Sunday 21 February, 2010

दादांना भावपूर्ण श्रद्धांजली!


शिवसेना नेते श्री. मधुकर (दादा) सरपोतदार यांचे काल संध्याकाळी हिंदुजा इस्पितळात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते. दादा हे बाळासाहेबांच्या ’अष्टप्रधान मंडळा’तील एक नेते म्हणून सर्वांना परिचित आहेत.

शिवसेनेच्या स्थापनेपासून आजन्म शिवसेनेत राहिलेले दादांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील आंजणारी गावात ३१ जानेवारी १९३४ साली झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते जॉन्सन कंपनीमध्ये पसोर्नेल मॅनेजर या पदावर रूजू झाले. याच काळात त्यांनी अनेक शिवसैनिकांना नोकरला लावले. यातील अनेक पुढे शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि नगरसेवक झाले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेचे उत्तम ज्ञान असलेल्या सरपोतदारांचे वक्तृत्वही उत्तम होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारलेल्या सरपोतदार यांनी पक्षाच्या कामात झोकून दिले. कामगारांविषयी तळमळ असलेल्या सरपोतदारांनी महाराष्ट्र श्रमिक सेनेच्या माध्यमातून अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला. कामगारांच्या मागण्यांसाठी दत्ताजी साळवी यांची भारतीय कामगार सेना एकीकडे रस्त्यावर उतरायची तर, कॉपोर्रेट क्षेत्रात उत्तम संबंध असलेले आणि फडेर् इंग्रजी बोलणारे सरपोतदार कंपन्यांच्या मालकांशी भांडून कामगारांना न्याय मिळवून देत.

आजन्म शिवसेनेत कार्यरत असलेले दादांच्या या पवित्र स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली!

Wednesday 17 February, 2010

आता तपास सुरू झालाय.. पण फायदा काय?

शनिवारी हादरलेले पुणे अजुन पर्यंत सावरलेले नाही. लोकांमध्ये दहशत आहे. अशी वाक्य सध्या मिडीयामध्ये सुरू आहे. रोज नविन नविन रिपोर्ट्स बनत आहेत, दाखविले जात आहेत. पोलिस धागे-दोरे-सुया शोधत आहेत. प्रत्येक आतंकवादी हल्ल्यानंतर हेच होते.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी देशावर सर्वात मोठा आतंकवादी हल्ला झाला. पहिल्यांदाच एका आतंकवाद्याला आमच्या शहिद तुकाराम ओंबळेंनी पकडून दिले. आतंकवादी कसाबचा जिवंत चेहरा जगाने प्रथमच पाहिला. वरीलप्रमाणे सगळ्या गोष्टी इथेही घडल्या. पोलिसांना सगळे धागे-दोरे-सुया मिळाले. एवढेच नाही तर आता जवळ सव्वा वर्षे होत आली, कसाब मराठीही बोलायला लागला. पण आपल्या सरकारने काय वाकडे केले कसाबचे? कोर्टात खटला सुरू आहे. एका वर्षाच्या आत कसाबला शिक्षा होईल असे सगळेजण बोलत होते पण काय झाले का हो?

आतंकवादी सापडला आणि आपण त्याला शिक्षा देत नाही. अफजलगुरू घरच्यापेक्षा सुखाने तुरूंगात जगत आहे. कसाबने बाप जन्मी कधी सुख भोगले नसेल इतके आता भोगत आहे. आम्ही आपले अजुन धागे-दोरे-सुया शोधतोय. काय मुर्खपणा आहे हा?

पुणे हल्ल्याचा शोध सुरू झालाय. सरकारी पैसा यासाठी वापरला जाईल. पण याने काही फायदा होणार आहे का? आतंकवादी पळाले आणि आपण आपले आता शोधाशोध सुरू करतोय. ’माय नेम इज खान’ साठी २२००० पोलिस तैनात केले. कुणी विचार केला का की इतका फौजफाटा आपण कुणाला देतोय आणि का? लोकांच्या करोडो रुपयांच्या कर स्वरूपात आलेल्या रकमेची अशी उधळपट्टी फक्त खानावरच का? सर्व सामान्यांनी असे घाबरत आयुष्य जगायचे का?

आतंकवाद्यांना सजा झालीच पाहिजे. पण अफजल गुरू, कसाब यांना शिक्षा देऊन आपण आतंकवाद्यांना का दाखवून देत नाही की हिंदुस्थानवर हल्ला केलात तर कशी सजा मिळते. आज बाळासाहेबांनी सांगितले तेच बरोबर. कुणीही या इकडे आणि धिंगाणा घाला. कोण काहीही बोलणार नाही.

Sunday 14 February, 2010

पुन्हा एकदा आतंकवादी हल्ला, जनतेचे रक्षण कोण करणार?


काल पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाले. आपल्याच महाराष्ट्रातील पुण्यामध्ये हे स्फोट झाले आणि त्यात १० पेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले आणि जवळ जवळ ५० च्या आसपास लोक जखमी झालेत. मिडियामध्येही ही बातमी ’ब्रेकिंग न्यूज’ म्हणून दाखविली जात होती. पण याची आता सर्व देशवासियांना सवय झालेली आहे. हे काही हिंदुस्थानींसाठी नविन नाही. देशातील अनेक शहरांना असे अनेक हादरे बसले आहेत.

आपल्या देशात सरकार नावाचे बुजगावणे जे आहे ते मुळात सर्वसामान्यांसाठी नसून ते फक्त वाचाळ बडबड करणाऱ्या शाहरूख खान आणि पळपुट्या राहुलसाठी.

मागिल सात दिवस जे मुंबईने पाहिले त्याने प्रत्येक मुंबईकरांना धक्काच बसला आहे. शिवसेनाप्रमुखांनी केवळ राहुल गांधीला काळे झेंडे दाखवा सांगितले आणि मुख्यमंत्री आणि गृहविभाग जणू देशातील जनतेवर आतंकवादी हल्ला होणार असल्यासारखे पोलिसांचे मुंबईभर कडे उभे केले. त्यात अनेक शिवसैनिकांना अटका झाल्या, कुणाला मार खावे लागले, कुणावर बंदुका रोखल्या गेल्या.

मागचे चार दिवस तर मुख्यमंत्र्याने जो प्रकार केला त्याचा प्रत्येक नागरीकाने धिक्कार केला पाहिजे असाच होता. ज्या शाहरूख खानने पाकिस्तानी खेळाडूंना न घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली तसेच आपले पुर्वज पाकिस्तानी असल्याचे अभिमानाने सांगितले त्याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अक्षरश: जीव ओवाळून टाकायला तयार होते. हजारो शिवसैनिकांना अटक करून चित्रपट रिलीज करून मोठा विजय मिळवल्याच्या अविर्भावात वागत होते.

पण एवढे सगळे जर सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी यांनी केले असते तर जे काल १० लोक मारली गेली त्यांचे प्राण वाचले नसते का? जो गृहराज्यमंत्री राहुल गांधीच्या सुरक्षिततेसाठी त्याचे जोडे उचलण्याचे काम करतो त्याने त्याच्या मतदारसंघातील लोकांचे प्राण वाचावे यासाठी प्रयत्न करायला हवेत की नको? कॉंग्रेसवाले नको तिथे नको ते चाळे करतात आणि अशा आतंकवादी हल्ल्यात सर्वसामान्यांना मरण ओढवावे लागते.

मागे प्रज्ञा साध्वीच्या मागे करकरेंसहित सर्व पोलिसी बळ लावले आणि मुंबई आतंकवाद्यांसाठी आंदण देऊन टाकली. पुढे जे काही घडले तो आज इतिहास आहे. कसाबला एका वर्षाच्या आत सजा दिली जाईल असे म्हणणारे शासन अजूनही त्याचे लाड करण्यात मश्गुल आहे.

हे असेच होत राहणार अफजल गुरू, कसाब सारख्या आतंकवाद्यांचे असे लाड सुरूच राहतील कारण मारला जाणारा हा गांधी नसतो. म्हणून आता देशातील लोकांनीच प्रार्थना करावी प्रत्येकाला गांधी कुटूंबात जन्माला घाल म्हणजे कुणालाही आतंकवादी हल्ल्यात मरण येणार नाही.

Saturday 13 February, 2010

शाब्बास शिवसैनिकानो! आम्हाला तुमचा अभिमान आहे!


साहेबांच्या एका आदेशाने प्राणाची बाजी लावणाऱ्या शिवसैनिकांनी काल परत आपल्या प्राणाची पर्वा न करता ’माय नेम इज खान’ चा विरोध केला. त्या सर्व शिवसैनिकांना संपूर्ण हिंदुस्थान लाख लाख सलाम करतोय.

अशोक खान-चव्हाणने अपयश हाती येतेय हे पाहून मल्टीप्लेक्स मालकांवर दबाव आणून चित्रपट रिलीज करायला लावला. जे चित्रपट बघायला गेले ते नक्कीच देशप्रेमी नसून ’खान’प्रेमी आहेत यात शंका नाही.

ज्या रितीने हे लोक चित्रपट बघायला गेले, तसेच हे लोक मंत्रालयावर मोर्चा नेऊन सरकारला कसाबला फाशी कधी देणार हे का विचारत नाही? जे लोक हा चित्रपट बघायला जात आहेत, ते नक्कीच हिंदुस्थानसाठी बलिदान करणाऱ्या सैनिक आणि क्रांतीकारकांची खिल्ली उडवत आहेत असेच म्हणावे लागेल.

चित्रपट मल्टीप्लेक्स मध्ये जरी दबावाने सुरू करण्यात आला असला तरी इतर चित्रपटगृहामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांनी सुरू करू दिला नाही आणि मराठी माणसाने याला प्रतिसाद दिलेला आहे.

शाहरूख खानला बॉलीवुडनेही भिक घातली नाही, काही खानप्रेमी सेलिब्रिटींना वगळता बाकी संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीने हा चित्रपट न बघून खानावर बहिष्कार टाकला.

शिवसैनिकांचे सांडलेले रक्त वाया जाणार नाही, याचा हिशेब अशोक खान-चव्हाण आणि कॉंग्रेस कडून घेतला जाईल.

कॉंग्रेस सरकार सत्तेत येऊन अजून फक्त चारच महिनेही पूर्ण झालेले नाहीत आणि शिवसैनिकांनी त्यांना पुरते अस्वस्थ करून टाकलेय, राहुल गांधी मुंबईत येऊन पळवाटेने निघून जावे लागले याचा जाब अशोक खान चव्हाणला दिल्लीला नक्कीच विचारला जाणार आहे. आता शिवसैनिकांसाठी इतके बंदोबस्त करावे लागत पुढे शिवसैनिक आणि शिवसेना यांचे काय हाल करेल हे त्यांना समजणार आहेच!

सुनिल मंत्री
बोस्टन, अमेरीका