Tuesday, 1 September 2009

सगळीकडे शिवसेना, शिवसेना आणि शिवसेनाच!

महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते राज ठाकरे यांना सध्या शिवसेनेशिवाय चैनच पडत नाही आहे. पक्ष सोडून जाऊन तीन वर्षे झाली तरी शिवसेनेचे नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नसावा असेच दिसतेय. हल्ली त्यांनी शिवसेनेचा धसकाच घेतला असला पाहिजे असेच काही आहे.

मुळात लोकसभेला जे मतदान झाले त्याने तसे राज ठाकरे हवेतच आहेत. आंदोलन न करता धमक्या दिल्याने जनतेचे प्रश्न सुटतात असे आजकाल त्यांना वाटू लागले आहे. असे आहे तर महाराष्ट्रात अनेक असे प्रश्न आहेत जे सुटणे आवश्यक आहे त्याबद्दल ते कधीच धमक्या देताना दिसत नाही. हे असे का? (सोप्पे कॉंग्रेसने स्क्रिप्ट दिल्याशिवाय आजकाल यांचे पानही हलत नाही).

म्हणे शिवसेनेत आता आक्रमक पणा उरलेला नाही! अहो पण आता तुम्ही शिवसेनेची काळजी कशाला करताय? तुमचा पक्ष आहे त्याची काळजी करा. तुमच्या पक्षात एवढा आक्रमकपणा आलाय की आज रस्त्यावरून चालणाऱ्या आयाबहिणींना तुमच्या लोकांपासून सुटका मिळण्याची गरज आहे. चोऱ्या, लुट, गाड्या जाळणे आणि बलात्कार करणे एवढेच काम तुमचे कार्यकर्ते सध्या आक्रमकपणे करत आहेत तर जरा तिकडे लक्ष द्या. आमचे उद्धवसाहेब आहेत पक्षाचे काय करायचे ते बघायला आणि हो आमचा ढाण्या वाघ सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहेच.

महाराष्ट्रात एवढे प्रश्न आहेत. गेली १० वर्षे जनता कॉंग्रेसच्या कामाने त्रस्त आहे आणि ते तुम्हाला दिसत असून गॉगलच्या आत वेगळेच काही चालले आहे. आज सर्वसामान्य माणसालाही हे कळते आहे. तुम्ही कॉंग्रेसचे पिल्लू आहात. तुम्ही कॉंग्रेसने सांगितल्याशिवाय काहीच करत नाही कारण काय? अर्थकारण की शिवसेना संपवण्याचा अफजलखानी विडा की मराठी माणसाला रस्त्यावर आणण्यासाठी?

तुम्ही शिवसेनेचा जप करत आहात याबद्दल मुळीच राग नाही आहे कारण तुम्ही जे बोलता ते आम्ही सत्य मानायला आम्ही तुमचे कार्यकर्ते नाही आहोत किंवा जनताही तुमच्यासारखे कॉंग्रेसच्या ताटाखालचे मांजर नक्कीच नाही. तुम्ही टिका करा शिवसेनेवर हवी तेवढी करा... शिवसेना नेत्यांवरही करा पण एक विसरू नका मागच्या १० वर्षातल्या ७ वर्षे तुम्हीही शिवसेनेचे नेते होतात तेव्हा काय तुमची दातखिळी बसली होती का? एकूण काय शिवसेनेवर टिका करताना तुमचा नालायकपणाच तुम्हीच जनतेसमोर मांडताय... मांडा आणखी मजा येईल तुमचा लाफ्टर शो बघायला!

No comments:

Post a Comment