सभेसाठी बाळासाहेब चोवीस थांबणार होते. त्यामुळे झालेली तगमग आपल्या "छाव्या'साठी बाळासाहेबांनी झेलली होती. दुसऱ्या दिवशी सभेला जनसागर लोटला. मनीषा निमकर दणदणीत मतांनी विजयी झाल्या.

बाळासाहेबांनी दिघे यांच्यावर पुत्रवत प्रेम केले. दिघे शिवसेनेच्या वाटचालीतील अनेक घटनांचे साक्षीदार होते. धगधगती मशाल होती. गुंडगिरीबरोबरच समांतर सरकार राबवीत असल्याचा आरोप त्यांच्यावर नेहमीच झाला. त्यांची निष्ठा होती ती शिवसेनाप्रमुखांवर आणि शिवसेनेवर. मुक्त हस्ते मदत हाच त्यांचा धर्म होता. त्यांच्या "दरबारा'त म्हणूनच साधुसंताबरोबरच मुल्ला-मौलवी, पाद्रीही दिसत. चार खासदार, आठ-दहा आमदार निवडून आणण्याची ताकद ज्या माणसाकडे होती, ते दिघे आमदारच काय मंत्रीही झाले असते; परंतु आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांप्रमाणे एकच पद घेऊन शिवसेनेत जगले. ते पद होते शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख.
२७ जानेवारी हा आनंद दिघे यांचा स्मृतिदिन. बाळासाहेब आणि दिघे या दोन नेत्यांमधील असलेले विश्‍वासाचे नाते शेवटपर्यंत टिकून होते. त्याला उजळणी देणारा हा अनुभव होता...

* हा लेख ई-सकाळ मधून घेतलेला असून श्री. प्रकाश पाटील यांनी लिहिला आहे.

Friday 23 January, 2009

बाळासाहेब : बाबा आणि आईही!

हा विशेष लेख आजच्या साहेबांच्या वाढदिवसानिमीत्त उद्धवसाहेबांनी मटा साठी लिहिला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हटले की तेजाचा गोळा... दरारा... करारी बाणा. मात्र याच्या उलट चित्र 'मातोश्री'मध्ये आम्ही अनुभवतो. कुटुंबवत्सल, प्रेमळ पिता, घरातल्या प्रत्येक सदस्याशी हितगुज साधणारा कुटुंबप्रमुख... असे एकापेक्षा एक अस्सल गुण आम्हाला 'मातोश्री'तल्या शिवसेनाप्रमुखांमध्ये पहायला मिळतात. आम्हा तिघा भावंडांना त्यांनी कधीही मारलं नाही. साधा हातही कधी उगारला नाही. त्यांना काय आवडते, त्यांना कशाचा राग येतो हे त्यांच्या वागण्यातूनच आम्ही ओळखायचो. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेची स्थापना करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांना आयुष्यात सतत संघर्षालाच तोंड द्यावे लागले. तरीही, त्यांनी स्वभावात त्रागा येऊ दिला नाही. मात्र एखाद्या माणसावर अन्याय झाला की याच प्रेमळ व्यक्तिमत्त्वाचे रुपांतर रागात होते आणि त्याचे पडसाद त्यांच्या रागापेक्षा दसपटीने अधिक उमटतात. अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची शक्ती त्यांच्यात कुठून येते, हे आम्हालाही आजवर न उलगडलेलं कोडं आहे...

मी बालमोहन विद्यामंदिरमध्ये शिकायचो. आताच्या 'पालक दिना'चे 'फॅड' त्यावेळी नव्हते. मात्र व्यस्त असूनही साहेेबांचे आमचा अभ्यास, खेळातल्या कौशल्याकडे लक्ष असायचे. दादरचे आमचे जुने घर तळमजल्यावर होते. तिथेच मागच्या गॅलरीत साहेबांचा कॉम्प्रेसर आणि स्पे गन असायची. व्यंगचित्र काढताना कोणी व्यत्यय आणलेला त्यांना आवडायचे नाही. १९८५ नंतर शिवसेनेचा व्याप बराच वाढत गेल्याने व्यंगचित्रांसाठी लागणारा एकांत व मोकळा वेळ मिळणे दुरापास्त झाले आणि साहेबांनी कुंचला थांबवला. ..........

शिस्तप्रिय, काटेकोर दष्टा
साहेब जेवढे कणखर आणि निडर आहेत, तेवढेच ते हळवेही आहेत. 'माँ'च्या जाण्याने ते अधिकच हळवे बनले. आजही मी दौऱ्यावर जाताना ते मला जेवणाकडे आवर्जून लक्ष देण्यास सांगतात. 'वाटेल तसे दौरे करण्याचे आणि जेवणाकडे दुर्लक्ष करण्याचे परिणाम मला आता दिसतायत. तू तुझी काळजी घे', असाच त्यांचा सल्ला असतो. सभेच्या ठिकाणी पोचल्यानंतर त्यांचा पहिला फोन येतो. सभा झाल्यानंतर 'कशी झाली' हेही ते आवर्जून विचारतात. परतताना सांभाळून निघ, सावकाश प्रवास कर, अशा सूचना करतात. 'माँ' गेल्यानंतर ते वडिलांबरोबरच आईचीही भूमिका बजावताहेत. साहेबांनी आम्ही तिघा भावंडांना खूपच प्रेम दिले. मात्र नातवंडांवरचे त्यांचे प्रेम पाहून आम्हालाही हेवा वाटतो. आजोबा आणि नातवंडांच्या बऱ्याच गप्पा रंगतात. साहेबांसारखाच तेजसलाही प्राण्यांविषयी खूप जिव्हाळा असल्याने त्यांचेही चांगलेच सूत जमलेय. साहेबांना प्राण्यांचा खूपच लळा. दादरला असताना आमच्याकडे मार्शल नावाचा ग्रेट डेन जातीचा कुत्रा होता. त्याला फिरवायला साहेब शिवाजी पार्कात जायचे.

साहेब अतिशय शिस्तप्रिय. टापटीपपणा हवाच. बैठकीसमोरचा टीपॉय व त्यावरच्या वस्तू त्यांना व्यवस्थित ठेवलेल्या लागत. झुरळ सरळ चालले तर त्याला साहेब सोडतील, पण ते तिरके चालले तर चपलेने फटकारतील, असे प्रमोद नवलकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले होते. हे उदाहरण फारच बोलके आहे. हा झाला गंमतीचा भाग, पण ते दैनंदिन जीवनातही फार काटेकोरपणे वागतात. दिलेली वेळ चुकवणे त्यांना खपत नसे. ठरलेल्या वेेळेआधी आपण एखाद्या ठिकाणी जातोय असे दिसले तर ते गाडी हळू करायला सांगत.

शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यात विरंगुळ्याचे क्षण तसे कमीच. सभा, दौरे सोडले तर स्वत:साठी फिरणं जवळजवळ नाहीच. 'माँ'च्या इच्छेखातर त्यांनी कर्जतला फार्म हाऊस बांधले. तेथे ते अधूनमधून जायचे. पण 'माँ'च्या निधनानंतर गेली कित्येक वषेर् ते तिथे गेलेलेच नाहीत. आतापर्यंत साहेबांनी एकदाच परदेश दौरा केलाय आणि तोही डिस्ने लँड पाहण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. १९८० सालची ती गोष्ट. योगायोग म्हणजे त्यावेळी डिस्नेलँडचा रौप्यमहोत्सव होता. तेथे स्थानिक व्यंगचित्रकार आपले पटकन व्यंगचित्र काढून देतात. अशाच एकाची फिरकी घेण्याची साहेबांना लहर आली आणि त्याचाच कुंचला-कागद घेऊन साहेबांनी त्याचेच व्यंगचित्र काढून दिले! सध्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच व्यंगचित्रकार असून त्यातही लाजवाब राजकीय व्यंगचित्रे रेखाटणारा शिवसेनाप्रमुखांशिवाय दुसरा कोणी व्यंगचित्रकार असेल, असे मला तरी वाटत नाही.

साहेबांना 'फोटोसेशन'साठी तयार करणे हेही जिकीरीचे काम असे. एकदा गोव्याला असताना समुदाच्या पार्श्वभूमीवर साहेबांचे फोटो काढण्याचा मला मूड आला. पण साहेब समुदावर यायला उत्सुक नव्हते. 'चला तर खरं, इथल्या किनाऱ्याचे वेगळेपण तरी बघा', असे सांगत मी त्यांना तयार केले. हॉटेलच्या बग्गीतून साहेब किनाऱ्याजवळ आले. पण पाण्यात जायला तयार होईनात. शेवटी इथली वाळू बघा किती वेगळी आहे असे सांगत मी त्यांना पाण्यापाशी घेऊन आलो. 'काय आहे वेगळे?' असे म्हणत साहेबांनी दोन्ही हात आडवे पसरले आणि मी कॅमेरा क्लिक केला. विस्तीर्ण सागराच्या दिशेने बाहू पसरून उभे असलेल्या साहेबांचा तो फोटो माझ्या आवडत्या फोटोंपैकी एक आहे.

साहेबांना छंद असे फारसे नाहीत. क्रिकेटवर मात्र त्यांचं निस्सिम प्रेम. चित्रपटांचं बोलाल तर आम्ही सर्वांनी मिळून थिएटरमध्ये पाहिलेला शेवटचा सिनेमा होता 'सरकार'! आजही त्यांच्या उशाला पु. ल. देशपांडे, प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या कथाकथनाच्या कॅसेट्स असतात. वारंवार ऐकून त्या साहेबांच्या अगदी तोंडपाठ झाल्या आहेत. बागकामाचीही त्यांना फार आवड. डॉ. बालाजी तांबे यांच्याकडे उपचारासाठी असताना साहेबांनी तर त्यांची बाग जवळजवळ नव्यानेच सजवून दिली होती. फार पूवीर् कधीतरी त्यांना एखादी डीश करायचा मूड येई. पण तिची 'रेसिपी' त्यांचीच असे!

कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्णय घेण्याचा बाळासाहेबांचा स्वभाव आहे. घेतलेल्या निर्णयावर ते ठाम असतात. प्रवाहाविरुद्ध दिशेने पोहणारे अनेक आहेत, मात्र प्रवाहाला थोपवून त्याचा मार्ग बदलण्याची ताकद बाळासाहेबांमध्ये पहायला मिळते. शिवसेना बाळासाहेबांना जीवापेक्षाही प्यारी आहे. शिवसैनिक जसे बाळासाहेबांना पहायला वेडे असतात, तसेच बाळासाहेबही त्यांना पहायला वेडे असतात. दौऱ्यात रात्री अपरात्री प्रवास करायचा नाही, अशा खास शिवसैनिकांना साहेबांच्या सूचना असतात. दौऱ्यात शिवसैनिकाला दुखापत झाली की साहेब ताबडतोब होमियोपॅथीचे औषध द्यायचे. त्यांच्या घरच्यांचीही ते तेवढ्याच आस्थेने चौकशी करीत असतात. आजही दौऱ्यानंतर शिवसैनिक सुखरूप परतल्याची चौकशी ते माझ्याकडे करत असतात. शिवसैनिक हा आपल्या परिवारापैकीच एक आहे, असे ते मानतात. शिवसेनेसाठी बाळासाहेबांनी स्वत:च्या जिवाला कायमचा धोका पत्करला आहे.

घरी असले तरी आजही साहेब बदलत्या जगाच्या अपडेट्स ठेवून आहेत. ओबामांचा शपथविधीही त्यांनी संपूर्ण पाहिला. त्याआधी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळीही ते टीव्हीसमोर बसून होते. ती दृश्ये बघताना ते संतापाने धगधगत होते. या हल्ल्यानंतर आपल्या सरकारने पाकिस्तानबरोबरचा क्रिकेट दौरा रद्द केला. त्या देशाबरोबरचे संबध तोडून आता कारवाई... प्रसंगी युद्धाची भाषा केली जातेय. मग साहेब त्यावेळी वेगळं काय सांगत होते? बांगलादेशी लोंढे आवरले पाहिजेत असे सध्याचे गृहमंत्री चिदंबरम आता बोलतायत. साहेब हे केव्हाच म्हणाले होते!..

बाळासाहेब दष्टे आहेत ते असे.