Wednesday, 8 April 2009

कॉंग्रेस सरकार म्हणजे अराजक! - उद्धवसाहेब

मुंबईतील पवित्र शिवतीर्थावर नारळ वाढवून शिवसेना भाजप युतीच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आणि त्यापाठोपाठ शिवसेनेचा भगवा झंझावत पहिल्या प्रथम मराठवाड्यात येऊन दाखल झाला. परभणीचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार गणेश दुधगावकर यांच्या प्रचारार्थ स्टेडीयम मैदानावर उद्धवसाहेबांची अतिविराट सभा झाली.

उद्धवसाहेब म्हणाले, " नांदेडहून निघालो तेव्हाच पावसाची रिपरिप सुरू होती. पण मी मात्र मनातल्या मनात प्रार्थना केली. एकवेळ या पावसामुळे माझी सभा नाही झाली तरी चालेल, पण तहानेने व्याकुळलेल्या माझ्या जनतेला पाणी तरी मिळेल. त्यासाठी तरी हा पाऊस पडू देत. सभा झाली नसती तरी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी लोटलेला हा भगवा जनसागर शिवसेनेलाच मतदान करणार याची मला ठाम खात्री आहे. मी मनोरंजनासाठी सभा घेत नाही आहे. माझ्या महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्याला मी मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. हा निर्धार करूनच यावेळी घरातून बाहेर पडलो आहे."

"कॉंग्रेसचे सरकार म्हणजे अराजक! देशात आता पुन्हा हे खिचडी सरकार नकोय. कुठलेच निर्णय न घेणार नाकर्त्या कॉंग्रेसच सरकार जर पुन्हा आलं तर या देशात अराजकच निर्माण होईल." असा इशारा यावेळी उद्धवसाहेबांनी दिला. " शेतीतलं तुम्हाला कळत ना! मग शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये देशात महाराष्ट्रच नंबर एक कसा?" असा भेदक सवाल कृषीमंत्र्यांना केला.
=============================================================
आम्ही म्हणे देशद्रोही...
कसाबला वकिल मिळू नये हा आमचा देशद्रोहीपणा ठरतो. गृहमंत्री जयंत पाटीलच तसे म्हणतात आणि मृत्यूला कवटाळले पण कसाबला सोडले नाही, त्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या शिवसैनिक भावाला अटक करून डांबले जाते. हे असे असेल तर पवारांनी सांगावे कोणाचे हात बरबटले आहेत ते.
=============================================================
विलासराव काठोड्याला गेले नाहीत
बीड जिल्ह्यात काठोडा येथे शेतकरी वस्तीवर भयंकर दरोडा पडला. नराधम दरोडेखोरांनी महिलांवरही अत्याचार केले. विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. पण ते मात्र काठोड्याला गेले नाहीत. कारण रामगोपाळ वर्माला त्यावेळी वेळ नव्हता किंवा या विषयावर पिक्चर बनू शकत नव्हता.
=============================================================

1 comment:

  1. chan bolale uddhavsaheb... kirtikar sahebnchya sitela bhet dya

    www.gajanankirtikar.com

    ReplyDelete