Sunday 13 April, 2008

भुमिपुत्रांचा आधार शिवसेना

संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाल्यानंतर सुद्धा 'मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची' असं कुत्सितपणे म्हटलं जात होतं। परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी तरूणांच्या मागे ठामपणे उभे राहून इथल्या कारखान्यात, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये, व्यवस्थापनामध्ये स्थानिक भुमिपुत्रांना स्थान दिलं पाहिजे अशा प्रकारची कणखर भुमिका घेतल्यामुळेच आज अनेक ठिकाणी मराठी तरूण स्वाभिमानाने जगत आहे। भारतीय कामगार सेना असेल नाहितर स्थानिय लोकाधिकार समिती महासंघ असेल. या संघटनांनी मराठी तरूणांना त्यांच्या घामाचा आणि श्रमाचा मोबदला योग्य प्रकारे मिळवून दिला.

मुंबई महाराष्ट्राची आहे म्हणून इथल्या तरूणांचा तिच्यावर जास्त अधिकार आहे अशी वारंवार भुमिका शिवसेनाप्रमुखांनी स्पष्ट केलेली आहे। म्हणूनच एकेकाळी पंचतारांकित हॉटेलमध्ये मराठी तरूण अपवादानेच पहायला मिळत होता. परंतु शिवसेनाप्रमुखांनी कामगार सेनेच्या माध्यमातून अनेक तरूणांना पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकर्‍या मिळवून देऊन त्यांचे जीवनही पंचतारांकित केलं. मुंबईतील अनेक कारखाने आणि व्यवस्थापनामधील मराठी तरूणांची वर्णी लागली ती केवळ शिवसेनेमुळेच.

इतर प्रांतातले सत्ताधारी नेते आपल्या प्रांतातल्या लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात। मात्र महाराष्ट्रातल्या एकाही सत्ताधारी पक्षातील नेत्याला मराठी तरूणाबद्दल प्रेम वाटत नाही किंवा त्यांच्यासाठी काही केलं पाहिजे याची जाणीव होत नाही. ती जाणीव केवळ शिवसेनाप्रमुखांनीच जोपासलेली आहे. आज मुंबईतून रेल्वेला जितका पैसा मिळतो तितका खचितच इतर कोणत्याही शहरातून मिळत नाही. किंबहुना संपूर्ण देशाची रेल्वेची जितकी आवक असेल त्यातील २५% आवक हि केवळ मुंबईतूनच होते. मात्र मुंबईत रेल्वेतील कर्मचारी पाहिल्यानंतर ते परप्रांतिय असल्याचेच दिसून येते. अलिकडे दोन वर्षापूर्वी रेल्वेमध्ये पुन्हा भरती प्रक्रिया सुरु झाली. सध्या रेल्वेमंत्री पद हे लालू यादव याच्याकडे असल्यामुळे संपूर्ण बिहार प्रांतातून नोकर्‍यांसाठी मुंबईत लोंढे उलटले. ही बाब शिवसेनेच्या लक्षात येताच इथे नोकरीसाठी आलेल्या बिहार्‍यांना पळवून लावण्यात शिवसैनिकांनी पुढाकार घेतला. कारण आधी महाराष्ट्रातल्या तरूणांना रोजगार द्या आणि मग इतरांचा विचार करा हि शिवसेनाप्रमुखांची भूमिका आहे.

केवळ शिवसेना मराठी तरूणांना नोकर्‍या देऊन थांबली नाही तर वेळोवेळी व्यवस्थापनाशी कामगारांच्या हितासाठी भांडून त्यांच्यात पगारवाढ घडवून आणली. त्यामुळेच अनेक मराठी तरूणांचे कुटुंब आज स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगत आहे. ज्यांना नोकर्‍या मिळाल्या नाहीत अशा तरूणांच्या मनामध्ये आत्मविश्वास जागृत करून त्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले. शिवसेनेच्या स्थापनेच्या काही दिवसांतच शिवसेनाप्रमुखांनी लाचारीने कुणाच्या दुकानार काम करण्यापेक्षा स्वत:चे छोटे मोठे उद्योग सुरू करा अशी हाक दिली. त्यातूनच भायखळा येथे एका पदवीधर तरूणाने वडा-पावची गाडी सुरू केली. आज २५ वर्षांनंतर ग्रॅजुएट वडा-पाव म्हणून संपूर्ण मुंबई त्याला ओळखते. या वडा-पावच्या व्यवसायावरच या तरूणाचे जीवन इतके सुधारले की तो आज आपल्यासह संपूर्ण कुटुंबाचा निर्वाह तर करतोच परंतु अन्य काही तरूणांना काम देऊन त्यांच्या कुटूंबाचाही भार त्याने उचलला आहे. हे बळ फक्त शिवसेनाप्रमुखांच्या वाणीतच आहे.

साभार
: जनतेचं मंत्रालय.

2 comments:

  1. wsi am shivsainik my first duty a protect a hindu in our
    country . soul problem marthi manus

    they are many parti says i am marathi and my marshthra he told last 1 year but he know already shivsena tell last 44 years

    i proud because iam hindu and burn in marashtra and my mother tong is marathi

    ReplyDelete
  2. save marathi and save marashthra

    ReplyDelete