Monday, 21 September 2009

शिवसेनेचे बंडोबा!

आज सकाळी सामना हातात पडला. शिवसेनेच्या उमेदवारांची यादी आजच्या सामनामध्ये जाहिर केली होती. तमाम शिवसैनिकांना हि निवडणूक जिंकून साहेबांचे स्वप्न पुर्ण करायचे असल्याने या उमेदवार यादी बद्दल उत्सुकता होती. बाळासाहेब आणि कार्यप्रमुख उद्धवसाहेबांनी यावेळेस कुणाला संधी दिली आहे हेही पाहण्यात शिवसैनिकांना नक्कीच रस असतो, परंतु मेहनत घेऊन शिवसेनेच्या प्रत्येक निवडणूकीत आपले घाम गाळणाऱ्या शिवसैनिकांचा साहेबांनी दिलेल्या उमेदवाराला कधीच आक्षेप नसतो त्याचप्रमाणे आताही नाही.

परंतु विधानसभेचे बाशिंग बांधलेल्या बंडोबांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली. आपले नाव या यादीत नसल्याने आपले काय होणार या भितीने अस्वस्थ होऊन आगडपाखड करून आम्हाला काम करून शिवसेनेने संधी दिली नाही याचे तुणतुणे सुरू झाले. मुंबईतील काही नगरसेवक शशिकांत पाटकर, राहुल शेवाळे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची भाषा केली आहे. उपविभागप्रमुख सिताराम दळवी यांनाही उमेदवारी हवी होती. परंतु कुठल्याही गोष्टींचा आणि अगदी बाळासाहेबांच्या स्वप्नांचा विचार न करता बंड सुरू झाले.

यातील काही नगरसेवक असूनही पुन्हा यांना विधानसभेची घाई लागलेली दिसतेय. शिवसेनेत बंडखोरी होत नाही असे म्हटले जायचे कारण शिवसेनेतील प्रत्येक शिवसैनिक हा जसा निष्ठावान समजला जातो तसेच शिस्तीचा सैनिक म्हणूनही गौरव केला जातो. पण या आमच्या महापुरूषांना याच्याशी काहीही देणेघेणे नाही. ज्या पक्षाच्या, शिवसेनाप्रमुखांच्या आशिर्वादाने आणि शिवसैनिकांच्या मेहनतीने हे नेगरसेवक पदाची फळे चाखत आहेत त्यांना सोयीस्करपणे विसरून गेले.

सर्वसामान्य शिवसैनिकांचा विचार यांनी केलेला आहे का? तर नक्कीच नाही. रंगशारदा मध्ये उद्धवसाहेबांनी स्पष्ट विचारले होते की, साहेबांनि दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत का तर सर्वांनी एकासुरात हो म्हटले असतानाही यांना पक्षापेक्षा स्वार्थच मोठा वाटला. सर्वसामान्य शिवसैनिक यांच्याकडे आदराने विश्वासाने बघतो परंतु बंडोबांना याचे सोयरेसुतक नाही.

आता पाहू या, एकदा पक्षाकडून यांची मनधरणी केली जाईल असे वाटतेय. पण तरीहि जर यांना माघार घ्यायचीच नसेल तर त्याला काही पर्याय एकच आहे. प्रत्येक शिवसैनिकांनी आपली असलेली ताकद वापरून कसेही करून यांना घरी बसवायचे बस्स!

2 comments:

  1. shivsena ne aplya junya style ne hya bandobana thand kele payje, tevhach hyana addal gadel.......baki mast lihla ahe blog, me pahilyandach bagitla ahe,ethunpude regular vachat jail

    ReplyDelete
  2. यावेळेस पूर्ण ताकद लावून हा स्वातंत्रलढा जिंकायचा आहे.भले हरलो तरी बेहत्तर पण माजुरड्या बंडखोरांना भिक घालू नये.असो जे झाल ते झाल आता माघार नाही.नाराजांची समजूत घालावी नाहीतर गेले खड्ड्यात.आणि जर का युतीची सत्ता आली तर मात्र हे दोम्कावले पुन्हा इथेच येतील यात शंका नाही.जय महाराष्ट्र!!

    ReplyDelete