Monday, 3 November 2008
हिंदुंनो साध्वी प्रज्ञाच्या पाठीशी उभे रहा - साहेब
राष्ट्राच्या मुळावर उठणा-या कुठल्याही दहशतवादाला आम्ही कधीच पाठिंबा दिलेला नाही. किंबहुना, अशा दहशतवादाचा निषेधच व्हायला हवं. पण मुस्लिम धर्मांधांना खुश करण्यासाठी होतकरू तरुणांना ' हिंदू दहशतवादी ' ठरवण्याचा उफराटेपणा काँग्रेसनं चालवला आहे. अशावेळी साध्वी प्रज्ञा, समीर कुलकर्णी आणि मेजर रमेश उपाध्याय यांच्या पाठीशी हिंदू समाजानं खंबीरपणे उभं राहायला हवं, असं आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलंय.
हिंदूंनी नामर्द आणि गांडू बनून जगावं आणि इस्लामी आक्रमकांनी आमच्या पिढ्याच्या पिढ्या नष्ट कराव्यात हेच काँग्रेसवाल्याचं धोरण असेल तर या तिघांचं काय चुकलं ? मुसलमानी मतांसाठी येथील राज्यकर्त्यांनी जे कृपाछत्र धर्मांधांवर धरलं आहे, ते दूर झालं तर हिंदूही आपल्या आईच्या दुधाची ताकद दाखवून देईल. देशातील बेगडी निधर्मीवाद्यांना अफझल गुरू प्यारा असेल तर आम्ही आक्रमक हिंदू तरुणांवर प्रेम का करू नये ?, अशी पाठराखण बाळासाहेबांनी ' सामना ' च्या अग्रलेखातून केली आहे.
दरम्यान, या तिघांना कायदेशीर लढाई लढण्यासाठी शिवसेनेतर्फे मदत केली जाईल, वकील दिला जाईल, अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा हायजॅक केला असताना, आता शिवसेनेनं पुन्हा आक्रमक हिंदुत्वाची कास धरली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसनं साध्वी प्रज्ञा सिंग, समीर कुलकर्णी आणि निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांना अटक केली आहे. त्यांच्या नार्को टेस्टची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेनं आपल्या मुखपत्रातून या त्रयीला पाठिंबा जाहीर केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. पण बाळासाहेबांनी अग्रलेखातून मुस्लिमविरोधी परखड मतं मांडली आहेत.
मालेगाव स्फोटांप्रकरणी ज्या अटका होत आहेत ते सगळे सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोक आहेत. पण त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांना ' हिंदू दहशतवादी ' ठरवलं जातंय. एटीएसवाल्यांच्या म्हणण्यानुसार, या स्फोटांमागे खरोखरच हिंदू असतील तर त्यांच्यावर तशी वेळ का आली, याचा विचारही करायला हवा, असं बाळासाहेबांनी नमूद केलंय. आज हिंदू सर्वत्र मार खातोय तो सरकारी कृपेनं. हिंदू जरा कुठे उसळी मारू लागला की त्याला दाबता येईल तेवढं दाबायचं आणि मुस्लिम धर्मांधांना खुश करायचं. त्यांना जणू संदेशच द्यायचा की, ' बघा बघा, हिंदूंना त्यांच्याच देशात आम्ही कसे भरडतोय आणि चिरडतोय. उद्या निवडणुका आल्या म्हणजे विसरू नका. ' साध्वी प्रज्ञा, कुलकर्णी आणि मेजर उपाध्याय यांना अटक करण्यामागे नेमकं हेच कारण आहे, असा आरोपही त्यांनी केलाय.
अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे, हे वाक्य वारंवार ऐकायला मिळतं. पण हिंदूंचे रक्षण करू आणि बांगलादेशी किंवा धर्मांध पाकप्रेमी मुसलमानांना धडा शिकवू, असं कुणी काँग्रेसवाला बोलल्याचं आठवतंय का ? , असा सवाल बाळासाहेबांनी केलाय। सरकार हिंदूंच्या मागे नसेल तर, होतकरू हिंदूंच्या मागे आपणच उभं राहायला हवं आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असंही त्यांनी जाहीर केलंय.
साभार - मटा. ऑनलाईन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment