आजच्या सामना मधील अग्रलेख वाचला आणि कुठेतरी साहेबांनी प्रत्येकाच्या मनातील भावनाच बोलून दाखविल्यासारखे झाले. हा लेख आपण इथे क्लिक करूनही वाचू शकता. आपल्या कडच्या इलेक्ट्रॉनिक मिडियाला खरे तर इलेक्ट्रिक शॉक ट्रिटमेंट देण्याची गरज आहे. नको तिथे तोंड उघडणे हेच यांचे धंदे बनले आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ यांना म्हटले जाते. पण जिथे लोकशाहीचेच कुणाला पडलेले नाही, मग हा स्तंभही आपले काम विसरला. वास्तविक आज बरेचसे मिडियावाले हे राजकिय पक्षांना विकले गेल्यासारखेच वागत आहेत. ज्या पक्षाची हे बाजू घेतात त्याच्या विरोधकाला नेस्तनाबूत करणे हे एकमेव ध्येय्य यांचे ठरलेले आहे. सर्व सामान्यांनी कोणाचे ऐकावे हेच एक मोठे कोडे बनून राहिले आहे.
फक्त एकच उदाहरण मला द्यावेसे वाटते, कि काही दिवसांपूर्वी जेव्हा राज ठाकरे यांचे अटकनाट्य सुरू होते तेव्हा स्टार वाहिनीच्या स्टार माझा आणि स्टार न्यूज या दोन्ही वाहिन्यांवर परस्पर विरोधी बातम्या दाखविल्या जाताना असे वाटले की काय बाजार मांडला आहे या लोकांनी. राज ठाकरे यांचे दांडा (माइक) गरम होवेस्तोवर स्तुती करण्यात स्टार माझा सगळ्यांच्या १०० पाऊल पुढेच असतो. पण त्याच मालकाच्या स्टार न्यूज वर राज ठाकरे यांना गुंडा म्हटले जात होते. आता प्रेक्षकांनीच विचार करा कि यांना काय म्हणावे. एकच मालक आपला धंदा वाढावा, खुप प्रेक्षक मिळावा म्हणून असल्या मुद्द्यावर स्वताचे गल्ले भरून घेतो पण आमचा मराठी माणूस हा विचार करत नाही कि हे चॅनेलवाले आपलीच कशी वाट लावतात.
साहेबांनी आजच्या अग्रलेखामध्ये उल्लेख केलाच आहे कि, यात मराठी मालकांचे चॅनेल किती आहेत? मग हे पत्रकार लोक आपल्या मालकाला हव्या तशा बातम्या बनवतात त्या सुद्धा प्रेक्षकांना उल्लू बनवण्यासाठीच ना! तसेच आपण ज्या हिंदी न्यूज चॅनेलवर आगडपाखड करतो त्याचे पत्रकारही बरेचसे मराठीच असतात ना?मग विचार करा!
ह्या मिडिया वाल्यांबद्दल न बोल्लेले बरे
ReplyDeleteह्यांना अजुन येते काय ?
जिथून पैसे मिळाले तितली प्रसिद्धि!तुम्हाला काय वाटले ?राज ठाकरे हा असाच प्रसिद्ध झाला?मिडिया ला पैसे द्या,एकी कधे उत्तर भार्तायांविरोधात बोलायचे,दूसरी कधे उत्तर भारतीय मिडियाचा मालाकान्नाच पैसे देऊन प्रसिद्धि चे फाटे फोडायचे
कांग्रेस ने ही हेच केले!
आता कालची तीन-रंगी माकड ही तेच करतायेत!
शेवटी ह्यांचा मुळ च मुद्दा म्हणजे आपण मजबूत कमवायचे आणि खोटी आश्वासन देऊन लोकांना फसवायचे!
शिवसेनेची भूमिका स्पष्ट होती,आहे आणि राहणार
दुसर्यांच्या भूमिका गेल्या तेल लावत!!!
कारण निषेध आम्ही ठेवत नसतो अशा फेकड्यान्चा
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा!
जय हिंद
जय महाराष्ट्र
-एक भगवा समर्थकह्या मिडिया वाल्यांबद्दल न बोल्लेले बरे
ह्यांना अजुन येते काय ?
जिथून पैसे मिळाले तितली प्रसिद्धि!तुम्हाला काय वाटले ?राज ठाकरे हा असाच प्रसिद्ध झाला?मिडिया ला पैसे द्या,एकी कधे उत्तर भार्तायांविरोधात बोलायचे,दूसरी कधे उत्तर भारतीय मिडियाचा मालाकान्नाच पैसे देऊन प्रसिद्धि चे फाटे फोडायचे
कांग्रेस ने ही हेच केले!
आता कालची तीन-रंगी माकड ही तेच करतायेत!
शेवटी ह्यांचा मुळ च मुद्दा म्हणजे आपण मजबूत कमवायचे आणि खोटी आश्वासन देऊन लोकांना फसवायचे!
शिवसेनेची भूमिका स्पष्ट होती,आहे आणि राहणार
दुसर्यांच्या भूमिका गेल्या तेल लावत!!!
कारण निषेध आम्ही ठेवत नसतो अशा फेकड्यान्चा
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा!
जय हिंद
जय महाराष्ट्र
-एक भगवा समर्थक