
१९ जुन १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य आणि हक्कासाठी लढणारी संघटना, शिवसेनेची स्थापना प्रबोधनकारांच्या आशिर्वादाने झाली. शिवसेनेची सर्व सुत्रे शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेबांनी आपल्याच हाती घेतली. शिवसेनेची सभासद नोंदणी सुरु झाली. त्यावेळी 'रविवारची जत्रा' मध्ये एक ओळ यायची 'शिवसेनेचे सभासद व्हा!' दर आठवड्याला हजारो लोक शिवसेनेचे सभासद होत होते. सर्व सभासदांना मार्गदर्शन करण्याचे ठरले.
सभा कुठे घ्यावी याची चर्चा सुरु झाली. अनेक सभासदांचे म्हणणे होते कुठेतरी एखाद्या सभागृहात सभा घ्यावी. पण साहेबांना जबरदस्त आत्मविश्वास होता त्यांनी सांगितले कि, ' पहिली जाहिर सभा शिवाजी पार्कलाच होईल.'
सभेची तयारी सुरु झाली. सर्वांना शंका वाटत होती सभा यशस्वी होईल कि नाही. सभेची तारीख विजयादशमीची ३० ऑक्टोबर १९६६ ठरली. त्यानंतर सर्वांना माहितच आहे एक झंझावत आजपर्यंत महाराष्ट्रात घोंघावतच आहे.
तीन वर्षापूर्वी दोन फुसक्या बारांनी शिवसेनेला हादरे देण्याचा प्रयत्न केला. स्वकियांनी केलेल्या गद्दारीचा साहेबांना जरूर प्रचंड दु:ख झाले. प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये एकच कोलाहल सुरू झाला 'आता शिवसेना संपली'. पण मराठी माणसाच्या काही वेगळेच होते. त्याला शिवसेना मनापासून हवी होती म्हणूनच राजकाराणात नविन असूनही माननिय कार्याध्यक्ष श्री. उद्धवजींनी या काळात शिवसेनेचे खंबीर नेतृत्व करून पुन्हा एकदा शिवसेनेला तेच वैभव प्राप्त करून दिले.
पक्षातून गेलेल्या गद्दारांना केवळ एकाच वर्षात त्यांची लायकी दाखवून दिली. आज शिवसेना जबरदस्त ताकदिनिशी वाटचाल करत आहे. श्रीवर्धन पोटनिवडणूकीपासून ते परवाच्या ठाणे लोकसभा पोटनिवडणूकीपर्यंत शिवसेनेची विजयी घौडदौड मा. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. नविन नविन संघटना, लोक आणि तरूण शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत. मंत्रालयावर जशी गर्दी असते किंबहुना तशीच गर्दी आज मातोश्री आणि शिवसेना भवनवर दिसते. शेतकरी मेळावे आणि इतर योजनाबद्ध आंदोलनामुळे जनतेमध्ये उद्धवजींबद्दल प्रचंड विश्वास आहे. तोच विश्वास शिवसेनेला विधानसभेत नेईल हेच संकेत आज दिसत आहेत.
शिवसेनेच्या ४२व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा!
जय हिंद! जय महाराष्ट्र!!