Friday, 20 March 2009

साहेब - मराठीचा मान आणि हिंदुत्वाचा अभिमान.

हा लेख 'मातृभूमी' या मासिकात प्रकाशित झालेला आहे, संपूर्ण मासिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

'बाळासाहेब ठाकरे' हे महाराष्ट्राचे एकमेवद्वितीय व्यक्तिमत्व आहे. एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार ते हिंदूत्ववादी नेते असा साहेबांचा प्रवास आहे.

महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे तसेच तरूणांचे आदर्श आहेत साहेब. ज्यांनी राजकारणात चालून आलेली पदे सर्वसामान्यांना दिली, त्यांना मोठे केले पण स्वतः मात्र सत्तेच्या राजकारणापासून चार हात दूर राहिले. साहेब आज देशातील लाखो हिंदूंचे आधारस्थान आहेत. महाराष्ट्रातील खास करून मुंबईत जो काही मराठी माणूस आज ताठ मानेने उभा आहे त्याचे संपूर्ण श्रेय साहेबांनाच जाते. साहेबांनी आजपर्यंत सर्वात जास्त प्रेम शिवसैनिकांवर केले आणि साहेबांचा शिवसैनिक असण्याचा मला खुप खुप अभिमान आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्राचे मोठ- मोठे नेते आपले कार्यरत असताना बाळासाहेब कुंचल्याच्या फटकार्‍यांनी महाराष्ट्रद्रोह्यांवर आसूड ओढत असत. जवाहरलाल नेहरू, मोरारजी देसाई, सदोबा पाटलांसारखे महाराष्ट्रद्रोह्यांनाही साहेबांनी सोडले नाही. पुढे १९६० च्या दशकात मुंबईत मराठी माणसांवर होणार्‍या अन्यायाने साहेब खुपच अस्वस्थ झाले. त्यांनी मार्मिक साप्ताहिक सुरू केले. 'वाचा आणि थंड बसा' या लेखमालिकेतून मराठी माणसावरील अत्याचारांना वाचा फोडली. शिवसेनेच्या माध्यमातून अन्यायाची जाण मराठी तरूणांना करून दिली, त्यांची मने पेटविली आणि मराठी तरूण जागा झाला. त्याला आपल्या हक्कांची जाणिव झाली आणि अन्यायाविरोधात लढू लागला.

साहेबांनी सुरू केलेल्या लढ्याला मराठी माणसाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या गावोगावी शिवसेनेच्या शाखा सुरू होऊ लागल्या, साहेबांच्या विचारांची देवाणघेवाण शिवसेना शाखांमधून होऊ लागली, सर्वसामान्यांची गार्‍हाणी-समस्या ऐकून घेऊन सोडवली जाऊ लागली. काही वर्षातच शिवसेनेने महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटवला. साहेबांनी केलेल्या प्रत्येक आवाहनाला मराठी माणूस खंबीर उभा राहू लागला. परंतु साहेबांच्या लढ्याला काही मराठी माणसे व वेगवेगळ्या पक्षांचे नेते, पत्रकार, विचारवंत विरोध करत असत. त्यावेळी साहेबांच्या बाजूने वडील प्रबोधनकार ठाकरे, त्यांची स्वतःची हिंमत, मराठी जनतेबद्दलचा जाज्वल्य अभिमान व समर्थ कुंचला हिच शक्तिस्थाने होती.

हिंदुस्थानमध्ये हिंदुत्वाची चळवळ फार पूर्वीपासून सुरू होती. तरीसुद्धा हिंदुत्वाची चळवळ तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम बाळासाहेबांनीच केले आहे. १९९२-९३ ची मुंबईतील दंगल असो किंवा मालेगाव मध्ये सतत गणपती विसर्जनावर होणारी धर्मांध मुस्लिमांची दगडफेक असो. महाराष्ट्रात आणि देशात प्रत्येक ठिकाणी हिंदू मार खात होता तेव्हा प्रत्येक वेळी साहेबांनीच हिंदूंना धीर दिला. धर्मांधांविरूद्ध लढण्याची ताकद आणि बळ दिले. आणि त्यांची पाठसुद्धा थोपटली.

१९९२ साली बाबरी मशीद पाडली तेव्हा काहींनी हात झटकून हे काम शिवसैनिकांनी केले असे सांगू लागले तेव्हा साहेब म्हणाले "हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे." साहेबांनी आयुष्यात कधीही आपले शब्द मागे घेतलेले नाहीत. जी भूमिका मांडली ती रोखठोक!

१९९३ च्या मुंबईतील जातिय दंगलीमध्ये जागोजागी हिंदूंची कत्तल करण्याचे काम धर्मांधांनी सुरू केले, जोगेश्वरीच्या बने कुटुंबातील लोकांना जाळले गेले, हिंदू आया-बहिणींच्या इज्जतीला हात घालण्यापर्यंत या लोकांची मजल गेली तेव्हा साहेबांनी चिडून उठून शिवसैनिकांना याच्या विरोधात जशाच तसे उत्तर देण्याचे आवाहन केले. शिवसैनिकांनीही साहेबांचे आवाहन शिरसावंद्य मानून रस्त्यावर आपल्या हिंदू माता-भगिणींची इज्जत वाचवण्याचे काम केले. मस्तावलेल्या धर्मांधांची मस्ती जिरवली. हे केवळ साहेबांमुळेच घडले. मुंबईतील हिंदू समाजाला तेव्हाच साहेबांची ताकद कळून आली आणि तेव्हापासून देशभरातील हिंदूंना साहेबांचा आधार वाटू लागला.

गोध्रामधील धर्मांधांच्या मस्तीला जशास तसे उत्तर देणार्‍या गुजरातचे मुख्यमंत्री माननिय नरेंद्रजी मोदी यांच्यावर देशातील मिडीया तुटून पडली, भाजप मधूनही मोदींना एकाकी पाडण्याचे काम सुरू झाले होते तेव्हा मित्रपक्ष म्हणून अडवाणींना साहेबांनी मोदींना मुख्यमंत्री म्हणून पुढेही ठेवण्याचे सांगितले. आज आपण सगळे पाहतोच आहोत कि आजचा गुजरात हा एक आदर्श राज्य म्हणून देशात नाव कमावत आहे. हि सुद्धा एक प्रकारची साहेबांची जादू मानल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

गेल्या वर्षी सर्वाधिक गाजलेल्या मालेगांव बॉम्बस्फोटात अडकविलेल्या हिंदू प्रज्ञा साध्वीवर केवळ हिंदू म्हणून अतिशय घाणेरडे अत्याचार करण्यात आले. कोणतेही आरोप सिद्ध न करता महाराष्ट्र एटीएस साध्वींना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न करीत असतानाच साहेब साध्वीच्या मागे खंबीर उभे राहिले आणि काँग्रेसचे हस्तक बनून देशात हिंदू आतंकवाद वाढत आहे असे दाखविणार्‍या एटीएस वाल्यांना साहेबांनी जबरदस्त पद्धतीने उत्तर दिले.

साहेबांचे हिंदुत्व हे सर्वच मुसलमानांच्या विरोधातले नाही. जे जात्यंध मुसलमान आहेत, ज्यांचा आजही पाकिस्तानला पाठिंबा असतो, जे देशद्रोही आहेत अशांना कुठल्याही परिस्थितीत साहेब सोडत नाहीत. अंधश्रद्धेच्या विरोधात असणारे साहेब फक्त हिंदूंच्या अंधश्रद्धा बंद करून मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातील अंधश्रद्धांना तशाच ठेवणार्‍या 'अंधश्रद्धा निर्मुलन समिती' वरही बरसतात. आपल्या संस्कृतीत बरेच चांगले उत्सव असताना परकिय 'वेलेंटाईन डे' सारखे दिवस साजरे करणार्‍या आजच्या तरूण पिढीला आपली संस्कृतीची योग्य माहिती व्हावी आणि वेलेंटाईन डे सारखी थेर बंद व्हावीत असे साहेबांना ठामपणे वाटते.

"हिंदुत्व" हेच राष्ट्रीयत्व मानणारे आमचे साहेब म्हणूनच लाखो हिंदूंचे "हिंदूहृदयसम्राट" आहेत.

Friday, 30 January 2009

जेव्हा साहेब दिघेसाहेबांवर चिडतात..

विधानसभेची १९९९ ची निवडणूक आजही आठवते. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. ठाणे जिल्ह्यातही कॉंग्रेस आघाडी विरुद्ध शिवसेना-भाजप युती असा सामना चांगला रंगात आला होता. जिल्ह्यातील युतीचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यावर सोपवण्यात आली होती. सुनियोजित तंत्र वापरून जिल्ह्यातून तेरापैकी आठ आमदार निवडून त्यांनी निवडून आणले होते.

या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पालघरच्या आमदार सौ. मनीषा निमकर यांच्या प्रचारासाठी आले होते. वेळ खूप कमी होता. राज्यात दौरे करून ते काहीसे थकले होते. मात्र, दिघे यांच्या आग्रहाखातर अगदी शेवटच्या टप्प्यात ते पालघरच्या सभेसाठी आले होते. अर्थात ते कसे आले, कसे "अडकले', याचा किस्सा खूपच गमतीदार आहे. बाळासाहेबांना तब्बल एक दिवस "कोंडून' ठेवण्याची हिंमत दिघे यांनी दाखविली होती. तो किस्सा असा घडला होता...

दिघे यांच्या हट्टापुढे बाळासाहेबांना माघार घ्यावी लागली होती. आपल्या पूर्वनियोजित जाहीर सभांना कात्री लावणे त्यांना भाग पडले होते. अखेर त्यांचा हिरवा कंदील मिळाला आणि पालघरसारख्या ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात साहेब येणार, या वृत्तानेच वातावरण भारले गेले. शिवसैनिकांची एकच धावपळ सुरू झाली. ते कुठे थांबणार? त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचे काय? असे प्रश्‍न होते. परंतु दिघे असल्याने साहेब आणि शिवसैनिक तसे निर्धास्तच होते.

२५ मार्च १९९९ रोजी सांयकाळी शेकडो गाड्यांचा ताफा पालघरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नंडोरे या आदिवासी गावात घुसला. आजूबाजूला वस्तीही नव्हती. चिकूच्या वाडीत असलेल्या एका कॉंग्रेस नेत्याच्या बंगल्यात बाळासाहेबांची थांबण्याची व्यवस्था केली होती. बाळासाहेब पोचले आणि काही वेळात वीज गेली. विजेची पर्यायी कोणतीच सोय नव्हती. त्यातच बंगल्यातील नळाला पाणीच येईना. साहेब अस्वस्थ झाले होते. बाळासाहेब म्हणाले, "आनंद कुठे आहे?'

दिघे त्यांच्यासमोर हजर!
""काय रे! मला कुठे आणून ठेवले आहेस? मला काय हवे, काय नको, हे तुला माहीत नाही का?'' ते चिडले होते.
चुकलो! साहेब!

काय चुकलो म्हणतोस! सभेची तयारी झाली का? चला आता...

दिघे गप्पच. साहेबांना कळेच ना. ते प्रश्‍नार्थक नजरेने बघू लागले.

चल म्हणतोय ना... साहेब गुरकावलेच.

दिघे सावरून म्हणाले, ""साहेब! सभा उद्या संध्याकाळी आहे.''

काय? उद्या संध्याकाळी सभा? मग आज कशाला आणलेस?

साहेब भडकलेच. सभा उद्या असताना या खेड्यात मला उगीचच चोवीस तास अगोदर आणले आहे, यामुळे ते संतापाने थरथर कापू लागले. त्यांचा हा पवित्रा पाहून नजरेला नजर भिडवण्याची ताकदच कुणात राहिली नाही...

सुधीर (जोशी) कुठे आहे?

आलो, साहेब!

दिघे आणि जोशी यांची धारदार शब्दांत खरडपट्टी सुरू झाली. आपला संताप बाहेर काढल्यानंतर धुमसणारे बाळासाहेब शेवटी शांतपणे खुर्चीवर बसले. क्षणभरानंतर आपल्या नेपाळी सहायकास ते म्हणाले, "चल! आताच मुंबईला निघायचे.'

आवराआवर सुरू झाली. बाळासाहेब एक शब्दही न बोलता खुर्चीवर रेललेले.

दुसरीकडे दिघे हे जोशींना म्हणाले, ""भाऊ, काही करा; पण साहेबांना थांबवा!''

जोशी म्हणाले, ""आनंद, मी काही बोलणी खाणार नाही. तू असे केलेच का? आता तुझे तू बघ. त्यांना कोणी आता थांबवू शकणार नाही?''

दिघे म्हणाले, ""माझ्यासाठी शेवटचा प्रयत्न करा?''

शक्‍य नाही, बाबा! माझी हिंमत नाही, जोशींनी पुन्हा नकार दिला.

शेवटी मनाचा हिय्या करून दिघेच तोफेच्या तोंडी आले. बाळासाहेबांसमोर लवून पण नेटाने उभारले.
"हवं तर उद्याच मला शिवसेनेतून काढून टाका? पण तुम्ही जाऊ नका! ही सभा व्हायलाच हवी! एका आदिवासी महिलेचा प्रश्‍न आहे. साहेब! तुम्ही थांबलेच पाहिजे.''

पाच फूट उंच, डोळ्यांत तेज, दाढीवरून सतत हात फिरविणाऱ्या या छाव्याकडे सिंहाने जळजळीत नजर टाकली. डोळ्यांत संताप धुमसत होता; पण कुठे तरी राग शांत झाल्याच्या खुणा चेहऱ्यावर झळकत होत्या. त्यातच दिघेचे ते शब्द साद घालणारे होते. क्षणभर सुन्न शांतता होती. त्याचा भंग करीत बाळासाहेब बोलले.

"ठीक आहे, तू म्हणतोस तर थांबावेच लागेल!''

या शब्दांनी दिघेंवरील सर्व दडपण गळून पडले. सभा होणार, हे नक्की झालेले असते. साहेबांचे चरणस्पर्श करून त्यांनी लगेचच बंगला सोडला. फक्त एक तासाच्या सभेसाठी बाळासाहेब चोवीस थांबणार होते. त्यामुळे झालेली तगमग आपल्या "छाव्या'साठी बाळासाहेबांनी झेलली होती. दुसऱ्या दिवशी सभेला जनसागर लोटला. मनीषा निमकर दणदणीत मतांनी विजयी झाल्या.

बाळासाहेबांनी दिघे यांच्यावर पुत्रवत प्रेम केले. दिघे शिवसेनेच्या वाटचालीतील अनेक घटनांचे साक्षीदार होते. धगधगती मशाल होती. गुंडगिरीबरोबरच समांतर सरकार राबवीत असल्याचा आरोप त्यांच्यावर नेहमीच झाला. त्यांची निष्ठा होती ती शिवसेनाप्रमुखांवर आणि शिवसेनेवर. मुक्त हस्ते मदत हाच त्यांचा धर्म होता. त्यांच्या "दरबारा'त म्हणूनच साधुसंताबरोबरच मुल्ला-मौलवी, पाद्रीही दिसत. चार खासदार, आठ-दहा आमदार निवडून आणण्याची ताकद ज्या माणसाकडे होती, ते दिघे आमदारच काय मंत्रीही झाले असते; परंतु आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांप्रमाणे एकच पद घेऊन शिवसेनेत जगले. ते पद होते शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख.
२७ जानेवारी हा आनंद दिघे यांचा स्मृतिदिन. बाळासाहेब आणि दिघे या दोन नेत्यांमधील असलेले विश्‍वासाचे नाते शेवटपर्यंत टिकून होते. त्याला उजळणी देणारा हा अनुभव होता...

* हा लेख ई-सकाळ मधून घेतलेला असून श्री. प्रकाश पाटील यांनी लिहिला आहे.

Friday, 23 January 2009

बाळासाहेब : बाबा आणि आईही!

हा विशेष लेख आजच्या साहेबांच्या वाढदिवसानिमीत्त उद्धवसाहेबांनी मटा साठी लिहिला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हटले की तेजाचा गोळा... दरारा... करारी बाणा. मात्र याच्या उलट चित्र 'मातोश्री'मध्ये आम्ही अनुभवतो. कुटुंबवत्सल, प्रेमळ पिता, घरातल्या प्रत्येक सदस्याशी हितगुज साधणारा कुटुंबप्रमुख... असे एकापेक्षा एक अस्सल गुण आम्हाला 'मातोश्री'तल्या शिवसेनाप्रमुखांमध्ये पहायला मिळतात. आम्हा तिघा भावंडांना त्यांनी कधीही मारलं नाही. साधा हातही कधी उगारला नाही. त्यांना काय आवडते, त्यांना कशाचा राग येतो हे त्यांच्या वागण्यातूनच आम्ही ओळखायचो. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेची स्थापना करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांना आयुष्यात सतत संघर्षालाच तोंड द्यावे लागले. तरीही, त्यांनी स्वभावात त्रागा येऊ दिला नाही. मात्र एखाद्या माणसावर अन्याय झाला की याच प्रेमळ व्यक्तिमत्त्वाचे रुपांतर रागात होते आणि त्याचे पडसाद त्यांच्या रागापेक्षा दसपटीने अधिक उमटतात. अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची शक्ती त्यांच्यात कुठून येते, हे आम्हालाही आजवर न उलगडलेलं कोडं आहे...

मी बालमोहन विद्यामंदिरमध्ये शिकायचो. आताच्या 'पालक दिना'चे 'फॅड' त्यावेळी नव्हते. मात्र व्यस्त असूनही साहेेबांचे आमचा अभ्यास, खेळातल्या कौशल्याकडे लक्ष असायचे. दादरचे आमचे जुने घर तळमजल्यावर होते. तिथेच मागच्या गॅलरीत साहेबांचा कॉम्प्रेसर आणि स्पे गन असायची. व्यंगचित्र काढताना कोणी व्यत्यय आणलेला त्यांना आवडायचे नाही. १९८५ नंतर शिवसेनेचा व्याप बराच वाढत गेल्याने व्यंगचित्रांसाठी लागणारा एकांत व मोकळा वेळ मिळणे दुरापास्त झाले आणि साहेबांनी कुंचला थांबवला. ..........

शिस्तप्रिय, काटेकोर दष्टा
साहेब जेवढे कणखर आणि निडर आहेत, तेवढेच ते हळवेही आहेत. 'माँ'च्या जाण्याने ते अधिकच हळवे बनले. आजही मी दौऱ्यावर जाताना ते मला जेवणाकडे आवर्जून लक्ष देण्यास सांगतात. 'वाटेल तसे दौरे करण्याचे आणि जेवणाकडे दुर्लक्ष करण्याचे परिणाम मला आता दिसतायत. तू तुझी काळजी घे', असाच त्यांचा सल्ला असतो. सभेच्या ठिकाणी पोचल्यानंतर त्यांचा पहिला फोन येतो. सभा झाल्यानंतर 'कशी झाली' हेही ते आवर्जून विचारतात. परतताना सांभाळून निघ, सावकाश प्रवास कर, अशा सूचना करतात. 'माँ' गेल्यानंतर ते वडिलांबरोबरच आईचीही भूमिका बजावताहेत. साहेबांनी आम्ही तिघा भावंडांना खूपच प्रेम दिले. मात्र नातवंडांवरचे त्यांचे प्रेम पाहून आम्हालाही हेवा वाटतो. आजोबा आणि नातवंडांच्या बऱ्याच गप्पा रंगतात. साहेबांसारखाच तेजसलाही प्राण्यांविषयी खूप जिव्हाळा असल्याने त्यांचेही चांगलेच सूत जमलेय. साहेबांना प्राण्यांचा खूपच लळा. दादरला असताना आमच्याकडे मार्शल नावाचा ग्रेट डेन जातीचा कुत्रा होता. त्याला फिरवायला साहेब शिवाजी पार्कात जायचे.

साहेब अतिशय शिस्तप्रिय. टापटीपपणा हवाच. बैठकीसमोरचा टीपॉय व त्यावरच्या वस्तू त्यांना व्यवस्थित ठेवलेल्या लागत. झुरळ सरळ चालले तर त्याला साहेब सोडतील, पण ते तिरके चालले तर चपलेने फटकारतील, असे प्रमोद नवलकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले होते. हे उदाहरण फारच बोलके आहे. हा झाला गंमतीचा भाग, पण ते दैनंदिन जीवनातही फार काटेकोरपणे वागतात. दिलेली वेळ चुकवणे त्यांना खपत नसे. ठरलेल्या वेेळेआधी आपण एखाद्या ठिकाणी जातोय असे दिसले तर ते गाडी हळू करायला सांगत.

शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यात विरंगुळ्याचे क्षण तसे कमीच. सभा, दौरे सोडले तर स्वत:साठी फिरणं जवळजवळ नाहीच. 'माँ'च्या इच्छेखातर त्यांनी कर्जतला फार्म हाऊस बांधले. तेथे ते अधूनमधून जायचे. पण 'माँ'च्या निधनानंतर गेली कित्येक वषेर् ते तिथे गेलेलेच नाहीत. आतापर्यंत साहेबांनी एकदाच परदेश दौरा केलाय आणि तोही डिस्ने लँड पाहण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. १९८० सालची ती गोष्ट. योगायोग म्हणजे त्यावेळी डिस्नेलँडचा रौप्यमहोत्सव होता. तेथे स्थानिक व्यंगचित्रकार आपले पटकन व्यंगचित्र काढून देतात. अशाच एकाची फिरकी घेण्याची साहेबांना लहर आली आणि त्याचाच कुंचला-कागद घेऊन साहेबांनी त्याचेच व्यंगचित्र काढून दिले! सध्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच व्यंगचित्रकार असून त्यातही लाजवाब राजकीय व्यंगचित्रे रेखाटणारा शिवसेनाप्रमुखांशिवाय दुसरा कोणी व्यंगचित्रकार असेल, असे मला तरी वाटत नाही.

साहेबांना 'फोटोसेशन'साठी तयार करणे हेही जिकीरीचे काम असे. एकदा गोव्याला असताना समुदाच्या पार्श्वभूमीवर साहेबांचे फोटो काढण्याचा मला मूड आला. पण साहेब समुदावर यायला उत्सुक नव्हते. 'चला तर खरं, इथल्या किनाऱ्याचे वेगळेपण तरी बघा', असे सांगत मी त्यांना तयार केले. हॉटेलच्या बग्गीतून साहेब किनाऱ्याजवळ आले. पण पाण्यात जायला तयार होईनात. शेवटी इथली वाळू बघा किती वेगळी आहे असे सांगत मी त्यांना पाण्यापाशी घेऊन आलो. 'काय आहे वेगळे?' असे म्हणत साहेबांनी दोन्ही हात आडवे पसरले आणि मी कॅमेरा क्लिक केला. विस्तीर्ण सागराच्या दिशेने बाहू पसरून उभे असलेल्या साहेबांचा तो फोटो माझ्या आवडत्या फोटोंपैकी एक आहे.

साहेबांना छंद असे फारसे नाहीत. क्रिकेटवर मात्र त्यांचं निस्सिम प्रेम. चित्रपटांचं बोलाल तर आम्ही सर्वांनी मिळून थिएटरमध्ये पाहिलेला शेवटचा सिनेमा होता 'सरकार'! आजही त्यांच्या उशाला पु. ल. देशपांडे, प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या कथाकथनाच्या कॅसेट्स असतात. वारंवार ऐकून त्या साहेबांच्या अगदी तोंडपाठ झाल्या आहेत. बागकामाचीही त्यांना फार आवड. डॉ. बालाजी तांबे यांच्याकडे उपचारासाठी असताना साहेबांनी तर त्यांची बाग जवळजवळ नव्यानेच सजवून दिली होती. फार पूवीर् कधीतरी त्यांना एखादी डीश करायचा मूड येई. पण तिची 'रेसिपी' त्यांचीच असे!

कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्णय घेण्याचा बाळासाहेबांचा स्वभाव आहे. घेतलेल्या निर्णयावर ते ठाम असतात. प्रवाहाविरुद्ध दिशेने पोहणारे अनेक आहेत, मात्र प्रवाहाला थोपवून त्याचा मार्ग बदलण्याची ताकद बाळासाहेबांमध्ये पहायला मिळते. शिवसेना बाळासाहेबांना जीवापेक्षाही प्यारी आहे. शिवसैनिक जसे बाळासाहेबांना पहायला वेडे असतात, तसेच बाळासाहेबही त्यांना पहायला वेडे असतात. दौऱ्यात रात्री अपरात्री प्रवास करायचा नाही, अशा खास शिवसैनिकांना साहेबांच्या सूचना असतात. दौऱ्यात शिवसैनिकाला दुखापत झाली की साहेब ताबडतोब होमियोपॅथीचे औषध द्यायचे. त्यांच्या घरच्यांचीही ते तेवढ्याच आस्थेने चौकशी करीत असतात. आजही दौऱ्यानंतर शिवसैनिक सुखरूप परतल्याची चौकशी ते माझ्याकडे करत असतात. शिवसैनिक हा आपल्या परिवारापैकीच एक आहे, असे ते मानतात. शिवसेनेसाठी बाळासाहेबांनी स्वत:च्या जिवाला कायमचा धोका पत्करला आहे.

घरी असले तरी आजही साहेब बदलत्या जगाच्या अपडेट्स ठेवून आहेत. ओबामांचा शपथविधीही त्यांनी संपूर्ण पाहिला. त्याआधी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळीही ते टीव्हीसमोर बसून होते. ती दृश्ये बघताना ते संतापाने धगधगत होते. या हल्ल्यानंतर आपल्या सरकारने पाकिस्तानबरोबरचा क्रिकेट दौरा रद्द केला. त्या देशाबरोबरचे संबध तोडून आता कारवाई... प्रसंगी युद्धाची भाषा केली जातेय. मग साहेब त्यावेळी वेगळं काय सांगत होते? बांगलादेशी लोंढे आवरले पाहिजेत असे सध्याचे गृहमंत्री चिदंबरम आता बोलतायत. साहेब हे केव्हाच म्हणाले होते!..

बाळासाहेब दष्टे आहेत ते असे.

Thursday, 1 January 2009

लक्षात ठेवा २००९ सुरू झालेय!

सर्वप्रथम सर्वांना नविन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा! हे नविन वर्ष आपल्याला सुख-समृद्धी आणि भरभराटिचे जावो! हिच ''श्रीं'' चरणी प्रार्थना!

"एकच लक्ष्य'' हा ब्लॉग डिसेंबर २००७ ला सुरू केला. आदरणीय बाळासाहेबांनी केलेल्या "एकच लक्ष्य - विधानसभा २००९'' या आवाहनाचे वर्ष २००९ आज सुरू झालेले आहे. हे आपल्या सर्व शिवसैनिकांसाठी अतिशय महत्त्वाचे असे वर्ष असणार आहे. या वर्षाच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात विधानस भेच्या निवडणूका होतील असे म्हटले जात आहे, म्हणजेच आपल्याकडे जीव ओतून काम करण्याचे आता केवळ ७-८ महिनेच उरलेले आहेत. जर या वेळात आपण आणखी मेहनत केली तर विधानसभा जिंकणे सोपे जाईल यात वादच नाही. साहेबांनी सांगितल्यानुसार शिवसेनेची एकहाती सत्ता म्हणजेच किमान १४५ आमदार निवडून आले पाहिजेत हेच लक्ष्य आपले सर्वांचे आहे आणि मा. उद्धवसाहेब यांच्या गरूडभरारीने हे लक्ष्य निश्चित जवळ येत आहे अशी खात्री वाटते.

तत्पूर्वी अतिशय महत्त्वाची अशा लोकसभेच्या निवडणूकाही काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. मागच्या साडेचार पेक्षा जास्त वर्षात काँग्रेसप्रणीत ''युपीए'' सरकारने देशाचे अक्षरशः वाटोळे लावण्याचे एककलमी कार्यक्रम हाती घेतलाय असेच वाटते. मनमोहनसिंग सारखा अर्थतज्ञ या देशाचा पंतप्रधान असूनही या सरकारला अर्थच नसल्यासारखे वाटते. सच्चर समितीच्या माध्यमातून असो किंवा ऑक्टोबर २००६ रोजी अफजलगुरूला सुप्रिम कोर्टाने सुनावलेली फाशी रद्द करण्याचे प्रयत्न असो मुस्लिम मतांचे राजकारण करण्यात या केंद्रसरकारने धन्यता मानली आहे. देशात जागोजागी होणार्‍या बॉम्बस्फोटाने देश हादरला पण गृहमंत्री बदलण्यापलिकडे यांची मजल गेलीच नाही. आताही पाकिस्तान एवढ्या धमक्या देत असतानाही आम्हाला युद्ध करायचे नाही. का? तर मुसलमान दुखावला जाईल! असेच ना!

१९९५ ते १९९९ या साडेचार वर्षात शिवसेना-भाजपा सरकारने विकासाची दिशा महाराष्ट्राला दाखवली. त्याचीच पुनरावृत्ती आता झाल्यास महाराष्ट्र पुन्हा नंबर एक वर येईल यात तिळमात्र शंका नाही. मुंबईत ५५ उड्डाणपुल, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे, साडेचार वर्षे जिवनावश्यक वस्तूंचे स्थिर भाव, कायदा आणि सुव्यवस्था तसेच स्थानिक आमदारांनी त्यांच्या विभागात चालविलेली धडाकेबाज कामे अश्या बर्‍याचशा गोष्टींमुळे युती सरकार ओळखले गेले. पण त्यानंतर महाराष्ट्रात आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतील लोक एक मेगावॅट निर्माण न करताही मोफत विजेची अश्वासने देऊन निवडणूका जिंकल्या खर्‍या पण झाले काय? गेले आठ वर्ष महाराष्ट्र अंधारात बुडाला आहे, शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत गेला, कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला, विकासकामांना खीळ बसली तरीही मंत्र्यांची पोटांचा घेर वाढलेलाच!

मराठीच्या अस्मितेच्या नावाने आता बोंबा मारणारे एवढे वर्षे राजकारणात असूनही कुठे होते हा मराठी माणसाचा प्रश्न आहे. शिवसेना सत्तेत असताना सत्तेचा स्वार्थसाठी वापर करून वरून शिवसेनेच्या नावाने बोंबाबोंब करून मराठी माणसाला भडकविण्याचे कामच या लोकांनी हाती घेतले आहे. परंतु मराठी माणसाला हे पक्के माहित आहे कि जर शिवसेना नसती तर आज मुंबईत मराठी माणूस ताठ मानेने जगणे केवळ मुश्किल होते. मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र आहे का असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा शिवसेना मराठी माणूस सर्वच क्षेत्रात पुढे कसा येईल याचा विचार करत होती. मराठी माणसाला मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर्‍या मिळत नसताना आंदोलने करून तिथे मराठी माणूस उभा राहिला. भारतीय कामगार सेना, स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून नोकर्‍यांमध्ये मराठी माणसावर होणार्‍या अत्याचाराला वाचा फोडून त्यांचे हक्क मिळवून दिले. ''वडापाव''च्या माध्यमातून रोजगार साखळी निर्माण केली त्यातून बर्‍याच मराठी कुटूंबांना आधार मिळाला. एवढे करूनही कोणी शिवसेनेवर आरोप करत असेल तर त्यासाठी मराठी माणसानेच शिवसेनेच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. शिवसेनेच्या नावाने पैसा कमावून कोणी मिल घेतल्या कोणी हॉटेल्स, पेट्रोल पंप घेतले आणि आणखी हाव सुटली तेव्हा बाहेर पडले.

मराठी माणसाची मते फोडून महाराष्ट्रात मराठी माणसाचे सरकार येऊ नये यासाठी बरेच प्रयत्न महाराष्ट्र बनल्यापासूनच केले गेले आहेत आणि करत आहेत. आताचेही बेगडी मराठीप्रेमी मुंबई महानगरपालिकेवरील मराठी माणसाचा, शिवसेनेचा भगवा खाली खेचण्यासाठी काँग्रसी भैय्यासाठी (विरोधीपक्ष नेता राजहंस सिंग) थुंकी झेलायला तयार आहेत. एका तोंडाने मराठीच्या बाता करायच्या दुसर्‍या बाजूने मराठीच्या बोडक्यावर बसवण्यासाठी (किंवा सत्तेच्या लालसेपोटी म्हणू या) काँग्रेसी लांडग्यांना मदत करायची अशी ढोलकी बडवण्याचे एकंदर काम सुरू आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला काम करायचे आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली कामे पोहचवून, लोकांची कामे करून शिवसेनेला येत्या विधानसभेत किमान १४५ जागांवर विजयी करण्यासाठी आवाहन करायचेय. शिवसेनेचा फगवा फडकल्यास मराठी माणसाचे भले होईलच परंतु विकास कामांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला देशातील एक नंबरचे राज्य बनवायचे आहे.

"मराठी माणसा आपले मत शिवसेनेलाच दे तरच तुझ्या मताची किंमत होईल अन्यथा तेच तुझे मत महाराष्ट्राला पर्यायाने तुला अंधाराच्या खाईत घालायला कारणीभूत ठरेल एवढे लक्षात ठेव. हे वर्ष महाराष्ट्रासाठीही भरभराटीचे जाईल अशी आशा बाळगून या. विचार कर पुरता पक्का! शिवसेना विरोधकांना दे धक्का!''

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

Monday, 29 December 2008

पाकिस्तानी शाळांमधून शिकवला जाणारा इतिहास.

आरिफ मोहम्मद खान यानी लिहिलेले हे लेख छापयची टाइम्स ऑफ़ इंडिया ला २७ दिसम्बर २००८ च्या वर्त्तमानपत्रात छाप बुद्धि झाली म्हणजे अप्रुप म्हणायला हवे . जोपर्यंत बहुसंख्या सामान्य हिन्दू मरत होते तेंव्हाची हिन्दू नेस्तनाबूत करण्याचे विचार उच्चभ्रू , परकीय नागारिकांवर हल्ले झाले तेंव्हा अचानक बदलून गेले. गाढवाच्या तोंडी गीता आली. जे इतके दिवस हिंदुत्ववाद्यांना चुकीचे म्हणत होते त्याना अचानक साक्षात्कार झाला म्हणायचे.

ढोंगी बुद्धिजीवी आणि हिन्दुना अक्कल शिकवणारे, वागणूकीचे धडे देणारे आणि पाकिस्तानात भारता बद्दल खुप चांगली भावना आहे म्हाणणारे यांना ही चपराक आहे. पाकिस्तानात शाळांमधे असा इतिहास शिकवला जातो की ज्या मुले लहान वया पासुनाच "धार्मिक आधारावर" असमानता आणि द्वेष याची शिकवण मिळत राहते. १९७७ पासून पकिस्तान मधे असणारी शाला मधील पुस्तकात भारता बद्दल आणि विशेषत:हिंदूं बद्दल द्वेष शिकवला जातो.

पकिस्तान शिक्षण आणि समाज शात्र या अनिवार्य (compulsory)विषयात इतिहासचा अपलाप करून मोडून तोडून कशी मने आणि विचार घडवले जातात त्याचे हे उदहारण आहे.

इयत्ता ६ वि च्या पुस्तकाच्या प्रस्तावानेतच पाकिस्तानी शिक्षण पद्धतीच्या धेया बद्दल सांगितले गेले आहे ."सामजिक अभ्यास या विषयाला पाकिस्तानी शैक्षणिक धोराणात विशेष महत्त्व दिले गेले आहे कारण सामाजिक समानते ची मूलभूत विचारधारणा तिचा स्वीकार आणि प्रत्यक्षत अमलबजावणी या आधार बळकट होवून व्यक्तिमत्व विकास व्हावा." "सामाजिक एकात्मता " म्हणले आहे राष्ट्रीय एकात्मता " नव्हे.

इयत्ता ५ वि चे पुस्तकात आहे....की हिन्दुनी ब्रिटिशांना त्यांची सत्ता भारतात प्रस्थापितसाठी मदत केली. "ब्रिटिशांना हिंदुस्थानात सत्ता प्रस्थापित करायची होती म्हणुन म्हणुन त्यानी हिन्दुना सामिल करून घेतले आणि हिन्दूना त्याना मदत करण्यात अतिशय आनंद होत होता.ब्रिटिश एक बाजूला संपूर्ण उपखंडात सत्ता प्रस्थापित करून लूट करत होते तर दुसरीकडे हिन्दुन्शी हात मिळवून मुसलमानांना दाबुन टाकत होते."

इयत्ता ८ वि च्या पुस्तकात लिहिले आहे.."मुस्लिम संतांच्या शिकवणीतुन हिंदूंच्या कित्येक अंधश्रद्धा दूर झाल्या आणि वाईट प्रथा बंद झाल्या आणि अश्या प्रकार जुनाट हिन्दू धर्माचा शेवट झाला."

भारत -पाक युद्धा बद्दल : ही पुस्तके खुलेपणाने "जिहाद "आणि "शहादत" यांचा पुरस्कार करतात आणि त्यांचे विस्तृत वर्णन करतात आणि मुलांना "मुजाहिद" बनवून भारता बरोबर कोणतेही संबंध, भावी मैत्री ना ठेवण्याबद्दल सांगतात .


इयत्ता ५ वि चे पुस्तक म्हणते."१९६५ साली पाकिस्तानी सैन्याने भारताचा बराच भूभाग जिंकुन घेतला होता आणि जेव्हा ते हरु लागले तेंव्हा त्यानी यूनो मधे धाव घेतली आणि युद्ध बंदी आनावली. १९६५ नंतर पूर्व पाकिस्तानातीलआणि आपल्या पासून पूर्व पकिस्तान तोडून टाकण्यात आला.म्हणुन आपणा सर्वानी दुश्मन शी लढण्या साठी सैनि हिन्दू नी तिथल्या लोकाना पश्चिम पाकिस्तान तिल लोकंविरुद्ध भाडकवुन अखेरीस दिसम्बर १९७१ मधे पूर्व पाकिस्तानात कब्जा मिलावाला.की शिक्षण घेतले पाहिजे."

**************************************
हा लेख ऑर्कुटवरील एका मित्रांने पोस्ट केलेल्या लेखाची प्रत आहे.

Friday, 26 December 2008

२६ नोव्हेंबर - शिवसैनिकांचे योगदान!

मुंबईत गेल्या महिन्याच्या २६ नोव्हेंबर ला इस्लामी आतंकवाद्यांनी धुमाकुळ घातला होता. कुलाब्याच्या नरिमन हाऊस मध्ये जेव्हा गोळीबार सुरू झाला त्यावेळेस तिथेच असणारे शिवसेना शाखाप्रमुख श्री. विजय सुर्वे यांनी त्यावेळी आपल्या शिवसैनिकांना घेऊन निशस्त्र असूनही पोलिस येईपर्यंत आतंकवाद्यांशी निडरपणे लढा दिला. यात दुर्दैवाने तरूण शिवसेना गटप्रमुख हरिश गोयल यांचा गोळी लागून मृत्यु झाला.

दि. २५ डिसेंबरच्या सामनामध्ये याबद्दल एक लेख आलेला आहे. आपण तो इथे क्लिक करून वाचू शकता.

शिवसैनिकांच्या या कामगिरी बद्दल इथे आपल्या प्रतिक्रिया कळवा

Wednesday, 24 December 2008

संघर्ष करा! महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणा!!

"संघर्षाचा काळ कधीच संपत नसतो. प्रसंगानुसार त्याकडे पहावं लागतं. किती झालं तरी, दारूगोळा उगीच फुकट कशाला घालवायचा याचाही विचार करावा लागतो. मी तर सतत संघर्षच केला. संघर्षातून ही आज दिसतेय ती शिवसेना उभी राहिली. संघर्षातूनच ती आणखी पुढे जाईल."

"आपल्या शिवसेनेवर निष्ठा आहेत, जिद्द आहे. ती महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी हिमतीने वापरा. कडवटपणाने वापरा. त्यात तुम्ही कुठेही कमी पडणार नाही याची मला स्वत:ला खात्री आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आणायची म्हणजे आणायचीच. त्या निष्ठेने आजपासून कामाला लागा. अशी मी आपणास नम्र विनंती करीत आहे."

साहेबांनी आज आपणा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती केलेली आहे ती आपण सर्वशक्तीनिशी महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी वापरायची आहे.

साहेबांच्या मुलाखतीचा आजचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

एकच लक्ष्य! विधानसभा २००८