Sunday, 14 February 2010
पुन्हा एकदा आतंकवादी हल्ला, जनतेचे रक्षण कोण करणार?
काल पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाले. आपल्याच महाराष्ट्रातील पुण्यामध्ये हे स्फोट झाले आणि त्यात १० पेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले आणि जवळ जवळ ५० च्या आसपास लोक जखमी झालेत. मिडियामध्येही ही बातमी ’ब्रेकिंग न्यूज’ म्हणून दाखविली जात होती. पण याची आता सर्व देशवासियांना सवय झालेली आहे. हे काही हिंदुस्थानींसाठी नविन नाही. देशातील अनेक शहरांना असे अनेक हादरे बसले आहेत.
आपल्या देशात सरकार नावाचे बुजगावणे जे आहे ते मुळात सर्वसामान्यांसाठी नसून ते फक्त वाचाळ बडबड करणाऱ्या शाहरूख खान आणि पळपुट्या राहुलसाठी.
मागिल सात दिवस जे मुंबईने पाहिले त्याने प्रत्येक मुंबईकरांना धक्काच बसला आहे. शिवसेनाप्रमुखांनी केवळ राहुल गांधीला काळे झेंडे दाखवा सांगितले आणि मुख्यमंत्री आणि गृहविभाग जणू देशातील जनतेवर आतंकवादी हल्ला होणार असल्यासारखे पोलिसांचे मुंबईभर कडे उभे केले. त्यात अनेक शिवसैनिकांना अटका झाल्या, कुणाला मार खावे लागले, कुणावर बंदुका रोखल्या गेल्या.
मागचे चार दिवस तर मुख्यमंत्र्याने जो प्रकार केला त्याचा प्रत्येक नागरीकाने धिक्कार केला पाहिजे असाच होता. ज्या शाहरूख खानने पाकिस्तानी खेळाडूंना न घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली तसेच आपले पुर्वज पाकिस्तानी असल्याचे अभिमानाने सांगितले त्याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अक्षरश: जीव ओवाळून टाकायला तयार होते. हजारो शिवसैनिकांना अटक करून चित्रपट रिलीज करून मोठा विजय मिळवल्याच्या अविर्भावात वागत होते.
पण एवढे सगळे जर सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी यांनी केले असते तर जे काल १० लोक मारली गेली त्यांचे प्राण वाचले नसते का? जो गृहराज्यमंत्री राहुल गांधीच्या सुरक्षिततेसाठी त्याचे जोडे उचलण्याचे काम करतो त्याने त्याच्या मतदारसंघातील लोकांचे प्राण वाचावे यासाठी प्रयत्न करायला हवेत की नको? कॉंग्रेसवाले नको तिथे नको ते चाळे करतात आणि अशा आतंकवादी हल्ल्यात सर्वसामान्यांना मरण ओढवावे लागते.
मागे प्रज्ञा साध्वीच्या मागे करकरेंसहित सर्व पोलिसी बळ लावले आणि मुंबई आतंकवाद्यांसाठी आंदण देऊन टाकली. पुढे जे काही घडले तो आज इतिहास आहे. कसाबला एका वर्षाच्या आत सजा दिली जाईल असे म्हणणारे शासन अजूनही त्याचे लाड करण्यात मश्गुल आहे.
हे असेच होत राहणार अफजल गुरू, कसाब सारख्या आतंकवाद्यांचे असे लाड सुरूच राहतील कारण मारला जाणारा हा गांधी नसतो. म्हणून आता देशातील लोकांनीच प्रार्थना करावी प्रत्येकाला गांधी कुटूंबात जन्माला घाल म्हणजे कुणालाही आतंकवादी हल्ल्यात मरण येणार नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
sarkar srk chi rakshan karnyat lagli ahe. tari krupya apla rakshan swatah karun ghene!!
ReplyDeletesarkar srk chya rakshan kamat busy ahe. krupaya apli surkasha swatah karun ghaywe!!
ReplyDeleteकाल पुण्यात बोंब स्फोट झाले. तिथे लोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर फिल्म स्टार लोकांसाठी आयोजित केलेल्या पार्टीत मश्गुल होते..त्यानाही हि बातमी कळल्यावरहि ते तब्बल दीड तासाने बाहेर पडले. महाराष्ट्राचा हाच मुख्यमंत्री इथे शाहरुख खान चा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतो..त्या खानाला तसेच चित्रपट गृहांना २२००० पोलिसांचे सौंरक्षण देतो आणि त्या बाबतीत जरा हि हलगर्जी पणा तसेच वेळेचा अपव्यय करत नाही..तसेच राहुल गांधी या नेत्यासाठी उन्हात तहानभूक विसरून वाट पाहतो..तसेच गृह खात्याचे राज्य मंत्री बागवे साहेब जे ज्या जनतेमुळे आपले पद उपभोगत आहेत त्या जनतेचे जोडे उचलण्याचे सोडून एका राहुल गांधीचे जोडे उचलतात. हि लोकं मात्र जेंव्हा महाराष्ट्रावर खरी अतिरेक्यांची संकट येतात तेंव्हा मात्र ढूनगणात शेपूट घालतात. तेंव्हा हे लोक कुठल्यातरी समारंभाला उपस्थिती लावी तसे आरामात हजार होतात. जी निर्णय क्षमता, जो जोश आणि त्वेष त्यांनी शिवसैनिकांना अटक करण्यात घालवला तोच जोश हे पाकिस्तानी अतिरेक्यांच्या कारवायांपुढे कुठे जातो. गृहमंत्री आबा पाटलांच्या उपस्थितीत २६/११ प्रकार घडला व त्यानंतर हि आमची पोलीस यंत्रणा दक्ष आहे, आमची व्यवस्था चोख आहे अशी वल्गना करणाऱ्या आबांच्याच उपस्थितीत परत हा बॉम्बस्फोटाचा प्रकार घडलाच ना!!. हा शाहरुख खान ज्याला पाकिस्तानी खेलाडूंवरचा अन्याय दिसतो तो आता पुण्यातल्या बॉम्ब स्फोटातल्या जबाबदार असणार्या अतिरेक्यांच्या बाजूनेच लढणार का? सरकारलाही माझा हाच सवाल आहे...
ReplyDeleteजय हिंद जय महाराष्ट्र !!!
प्रसाद कुलकर्णी