Wednesday, 30 July 2008

मतांसाठी देशावर लाचारी लादणारे राज्यकर्ते

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातच लोकशाहीतील मतांच्या राजकारणासाठी त्याच देशाच्या निरपराध नागरिकांचे मुडदे पाडले जात आहेत. देशातील मुस्लिम वोट बँक आपल्याकडेच राहावी यासाठी हे सगळे सुरू आहे. खरेतर मुस्लिम एवढी लाचार का झाले आहे याचे उत्तर सर्वसामान्य मुस्लिम सुद्धा देऊ शकणार नाही.

मागच्या आठवड्यात शुक्रवारी देशातील सर्वात मोठ्या आयटी सिटी बंगळूरु मध्ये भर दिवसा सात साखळी बॉम्बस्फोट झाले. दुसर्‍या दिवशी हिंदु नेते नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेतील अहमदाबाद शहरात तर तब्बल १७ बॉम्बस्फोट झाले. या दोन्ही शहरातील घातपातामध्ये शेकडो निरपराध लोकांचे प्राण गेले. इतके कमी म्हणूनच कि काय पुढील सलग चार दिवस जवळ जवळ २५ जिवंत बॉम्ब गुजरातमधील सुरत शहरात निकामी करण्यात सुरक्षा जवानांना यश मिळाले. विचार करा हे सगळे स्फोट झाले असते तर किती मोठी हाणी झाली असती? मागिल काही बॉम्बहल्ल्यात एक धागा समान आहे तो म्हणजे बॉम्बहल्ले भाजपा शासित राज्यात होत आहेत म्हणजेच कुठेतरी भाजपाला धडा शिकवण्याचा हा प्रयत्न आहे म्हटले तरी काहीच गैर नाही.

आतंकवादी हल्ले हे हिंदुस्थानसाठी किंवा हिंदुस्थानी जनतेसाठी नविन नाहीत. सर्वाधिक आतंकवादी हल्ले आपल्याच देशात झालेले आहेत. काश्मिर मध्ये रोजच असे हल्ले होतच असतात, किंवा पाकिस्तान सिमेवर आमचे जवान निष्कारण मारले जातच आहेत. मुंबई आतंकवाद्यांचे एक नंबरचे टारगेट आहेच. त्यानंतर देशातील इतर भागातील हिंदु मंदिरे, मार्केट आणि अपवादात्मक मुस्लिम वस्त्यांमध्ये आतंकवादी निरपराधांचे बळी घेतच आहेत.

मुंबईतील ११ जुलैच्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोटाच्या जखमा आजही तशाच आहेत. रोज रेल्वेने प्रवास करणारा मुंबईकर आपले जीव मुठीत घेऊनच आल्या दिवसाला सामोरा जात असतो. संध्याकाळी जेव्हा घरी पोहचतो तेव्हा एक एक दिवस जगल्याचे समाधान मिळते. रेल्वेमध्ये आतंकवादी कधी बॉम्ब फोडतील हे कोणालाही माहिती नाही. सुरक्षा जवान किंवा कोणीही राज्यकर्त्यांपैकी मुंबई सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. चर्चगेट रेल्वे स्थानकात मेटल डिटेक्टर लावल्याने संपूर्ण रेल्वेमार्ग कसा सुरक्षित राहिल हेसुद्धा एक न सुटणारे कोडे आहे. परवाच एका न्युजचॅनेलने रात्री रेल्वे स्थानकात जाऊन दाखविले कि सुरक्षतेचे कसे तिनतेरा वाजले आहेत. त्या स्थानकावर रात्रीच्या वेळी एकही पोलिस किंवा इतर सुरक्षा जवान नव्हता.

एनडीए सरकारच्या काळात आतंकवादाविरोधात लढण्यासाठी पोटा हा विशेष कायदा बनविला होता. नंतर जो बर्‍याच देशांनी त्यांच्या देशात असा कायदा अंमलात आणला. पण आताचे युपीए सरकार सत्तेत आल्यानंतर बहुमताच्या जोरावर रद्द करण्यात आला. यामागे सर्वसामान्य मुस्लिमांना या कायद्याने त्रास दिला जात असल्याचे कारण सांगण्यात आले. यानंतर मात्र आतंकवाद्यांनी हिंदुस्थान आंदण मिळाल्यासारखे बॉम्ब पेरण्याचे सत्र सुरू केले.

लोकशाहीचे मंदिर म्हणजेच संसद भवन उडवण्याच्या कटात सामिल असलेला आणि ज्याला सुप्रीम कोर्टाने फाशीची सजा दिलेली आहे अशा अफजल गुरूला फाशी देण्यात हे युपीए सरकार टाळाटाळ करत आहे. कदाचित येत्या सार्वत्रिक निवडणूकांपर्यंत तरी त्याला सजा मिळण्याची शक्यता कमीच आहे, आणि जर कदाचित हे युपीए सरकार पुन्हा सत्तेत आले तर हेच अफजल गुरु आपल्या देशाचे पंतप्रधानही बनतील. सर्वसामान्य निरपराध्यांचे प्राण घेणार्‍या देश द्रोह्यांच्या मागे मानवी हक्क आयोगवाले उभे राहतात पण ज्यांच्या जीवावर हे सत्ताधारी निवडून आलेत त्या जनतेच्या मागे हे उभे का राहात नाही? २० कोटी मुस्लिमांच्या मतांना एवढे महत्त्व का मिळते? बॉम्बहल्ले झाल्यानंतर पाकिस्तान आतंकवाद्यांना संरक्षण देते म्हणून बोंबलायचे आणि स्वतः मात्र मतांसाठी पकडले गेलेल्या आतंकवाद्यांना सोडायचे मग पाकिस्तान आणि आपल्यात फरक तो काय?

हिंदु बहुसंख्य असलेल्या या देशाला धर्मनिरपेक्ष देश मानले जाते मग हे सरकार धर्मनिरपेक्षासारखे वागते का? मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळणे म्हणजे निधर्मीपणा म्हणू शकतो का? आणि जर देशातील सर्वधर्मियांना समान कायदा लागू करून समान अधिकार द्यायचे नसतील तर अल्पसंख्य मुस्लिमांचे इस्लामी राष्ट्र म्हणून या देशाला मान्यता तरी द्या म्हणजे निदान आपले अधिकारच नाहीत म्हणून हिंदू आपले हात तरी पुढे करणार नाहीत. म्हणजे कसे साप पण मेला आणि लाठीही वाचल्यासारखे होईल नाही का!

अमित चिविलकर

Tuesday, 8 July 2008

नानांना विनम्र अभिवादन

|| श्रीराम समर्थ ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||


जेष्ठ निरुपणकार आणि महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे आज पुण्याच्या दिनानाथ रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. नानांच्या जाण्याने जगातील लाखो समर्थ सेवकांमध्ये शोककळा पसरली आहे.

नानांनी दासबोधाच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये बैठका चालवून आपले कार्य सुरू केले. मौखिक निरूपणाद्वारे व्यसनमुक्ती, अज्ञान, अंधश्रद्धा, स्त्रीयांवरील अत्याचार, बालसंस्कार केंद्र, प्रौढ शिक्षण आणि वृक्षारोपण आदि वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला समाजाला सन्मार्गाला नेण्याचे कार्य केले. नानांना रायगड भूषण, शिव-समर्थ, डि-लिट तसेच हल्लीच महाराष्ट्र भूषण इत्यादी पुरस्कारानी सन्मानित करण्यात आलेले आहे. कुठल्याही प्रसिद्धीशिवाय समर्थांच्या बैठका गेली ६५ वर्षे अखंडपणे सुरू आहेत.

नानांना माझ्या कुटुंबियांतर्फे भावपूर्ण आदरांजली!

Thursday, 19 June 2008

झंझावताची ४२ वर्षे..



१९ जुन १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य आणि हक्कासाठी लढणारी संघटना, शिवसेनेची स्थापना प्रबोधनकारांच्या आशिर्वादाने झाली. शिवसेनेची सर्व सुत्रे शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेबांनी आपल्याच हाती घेतली. शिवसेनेची सभासद नोंदणी सुरु झाली. त्यावेळी 'रविवारची जत्रा' मध्ये एक ओळ यायची 'शिवसेनेचे सभासद व्हा!' दर आठवड्याला हजारो लोक शिवसेनेचे सभासद होत होते. सर्व सभासदांना मार्गदर्शन करण्याचे ठरले.

सभा कुठे घ्यावी याची चर्चा सुरु झाली. अनेक सभासदांचे म्हणणे होते कुठेतरी एखाद्या सभागृहात सभा घ्यावी. पण साहेबांना जबरदस्त आत्मविश्वास होता त्यांनी सांगितले कि, ' पहिली जाहिर सभा शिवाजी पार्कलाच होईल.'

सभेची तयारी सुरु झाली. सर्वांना शंका वाटत होती सभा यशस्वी होईल कि नाही. सभेची तारीख विजयादशमीची ३० ऑक्टोबर १९६६ ठरली. त्यानंतर सर्वांना माहितच आहे एक झंझावत आजपर्यंत महाराष्ट्रात घोंघावतच आहे.

तीन वर्षापूर्वी दोन फुसक्या बारांनी शिवसेनेला हादरे देण्याचा प्रयत्न केला. स्वकियांनी केलेल्या गद्दारीचा साहेबांना जरूर प्रचंड दु:ख झाले. प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये एकच कोलाहल सुरू झाला 'आता शिवसेना संपली'. पण मराठी माणसाच्या काही वेगळेच होते. त्याला शिवसेना मनापासून हवी होती म्हणूनच राजकाराणात नविन असूनही माननिय कार्याध्यक्ष श्री. उद्धवजींनी या काळात शिवसेनेचे खंबीर नेतृत्व करून पुन्हा एकदा शिवसेनेला तेच वैभव प्राप्त करून दिले.

पक्षातून गेलेल्या गद्दारांना केवळ एकाच वर्षात त्यांची लायकी दाखवून दिली. आज शिवसेना जबरदस्त ताकदिनिशी वाटचाल करत आहे. श्रीवर्धन पोटनिवडणूकीपासून ते परवाच्या ठाणे लोकसभा पोटनिवडणूकीपर्यंत शिवसेनेची विजयी घौडदौड मा. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. नविन नविन संघटना, लोक आणि तरूण शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत. मंत्रालयावर जशी गर्दी असते किंबहुना तशीच गर्दी आज मातोश्री आणि शिवसेना भवनवर दिसते. शेतकरी मेळावे आणि इतर योजनाबद्ध आंदोलनामुळे जनतेमध्ये उद्धवजींबद्दल प्रचंड विश्वास आहे. तोच विश्वास शिवसेनेला विधानसभेत नेईल हेच संकेत आज दिसत आहेत.

शिवसेनेच्या ४२व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा!

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

Saturday, 14 June 2008

'राजाशिवाजी डॉट कॉम' संकेतस्थळ पुन्हा व्यवस्थित सुरु झाले

कालच माझ्या ब्लॉगवर लिहिलेल्या "हे महाराजांचे दुर्दैव आणि काय?" लेखाची दखल घेऊन 'राजाशिवाजी डॉट कॉम' हे महाराजांवरील संकेतस्थळ पुन्हा सुस्थितीत सुरू केले गेले आहे. म्हणून मी संचालकांचे आभार मानतो.

नक्की भेट द्या : www.rajashivaji.com

आपला,
अमित चिविलकर

Thursday, 12 June 2008

हे महाराजांचे दुदैव आणि काय?

कालच ऑर्कुटवरील शिवसेना कम्युनिटीच्या पाठपुराव्यामुळे शिवाजी महाराज तसेच मराठा साम्राज्याचा उल्लेख नसल्याबद्दलचा लेख मटा मध्ये प्रकाशित झाला. केंद्र सरकारच्या www.india.gov.in या संकेतस्थळावर know India अंतर्गत Medieval History सदरात मुघल, शिख, विजयनगर आणि इतर साम्राज्याची दखल घेतली गेली असतानाच महाराष्ट्राचे आराध्यदैवत छ्त्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याची उल्लेखही टाळला आहे.

अशाच प्रकारचा काहिसा प्रकार आज पहायला मिळाला. नेटवर सर्फिंग करत असताना सहजच 'राजाशिवाजी डॉट कॉम' या संकेतस्थळावर भेट दिली असता एकदम धक्काच बसला.ब्राउजर मध्ये www.rajashivaji.com टाईप केले असता हे संकेतस्थळ दुसर्‍याच एका संकेतस्थळाला जोडले गेले असल्याचे समजले. शिवाजी महाराजांबद्दल माहिती घेण्यासाठी येणार्‍यांची अशी निराशा करण्यामागे काय हेतू असेल?

''राजाशिवाजी डॉट कॉम' चे गेल्यावर्षी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे फोटोंचे प्रदर्शन टि.व्ही. वर पाहिले. त्याचप्रसंगी 'राजाशिवाजी डॉट कॉम' चे संचालक मिलींद वेर्लेकर यांनी या संकेतस्थळावर नेटवरील इतर कोणत्याही संकेतस्थळापेक्षा जास्त महाराजांच्या गडकिल्ल्यांचे फोटो टाकून एक जागतिकविक्रम होणार असल्याची माहिती दिल्याचेही आठवते.

'राजाशिवाजी डॉट कॉम' हे संकेतस्थळ शिवाजी महाराजांशी संबंधीत आहे. भले ते खाजगी संकेतस्थळ असेल पण जेव्हा शिवाजी महाराजांचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येक मराठी माणसाच्याभावनांचाही प्रश्न येतो. संचालकांना हे नक्किच माहित असले पाहिजे. शिवाजी महाराजांवर जर संकेतस्थळ बनविले असेल तर त्याची जबाबदारीही समजायला हवी. जरकाही अडचणी असतील तर इतर संकेतस्थळाला जोडण्यापेक्षा एखादी सुचना लिहिली असती तर खुपच चांगले झाले असते.

शिवाजी महाराजांशी संबंधीत या दोन घटना दुर्दैवी आहेत. एका ठिकाणी केंद्र सरकारचा हलगर्जीपणा. तर दुसरीकडे एक मराठी माणूस जो शिवाजी महाराजांना आराध्यदैवत मानतो आणि अशा चुका करतो....