कालच्या दहिहंडी संदर्भात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला जवळ जवळ सगळ्याच पक्षांनी चांगला प्रतिसाद दिला. विशेषकरून मोठ मोठ्या दहिहंडी आयोजकांनी या बदल्यात जे उपक्रम राबविले त्याने महाराष्ट्राची आणखी अनोखी ओळख देशात पोहचली आहे.
मराठी माणूस तसा उत्सवप्रेमी आहे हे नविन सांगण्याची गरज नाही. परंतु स्वाईन फ्लू मुळे जे काही घडतेय किंवा घडलेय ते नक्कीच कुठल्याही संवेदनशिल माणसासाठी अतिशय दु:खदायक आहे. त्यातूनच उद्धवसाहेबांनी सर्व मोठ्या दहिहंडी आयोजकांना यंदाची दहिहंडी पारंपारिक पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन केले तसेच बक्षिसरुपाने ठेवलेल्या रकमेचे सामाजिक कार्यासाठी वापर करण्यास सांगितले त्याप्रमाणे शिवसेनेच्या सर्व दहिहंडी आयोजकांनी कुणी मास्क वाटले, कुणी वैद्यकिय उपकरणे इस्पितळांना भेट दिली कुणी आणखी काय केले? यात जितेंद्र आव्हाड सुद्धा आलेच!
काही दिवटे असेही होते जे स्वत: बिहारी असून मुंबईच्या बाबतीत कधीही काही न बोलणारे मराठी माणसाच्या सणाचे महत्व पटवून देत होते किंवा स्वाईन फ्ल्यु बद्दल भिती बाळगू नये असे पाळपूद लावून आपले निवडणुकी अगोदर शक्ती प्रदर्शन करण्यात गुंतले होते. परंतु आज आपण विचार केल्यास ज्यांनी दहिहंडी आयोजन नाही केले त्यांचे योगदान यांच्यापेक्षा लाखमोलाचे आहे हे नक्कीच!
उत्सव बंद करणे कधीहि योग्य नाही परंतु जर वेळ तशीच आली तर आम्ही असे वेगळे काही करू शकतो हे कालच्या या काही घटनांवरून नक्कीच लक्षात आले!
No comments:
Post a Comment