Friday, 5 March 2010

’भारत श्री’चा पगार कमी; अमेरिकेने विसा नाकारला!!


महाराष्ट्रातील मुले मेहनती नाहीत, त्यांना मेहनत करायचे माहित नाही. म्हणून परप्रांतिय इकडे येऊन आपल्या नोकऱ्या बळकावतात.

सुहास खामकर बॉडी बिल्डींग मध्ये सलग चार वेळा ’भारत श्री’ पटकावणाऱ्या आणि ’शिव छत्रपती पुरस्कार’ विजेत्या खेळाडूचे काय?

सुहास खामकर रेल्वे मध्ये टी.सी. म्हणून काम करतो. दरमहा रू. १२०००/- पगार मिळतो. टी.सी. ना दिवस आणी रात्रपाळी असे काम करावे लागते, तरीही बॉडी बिल्डींग मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवायचे, हिंदुस्थान आणि महाराष्ट्राचे नाव मोठं करायचं, हिच त्याची धडपड रात्रंदिवस सुरू असते.

शेवटी ती वेळही आली, अमेरिकेत ऑर्नाल्ड अमॅच्युअर बॉडी बिल्डींग स्पर्धा (कोलंबस, ओहियो) मध्ये भाग घ्यायचा होता. पण अमेरिकन दुतावासाने या आठवड्यात दोन वेळा त्याचा विसा नाकारला. का? कारण पगार कमी आहे...

सुहासने सरळ मुख्यमंत्री कार्यालयात धाव घेतली, पण मुख्यमंत्र्यांनीही त्याला भेट देण्याचे नाकारले. तसेच कोंबडीचोर नारोबाकडेही त्याने धाव घेतली पण त्या नारोबाकडेही सुहाससाठी वेळ नव्हती.

कसले हे भिकार सरकार? कुठे आहेत आपले महाराष्ट्राचे आणि देशाचे क्रिडामंत्री? सुहाससारख्या जीवतोड मेहनत घेणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जात नसेल तर आणखी कोणाला हे देणार आहेत?

सुहास खामकरला ऑर्नाल्ड अमॅच्युअर बॉडी बिल्डींग स्पर्धेचे आलेले निमंत्रण :


सुहास आता येत्या जुन मध्ये होणाऱ्या आशियाई बॉडी बिल्डींग स्पर्धेची तयारी करतोय. प्रायोजक नसल्याने त्याच्या तुटपुंज्या पगारातून त्याला स्वत:चे पैसे खर्च करावे लागत आहेत. सरकार मदत देवो वा न देवो महाराष्ट्रातील सर्व तरूणांनी सुहासच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे. आपण प्रत्येकाने आपापल्या परीने सुहासला मदत करू या.

आपण सुहासला थेट त्याच्या मोबाईल वर संपर्क करू शकता किंवा ईमेल द्वारे त्याला कळवू शकता

सुहासचा मोबाईल नंबर आहे +९१-९८९२६८४९२१

ईमेल आहे : suhas.khamkar@yahoo.com

No comments:

Post a Comment