Monday, 7 September 2009

अफजलखान तुमचा कोण लागतो?

आजच्या संपादकीय मध्ये हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी मिरजेतील धर्मांधांविषयी मांडलेले विचार





Sunday, 6 September 2009

मनसे सरचिटणीस शिवसेनेत!


मनसेचे सरचिटणीस श्री संजय घाडी आणि त्यांच्या पत्नी आणि महिला विभागसंघटक सौ संजना घाडी यांनी शिवसेना कार्यप्रमुख मा. उद्धवसाहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

सौ संजना घाडी यांनी २००७ च्या महानगर पालिकेची निवडणूक दहिसर विभागतून लढविलेली होती. तसेच संजय घाडी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे अत्यंत निकटवर्ती म्हणून समजले जात होते. श्री संजय घाडी हे येत्या विधानसभा निवडणूकीत मनसे कडून निवडणूक लढविणार असेही म्हटले जात होते.

संजय घाडी यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसे आणि राज ठाकरे यांना श्वेता परूळकर यांच्या नंतरचा सर्वात मोठा धक्का बसला आहे.

Saturday, 5 September 2009

महाराजांनी खानाचा कोथळा काढला होता?

यावर ऑर्कुट शिवसेना कम्युनिटी सभासद नचिकेत गुरव यांचा लेख पुढीलप्रमाणे :
वास्तवात आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला गेला. खरेतर शिवराय अणि अफझलखान यांच्यात काका-पुतण्याचे नाते होते. पुतन्याच्या भेटीच्या ओढीनेच अफझलखान विजापूरहून शिवरायाना भेटायला प्रतापगडावर आला होता. शिवरायाना पाहताच त्याला प्रेमाचा उमाला आला व त्याने गलाभेटीसाठी शिवरायाना आलिंगन दिले. शिवरायांचा मुळात स्वभावच विनोदी होता. त्यानी खानास गुदगुल्या करण्यास सुरवात केली. खानाचे शारीर प्रचंड असल्याने त्याला कोलेस्ट्रोलची समस्या होती. त्यामुले अति हसण्याने त्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यात त्याचा मृत्यु झाला. हा खरा इतिहास आहे.

दूसरा प्रसंग शाहिस्तेखान बाबत आहे. याची बोटे शिवरायानी छाटली असे म्हंटले जाते ते ही चुकीचे आहे.

खरेतर येथे ही खान व शिवराय यांच्यात मामा-भाच्याचे नाते होते ( मित्र औरंग्याचा मामा तो आपला मामा या नात्याने ). येथेही अपनास असे चुकीचे शिकवले गेले की खानाने शिवरायांचे घर बलकावले. आता मामा भाच्याच्या घरी राहणार नाही तर कोणाच्या घरी राहणार ? त्याचा तो हक्क नाही का ? असो मग एक दिवस शिवराय मामाला भेटायला लाल महालात गेले. जेवण व हवा-पाण्याची चर्चा झाल्यावर, शिवरायानी मामाला तलवारीचे दावपेच शिकाविन्याचा अग्रह केला. आता भाच्याचे मन मोडवेना म्हनून मामने दावपेच शिकवन्यास प्रारंभ केला त्यात एक डाव शिकवताना चुकून शिवरायांची तलवार खानच्या बोटाला लागली त्यात त्याची बोटे तुटली. शिवरायानी यावर धावपळ करुन मामासाठी चांगला वैद्य अनन्यासाठी मामाच्या छावनी बाहेर धाव ही घेतली होती. पण चांगला वैद्य मिळाला नाही म्हनून मामाला आता कसे तोंड दाखवू म्हनून ते परत मामाच्या छावनित गेले नाही.

हा खरा इतिहास आहे. म्हनुनच अफझलवधाचा प्रसंग अपल्या सरकारने पाठ्यपुस्तकातून वगळला.

आदेश बांदेकर शिवसेनेत!

तमाम महाराष्ट्रातील वहिणींचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांनी काल शिवसेना कार्यप्रमुख उद्धवसाहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्यासह त्याच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांनीही सेनेत प्रवेश केलाय.

लहानपणापासून शिवसेना शाखेशी संबंधित असल्यामुळे शिवसेनेतील हा प्रवेश फक्त औपचारिकता असल्याचे त्यांनी सांगितले तसेच शिवसेना कार्यप्रमुख उद्धवसाहेबांनी सांगितले कि श्री. बांदेकर यांना त्यांच्या योग्य जबाबदारी लवकरच सोपविली जाईल.

Tuesday, 1 September 2009

माझे सरकार... माझा वचननामा!

आजच शिवसेना कार्यप्रमुख मा. उद्धवसाहेब यांनी एक विशेष घोषणा केलेली आहे. येत्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना आपला वेगळा वचननामा काढणार आहे आणि हा वचननामा जनता ठरवणार आहे. शिवसेना हेल्पलाईन आणि शिवसेनेच्या वेबसाईट्च्या माध्यमातून हि जनतेची मते घेतली जातील असेही श्री. उद्धवसाहेबांनी सांगितले आहे.

शिवसंवाद दौऱ्यात जनतेशी थेट संपर्क साधताना जनतेचे प्रश्न बघता जनताभिमुख वचननामा असला पाहिजे अशी संकल्पना समोर आली म्हणून शिवसेना जनतेच्या मतांचा विचार करून हा वचननामा बनवेल तसेच युतीचे सरकार आल्यावर वचननामा पूर्ण करण्यासाठी विशेष खाते सुरू करण्यात येईल. असेही श्री. उद्धवसाहेबांनी सांगितले आहे.

शिवसेनेच्या वेगळ्या पद्धतीने जनता आपली कामे शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्यासाठी पुढे येऊन पूर्ण करून घेऊ शकेल. तसेच जनतेची मते यात घेतली जाणार असल्याने येणारे युतीचे सरकार हे जनताभिमुख असेल असेही यातून दिसते.

सगळीकडे शिवसेना, शिवसेना आणि शिवसेनाच!

महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते राज ठाकरे यांना सध्या शिवसेनेशिवाय चैनच पडत नाही आहे. पक्ष सोडून जाऊन तीन वर्षे झाली तरी शिवसेनेचे नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नसावा असेच दिसतेय. हल्ली त्यांनी शिवसेनेचा धसकाच घेतला असला पाहिजे असेच काही आहे.

मुळात लोकसभेला जे मतदान झाले त्याने तसे राज ठाकरे हवेतच आहेत. आंदोलन न करता धमक्या दिल्याने जनतेचे प्रश्न सुटतात असे आजकाल त्यांना वाटू लागले आहे. असे आहे तर महाराष्ट्रात अनेक असे प्रश्न आहेत जे सुटणे आवश्यक आहे त्याबद्दल ते कधीच धमक्या देताना दिसत नाही. हे असे का? (सोप्पे कॉंग्रेसने स्क्रिप्ट दिल्याशिवाय आजकाल यांचे पानही हलत नाही).

म्हणे शिवसेनेत आता आक्रमक पणा उरलेला नाही! अहो पण आता तुम्ही शिवसेनेची काळजी कशाला करताय? तुमचा पक्ष आहे त्याची काळजी करा. तुमच्या पक्षात एवढा आक्रमकपणा आलाय की आज रस्त्यावरून चालणाऱ्या आयाबहिणींना तुमच्या लोकांपासून सुटका मिळण्याची गरज आहे. चोऱ्या, लुट, गाड्या जाळणे आणि बलात्कार करणे एवढेच काम तुमचे कार्यकर्ते सध्या आक्रमकपणे करत आहेत तर जरा तिकडे लक्ष द्या. आमचे उद्धवसाहेब आहेत पक्षाचे काय करायचे ते बघायला आणि हो आमचा ढाण्या वाघ सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहेच.

महाराष्ट्रात एवढे प्रश्न आहेत. गेली १० वर्षे जनता कॉंग्रेसच्या कामाने त्रस्त आहे आणि ते तुम्हाला दिसत असून गॉगलच्या आत वेगळेच काही चालले आहे. आज सर्वसामान्य माणसालाही हे कळते आहे. तुम्ही कॉंग्रेसचे पिल्लू आहात. तुम्ही कॉंग्रेसने सांगितल्याशिवाय काहीच करत नाही कारण काय? अर्थकारण की शिवसेना संपवण्याचा अफजलखानी विडा की मराठी माणसाला रस्त्यावर आणण्यासाठी?

तुम्ही शिवसेनेचा जप करत आहात याबद्दल मुळीच राग नाही आहे कारण तुम्ही जे बोलता ते आम्ही सत्य मानायला आम्ही तुमचे कार्यकर्ते नाही आहोत किंवा जनताही तुमच्यासारखे कॉंग्रेसच्या ताटाखालचे मांजर नक्कीच नाही. तुम्ही टिका करा शिवसेनेवर हवी तेवढी करा... शिवसेना नेत्यांवरही करा पण एक विसरू नका मागच्या १० वर्षातल्या ७ वर्षे तुम्हीही शिवसेनेचे नेते होतात तेव्हा काय तुमची दातखिळी बसली होती का? एकूण काय शिवसेनेवर टिका करताना तुमचा नालायकपणाच तुम्हीच जनतेसमोर मांडताय... मांडा आणखी मजा येईल तुमचा लाफ्टर शो बघायला!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका १३ ऑक्टोबरला!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका येत्या १३ ऑक्टोबर रोजी होणार आहेत, म्हणजेच येत्या दिवाळी नंतर महाराष्ट्रात नविन सरकार अस्तित्वात येणार आहे. या निवडणूकीची अधिसुचना १८ सप्टेंबर रोजी जारी होईल त्याच दिवशी उमेदवार अर्ज भरण्याची सुरूवात होणार असून २५ सप्टेंबर हि शेवटची तारीख असणार आहे, २६ सप्टेंबर ला अर्जांची छाननी होईल २९ सप्टेंबर अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. मतमोजणी दिवाळीनंतर लगेचच म्हणजेच २२ ऑक्टोबरला पार पडणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी ७ कोटींहून अधिक मतदार आपले बजावू शकणार आहेत.