Saturday, 20 March 2010

‘खान’चे असली उद्योग - सामना अग्रलेख

कॉंग्रेस पक्षाचा लाडका शाहरुख खान याचा ‘माय नेम इज खान’ हा सिनेमा पडद्यावर कोसळला असला तरी त्या सिनेमाचा हेतू सफल झाला आहे. ‘माय नेम इज खान’ला लोकांनी केव्हाच सिनेमागृहातून खाली उतरवले. पडद्यावर दगडधोंडे मारून खान व त्या करण जोहरची छी: थू: केली. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात व देशातही खानाचा ‘गल्ला’ भरला नाही. हा सिनेमा अरब व इस्लामी राष्ट्रांत मात्र भरपूर गाजला. पाकिस्तानात तर शाहरुख खानचा नुसता ‘जय हो’च झाला. पण त्याहीपेक्षा जी एक वेगळी माहिती आता या खानच्या बाबतीत बाहेर आली आहे ती डोके सुन्न करणारी आहे. ‘माय नेम इज खान’ चित्रपट मुसलमान तरुणांना दाखवून त्यांची डोकी भडकवायची व त्यांच्याकडून अतिरेकी कारवाया घडवून आणायच्या अशा प्रकारची योजना धर्मांध मुस्लिमांनी आखल्याचे उघड झाले आहे. हिजबुल, अल-कायदा वगैरे अतिरेकी संघटनांनी याबाबत आखलेली कट-कारस्थाने म्हणजे आणखी एका नव्या ‘जिहाद’ची तयारीच म्हणायला हवी.

अहमदाबादमधील दहशतवादविरोधी पथकाने यासंदर्भात अटक केलेल्या अतिरेक्यांनीच हा गौप्यस्फोट केला. गुजरातमधील काही सिनेमागृहांत अद्यापि ‘माय नेम इज खान’च्या पाट्या झळकत आहेत. या चित्रपटाची असंख्य तिकिटे पकडलेल्या अतिरेक्यांकडे सापडली. ही तिकिटे कशासाठी, असा ‘थर्ड डिग्री’ प्रश्‍न विचारताच पाकनिष्ठ पोपट धडाधडा बोलू लागले, ‘मुस्लिम तरुणांनी हा सिनेमा जास्तीत जास्त पाहावा व त्यांनी हिंदुस्थानविरुद्ध जिहाद पुकारावा. हिंदूंच्या
कत्तली कराव्यात यासाठीच या

सिनेमाचा वापर हिंदुस्थानविरोधी इस्लामी संघटना
करीत आहेत’, असे या पोपटांनी सांगितले. ‘माय नेम इज खान’मध्ये मुस्लिमांची कशी ससेहोलपट होते, ते मुसलमान असल्याने त्यांना अनेक देशांत कसा त्रास होतो, अपमानास्पद वागणुकीचा अनुभव येतो अशा प्रकारचे कथानक असल्याचे सांगितले जाते. खरे-खोटे त्या खानास व त्याच्या कॉंग्रेजी पिलावळीलाच माहीत. आम्ही एरवी काही चांगले चित्रपट अधूनमधून पाहत असतो, पण पाकपे्रमाची उबळ आलेल्या खानाचा हा चित्रपट काही आम्ही पाहिला नाही. त्यामुळे त्या चित्रपटात काय आहे? तो कसा आहे? तो खान आहे की घाण आहे? याबाबत आम्ही काहीच सांगू शकत नाही. मात्र चित्रपट कोसळला असला तरी ‘हिजबूल’ वगैरे हिंदुस्थानविरोधी संघटनांना तो खूपच आवडल्याचे त्यांच्या एकंदरीत कारवायांवरून दिसून येत आहे. मुसलमान तरुणांना भडकविण्यासाठी या चित्रपटाचा वापर सुरू आहे. याबाबत त्या करण जोहरला व खानास आता काय म्हणायचे आहे? हिंदूंचा कोथळा काढण्यासाठी मुसलमान तरुणांची डोकी तयार व्हावीत हाच या चित्रपटाचा मुख्य हेतू होता. अहमदाबादमध्ये पकडलेल्या संशयित आरोपीच्या जबानीतून तरी आम्हाला तेच दिसत आहे. मुसलमानांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे आणि त्यांचे हाल होत आहेत असे कथानक कोणी दाखवत असेल व त्यावरून हिंदुस्थानातील मुसलमान तरुणांना कोणी भडकवीत असेल तर त्याबाबत सरकारने कठोर पावले उचलायला हवीत. खरंतर अशा प्रकारची कथानके निर्माण करून मुसलमानांना भडकविण्याचे उद्योग कुणी या देशात तरी करू नयेत. येथील मुसलमानांचा कोणीही अपमान करीत नाही व त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देत नाही. या देशाचे नाव भले ‘हिंदुस्थान’ असेल, पण येथे फक्त मुसलमानांचीच चलती आहे. पाकिस्तानात मुसलमानांचे जेवढे लाडकोड होत नसतील त्यापेक्षा जास्त संरक्षण आणि दौलतजादा येथील मुसलमानांवर होत आहे. देशद्रोहाच्या खटल्यात फाशीची शिक्षा ठोठावलेल्या अफझल गुरूलाही कॉंग्रेसवाल्यांनी जीवनदान दिले ते फक्त मुसलमान असल्यामुळेच.  पाक क्रिकेटपटूंसाठी पायघड्या घालणार्‍या शाहरुख खानलाही आमच्या राज्यकर्त्यांनी

22 हजार पोलिसांचे संरक्षण
दिलेच ना? तुमच्या गळ्याभोवतीचा फास सोडवण्याची हिंमत फक्त हिंदुस्थानातच दाखवली जाऊ शकते. कारण शेवटी तुम्ही मुसलमान आहात ना? या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार फक्त मुसलमानांचाच राहील अशी घोषणा ज्या देशाचे पंतप्रधान करतात त्या देशात मुसलमानांचा अपमान होतो असे कोणत्या तोंडाने सांगता? ‘माय नेम इज खान’साठी व खासकरून त्या पाकड्या क्रिकेटपटूंसाठी अशोक चव्हाण हे शाहरुख खानचे बॉडीगार्डच बनले होते. काय त्याचे विमानतळावर स्वागत, काय त्याच्या बंगल्यास पोलिसांचा गराडा, काय त्याचा टीव्ही चॅनलवर उदोउदो! जणू हे कोणी राष्ट्रनिष्ठ क्रांतिकारकच निर्माण झाले हो! मुसलमान म्हणून तुम्हाला जे आज हिंदुस्थानात मिळत आहे ते पाकिस्तानात जन्माला आला असता तर मिळाले असते काय? पाकिस्तानातील उरल्यासुरल्या हिंदूंसाठी तेथील राज्यकर्त्यांनी एखादा ‘सच्चर’ आयोग नेमून शे-पाचशे कोटींची बरसात केली असेल तर सांगावे. कश्मीर खोर्‍यात हिंदूंच्या कत्तली झाल्या, कश्मिरी पंडितांना घरेदारे सोडून पळावे लागले. शेकडो देवळांचा विध्वंस झाला याचे चित्रीकरण करून दाखवायचे म्हटले तर ‘हिंदूंना’ चिथावणी दिल्याच्या आरोपावरून आमच्यावर खटले दाखल करतील. मग ज्या ‘खान’ चित्रपटावरून मुसलमानांची डोकी भडकविण्याचे उद्योग चालले आहेत त्याबाबत शाहरुख खानचे बॉडीगार्ड बनलेले अशोक चव्हाण, तिकडे नरेंद्र मोदी कोणती कारवाई करणार? की खान व त्याच्या पिलावळीला आणखी बळ देणार? महाराष्ट्र सरकारकडून अशा कारवाईची अपेक्षा करणे म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखे आहे. आता नरेंद्र मोदींनीच काही करावे.

No comments:

Post a Comment