शिवसेनेचे कार्यकारीप्रमुख माननीय श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी सर्व विजयी खासदारांबरोबर पत्रकार परिषद घेतली. उद्धवसाहेबांनी सर्व यशस्वी खासदारांचे अभिनंदन केले आणि सर्व खासदारांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. ह्या वेळी शिवसेनेचे नेते व विरोधी पक्ष नेते श्री.रामदासभाई कदम, शिवसेनेचे नेते श्री. मनोहर जोशी सर, शिवसेना सचिव अनिलजी देसाई, खासदार श्री. संजय राऊतसाहेब, आमदार श्री.सुभाषजी देसाई व सौ.निलमताई गोरे आणि अनेक शिवसेनेचे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, जिल्हाप्रमुख, नगरसेवक, शाखाप्रमुख आणि गटप्रमुख उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत उद्धवसाहेब नेमके काय काय बोल्लेत हे पुढीलप्रमाणे...
उद्धवसाहेब म्हणाले कि मुंबई मध्ये शिवसेनेने असे काय कमी केले कि मुंबईकरांनी कॉंग्रेसला साथ दिली...पण आमचा मुंबईकरांवर विश्वास आहे. आगामी निवडणुकीत हा विश्वास फळाला येईल.
अपयशाने खचुन न जाता शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागण्याची गरज आहे असा संदेश उद्धवसाहेबांनी त्यांचा शिवसैनिकांना दिला.
ते पुढे म्हणाले कि कोणत्याही स्टार शिवाय आणि जनतेचे प्रश्न ह्या मुद्यांवर आम्ही निवडणुक लढवली.
उद्धवसाहेब पुढे म्हणाले कि मागच्या लोकसभेच्या वेळी पक्षामध्ये अमर, अकबर, ऍंथनी सर्व होते...तेव्हा महाराष्ट्रामध्ये सेनेच्या १२ जागा आल्या... आता हे अमर,अकबर,ऍंथनी निघुन गेले तरी सेनेला ११ जागा मिळाल्या.मुंबईची एक सिट कमी झाली.अर्थात ह्यात काय आनंदाची गोष्ट पण नाही आहे. अशाप्रकारे उद्धवसाहेबांनी राज ला जोरदार टोळा लगावला.
ते पुढे म्हणाले कि रामटेक जागा आम्ही थोडक्यात हरलो... धाराशिव मध्ये ही तेच झाले.ग्रामिण भागात शिवसेनेने चांगली कमाई केली असं ते म्हणाले.
उद्धवसाहेब म्हणाले कि निकाल हे निकाल असतात... त्यांचं खापर कोणावर फोडणं हे योग्य नाही. विधानसभेवर भगवा फडकणारच असा जोरदार आत्मविश्वास उद्धवसाहेबांनी दाखवला.
ते पुढे म्हणाले मुंबईकरांनी कॉंग्रेसवर विश्वास दाखवला ह्याचं मला आश्चर्य़ वाटते. २६/११ च्या हल्ल्यात शिवसैनिक मदतकार्य करत होते,तरी मुंबई कॉंग्रेसला कशी भुलली? असा प्रश्न त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे शत्रु अनेक आहेत पण शिवसेनेचा शत्रु क्रमांक एक हा कॉंग्रेस आहे असे उद्धवसाहेब बोलले.
डोळ्यदेखत भगवा खाली उतरणं यासारखं दुसरं दु:ख ते कोणतं? मतविभागणी होऊ नये ह्याची काळजी आम्ही आगामी निवडणुकीत घेऊ असे उद्धवसाहेबांनी पत्रकारांना सांगीतले.
पुढे ते म्हणाले खासदार विजयी झाले ते माझ्या मुळे नाही तर शिवसेनाप्रमुखांच्या आणि शिवसैनिकांच्या मेहनती मुळे झाले.
एका निवडणुकीवर दुसरया निवडणुकीचे निकाल अवलंबून नसतात असे ते म्हणाले.मागच्या लोकसभेत देखिल शिवसेनेचे फक्त मोहन रावले हे खासदार निवडुन आले.पण त्या नंतर विधानसभेवर अनेक सेनेचे आमदार निवडुन आले आणि महानगर पालिकेत पुन्हा सत्ता ही आली.
मनसेविषयी बोलताना उद्धवसाहेब म्हणाले...जी मराठी मतं विरोधकांच्या दिशेने गेली ती मतं परत येणार ह्याचा ठाम विश्वास आहे. पत्रकारांनी जेव्हा विचारले कि मनसेशी युती करणार का?...त्यावर उद्धवसाहेब म्हणाले कि शिवसेनाप्रमुखांनी त्यांचे मत सांगीतलेले आहे आणि त्यांचे प्रत्येक विचार,मतं आणि आदेश ह्याचे पालन करणे आमचे कर्तव्य आहे.जे शिवसेनाप्रमुख सांगतील आम्ही तेच करणार.शिवसेना प्रमुखांनी ठाम मत दिलेलं आहे..आता मला नाही वाटत कि कोणाच्या मनात काही शंका उरली असणार.जिथे आम्ही कमी पडलो ति उणीव आम्ही भरुन काढु असे उद्धवसाहेब पुढे म्हणाले.
’हमने दो ही मारा..पर सॉलिड मारा’ ह्यावर जेव्हा पत्रकाराने उद्धवसाहेबांना प्रतिक्रिया दिली कि कोणाला मारतायेत त्याचा विचार करा...शिवसेनेने मराठी माणसासाठी आपल्या स्वार्थाचा विचार कधीच केला नाही किव्हा मराठी माणसाचा स्वतासाठी कधीच उप्योग केला नाही....बाळासाहेबांच्या शिवसेनेला ठोसा मारणारा अजुन पर्यंत कोणी जन्मला आलेला नाही आणि भविष्यातही कोण जन्मला येऊ शकणार नाही असे ठणकाहुन उद्धवसाहेबांनी विरिधकांना बजावले.
उद्धवसाहेब पुढे म्हणाले कि ’पंतप्रधानपदावर मराठी माणुस बसु शकला नाही याचे नक्कीच दु:ख आहे पण जो मराठी माणुस तुम्हाला पंतप्रधानपदी हवा होता,त्याच्याबद्दल बिल्कुल दु:ख वाटत नाही’ असा जोरदार टोळा उद्धवसाहेबांनी शरद पवारांना लगावला.
परिषद आटपता उद्धवसाहेब म्हणाले कि मुंबई मध्ये माझं लक्ष्य कमी झालं हे खरंच आहे पण ग्रामीण भागात आमचा पाया मजबूत झाला.आतापासुन जोमाने कामाला लागा...विधानसभेवर भगवा नक्कीच फडकेल असा आदेश त्यांनी कार्यकरत्यांना दिला.
साभार : शिवसेना अपडेट्स
No comments:
Post a Comment