कालच ऑर्कुटवरील शिवसेना कम्युनिटीच्या पाठपुराव्यामुळे शिवाजी महाराज तसेच मराठा साम्राज्याचा उल्लेख नसल्याबद्दलचा लेख मटा मध्ये प्रकाशित झाला. केंद्र सरकारच्या www.india.gov.in या संकेतस्थळावर know India अंतर्गत Medieval History सदरात मुघल, शिख, विजयनगर आणि इतर साम्राज्याची दखल घेतली गेली असतानाच महाराष्ट्राचे आराध्यदैवत छ्त्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याची उल्लेखही टाळला आहे.
अशाच प्रकारचा काहिसा प्रकार आज पहायला मिळाला. नेटवर सर्फिंग करत असताना सहजच 'राजाशिवाजी डॉट कॉम' या संकेतस्थळावर भेट दिली असता एकदम धक्काच बसला.ब्राउजर मध्ये www.rajashivaji.com टाईप केले असता हे संकेतस्थळ दुसर्याच एका संकेतस्थळाला जोडले गेले असल्याचे समजले. शिवाजी महाराजांबद्दल माहिती घेण्यासाठी येणार्यांची अशी निराशा करण्यामागे काय हेतू असेल?
''राजाशिवाजी डॉट कॉम' चे गेल्यावर्षी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे फोटोंचे प्रदर्शन टि.व्ही. वर पाहिले. त्याचप्रसंगी 'राजाशिवाजी डॉट कॉम' चे संचालक मिलींद वेर्लेकर यांनी या संकेतस्थळावर नेटवरील इतर कोणत्याही संकेतस्थळापेक्षा जास्त महाराजांच्या गडकिल्ल्यांचे फोटो टाकून एक जागतिकविक्रम होणार असल्याची माहिती दिल्याचेही आठवते.
'राजाशिवाजी डॉट कॉम' हे संकेतस्थळ शिवाजी महाराजांशी संबंधीत आहे. भले ते खाजगी संकेतस्थळ असेल पण जेव्हा शिवाजी महाराजांचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येक मराठी माणसाच्याभावनांचाही प्रश्न येतो. संचालकांना हे नक्किच माहित असले पाहिजे. शिवाजी महाराजांवर जर संकेतस्थळ बनविले असेल तर त्याची जबाबदारीही समजायला हवी. जरकाही अडचणी असतील तर इतर संकेतस्थळाला जोडण्यापेक्षा एखादी सुचना लिहिली असती तर खुपच चांगले झाले असते.
शिवाजी महाराजांशी संबंधीत या दोन घटना दुर्दैवी आहेत. एका ठिकाणी केंद्र सरकारचा हलगर्जीपणा. तर दुसरीकडे एक मराठी माणूस जो शिवाजी महाराजांना आराध्यदैवत मानतो आणि अशा चुका करतो....
No comments:
Post a Comment