शिवसेनेच्या इंटरनेटवरील ऑर्कुट कम्युनिटीच्या सभासदांची बैठक काल शिवाजी पार्क येथे झाली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इंटरनेटच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी हि पहिली बैठक झाली. इंटरनेटवर हजारो शिवसैनिक ऑर्कुटसारख्या वेबसाईटवर आपली मते रोजच मांडत असतात. परंतु हि मते आणि त्यांची भुमिका फक्त इंटरनेटवरच मर्यादित न राहता प्रत्यक्ष काम कसे करता येईल तसेच आजच्या इंटरनेट्च्या युगात शिवसेनेच्या कामाला आधुनिक स्वरूपात लोकांसमोर मांडून शिवसेनेची भूमिका स्पष्ट करता यावीयासाठी अशा प्रकारच्या सभा पुढेही घेण्यात येतील.
या बैठकीत सभासदांनी काही मुद्द्यांवर चर्चा करून पुढील योजना आखल्या आहेत त्या अशा:
१. पुढील बैठकिला जास्तीत जास्त शिवसैनिकांना एकत्र आणणे. (किमान २५ तरी)
२. पुढची बैठक कुठेतरी छोट्याशा सभागॄह किंवा शाळेच्या वर्गात घेणे.
३. जास्तीत जास्त शिवसैनिकांना सोबत घेऊन उद्धवसाहेबांना याबद्दल माहीती देऊन मार्गदर्शन घेणे.
४. भा.वि.से. चे अध्यक्ष किंवा इंटरनेटवर कार्यरत असणार्या नेत्याशी संलग्न राहणे. (किंवा उद्धवसाहेब देतील तो नेता)
५. इंटरनेटच्या माध्यमातून सामाजिक कामे करणे.
६. एखादी वेबसाईट तयार करून त्यावर इंटरनेट शिवसेनेची कामे, बैठकांची माहिती देणे. तसेच फोरम बनविणे किंवा http://shivsena.freeforums.org वर प्रतिक्रिया देणे.
कालच्या बैठकिला उपस्थित असलेले शिवसैनिक आणि त्यांचे फोन नंबर.
१. विनोद ९३२१९२६२४४/९८२०६०९३१६-चुनाभत्ती.
२. विवेक ९८३३६२५८५२-वाशी.
३. अभिषेक ९८३३६७४९८३-कुर्ला.
४. नागनाथ टी.गजरे ९८९२८३६४१५-ऐरोली.
५. प्रतीक ९८२१७१००७३-विक्रोली.
६. सिद्ध भिडे ९८२०८१७३९७-पनवेल.
७. अमित चिविलकर ९९६९८१३२३१-मालाड.
टिप : पुढल्या सभेला उपस्थित राहणार्या शिवसैनिकांनी वरील कोणालाही फोन करून माहिती घेऊ शकाल.
No comments:
Post a Comment