Wednesday, 30 July 2008

मतांसाठी देशावर लाचारी लादणारे राज्यकर्ते

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातच लोकशाहीतील मतांच्या राजकारणासाठी त्याच देशाच्या निरपराध नागरिकांचे मुडदे पाडले जात आहेत. देशातील मुस्लिम वोट बँक आपल्याकडेच राहावी यासाठी हे सगळे सुरू आहे. खरेतर मुस्लिम एवढी लाचार का झाले आहे याचे उत्तर सर्वसामान्य मुस्लिम सुद्धा देऊ शकणार नाही.

मागच्या आठवड्यात शुक्रवारी देशातील सर्वात मोठ्या आयटी सिटी बंगळूरु मध्ये भर दिवसा सात साखळी बॉम्बस्फोट झाले. दुसर्‍या दिवशी हिंदु नेते नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेतील अहमदाबाद शहरात तर तब्बल १७ बॉम्बस्फोट झाले. या दोन्ही शहरातील घातपातामध्ये शेकडो निरपराध लोकांचे प्राण गेले. इतके कमी म्हणूनच कि काय पुढील सलग चार दिवस जवळ जवळ २५ जिवंत बॉम्ब गुजरातमधील सुरत शहरात निकामी करण्यात सुरक्षा जवानांना यश मिळाले. विचार करा हे सगळे स्फोट झाले असते तर किती मोठी हाणी झाली असती? मागिल काही बॉम्बहल्ल्यात एक धागा समान आहे तो म्हणजे बॉम्बहल्ले भाजपा शासित राज्यात होत आहेत म्हणजेच कुठेतरी भाजपाला धडा शिकवण्याचा हा प्रयत्न आहे म्हटले तरी काहीच गैर नाही.

आतंकवादी हल्ले हे हिंदुस्थानसाठी किंवा हिंदुस्थानी जनतेसाठी नविन नाहीत. सर्वाधिक आतंकवादी हल्ले आपल्याच देशात झालेले आहेत. काश्मिर मध्ये रोजच असे हल्ले होतच असतात, किंवा पाकिस्तान सिमेवर आमचे जवान निष्कारण मारले जातच आहेत. मुंबई आतंकवाद्यांचे एक नंबरचे टारगेट आहेच. त्यानंतर देशातील इतर भागातील हिंदु मंदिरे, मार्केट आणि अपवादात्मक मुस्लिम वस्त्यांमध्ये आतंकवादी निरपराधांचे बळी घेतच आहेत.

मुंबईतील ११ जुलैच्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोटाच्या जखमा आजही तशाच आहेत. रोज रेल्वेने प्रवास करणारा मुंबईकर आपले जीव मुठीत घेऊनच आल्या दिवसाला सामोरा जात असतो. संध्याकाळी जेव्हा घरी पोहचतो तेव्हा एक एक दिवस जगल्याचे समाधान मिळते. रेल्वेमध्ये आतंकवादी कधी बॉम्ब फोडतील हे कोणालाही माहिती नाही. सुरक्षा जवान किंवा कोणीही राज्यकर्त्यांपैकी मुंबई सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. चर्चगेट रेल्वे स्थानकात मेटल डिटेक्टर लावल्याने संपूर्ण रेल्वेमार्ग कसा सुरक्षित राहिल हेसुद्धा एक न सुटणारे कोडे आहे. परवाच एका न्युजचॅनेलने रात्री रेल्वे स्थानकात जाऊन दाखविले कि सुरक्षतेचे कसे तिनतेरा वाजले आहेत. त्या स्थानकावर रात्रीच्या वेळी एकही पोलिस किंवा इतर सुरक्षा जवान नव्हता.

एनडीए सरकारच्या काळात आतंकवादाविरोधात लढण्यासाठी पोटा हा विशेष कायदा बनविला होता. नंतर जो बर्‍याच देशांनी त्यांच्या देशात असा कायदा अंमलात आणला. पण आताचे युपीए सरकार सत्तेत आल्यानंतर बहुमताच्या जोरावर रद्द करण्यात आला. यामागे सर्वसामान्य मुस्लिमांना या कायद्याने त्रास दिला जात असल्याचे कारण सांगण्यात आले. यानंतर मात्र आतंकवाद्यांनी हिंदुस्थान आंदण मिळाल्यासारखे बॉम्ब पेरण्याचे सत्र सुरू केले.

लोकशाहीचे मंदिर म्हणजेच संसद भवन उडवण्याच्या कटात सामिल असलेला आणि ज्याला सुप्रीम कोर्टाने फाशीची सजा दिलेली आहे अशा अफजल गुरूला फाशी देण्यात हे युपीए सरकार टाळाटाळ करत आहे. कदाचित येत्या सार्वत्रिक निवडणूकांपर्यंत तरी त्याला सजा मिळण्याची शक्यता कमीच आहे, आणि जर कदाचित हे युपीए सरकार पुन्हा सत्तेत आले तर हेच अफजल गुरु आपल्या देशाचे पंतप्रधानही बनतील. सर्वसामान्य निरपराध्यांचे प्राण घेणार्‍या देश द्रोह्यांच्या मागे मानवी हक्क आयोगवाले उभे राहतात पण ज्यांच्या जीवावर हे सत्ताधारी निवडून आलेत त्या जनतेच्या मागे हे उभे का राहात नाही? २० कोटी मुस्लिमांच्या मतांना एवढे महत्त्व का मिळते? बॉम्बहल्ले झाल्यानंतर पाकिस्तान आतंकवाद्यांना संरक्षण देते म्हणून बोंबलायचे आणि स्वतः मात्र मतांसाठी पकडले गेलेल्या आतंकवाद्यांना सोडायचे मग पाकिस्तान आणि आपल्यात फरक तो काय?

हिंदु बहुसंख्य असलेल्या या देशाला धर्मनिरपेक्ष देश मानले जाते मग हे सरकार धर्मनिरपेक्षासारखे वागते का? मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळणे म्हणजे निधर्मीपणा म्हणू शकतो का? आणि जर देशातील सर्वधर्मियांना समान कायदा लागू करून समान अधिकार द्यायचे नसतील तर अल्पसंख्य मुस्लिमांचे इस्लामी राष्ट्र म्हणून या देशाला मान्यता तरी द्या म्हणजे निदान आपले अधिकारच नाहीत म्हणून हिंदू आपले हात तरी पुढे करणार नाहीत. म्हणजे कसे साप पण मेला आणि लाठीही वाचल्यासारखे होईल नाही का!

अमित चिविलकर

1 comment:

  1. It's good for Everybody but, what u think how many think seriously about that???????
    Keep it up Writing here......

    ReplyDelete