Monday 27 July, 2009

उद्धवसाहेब - तरूणांचे आदर्श नेतृत्व

आजच्या देशाच्या राजकारणात फारच कमी आदर्श म्हणावेत असे नेते उरलेले आहेत. जे काही उरले आहेत ते आपल्या आयुष्याच्या उत्तारार्धात आहेत. भविष्याच्या राजकारणात सध्या तरी "आदर्श नेता" कोणी होईल असे चित्र नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातही काही वेगळे दिसतेय असे वाटत नाही. परंतु एक सच्चा माणूस हि पोकळी भरून काढण्याच्या दिशेने चालला आहे, नव्हे ती पोकळी निदान महाराष्ट्रापुरते म्हटल्यास भरून काढलेली आहे. ज्याला गोरगरीबांचे अश्रू दिसतात, शेतकऱ्यांची दारूण अवस्था पाहवत नाही, मुंबईतील गरीबांची दशा कळतेय, सर्वसामान्यांना नक्की काय हवेय याची संपूर्णपणे जाण आहे. तसेच स्वकर्तुत्वावर विश्वास असलेला माणूस आहे आणि तो म्हणजे आम्हा तरूण शिवसैनिकांचे लाडके उद्धवसाहेब!

शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून उद्धवसाहेबांना नक्कीच "मातोश्री" मध्ये बसून शिवसैनिकांना आदेश देऊन काम करता आले असते. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून शिवसेना वाढवण्याचे काम करत आहेत. शिवसैनिकांसह वेगवेगळ्या आंदोलनांत स्वत: सहभागी जनतेच्या कामांचा आवाज सरकारसमोर मांडत आहेत. शेतकरी आत्महत्यांविरोधात पुकारलेल्या जबरदस्त आंदोलनासमोर सरकारला झुकवून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिली परंतु नालायक सरकारच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. शेतकरी आत्महत्या, देता की जाता, वीजभारनियमन, युएलसी आणि म्हाडा विरोधातील मोर्चा, रिलायन्स भाववाढीच्या विरोधातील आंदोलन अशा आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. सध्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणमंत्र्यांनी घातलेल्या गोंधळाला सामंजस्याची भूमिका वारंवार सुचना देऊनही शेवटी व्हायचा तो गोंधळ झालाच.

उद्धवसाहेबांचे व्यक्तीमत्व प्रत्यक्ष भेटणाऱ्याला चांगले कळते असे मला वाटते. महाराष्ट्राचे आणि मुंबईचे प्रश्न सच्चेपणाने आज फक्त उद्धवसाहेब मांडत आहेत. केवळ दगडफेक करून मराठी माणसांची मने भडकवणे सोप्पे आहे पण त्याच्या गरजांवर आवाज उठविणे सोप्पे नाही हे चित्रच सध्या आहे. महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी, विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी, भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आज मराठी माणसांची नौका फक्त आणि फक्त उद्धवसाहेबच किनाऱ्याला लावू शकतात. शिवसेनेची सता असताना शिवसेनेने काय केलेले विचारणारे स्वत:च्या तुंबड्या भरून झाल्यावर हे प्रश्न निर्माण करीत आहेत. म्हणूनच एकदा उद्धवसाहेबांच्या हाती सत्ता आल्यास त्याची उत्तरे मिळतील किंबहुना सत्ता नसतानाही त्याची झळक मिळाली आहे.

आजच्या उद्धवसाहेबांच्या वाढदिवशी आपण सर्वांनी शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विधानसभेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी, एका सुसंस्कारीत, सुशिक्षित, आदर्श नेत्याकडे महाराष्ट्र सोपविण्यासाठी प्रत्येक तरूणांनी उद्धवसाहेबांचे मागे उभे राहावेच लागेल!

जय हिंद! जय महाराष्ट्र!!