Monday, 13 April 2009

शेतकऱ्यांचा दावा आहे, उद्धव ठाकरे छावा आहे!

शिवसेनेचा ढाण्या वाघ प्रचारात उतरल्याबरोबर लगेचच विरोधकांची पळापळ सुरू झालेली आहे. शरद पवार, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, सोनियाबाई, परमपुज्य पंतप्रधान मनमोहन सिंग या सगळ्यांचा पर्दाफाश मा. उद्धवसाहेबांनी केलेला आहे. उद्धवसाहेबांच्या सवालांचे जवाब देताना या आघाडी वाल्यांची पळती भूई थोडी झालेली आहे.

कालच्या दिवसातील शिवसेना कार्यकारीप्रमुख मा. उद्धवजीनी केलेली महत्वाची वक्तव्ये पुढीलप्रमाणे:

कुही
प्रियंका म्हणते, मी कुठे म्हातारी दिसते? पण माझ्या देशातील जनता म्हातारी दिसते आहे, ते का? कारण जनतेच्या रक्ताचे शोषण करून कॉंग्रेसने आपले तारूण्य टिकून ठेवले आहे.

बारशिवणी
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बायका-मुलींनीही जीवन संपवले. ते तरूण नव्हते काय? या नेत्यांच्या म्हातारपण आणि तरूणपणापेक्षा आम्हाला दिसते ते आया-बहिणींचे दु:ख.

सावनेर
पाणी मागणाऱ्या जनतेवर कॉंग्रेसने लाठ्या चालवल्या. खेड्यापाड्यातील लोकांच्या पिढ्या बरबाद झाल्या. तुमच्या नशिबावर असा वरवंटा फिरवणाऱ्या कॉंग्रेसवर आतातरी वरवंटा फिरवा.

नरखेड
जातपात आम्ही मानत नाही. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्नेही होते. हेच बाळकडू आम्हाला मिळाले. चला शिवशक्ती-भिमशक्ती एक करूया.

कोंडाळी
मनमोहन नावाचे दुबळे बुवा पुन्हा पंतप्रधान म्हणून डोक्यावर घेऊ नका. दळभद्री कॉंग्रेसला याच मातीत गाडून टाका. नाहीतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे तडफडणारे आत्मे तुम्हाला जाब विचारतील.

तिवसा
शास्त्रीजींनी ’जय जवान...जय किसान’ नारा दिला होता. पण दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान मरतो आहे, तर किसान आत्महत्या करतो आहे. त्यांची कुर्बानी याद करा आणि नाकर्त्या कॉंग्रेसचा फैसला करा.

अचलपूर
तुम्ही ज्यांना दिल्लीत पाठवले, ते सोनियाची लाचारी करत बसले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत महाराष्ट्र नंबर वन. लोडशेडींग पण इकडेच जास्त. हे सगळे आपले, तिकडे दिल्लीत जाऊन झोपले.

No comments:

Post a Comment