Saturday 20 March, 2010

‘खान’चे असली उद्योग - सामना अग्रलेख

कॉंग्रेस पक्षाचा लाडका शाहरुख खान याचा ‘माय नेम इज खान’ हा सिनेमा पडद्यावर कोसळला असला तरी त्या सिनेमाचा हेतू सफल झाला आहे. ‘माय नेम इज खान’ला लोकांनी केव्हाच सिनेमागृहातून खाली उतरवले. पडद्यावर दगडधोंडे मारून खान व त्या करण जोहरची छी: थू: केली. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात व देशातही खानाचा ‘गल्ला’ भरला नाही. हा सिनेमा अरब व इस्लामी राष्ट्रांत मात्र भरपूर गाजला. पाकिस्तानात तर शाहरुख खानचा नुसता ‘जय हो’च झाला. पण त्याहीपेक्षा जी एक वेगळी माहिती आता या खानच्या बाबतीत बाहेर आली आहे ती डोके सुन्न करणारी आहे. ‘माय नेम इज खान’ चित्रपट मुसलमान तरुणांना दाखवून त्यांची डोकी भडकवायची व त्यांच्याकडून अतिरेकी कारवाया घडवून आणायच्या अशा प्रकारची योजना धर्मांध मुस्लिमांनी आखल्याचे उघड झाले आहे. हिजबुल, अल-कायदा वगैरे अतिरेकी संघटनांनी याबाबत आखलेली कट-कारस्थाने म्हणजे आणखी एका नव्या ‘जिहाद’ची तयारीच म्हणायला हवी.

अहमदाबादमधील दहशतवादविरोधी पथकाने यासंदर्भात अटक केलेल्या अतिरेक्यांनीच हा गौप्यस्फोट केला. गुजरातमधील काही सिनेमागृहांत अद्यापि ‘माय नेम इज खान’च्या पाट्या झळकत आहेत. या चित्रपटाची असंख्य तिकिटे पकडलेल्या अतिरेक्यांकडे सापडली. ही तिकिटे कशासाठी, असा ‘थर्ड डिग्री’ प्रश्‍न विचारताच पाकनिष्ठ पोपट धडाधडा बोलू लागले, ‘मुस्लिम तरुणांनी हा सिनेमा जास्तीत जास्त पाहावा व त्यांनी हिंदुस्थानविरुद्ध जिहाद पुकारावा. हिंदूंच्या
कत्तली कराव्यात यासाठीच या

सिनेमाचा वापर हिंदुस्थानविरोधी इस्लामी संघटना
करीत आहेत’, असे या पोपटांनी सांगितले. ‘माय नेम इज खान’मध्ये मुस्लिमांची कशी ससेहोलपट होते, ते मुसलमान असल्याने त्यांना अनेक देशांत कसा त्रास होतो, अपमानास्पद वागणुकीचा अनुभव येतो अशा प्रकारचे कथानक असल्याचे सांगितले जाते. खरे-खोटे त्या खानास व त्याच्या कॉंग्रेजी पिलावळीलाच माहीत. आम्ही एरवी काही चांगले चित्रपट अधूनमधून पाहत असतो, पण पाकपे्रमाची उबळ आलेल्या खानाचा हा चित्रपट काही आम्ही पाहिला नाही. त्यामुळे त्या चित्रपटात काय आहे? तो कसा आहे? तो खान आहे की घाण आहे? याबाबत आम्ही काहीच सांगू शकत नाही. मात्र चित्रपट कोसळला असला तरी ‘हिजबूल’ वगैरे हिंदुस्थानविरोधी संघटनांना तो खूपच आवडल्याचे त्यांच्या एकंदरीत कारवायांवरून दिसून येत आहे. मुसलमान तरुणांना भडकविण्यासाठी या चित्रपटाचा वापर सुरू आहे. याबाबत त्या करण जोहरला व खानास आता काय म्हणायचे आहे? हिंदूंचा कोथळा काढण्यासाठी मुसलमान तरुणांची डोकी तयार व्हावीत हाच या चित्रपटाचा मुख्य हेतू होता. अहमदाबादमध्ये पकडलेल्या संशयित आरोपीच्या जबानीतून तरी आम्हाला तेच दिसत आहे. मुसलमानांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे आणि त्यांचे हाल होत आहेत असे कथानक कोणी दाखवत असेल व त्यावरून हिंदुस्थानातील मुसलमान तरुणांना कोणी भडकवीत असेल तर त्याबाबत सरकारने कठोर पावले उचलायला हवीत. खरंतर अशा प्रकारची कथानके निर्माण करून मुसलमानांना भडकविण्याचे उद्योग कुणी या देशात तरी करू नयेत. येथील मुसलमानांचा कोणीही अपमान करीत नाही व त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देत नाही. या देशाचे नाव भले ‘हिंदुस्थान’ असेल, पण येथे फक्त मुसलमानांचीच चलती आहे. पाकिस्तानात मुसलमानांचे जेवढे लाडकोड होत नसतील त्यापेक्षा जास्त संरक्षण आणि दौलतजादा येथील मुसलमानांवर होत आहे. देशद्रोहाच्या खटल्यात फाशीची शिक्षा ठोठावलेल्या अफझल गुरूलाही कॉंग्रेसवाल्यांनी जीवनदान दिले ते फक्त मुसलमान असल्यामुळेच.  पाक क्रिकेटपटूंसाठी पायघड्या घालणार्‍या शाहरुख खानलाही आमच्या राज्यकर्त्यांनी

22 हजार पोलिसांचे संरक्षण
दिलेच ना? तुमच्या गळ्याभोवतीचा फास सोडवण्याची हिंमत फक्त हिंदुस्थानातच दाखवली जाऊ शकते. कारण शेवटी तुम्ही मुसलमान आहात ना? या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार फक्त मुसलमानांचाच राहील अशी घोषणा ज्या देशाचे पंतप्रधान करतात त्या देशात मुसलमानांचा अपमान होतो असे कोणत्या तोंडाने सांगता? ‘माय नेम इज खान’साठी व खासकरून त्या पाकड्या क्रिकेटपटूंसाठी अशोक चव्हाण हे शाहरुख खानचे बॉडीगार्डच बनले होते. काय त्याचे विमानतळावर स्वागत, काय त्याच्या बंगल्यास पोलिसांचा गराडा, काय त्याचा टीव्ही चॅनलवर उदोउदो! जणू हे कोणी राष्ट्रनिष्ठ क्रांतिकारकच निर्माण झाले हो! मुसलमान म्हणून तुम्हाला जे आज हिंदुस्थानात मिळत आहे ते पाकिस्तानात जन्माला आला असता तर मिळाले असते काय? पाकिस्तानातील उरल्यासुरल्या हिंदूंसाठी तेथील राज्यकर्त्यांनी एखादा ‘सच्चर’ आयोग नेमून शे-पाचशे कोटींची बरसात केली असेल तर सांगावे. कश्मीर खोर्‍यात हिंदूंच्या कत्तली झाल्या, कश्मिरी पंडितांना घरेदारे सोडून पळावे लागले. शेकडो देवळांचा विध्वंस झाला याचे चित्रीकरण करून दाखवायचे म्हटले तर ‘हिंदूंना’ चिथावणी दिल्याच्या आरोपावरून आमच्यावर खटले दाखल करतील. मग ज्या ‘खान’ चित्रपटावरून मुसलमानांची डोकी भडकविण्याचे उद्योग चालले आहेत त्याबाबत शाहरुख खानचे बॉडीगार्ड बनलेले अशोक चव्हाण, तिकडे नरेंद्र मोदी कोणती कारवाई करणार? की खान व त्याच्या पिलावळीला आणखी बळ देणार? महाराष्ट्र सरकारकडून अशा कारवाईची अपेक्षा करणे म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखे आहे. आता नरेंद्र मोदींनीच काही करावे.

Sunday 14 March, 2010

विंदांना भावपूर्ण आदरांजली..


गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ विंदा यांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध केले. त्यांच्या ‘अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी त्यांना साहित्य क्षेत्रात सर्वोच्च समजला जाणारा ३९ वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन २००३ साली गौरवण्यात आले होते. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे साहित्यिक ठरले. त्याशिवाय कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार, कोणार्क सन्मान, केशवसूत पुरस्कार तसेच विद्यापीठांच्या डी.लिटस् अशा पदव्यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

विंदांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात घालवण गावी झाली. विंदाचे वडिल 'विनायक करंदीकर' कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. रा.स्व. संघ ते मार्क्स असा त्यांचा वैचारीक प्रवास राहीला. पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाही. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्विकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१ सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पूर्ण लेखनासाठी घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले आहे. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्विकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली आहे. विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर आणि मुलगी सौ.जयश्री विश्वास काळे हे सुद्धा सामाजिक कार्यात सक्रीय असतात. तसेच त्यांना नंदू आणि उदय असे दोन मुलगे आहेत.

विंदांचे समग्र वाङ्मय

विंदानी मराठी काव्यमंजुषेत विविध घाटाच्या रंजक, वैचारीक, काव्यलेखनाने भर घातली. मराठी बालकवितेची मुहुर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करुन कविता जनसामान्यापर्यंत पोहचेल असे पाहीले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांचे कडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठी भाषेस परिचय झाला. हा त्यांचा साहित्यिक प्रवास त्यांनी इ.स. १९८१ साली लेखन निवृत्ती घेउन यशस्वीपणे पूर्ण केला.

स्वेदगंगा (इ.स. १९४९), मृद्गंध (इ.स. १९५४), धृपद (इ.स. १९५९), जातक (इ.स. १९६८), विरूपिका (इ.स. १९८१), अष्टदर्शने (इ.स. २००३) (या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार) असे त्यांचे अनेक काव्यसंग्रह गाजले. त्याशिवाय संहिता (इ.स. १९७५) (संपादन - मंगेश पाडगावकर), आदिमाया (इ.स. १९९०) (संपादन - विजया राजाध्यक्ष) या संकलित काव्यसंग्रहासाठीही त्यांनी योगदान दिले. विंदांच्या बालकविता खूपच गाजल्या. राणीची बाग (इ.स. १९६१), एकदा काय झाले (इ.स. १९६१), सशाचे कान (इ.स. १९६३), एटू लोकांचा देश (इ.स. १९६३), परी ग परी (इ.स. १९६५), अजबखाना (इ.स. १९७४), सर्कसवाला (इ.स. १९७५), पिशीमावशी आणि तिची भुतावळ (इ.स. १९८१), अडम् तडम् (इ.स. १९८५), टॉप (इ.स. १९९३), सात एके सात (इ.स. १९९३), बागुलबोवा (इ.स. १९९३) अशा बालसाहित्यातून त्यांनी मुलांचे मनोरंजन केले.

धन्यवाद महाराष्ट्र टाईम्स


Friday 5 March, 2010

’भारत श्री’चा पगार कमी; अमेरिकेने विसा नाकारला!!


महाराष्ट्रातील मुले मेहनती नाहीत, त्यांना मेहनत करायचे माहित नाही. म्हणून परप्रांतिय इकडे येऊन आपल्या नोकऱ्या बळकावतात.

सुहास खामकर बॉडी बिल्डींग मध्ये सलग चार वेळा ’भारत श्री’ पटकावणाऱ्या आणि ’शिव छत्रपती पुरस्कार’ विजेत्या खेळाडूचे काय?

सुहास खामकर रेल्वे मध्ये टी.सी. म्हणून काम करतो. दरमहा रू. १२०००/- पगार मिळतो. टी.सी. ना दिवस आणी रात्रपाळी असे काम करावे लागते, तरीही बॉडी बिल्डींग मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवायचे, हिंदुस्थान आणि महाराष्ट्राचे नाव मोठं करायचं, हिच त्याची धडपड रात्रंदिवस सुरू असते.

शेवटी ती वेळही आली, अमेरिकेत ऑर्नाल्ड अमॅच्युअर बॉडी बिल्डींग स्पर्धा (कोलंबस, ओहियो) मध्ये भाग घ्यायचा होता. पण अमेरिकन दुतावासाने या आठवड्यात दोन वेळा त्याचा विसा नाकारला. का? कारण पगार कमी आहे...

सुहासने सरळ मुख्यमंत्री कार्यालयात धाव घेतली, पण मुख्यमंत्र्यांनीही त्याला भेट देण्याचे नाकारले. तसेच कोंबडीचोर नारोबाकडेही त्याने धाव घेतली पण त्या नारोबाकडेही सुहाससाठी वेळ नव्हती.

कसले हे भिकार सरकार? कुठे आहेत आपले महाराष्ट्राचे आणि देशाचे क्रिडामंत्री? सुहाससारख्या जीवतोड मेहनत घेणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जात नसेल तर आणखी कोणाला हे देणार आहेत?

सुहास खामकरला ऑर्नाल्ड अमॅच्युअर बॉडी बिल्डींग स्पर्धेचे आलेले निमंत्रण :


सुहास आता येत्या जुन मध्ये होणाऱ्या आशियाई बॉडी बिल्डींग स्पर्धेची तयारी करतोय. प्रायोजक नसल्याने त्याच्या तुटपुंज्या पगारातून त्याला स्वत:चे पैसे खर्च करावे लागत आहेत. सरकार मदत देवो वा न देवो महाराष्ट्रातील सर्व तरूणांनी सुहासच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे. आपण प्रत्येकाने आपापल्या परीने सुहासला मदत करू या.

आपण सुहासला थेट त्याच्या मोबाईल वर संपर्क करू शकता किंवा ईमेल द्वारे त्याला कळवू शकता

सुहासचा मोबाईल नंबर आहे +९१-९८९२६८४९२१

ईमेल आहे : suhas.khamkar@yahoo.com

Wednesday 3 March, 2010

शिवरायांचा सरकारला विसर!


आज फाल्गुन कृ. तृतिया म्हणजेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ३८० वी जयंती.

शिवाजी महाराजांची कीर्ति संपूर्ण जगाला माहिती आहे. तसा त्या वेळेचा उल्लेख इंग्रजांनी त्यांच्या वर्तमान पत्रात दिल्याचे काही महिन्यांपूर्वी स्पष्ट झाले. पण इथे आपले केंद्रसरकार अजून झोपा काढत आहे.

www.india.gov.in हि केंद्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे. याचे सर्व काम नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर (NIC) बघते. या संकेतस्थळावर हिंदुस्थानातील सर्व प्रकारची माहिती तसेच इतिहास दिलेला आहे. तसेच हिंदुस्थानात किती राजे होते त्याबद्दलची माहिती स्पष्टपणे दिलेली आहे.

याच संकेतस्थळावर मध्यकालीन इतिहास मध्ये बाबर, हुमायुन, अकबर, शहाजहान, औरंगजेब यांची माहिती देण्यात आलेली आहे. परंतु ज्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, अफजलखानाचा कोथळा काढला, त्यांचा इथे एकाही ओळीमध्ये उल्लेख केलेला नाही.

शिवछत्रपतींच्या आजच्या जयंती निमित्त आपण आपल्या सर्व मित्रांना ई-मेल, एसेमेस करतो, फोटोज पाठवून महाराजांची आठवण काढतो, हे सगळं केल्यानी शिवजयंतीची आठवण नक्कीच जागवतो पण ज्या हिंदुस्थानात आपण राहतो त्याच हिंदुस्थानच्या केंद्र सरकारला याची जाग येण्यासाठीही आपण प्रयत्न केले पाहिजेत. नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर (NIC) ला त्यांचे ईमेल indiaportal@gov.in आणि siomsu@hub.inc.in वर छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास लवकरात लवकर संकेतस्थळावर दिसले पाहिजे अशी विनंती करा.

नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर (NIC) चे संपर्क कार्यालयाचे पत्ते पुढीलप्रमाणे :

मुख्य कार्यालय दिल्ली : इंडीया पोर्टल सेक्रेटरी, तिसरा माळा, नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर, ’ए’ ब्लॉक, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली - ११०००३,

मुंबई कार्यालय : NIC स्टेट सेंटर, ११ वा मजला, नविन प्रशासकिय बिल्डींग, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

सुनिल मंत्री,
बॉस्टन, युनाइटेड स्टेट्स.