Wednesday 14 April, 2010

शिवसेना इंटरनेट समुदायाचा मेळावा!

मित्रानो आपण सर्वाना माहीतच असेल कि आपल्या समुदायाचा पहिला मेळावा शिवसेना भवन येथे पार पडला. मेळाव्याला लाभलेला प्रतिसाद फार उत्तम आणि अवर्णनीय होता. काल पर्यंत आपण शिवसेना ऑर्कुट समुदाय ह्या नावाने ओळखलो जात होतो परंतु कालच शिवसेना सचिव विनायक राउत साहेब यांनी सर्व सभासदांना सांगितले कि
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या समुदायाला या पुढे संघटनेचे रूप देण्याचे ठरवले असून
मा. बाळासाहेबानीच आपल्या या समुदायाच्या नवीन संघटनेला " शिव माहिती तंत्रज्ञान सेना " हे नाव दिले आहे..
मित्रानो पक्षाने आपल्यावर फार मोठी जवाबदारी दिली आहे. आजपासूनच सर्व कामाला लागू या आणि शिवसेना या पक्षाच्या वाढीसाठी हातभार लावूया ..

सदर मेळाव्यासाठी शिवसेना सचिव विनायक राउत साहेब, विद्यार्थी सेनेचें अध्यक्ष अभिजित पानसे, राहुलजी खेडेकर, मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे साहेब , अमेरिकेहून खास ह्या मेळाव्याकरिता उपस्थित असेलेले सुनीलजी मंत्री आदी उपस्थित होते..

मेळाव्याची प्रस्तावना आपले समुदाय नियंत्रक अमित चिविलकर यांनी केली. आपल्या समुदायातील अक्षया महाडिक, मेघाताई गावडे, सतीश पानपत्ते, अमोल नाईक यांनी आपले विचार मांडले.
समुद्याची वाटचाल कशी असेल या बाबत श्री. जनार्दन मानकर साहेब यांनी उपस्थितांना उत्कृष्ठ मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या समुदायातील सभासद विशेष राणे यांनी केले.

भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अभिजित पानसे यांही समुदाय्च्या वाटचाली बाबत समाधान व्यक्त करत यापुढे संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे साहेब यांनी सुद्धा समुदायाला गरज लागेल तेव्हा मदतीला उभा असें असे आश्वासन दिले. शिवसेना सचिव विनायक राउत साहेब यांनी आपल्या समुदायाच्या कार्यातून शिवसेना द्वेष्ट्यांचे दात घश्यात घालण्याचे आव्हान केले व त्यांनी समुदायाचे कोडकौतुक हि केले.

Monday 12 April, 2010

ऐतिहासिक क्षणाला काहीच तास उरले!

आपल्या आयुष्यातील ऐतिहासिक क्षणाला काहीच तास आता उरले आहेत.. कारण उद्या दुपारी ४ वाजता शिवसेना भवन येथे आपल्या समुदायाचा मेळावा पार पडणार आहे.

२१ व्या युगात इंटरनेट हे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून पुढे येत असताना फक्त आणि फक्त शिवसेना या पक्षाने त्याचे महत्व जाणून इंटरनेट वर कार्यरत असणाऱ्या युवकांना एकत्र करून पक्षाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतलं. इंटरनेट वर काम करणारी मुलंच उद्या समाजोन्नती साठी भरीव कार्य करू शकतात हे शिवसेना कार्यप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेबांनी जाणलं आणि अश्या युवकांना एकत्र आणण्याच काम आपल्या समुदायावर सोपवलं. आणि इंटरनेट हेच येत्या काही काळात प्रभावी माध्यम असेल हि दूरदृष्टी फक्त आणि फक्त उद्धाव्साहेबंकडेच आहे हे मला सांगायला अभिमान वाटत आहे. एका पक्षाचा प्रमुख उद्या मेळाव्यामध्ये तुम्हा आम्हा सामान्य शिवसैनिकाना मार्गदर्शन करणार आहे.

इंटरनेट वर बसलेली मुल फक्त वेळ घालवण्यासाठी त्याचा उपयोग करतात, चाटिंग, मित्रमैत्रिणी वाढवण्यासाठी इंटरनेटचा आजपर्यंत वापर होत होता परंतु शिवसेना या पक्षाने त्याचप्रमाणे उद्धवसाहेबांनी दाखवून दिल कि ह्याच मुलांना योग्य दिशा दाखवली तर हीच मुल एक पक्ष वाढवण्याच काम देखील करू शकतात, तरुणांच्या मूळ भावना उद्धवसाहेबांनी जाणून घेतल्या. मित्रानो उद्या मेळाव्याला येताना विचार करा कि काल पर्यंत आपण कोण होतो ? परंतु फक्त उद्धवसाहेबांन मुळेच उद्यापासून आपण एका पक्षाच्या मुख्य प्रवाहात असणार आहोत.

मित्रानो उद्यापासून आपली जवाबदारी वाढणार आहे कारण उद्यापासून आपण शिवसेना आणि हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेबांचे ज्वलंत विचारांचा इंटरनेट च्या माध्यमातून सर्वत्र प्रचार करणार आहोत.

उद्धवसाहेबांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला आता पात्र होण्याची वेळ आली आहे. आपण सर्व निर्धार करूया आणि उद्धवसाहेबांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ करूया.

जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!

अमोल नाईक