Monday, 12 October 2009

२२ ऑक्टोबर.. विधानसभेवर भगवा फडकणारच! .. असेल हिंमत तर अडवा!!


काहीच तासात मतदान सुरू होईल, आणि महाराष्ट्राचे भविष्य तुमच्या हातून घडणार आहे. मतदान करण्यापूर्वी महत्वाचे आहे की कोणी काय काम केले हे समजून घेणे.

लोकसभा निवडणूकीनंतर झोपी गेलेले राजूसुपारी ऐन निवडणूकीवेळेस झोपेतून उठतात. आणि बकबक भाषण सुरू होते. इतके दिवस तुम्ही कुठे होतात? लोकसभा निवडणूका झाल्यावर, आपण कुठलेही मुद्दे हातात घेताना दिसला नाहीत? असे विचारता, म्हणतात.. महाराष्ट्राची "ब्लू प्रिंट" बनविण्यात बिझी असल्याने मुद्दे घेऊ शकलो नाही... बरं का! ह्यांची ब्लू प्रिंट (वचकनामा) रद्दी पेपरसारखी ४ पानांची काल प्रकाशित केली. जशी कॉंग्रेसने सरळ सरळ कॉपी शिवसेना-भाजप च्या वचननाम्याची केली, तशीच शिवसेना वचननाम्यातील चार लाईन चोरी करून स्वत:चा रद्दी "वचकनामा" मनसेने बनविला. आणि ह्यांच्या वचकनाम्यामध्ये शेतकरी आत्महत्यांबद्दल पहिल्या लाईन वर नसून सगळ्यात खाली सहाव्या लाईनवर दिसून येतो. यातच समजून येते की, यांना शेतकऱ्यांची किती काळजी आहे... बरं का! मागच्या काही महिन्यांत घडलेले बलात्कार, खंडणीवसूली या सगळ्या कामावरून दिसून येतेय की, काय नवनिर्माण हे करत आहेत.
मागिल १० वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेवर असून महाराष्ट्र जिथे बऱ्याच क्षेत्रात एक नंबर वर होता आता तिथे सहाव्या नंबरवर जाऊन पोहचला आहे. शेतकरी आत्महत्या, लोडशेडींग, महागाई सगळ्या विषयांवर या लोकांनी दुर्लक्ष केले आणि सत्ता भोगली असले हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार.

अजमल कसाबला गेट वे समोर फाशी दिली पाहिजे हे आपले सगळ्यांचे मत आहे. कसाब तर बाहेरचा आतंकवादी आहे. अगोदर जे घरात लपून असले आहेत ते राष्ट्रवादीच्या शरद पवारांसारख्यांना फाशी लावली पाहिजे. केंद्रात कृषीमंत्री असून हयांनी काय उत्पन्न केले? जसे "गोष्ट छोटी डोंगराएवढी" चित्रपटात पेट्रोलची खाण असल्याचे फसवून गावात आणून त्याला राबविले जाते अगदी तसेच कृषीमंत्र्यासोबत आमच्या शेतकऱ्यांनी करायला हवे होते. एकेकाळी साखर हिंदुस्थानातून इतर देशात निर्यात केली जात होती, पण शरद पवारांच्या कृपेने आता ३० मिलीयन मेट्रीक टनहून अधिक साखर आपल्याला परदेशातून आयात करावी लागत आहे. कृषीमंत्री असताना यांनी हरितक्रांती करायला हवी होती पण काय केलं यांनी?

या सगळ्या चोरांची गर्दी एकीकडे आणि उद्धवसाहेब एकीकडे. गरीबांचे, शेतकऱ्यांचे दु:ख जाणुन घ्यायला दिवस-रात्र एक केली. एकदा नाही तर दोनदा अख्या महाराष्ट्राचा दौरा केला; आणि इतक्या कमी वेळात ७०० पेक्षा जास्त सभा कोणतीही निवडणूक नसताना ग्रामीण महाराष्ट्रात घेऊन एक आगळा विक्रम केलाय. महागाई असो की लोडशेडींगचा मुद्दा, रस्त्यावर उतरतो तो फक्त शिवसैनिकच!

"माझे सरकार, माझा वचननामा" हा एक अनोखा वचननामा पहिल्यांदाच जनतेने बनविलेला वचननामा आहे तसेच या वचननाम्याच्या पूर्तीसाठी एक वेगळे खातेही बनविण्याचा उद्धवसाहेबांचा मानस आहे. एक दारिद्र्यमुक्त आणि विकसीत महाराष्ट्राचे स्वप्न आहे.

"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" मधले काही वाक्ये पुन्हा सांगावेसे वाटतात...

कडे-कपाऱ्या दऱ्या-खोऱ्यातून, निधड्या छातीने घोड्याच्या टापा ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या, त्या शिवबाचे वारसदार असे हतबल होऊन स्वत:च्या मराठीपणाची लख्तरं गुढी उभारल्यासारखी महाराष्ट्राच्या वेशीवर टांगलीय. याचसाठी केला का केला होता अट्टाहास, हिंदवी स्वराज्याचा? मर्द मावळ्यांच्या राज्याचा? आई भवानीचा आशिर्वाद आणि जिजाऊंचा लढावू बाणा घेऊन, रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली, ती हाच दिवस पाहण्यासाठी? तुम्हाला मराठी असण्याची लाज वाटते हे ऐकण्यासाठी?

मराठी माणूस आज स्वत:च्या कर्तुत्वाने मागे राहिला आहे. "आमची कुठेही शाखा नाही" असे अभिमानाने सांगता तुम्ही, अहो त्या गोष्टीची लाज वाटायला हवी, त्या अभिमानाची पाटी कसली लावता? मराठी माणसाला मान नाही कारण हि स्थिती तुम्हीच स्वत:वर ओढवून घेतलीय. स्वत:च्या नाकर्तेपणाचे दोष परप्रांतियांवर लादू नका.

जागे व्हा आणि पुन्हा आपल्या धमन्यात खेळवा मर्द मराठ्याचा सळसळता रक्त. सर्व क्षेत्रांत मराठ्यांचे प्रभुत्व स्थापित करा. वेडात मराठे वीर दौडले सात. आजच्या काळात त्या गाण्याचा बदल करायला हवा. माझा लाखो, करोडो लोकांचा मुलुख आणि वेडात मराठे वीर दौडले फक्त सातच? आता म्हणा वेडात मराठे वीर दौडले सात नाही एकसाथ.. आणि मग पुन्हा एकदा म्हणता येईल.. दिल्लीचा तख्त राखितो महाराष्ट्र माझा!

No comments:

Post a Comment