Sunday, 21 June 2009

साहेब आता आयसीयू तून बाहेर!

गुरूवारी लिलावतीमध्ये श्वसनाच्या त्रासाने दाखल झालेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत जलद गतीने सुधारणा होत असल्याच्या बातम्या येतच आहेत. त्यातच आज साहेबांना आयसीयु मधून व्हीआय्पी वार्डामध्ये आणण्यात आलेले आहे. शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी जनता आणि साहेबांच्या चाहत्यांसाठी हि अतिशय आनंदाची बातमी आहे तसेच येत्या मंगळवार पर्यंत साहेबांना मातोश्रवर आणले जाईल असे बोलले जात आहे.

शिवसेनाद्वेष्ट्यांनी दोन दिवस अफवांच्या घातलेल्या धुमाकुळीमुळे किंवा देव पाण्यात बुडवून ठेवलेल्यांसाठी हि खुपच धक्कादायक अशीच बातमी म्हणू शकतो. शिवसैनिकांना मानसिकरित्या त्रास देण्याचे काम या लोकांनी केलेले आहे. तेव्हा आता शिवसैनिक कसल्याही अफवांवर विश्वास ठेवूच शकणार नाही!

भवानी माते आमच्या साहेबांना लवकर पूर्णपणे बरे कर आणि शिवसेनेवरचे संकट दूर कर!

Tuesday, 2 June 2009

शरद पवारांचे घड्याळ बिघडले!




साभार : मिलिंद पंडीत

Wednesday, 20 May 2009

शिवसेनेचे शत्रु अनेक आहेत पण शिवसेनेचा शत्रु क्रमांक एक हा कॉंग्रेस आहे

शिवसेनेचे कार्यकारीप्रमुख माननीय श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांनी सर्व विजयी खासदारांबरोबर पत्रकार परिषद घेतली. उद्धवसाहेबांनी सर्व यशस्वी खासदारांचे अभिनंदन केले आणि सर्व खासदारांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. ह्या वेळी शिवसेनेचे नेते व विरोधी पक्ष नेते श्री.रामदासभाई कदम, शिवसेनेचे नेते श्री. मनोहर जोशी सर, शिवसेना सचिव अनिलजी देसाई, खासदार श्री. संजय राऊतसाहेब, आमदार श्री.सुभाषजी देसाई व सौ.निलमताई गोरे आणि अनेक शिवसेनेचे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, जिल्हाप्रमुख, नगरसेवक, शाखाप्रमुख आणि गटप्रमुख उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत उद्धवसाहेब नेमके काय काय बोल्लेत हे पुढीलप्रमाणे...

उद्धवसाहेब म्हणाले कि मुंबई मध्ये शिवसेनेने असे काय कमी केले कि मुंबईकरांनी कॉंग्रेसला साथ दिली...पण आमचा मुंबईकरांवर विश्वास आहे. आगामी निवडणुकीत हा विश्वास फळाला येईल.

अपयशाने खचुन न जाता शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागण्याची गरज आहे असा संदेश उद्धवसाहेबांनी त्यांचा शिवसैनिकांना दिला.

ते पुढे म्हणाले कि कोणत्याही स्टार शिवाय आणि जनतेचे प्रश्न ह्या मुद्यांवर आम्ही निवडणुक लढवली.

उद्धवसाहेब पुढे म्हणाले कि मागच्या लोकसभेच्या वेळी पक्षामध्ये अमर, अकबर, ऍंथनी सर्व होते...तेव्हा महाराष्ट्रामध्ये सेनेच्या १२ जागा आल्या... आता हे अमर,अकबर,ऍंथनी निघुन गेले तरी सेनेला ११ जागा मिळाल्या.मुंबईची एक सिट कमी झाली.अर्थात ह्यात काय आनंदाची गोष्ट पण नाही आहे. अशाप्रकारे उद्धवसाहेबांनी राज ला जोरदार टोळा लगावला.

ते पुढे म्हणाले कि रामटेक जागा आम्ही थोडक्यात हरलो... धाराशिव मध्ये ही तेच झाले.ग्रामिण भागात शिवसेनेने चांगली कमाई केली असं ते म्हणाले.

उद्धवसाहेब म्हणाले कि निकाल हे निकाल असतात... त्यांचं खापर कोणावर फोडणं हे योग्य नाही. विधानसभेवर भगवा फडकणारच असा जोरदार आत्मविश्वास उद्धवसाहेबांनी दाखवला.

ते पुढे म्हणाले मुंबईकरांनी कॉंग्रेसवर विश्वास दाखवला ह्याचं मला आश्चर्य़ वाटते. २६/११ च्या हल्ल्यात शिवसैनिक मदतकार्य करत होते,तरी मुंबई कॉंग्रेसला कशी भुलली? असा प्रश्न त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे शत्रु अनेक आहेत पण शिवसेनेचा शत्रु क्रमांक एक हा कॉंग्रेस आहे असे उद्धवसाहेब बोलले.

डोळ्यदेखत भगवा खाली उतरणं यासारखं दुसरं दु:ख ते कोणतं? मतविभागणी होऊ नये ह्याची काळजी आम्ही आगामी निवडणुकीत घेऊ असे उद्धवसाहेबांनी पत्रकारांना सांगीतले.

पुढे ते म्हणाले खासदार विजयी झाले ते माझ्या मुळे नाही तर शिवसेनाप्रमुखांच्या आणि शिवसैनिकांच्या मेहनती मुळे झाले.

एका निवडणुकीवर दुसरया निवडणुकीचे निकाल अवलंबून नसतात असे ते म्हणाले.मागच्या लोकसभेत देखिल शिवसेनेचे फक्त मोहन रावले हे खासदार निवडुन आले.पण त्या नंतर विधानसभेवर अनेक सेनेचे आमदार निवडुन आले आणि महानगर पालिकेत पुन्हा सत्ता ही आली.

मनसेविषयी बोलताना उद्धवसाहेब म्हणाले...जी मराठी मतं विरोधकांच्या दिशेने गेली ती मतं परत येणार ह्याचा ठाम विश्वास आहे. पत्रकारांनी जेव्हा विचारले कि मनसेशी युती करणार का?...त्यावर उद्धवसाहेब म्हणाले कि शिवसेनाप्रमुखांनी त्यांचे मत सांगीतलेले आहे आणि त्यांचे प्रत्येक विचार,मतं आणि आदेश ह्याचे पालन करणे आमचे कर्तव्य आहे.जे शिवसेनाप्रमुख सांगतील आम्ही तेच करणार.शिवसेना प्रमुखांनी ठाम मत दिलेलं आहे..आता मला नाही वाटत कि कोणाच्या मनात काही शंका उरली असणार.जिथे आम्ही कमी पडलो ति उणीव आम्ही भरुन काढु असे उद्धवसाहेब पुढे म्हणाले.

’हमने दो ही मारा..पर सॉलिड मारा’ ह्यावर जेव्हा पत्रकाराने उद्धवसाहेबांना प्रतिक्रिया दिली कि कोणाला मारतायेत त्याचा विचार करा...शिवसेनेने मराठी माणसासाठी आपल्या स्वार्थाचा विचार कधीच केला नाही किव्हा मराठी माणसाचा स्वतासाठी कधीच उप्योग केला नाही....बाळासाहेबांच्या शिवसेनेला ठोसा मारणारा अजुन पर्यंत कोणी जन्मला आलेला नाही आणि भविष्यातही कोण जन्मला येऊ शकणार नाही असे ठणकाहुन उद्धवसाहेबांनी विरिधकांना बजावले.

उद्धवसाहेब पुढे म्हणाले कि ’पंतप्रधानपदावर मराठी माणुस बसु शकला नाही याचे नक्कीच दु:ख आहे पण जो मराठी माणुस तुम्हाला पंतप्रधानपदी हवा होता,त्याच्याबद्दल बिल्कुल दु:ख वाटत नाही’ असा जोरदार टोळा उद्धवसाहेबांनी शरद पवारांना लगावला.

परिषद आटपता उद्धवसाहेब म्हणाले कि मुंबई मध्ये माझं लक्ष्य कमी झालं हे खरंच आहे पण ग्रामीण भागात आमचा पाया मजबूत झाला.आतापासुन जोमाने कामाला लागा...विधानसभेवर भगवा नक्कीच फडकेल असा आदेश त्यांनी कार्यकरत्यांना दिला.

साभार : शिवसेना अपडेट्स

Monday, 13 April 2009

शेतकऱ्यांचा दावा आहे, उद्धव ठाकरे छावा आहे!

शिवसेनेचा ढाण्या वाघ प्रचारात उतरल्याबरोबर लगेचच विरोधकांची पळापळ सुरू झालेली आहे. शरद पवार, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, सोनियाबाई, परमपुज्य पंतप्रधान मनमोहन सिंग या सगळ्यांचा पर्दाफाश मा. उद्धवसाहेबांनी केलेला आहे. उद्धवसाहेबांच्या सवालांचे जवाब देताना या आघाडी वाल्यांची पळती भूई थोडी झालेली आहे.

कालच्या दिवसातील शिवसेना कार्यकारीप्रमुख मा. उद्धवजीनी केलेली महत्वाची वक्तव्ये पुढीलप्रमाणे:

कुही
प्रियंका म्हणते, मी कुठे म्हातारी दिसते? पण माझ्या देशातील जनता म्हातारी दिसते आहे, ते का? कारण जनतेच्या रक्ताचे शोषण करून कॉंग्रेसने आपले तारूण्य टिकून ठेवले आहे.

बारशिवणी
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बायका-मुलींनीही जीवन संपवले. ते तरूण नव्हते काय? या नेत्यांच्या म्हातारपण आणि तरूणपणापेक्षा आम्हाला दिसते ते आया-बहिणींचे दु:ख.

सावनेर
पाणी मागणाऱ्या जनतेवर कॉंग्रेसने लाठ्या चालवल्या. खेड्यापाड्यातील लोकांच्या पिढ्या बरबाद झाल्या. तुमच्या नशिबावर असा वरवंटा फिरवणाऱ्या कॉंग्रेसवर आतातरी वरवंटा फिरवा.

नरखेड
जातपात आम्ही मानत नाही. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्नेही होते. हेच बाळकडू आम्हाला मिळाले. चला शिवशक्ती-भिमशक्ती एक करूया.

कोंडाळी
मनमोहन नावाचे दुबळे बुवा पुन्हा पंतप्रधान म्हणून डोक्यावर घेऊ नका. दळभद्री कॉंग्रेसला याच मातीत गाडून टाका. नाहीतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे तडफडणारे आत्मे तुम्हाला जाब विचारतील.

तिवसा
शास्त्रीजींनी ’जय जवान...जय किसान’ नारा दिला होता. पण दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवान मरतो आहे, तर किसान आत्महत्या करतो आहे. त्यांची कुर्बानी याद करा आणि नाकर्त्या कॉंग्रेसचा फैसला करा.

अचलपूर
तुम्ही ज्यांना दिल्लीत पाठवले, ते सोनियाची लाचारी करत बसले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत महाराष्ट्र नंबर वन. लोडशेडींग पण इकडेच जास्त. हे सगळे आपले, तिकडे दिल्लीत जाऊन झोपले.

Wednesday, 8 April 2009

कॉंग्रेस सरकार म्हणजे अराजक! - उद्धवसाहेब

मुंबईतील पवित्र शिवतीर्थावर नारळ वाढवून शिवसेना भाजप युतीच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आणि त्यापाठोपाठ शिवसेनेचा भगवा झंझावत पहिल्या प्रथम मराठवाड्यात येऊन दाखल झाला. परभणीचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार गणेश दुधगावकर यांच्या प्रचारार्थ स्टेडीयम मैदानावर उद्धवसाहेबांची अतिविराट सभा झाली.

उद्धवसाहेब म्हणाले, " नांदेडहून निघालो तेव्हाच पावसाची रिपरिप सुरू होती. पण मी मात्र मनातल्या मनात प्रार्थना केली. एकवेळ या पावसामुळे माझी सभा नाही झाली तरी चालेल, पण तहानेने व्याकुळलेल्या माझ्या जनतेला पाणी तरी मिळेल. त्यासाठी तरी हा पाऊस पडू देत. सभा झाली नसती तरी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी लोटलेला हा भगवा जनसागर शिवसेनेलाच मतदान करणार याची मला ठाम खात्री आहे. मी मनोरंजनासाठी सभा घेत नाही आहे. माझ्या महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्याला मी मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. हा निर्धार करूनच यावेळी घरातून बाहेर पडलो आहे."

"कॉंग्रेसचे सरकार म्हणजे अराजक! देशात आता पुन्हा हे खिचडी सरकार नकोय. कुठलेच निर्णय न घेणार नाकर्त्या कॉंग्रेसच सरकार जर पुन्हा आलं तर या देशात अराजकच निर्माण होईल." असा इशारा यावेळी उद्धवसाहेबांनी दिला. " शेतीतलं तुम्हाला कळत ना! मग शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये देशात महाराष्ट्रच नंबर एक कसा?" असा भेदक सवाल कृषीमंत्र्यांना केला.
=============================================================
आम्ही म्हणे देशद्रोही...
कसाबला वकिल मिळू नये हा आमचा देशद्रोहीपणा ठरतो. गृहमंत्री जयंत पाटीलच तसे म्हणतात आणि मृत्यूला कवटाळले पण कसाबला सोडले नाही, त्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या शिवसैनिक भावाला अटक करून डांबले जाते. हे असे असेल तर पवारांनी सांगावे कोणाचे हात बरबटले आहेत ते.
=============================================================
विलासराव काठोड्याला गेले नाहीत
बीड जिल्ह्यात काठोडा येथे शेतकरी वस्तीवर भयंकर दरोडा पडला. नराधम दरोडेखोरांनी महिलांवरही अत्याचार केले. विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. पण ते मात्र काठोड्याला गेले नाहीत. कारण रामगोपाळ वर्माला त्यावेळी वेळ नव्हता किंवा या विषयावर पिक्चर बनू शकत नव्हता.
=============================================================

Friday, 20 March 2009

साहेब - मराठीचा मान आणि हिंदुत्वाचा अभिमान.

हा लेख 'मातृभूमी' या मासिकात प्रकाशित झालेला आहे, संपूर्ण मासिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

'बाळासाहेब ठाकरे' हे महाराष्ट्राचे एकमेवद्वितीय व्यक्तिमत्व आहे. एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार ते हिंदूत्ववादी नेते असा साहेबांचा प्रवास आहे.

महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे तसेच तरूणांचे आदर्श आहेत साहेब. ज्यांनी राजकारणात चालून आलेली पदे सर्वसामान्यांना दिली, त्यांना मोठे केले पण स्वतः मात्र सत्तेच्या राजकारणापासून चार हात दूर राहिले. साहेब आज देशातील लाखो हिंदूंचे आधारस्थान आहेत. महाराष्ट्रातील खास करून मुंबईत जो काही मराठी माणूस आज ताठ मानेने उभा आहे त्याचे संपूर्ण श्रेय साहेबांनाच जाते. साहेबांनी आजपर्यंत सर्वात जास्त प्रेम शिवसैनिकांवर केले आणि साहेबांचा शिवसैनिक असण्याचा मला खुप खुप अभिमान आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्राचे मोठ- मोठे नेते आपले कार्यरत असताना बाळासाहेब कुंचल्याच्या फटकार्‍यांनी महाराष्ट्रद्रोह्यांवर आसूड ओढत असत. जवाहरलाल नेहरू, मोरारजी देसाई, सदोबा पाटलांसारखे महाराष्ट्रद्रोह्यांनाही साहेबांनी सोडले नाही. पुढे १९६० च्या दशकात मुंबईत मराठी माणसांवर होणार्‍या अन्यायाने साहेब खुपच अस्वस्थ झाले. त्यांनी मार्मिक साप्ताहिक सुरू केले. 'वाचा आणि थंड बसा' या लेखमालिकेतून मराठी माणसावरील अत्याचारांना वाचा फोडली. शिवसेनेच्या माध्यमातून अन्यायाची जाण मराठी तरूणांना करून दिली, त्यांची मने पेटविली आणि मराठी तरूण जागा झाला. त्याला आपल्या हक्कांची जाणिव झाली आणि अन्यायाविरोधात लढू लागला.

साहेबांनी सुरू केलेल्या लढ्याला मराठी माणसाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या गावोगावी शिवसेनेच्या शाखा सुरू होऊ लागल्या, साहेबांच्या विचारांची देवाणघेवाण शिवसेना शाखांमधून होऊ लागली, सर्वसामान्यांची गार्‍हाणी-समस्या ऐकून घेऊन सोडवली जाऊ लागली. काही वर्षातच शिवसेनेने महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटवला. साहेबांनी केलेल्या प्रत्येक आवाहनाला मराठी माणूस खंबीर उभा राहू लागला. परंतु साहेबांच्या लढ्याला काही मराठी माणसे व वेगवेगळ्या पक्षांचे नेते, पत्रकार, विचारवंत विरोध करत असत. त्यावेळी साहेबांच्या बाजूने वडील प्रबोधनकार ठाकरे, त्यांची स्वतःची हिंमत, मराठी जनतेबद्दलचा जाज्वल्य अभिमान व समर्थ कुंचला हिच शक्तिस्थाने होती.

हिंदुस्थानमध्ये हिंदुत्वाची चळवळ फार पूर्वीपासून सुरू होती. तरीसुद्धा हिंदुत्वाची चळवळ तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम बाळासाहेबांनीच केले आहे. १९९२-९३ ची मुंबईतील दंगल असो किंवा मालेगाव मध्ये सतत गणपती विसर्जनावर होणारी धर्मांध मुस्लिमांची दगडफेक असो. महाराष्ट्रात आणि देशात प्रत्येक ठिकाणी हिंदू मार खात होता तेव्हा प्रत्येक वेळी साहेबांनीच हिंदूंना धीर दिला. धर्मांधांविरूद्ध लढण्याची ताकद आणि बळ दिले. आणि त्यांची पाठसुद्धा थोपटली.

१९९२ साली बाबरी मशीद पाडली तेव्हा काहींनी हात झटकून हे काम शिवसैनिकांनी केले असे सांगू लागले तेव्हा साहेब म्हणाले "हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे." साहेबांनी आयुष्यात कधीही आपले शब्द मागे घेतलेले नाहीत. जी भूमिका मांडली ती रोखठोक!

१९९३ च्या मुंबईतील जातिय दंगलीमध्ये जागोजागी हिंदूंची कत्तल करण्याचे काम धर्मांधांनी सुरू केले, जोगेश्वरीच्या बने कुटुंबातील लोकांना जाळले गेले, हिंदू आया-बहिणींच्या इज्जतीला हात घालण्यापर्यंत या लोकांची मजल गेली तेव्हा साहेबांनी चिडून उठून शिवसैनिकांना याच्या विरोधात जशाच तसे उत्तर देण्याचे आवाहन केले. शिवसैनिकांनीही साहेबांचे आवाहन शिरसावंद्य मानून रस्त्यावर आपल्या हिंदू माता-भगिणींची इज्जत वाचवण्याचे काम केले. मस्तावलेल्या धर्मांधांची मस्ती जिरवली. हे केवळ साहेबांमुळेच घडले. मुंबईतील हिंदू समाजाला तेव्हाच साहेबांची ताकद कळून आली आणि तेव्हापासून देशभरातील हिंदूंना साहेबांचा आधार वाटू लागला.

गोध्रामधील धर्मांधांच्या मस्तीला जशास तसे उत्तर देणार्‍या गुजरातचे मुख्यमंत्री माननिय नरेंद्रजी मोदी यांच्यावर देशातील मिडीया तुटून पडली, भाजप मधूनही मोदींना एकाकी पाडण्याचे काम सुरू झाले होते तेव्हा मित्रपक्ष म्हणून अडवाणींना साहेबांनी मोदींना मुख्यमंत्री म्हणून पुढेही ठेवण्याचे सांगितले. आज आपण सगळे पाहतोच आहोत कि आजचा गुजरात हा एक आदर्श राज्य म्हणून देशात नाव कमावत आहे. हि सुद्धा एक प्रकारची साहेबांची जादू मानल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

गेल्या वर्षी सर्वाधिक गाजलेल्या मालेगांव बॉम्बस्फोटात अडकविलेल्या हिंदू प्रज्ञा साध्वीवर केवळ हिंदू म्हणून अतिशय घाणेरडे अत्याचार करण्यात आले. कोणतेही आरोप सिद्ध न करता महाराष्ट्र एटीएस साध्वींना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न करीत असतानाच साहेब साध्वीच्या मागे खंबीर उभे राहिले आणि काँग्रेसचे हस्तक बनून देशात हिंदू आतंकवाद वाढत आहे असे दाखविणार्‍या एटीएस वाल्यांना साहेबांनी जबरदस्त पद्धतीने उत्तर दिले.

साहेबांचे हिंदुत्व हे सर्वच मुसलमानांच्या विरोधातले नाही. जे जात्यंध मुसलमान आहेत, ज्यांचा आजही पाकिस्तानला पाठिंबा असतो, जे देशद्रोही आहेत अशांना कुठल्याही परिस्थितीत साहेब सोडत नाहीत. अंधश्रद्धेच्या विरोधात असणारे साहेब फक्त हिंदूंच्या अंधश्रद्धा बंद करून मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातील अंधश्रद्धांना तशाच ठेवणार्‍या 'अंधश्रद्धा निर्मुलन समिती' वरही बरसतात. आपल्या संस्कृतीत बरेच चांगले उत्सव असताना परकिय 'वेलेंटाईन डे' सारखे दिवस साजरे करणार्‍या आजच्या तरूण पिढीला आपली संस्कृतीची योग्य माहिती व्हावी आणि वेलेंटाईन डे सारखी थेर बंद व्हावीत असे साहेबांना ठामपणे वाटते.

"हिंदुत्व" हेच राष्ट्रीयत्व मानणारे आमचे साहेब म्हणूनच लाखो हिंदूंचे "हिंदूहृदयसम्राट" आहेत.