Saturday, 26 September 2009

श्रीवर्धन आणि महाडमध्ये शिवसेनेचे भगवे वादळ!

काल शिवसेनेच्या दक्षिण रायगड मधील श्रीवर्धन आणि महाडमधील शिवसेनेचे उमेदवार अनुक्रमे आमदार तुकाराम सुर्वे आणि रा.जि. बांधकाम सभापती भरतशेट गोगावले यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धवसाहेबांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे रायगडावर भगवा फडकविण्याचे स्वप्न लोकसभेच्या माध्यमातून साकार करून दाखविले आहे. आता या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा फडकविण्याचे स्वप्न सर्व शिवसैनिकांना पूर्ण करायचेय.

बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार आहे यात वादच नाही, परंतु हे स्वप्न पूर्ण करताना शिवरायांच्या राजधानीत रायगडामध्ये खास करून दक्षिण रायगडमधील दोन्ही जागा शिवसेनेने जिंकणे अतिशय महत्वाचे आहे. त्याप्रमाणे काल शिवसैनिकांनी दाखविलेल्या झळकीनेच दोन्ही ठिकाणचे राष्ट्रवादीचे(भ्रष्ट्रवादी खरे तर म्हणावे लागेल) दोन्ही उमेदवार हादरले असतील यात वादच नाही.

श्रीवर्धन मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. श्रीवर्धन, म्हसळे, माणगाव, तळे आणि रोहा असा विखुरलेला मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण भागाचा असा मिश्र मतदारसंघ आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणूकीमध्ये इथून शिवसेनेकडे ८००० आघाडी आहे. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणूका पूर्णपणे वेगळ्या असल्याने यात फरक आहेच. गोरेगांव अर्बन बँक, रोहा-अष्टमी बँक, चंडिका पतपेढी या संस्थांमधील जवळजवळ २१० कोटी रुपयाला चुना राष्ट्रवादी आणि त्यांच्या चेल्यांनी लावलेला आहे. लोकांमध्ये प्रचंड चिड आहे. तटकरे यावेळेस पुन्हा नकोय अशी भावना स्थानिक लोकांमध्ये असल्याने सुर्वे साहेबांना हि निवडणूक तशी जड जाणार नाही. परंतु कुठल्याही प्रकारे स्वस्थ न बसता शिवसैनिकांनी लक्ष देऊन काम करणे गरजेचे आहे.

भरतशेट गोगावले यांच्या बद्दल खुप काही सांगण्याची गरज नाही. मतदारसंघातील जवळ जवळ सगळ्या गावात फिरलेला हा माणुस लग्न, नामकरण समारंभासारख्या छोट्या मोठ्या सुख दुखात सहाभागी होणारा शिवसैनिक म्हणून या विभागात ख्याती आहे. रायगड जिल्हापरिषदेत बांधकाम सभापती म्हणून काम करताना लोकांच्या कामाकडे कुठल्याही प्रकारे जनतेची कामे झालीच पाहिजे इकडे भरतशेट खास करून लक्ष देत असतात. सुनिल तटकरेप्रमाणेच गोरेगांव अर्बन बँकेला बुडविण्याचा हात माणिक जगतापचाही असल्याने याचेही काही खरे नाही. कालच्या भरतशेटच्या अर्ज भरण्याच्या वेळेस जवळ जवळ पूर्ण महाड शहर लोकांनी गजबजून गेला होता. काही स्थानिकांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या कि, एवढी गर्दी अर्ज भरण्यासाठी प्रथमच होत आहे आणि भरतशेट हे नक्की जिंकलेले आहेत.

तर एकूण हे दोन मतदारसंघ शिवसेना जिंकून आपले रायगडमधील भगवा झेंडा अखंड फडक्त ठेवतील यासाठी शिवसैनिक नक्कीच काम करत आहेत.

No comments:

Post a Comment