Wednesday 30 January, 2008

सरकारी रियालिटी शो

अलिकडे एक मजेशीर बातमी वाचली, ती अशी कि महाराष्ट्र सरकार म्हणते, महाराष्ट्रात राहणारे बौद्ध धर्मीय मराठी नाहित। बातमीच अशी गमतीशीर आहे कि, हसावे का रडावे तेच कळत नाही. पण महाराष्ट्र सरकार म्हणते तर नक्किच हसण्यासाठी एखादा जोक केला असावा. कारण आमच्या राज्यात लोडशेडींगमुळे विज नाही म्हणून लोक टिव्ही बघु शकत नाही, मग "लाफ्टर शो" करण्याची जबाबदारी सरकारचीच नव्हे का!

आपल्या देशाचाच आज "लाफ्टर शो" झाला आहे. जो तो येतोय तो मुस्लिमांचे लांगुनलांचन करण्याचे "रियालिटी शो" आयोजित करतोय. मागे एकदा आमचे ठोकळे पंतप्रधान म्हणाले होते कि देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा राहिल. प्रथम यांनी आपली मालमत्ता कोणाच्या नावे केली आहे हेही जाहिर व्हावे म्हणजे कळेल कि महाशय स्वतः काय करत आहेत. त्याच आसपास आमचे सुपरमन विलासराव म्हणाले होते कि, आम्हाला मुसलमानांनी सत्तेवर बसविले आहे म्हणून त्यांच्या भल्याचा पहिला विचार करावा लागेल. आता मित्रांनो तुम्हीच सांगा ज्या देशात ८०% हिंदु राहतात त्या देशात २०% मुस्लिम यांना सत्तेत कसा बसवू शकतात? कि यांची अशी समज आहे कि कॉग्रेसला मतदान करणारे मग तो हिंदु असो अथवा आणि कोणीही तो मुस्लिमच! याचा विचार आमच्या धर्मनिरपेक्षवादी हिंदुनीच करावा.
काही दिवसांपूर्वीच आमचे आणखी एक अनमोलरत्न (चुकून "भारतरत्न" वाचु नये) शिवराज पाटील आपल्या मुखकमळातून आकाशवाणी करून मोकळे झाले कि हा देश एकसंध राहण्यासाठी मुस्लिमांचे लांगुनलांचन करावेच लागेल. काय म्हणावे या देशाच्या गृहमंत्र्याला? यांना यावेळेस देशातील कुठल्यातरी मिनी पाकिस्तान मधुन निवडणूकिचे तिकिट दिले पाहिजे म्हणजे किमान निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश मिळेल. कारण लातुरमधील जनतेने यांना अडगळीत फेकून दिले असतानाही सोनियाजींनी कोळशामधुन हिरा काढावा असे वेचुन काढले आहे आणि सोबत कोणतेही असे कर्तृत्व नसताना देशाचे गृहमंत्री केले।

काय करायचे या सगळ्या माकडांचे? यांना हुसकावून लावावेच लागेल, नाहितर हे हरामी कॉग्रेसवाले देशाला ईस्लामी राष्ट्र म्हणून घोषित करायला मागे पुढे बघणार नाहित।

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

Wednesday 23 January, 2008

साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!


हिंदुत्वाची शान, महराष्ट्राचा अभिमान,
आम्हा शिवसैनिकांची जान, पुजातो तुम्हा हिंदुस्थान...
आमच्या साहेबांचा सम्मान!


साहेबांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

असेल मी नसेल मी असेल माझा शब्द!

दिवंगत शिवसेना नेते श्री प्रमोद नवलकर साहेबांचा आणि साहेबांचा जन्मदिवस आज आहे. प्रमोद नवलकरसाहेबांची जयंती आपण साजरी करत आहोत त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Monday 21 January, 2008

उद्धव ठाकरे - द पॉलीटिकल वॉरिअर

सुचना: हा लेख दि. २० जानेवारी २००८ च्या ई-सकाळ.कॉम वरून घेतला आहे. याचे मुळलेखक पद्मभुषण देशपांडे आहेत.

राजकारण हा काही त्याचा प्रांत नाही,' यावर सगळ्यांचं एकमत होतं. कोणी म्हणे, "बॅंकेमध्ये काम करणारा संसारिक गृहस्थ म्हणून तो अगदी आदर्श आहे.' काही म्हणत, "शिवसेनेसारखी ज्वलजहाल संघटना याच्या हातात कधीच राहणार नाही.' राजकीय विरोधक, "त्याच्या नाकावरची माशी हलते का?' असा प्रश्‍न उपरोधाने विचारत.

"जंगलात जाऊन सुरक्षित ठिकाणी बसून फोटोबिटो काढणं ठीक आहे. ठाकरे आडनावाचा फायदा घेत हेलिकॉप्टर मिळवणं आणि त्यात बसून फोटो काढणं ठीक आहे. तेवढंच त्याचं काम-' शिवसेनेचेच कारभारी त्याकाळी खासगीत आपल्या जीभेचा पट्टा असा चालवत असत. मग, त्याच्यावतीने त्याची बायकोच कारभार करते, तुम्ही भेटायला गेलात की तीच दारात येऊन उभी राहते, हल्ली अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन फायलीही हाताळते... आणि नसेलच ती तर मिलिंद नार्वेकर असतोच. सगळा कारभार त्या दोघांच्याच हाती आहे... अशी कुजबूज मोहीम मित्रपक्षातून चाललेली असे.

अवघ्या पाच वर्षांत त्याने सगळ्यांची तोंडं बंद केली. आपल्या मार्गातले काटे अलगद दूर केले. प्रत्येकवेळी वेगळे डाव टाकले, मित्र पक्षावर गहिरे घाव टाकले. शिवसेना नावाची एक मजबूत फुरफुरती ताकद आज त्याची अंकित आहे. राष्ट्रीय मित्रपक्षाला त्याने काबूत आणले आहे आणि कॉंग्रेससारख्या पक्षालाही कोडे वाटावे अशा दिशेने तो आपल्या रणनीतीचे घोडे दामटतो आहे.

विरोधी पक्षाचे नेते तर सोडाच, पण त्याचे जानी दुष्मनही आता त्याच्याविषयी जपून बोलतात. येत्या निवडणुकीत तो कुणाला कशाची भेट देईल, याचा अंदाज बांधत असतात. चर्चा निघाली की आता ते म्हणतात, "उद्धव वाटतो तसा नाही. पक्का आतल्या गाठीचा आहे. त्याच्या चेहऱ्यावरून जाऊ नका. वडिलांपेक्षाही कट्टर आणि वेळ येईल तेव्हा कठोर होणारा आहे. परिस्थितीने त् य ाला पुरेसा वाव मिळालेला नाही. पण, जेव्हा त्याचे दोन्ही हात मोकळे होतील तेव्हा बघा...'

शिवसेनेचा कार्याध्यक्ष म्हणून २१ जानेवारी २००२ रोजी उद्धव ठाकरे यांनी सूत्र आपल्या हाती घेतली. २१ जानेवारी २००७ मध्ये त्याने आपल्या विषयी असणारी सगळ्यांची सगळी मतं बदलून टाकली. पाच वर्षांचा काळ मोठा नाही हे खरं. पण, राजकारणाच्या दृष्टीने असा पाच-सात वर्षांचाच काळ कसोटीचा असतो. या काळात तुम्ही कसोटीला उतरलात तर राजकारणी म्हणून तुमची मान्यता कायम होते. येता काळ कोणती आव्हानं घेऊन येणार आहे, माहीत नाही. पण, गेल्या पाच वर्षांत उद्धव ठाकरे यांच्यासमोर चढत्याक्रमाने आव्हानं उभी ठाकली आणि त्यांनी ती मोठ्या हिमतीने स्वीकारली, हे कोणीही मान्यच करेल.

मुळात उद्धव ठाकरे यांना कोणी राजकारणी मानायलाच तयार नव्हतं. राजीव गांधींसारखीच काहीशी सुरूवात होती. राजकारण्यासाठी जे रसायन लागतं ते या माणसात नाही, असंच सगळ्यांचं ठाम मत होतं. असं मतही सहानुभूती आणि भलेपणाचं वलय देत असतं. पण, शिवसेनेच्या नेत्याच्या नशिबी एवढं भाग्य नसतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला तर कोणीच असं सहज माप टाकणार नाही. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा हा त्यांच्या वरकरणी बोलण्याएवढाच जहाल असायला हवा अशी सर्वसामान्य माणसापासून प्रसिद्धी माध्यमांचीही अपेक्षा होती. या अपेक्षेला उद्धवपेक्षा त्यांचा चुलतभाऊ राज ठाकरे सहीसही उतरत होता. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचा उत्तराधिकारी, ठाकरे घराण्याचा राजकीय वारस आणि शिवसेनेचा पुढचा सेनापती राज ठाकरेच असणार असं गृहित धरून सगळे जण शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करत होते. या समजाला पहिली ठेच लागली १९९७ साली. त्यावेळचे विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी रमेश किणी हत्याप्रकरण उकरून काढलं आणि राज ठाकरे यांच्याभोवती संशय ा चा फास पडला. संपूर्ण ठाकरे कुटुंबाने आपलं सारं बळ प्रामाणिकपणे लावूनही राज ठाकरे यांच्यावर पडायचा तो शिक्का पडलाच. उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जन्माला ही घटना कारणीभूत ठरली, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.

राज ठाकरे किणी प्रकरणाच्या खोड्यात अडकल्याने साहजिकच उद्धव ठाकरे यांच्यावर एकेक जबाबदारी येत गेली. १९९९ मध्ये भारतीय जनतापक्षाबरोबरच्या युतीतील जागा वाटपात ते शिवसेनेचे नेते म्हणून बसले. मदतीला सुभाष देसाई आणि मनोहर जोशी यांच्यासारखे पक्के "चिटणीस' होते. निवडणुकीच्या राजकारणाचा अंदाज केवळ ठोकताळ्याने घेण्यापेक्षा शास्त्रीय नेटकेपणाने घेण्याचा प्रयत्न उद्धव यांनी केला. शिवसेनेने अशा पद्धतीने पहिल्यांदाच राजकारण केल्याने अगदी खालच्या आवाजात उद्धव ठाकरेच्या या "पुस्तकी' राजकारणाची खिल्ली उडवली जात होती. उद्धव ठाकरे यांनी मोठ्या आत्मविश्‍वासाने त्याकडे दुर्लक्ष केलं. कारण १९८५ आणि १९९० च्या महापालिका निवडणुकीचं "कॅम्पेनिंग' त्यांनी केलं होतं. "चौरंग' नावाची जाहिरात आणि जनसंपर्क एजन्सीद्वारे राजला बरोबर घेऊन १९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं प्लॅनिंगही उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. आपल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधल्या मित्रांच्या आणि अनुभवाच्या आधारे हे कॅम्पेनिंग आणि प्लॅनिंग केलं असलं तरी अशा कामाला राजकीय दृष्टी अपरिहार्य असते हे कोणी नीट लक्षात घेतलं नाही. प्रचारातही राजकीय डावपेच असतात, कूटनीती असते आणि युक्तीवादही असतो. त्यासाठी राजकीय भूमिका अपरिहार्य असते.. जमिनीखालचे प्रवाह समजून घ्यावे लागतात आणि राजकीय भूमी कुठे हादरेल याचा अंदाज घ्यावा लागतो. सिद्ध आणि प्रसिद्ध पुढारपण नसल्याने उद्धव ठाकरे यांना हा गृहपाठ व्यवस्थित करता आला. गेल्या पाच वर्षांत त्यांनी आपल्या डावपेचात जी राजकीय परिपक्वता द ा खवली त्याला या गृहपाठाचाच आधार असणार असं मानायला जागा आहे.

कार्याध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या पक्षाची सूत्रं हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दोन राजकीय कार्यक्रम दिले. एक ः शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या समन्वयाचा आणि दुसरा ः मी मुंबईकर या नाऱ्याचा. हे दोन्ही कार्यक्रम शिवसेनेला पडलेल्या मर्यादा तोडणारे आणि नवा राजकीय आधार शोधणारे होते. एका कार्यक्रमातून जातीचं वास्तव स्वीकारल्याची जाणीव होती. ही ताकद जोडली गेली तर पक्षाची प्रतिमा बदलेल अशी आशा होती आणि विरोधी पक्षांची वोटबॅंक खिळखिळी करता येईल, असं गणित होतं. त्यासाठी आवश्‍यक असणारी माणसांची पारख मात्र झाली नाही. नामदेव ढसाळ आणि तत्सम आधांतरी नेते बरोबर घेऊन प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला. तो सपशेल फसला. दुसरा प्रयोग आपली राजकीय भूमिच बदलण्याचा होता. ज्या मराठी माणसासाठी आणि मराठी आवाजासाठी शिवसेनेचा जन्म झाला आणि मराठी जनांनी तिला आधार दिला तीच शिवसेना परप्रांतीयांना जवळ करू लागली. हिंदुत्वाचा फॉर्म्युला वापरण्यापेक्षा आणि त्यानिमित्ताने भाजपबरोबर फरफटत जाण्यापेक्षा या फॉर्म्युल्याची चव जमली तर बघावी, असा या नव्या नेतृत्त्वाचा विचार होता. त्यामुळे, शिवसेना "मी मराठी'ऐवजी "मी मुंबईकर'चा नारा देऊ लागली. मराठी टक्का सोडून अन्य प्रांतियांची बेरीज करीत आपला टक्का वाढवायला पाहू लागली. याचीही पुरेशी तयारी केली गेली नाही. जनमानसाची चाचपणी झाली नाही. संघटनेला विश्‍वासात घेतले नाही. पेडर रोड आणि कार्टर रोडच्या तथाकथित "सामाजिक जाणीव'वाल्यांच्या सहभागाने गाणीबिणी बसली, पण नंतर ही मोहीमच बसली. दुसरा प्रयोगही गुंडाळून ठेवावा लागला.

राजकारणात नीट जम बसवायचा आणि पक्षाला सत्ताधारी करायचे तर आधी सत्ताधारी म्हणून पक्षाव र नीट मांड बसवली पाहिजे, याची जाणीव उद्धव ठाकरेंना बरीच आधी झाली असावी. त्यामुळे त्यांनी आपलं सगळं लक्ष पूर्णपणे संघटनेवर केंद्रीत केलं. संघटना आणि संघटनेतील माणसं समजावून घेतली. त्यांची नव्याने ओळख करून घेतली. संघटनात्मक रचनेतील प्रत्येक पातळीवरच्या माणसाचं महत्त्व आणि त्याची विचार करण्याची पद्धत लक्षात घेतली. महापालिकेच्या २००२ मधील निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या या संघटनात्मक ज्ञानाची पहिली चाचणी घेतली. संपूर्ण उमेदवारी वाटप त्यांनी आपल्या हाती घेतले. राज ठाकरे यांना शिवसेनेत त्याचवेळी पहिल्यांदा असुरक्षित वाटले. त्यांनी आपल्या समर्थकांकरवी आदळआपट करून पाहिली. पण, उद्धव ठाकरे यांनी त्याची अजिबात दखल घेतली नाही. आपली समिकरणे आपण मांडायची आणि शास्त्रीय पद्धतीने ती सोडवायची. आपला आणि शिवसैनिकांमधील संवाद हाच खरा, बाकी सगळ्यांचे सल्ले आणि अधिकार गौण अशा ठाम विश्‍वासाने उद्धव ठाकरे यांनी ती निवडणूक हाताळली आणि यशही मिळवलं. उद्धव यांच्या या यशाने शिवसेनाप्रमुख आश्‍वस्त झाले आणि त्यांची सारे प्रतिस्पर्धी पहिल्यांदा धास्तावले. उद्धव ठाकरे यांची राजकारणी म्हणून दखल तेव्हापासूनच घेतली जाऊ लागली.

घरात राज ठाकरे आणि पक्षात नारायण राणे असे दोन प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे यांना छळत आणि सलत होते. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा "ऑपरेशन राणे' हाती घेतलं. पद्धतशीरपणे त्यांनी राणेंचे पंख कातरले आणि त्यांना उडण्यासाठी मजबूर केलं. शिवसेनेतल्या कोणत्याही नेत्याने शिवसेनेच्या नेतृत्वावर केली नसेल अशी टीका राणे यांनी केली. "सामना'ने राणे यांचा मुखभंग करण्याची एकही संधी सोडली नाही. पण, ही लढाई लढावी लागली ती उद्धव ठाकर? यांनाच. शिवसेना नेत्यांपैकी कुणाचीही मदत यावेळी उद्धव यांना होऊ शकली नाही. आपल्या मर्यादित वक्तृत्वाच्या आणि राजक ी य अनुभवाच्या शिदोरीवर उद्धव यांनी ही लढाई केली. भावनिक सौदेबाजी करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जखडून ठेवायचे आणि दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कर्तृत्वहीनतेचे आणि त्यांच्या निकटच्या व्यक्तींविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करायचे असे "नारायणास्त्र'ही त्यांनी यथावकाश निष्प्रभ केलं. शिवसैनिकांच्या मनात स्वतःविषयी विश्‍वास निर्माण केला.

कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राणे यांनी शिवसेनेवर राजकीय हल्ले करायला सुरूवात केली. त्यांचा अश्‍वमेधाचा वारू अखेर श्रीवर्धन मतदारसंघात अडकला. शिवसेनेच्या तुकाराम सुर्वे यांनी राणेसमर्थक कॉंग्रेसच्या श्‍याम सावंत यांचा पराभव केला. त्यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघातही राणेसमर्थक सुबोध मोहिते यांचा पराभव झाला. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या दीपक सावंत यांनी मिळविलेला दणदणीत विजय अनेकांना तोंडात बोटं घालायला लावणारा ठरला. कोणत्याही राजकारण्याची किंमत शेवटी निवडणुकीच्या रणांगणातच ठरते. उद्धव ठाकरे यांची किंमत या तिनही विजयांनी चांगलीच प्रस्थापित केली.

राणेंपाठोपाठ राज ठाकरे यांचा क्रमांक लागला. राणेंपेक्षा हे प्रकरण वेगळं होतं. ही शस्त्रक्रिया जोखमीची होती. पण तीही उद्धव ठाकरे यांनी करून दाखविली. शिवसेनाप्रमुखांनंतर महाराष्ट्रात करिष्मा असलेलं एकमेव युवा नेतृत्व म्हणून ज्याकडे पाहिलं जात होतं त्याच्या साऱ्या प्रभा मिटवून टाकणं सोपं नव्हतं. "सामना'चे कार्यकारी संपादक आणि खासदार, राज ठाकरे यांचे एकेकाळचे जीवलग संजय राऊत यांच्या मदतीने उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरणही वर्षा दीडवर्षात मिटवून टाकलं. आता शिवसेनेच्या वाघावर उद्धव ठाकरे पक्के स्वार झाले आहेत.

शिवसेना वाढली ती बाळासाहेब ठाकरे या एकाच माणसाच्या करिष्म्याने. पण तरी या करिष्म्याला आधा र शिवसेनेच्या नेत्यांचा होता. सुरूवातीचे अष्टप्रधान मंडळ नंतर डझनावर गेले. उद्धव ठाकरे यांनी सूत्रं हाती घेऊन पाच वर्ष झाली तरी शिवसेना नेता म्हणून कोणालाच मान्यता दिली नाही. सुरूवातीला केवळ देसाई-जोशी यांच्या मदतीने कारभार हाकला. आता संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर या दोन वेगवेगळ्या पातळीवरील सहकाऱ्यांच्या मदतीने ते शिवसेना चालवत आहेत. भारतीय जनता पक्षासारखा मित्रपक्ष नियंत्रणात ठेवणे सोपी गोष्ट नाही. पण, उद्धव ठाकरे यांनी सुरूवातीला पोट निवडणुकांतील जागावाटपात आणि नंतर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवेळी या पक्षालाही झटके दिले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्या पक्षाला योग्य तो संदेश दिला. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आपल्यावर निर्धास्त राहणार नाही अशी वातावरण निर्मिती करून ठेवली. कॉंग्रेसपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसपर्यंत मोठ्या कौशल्याने राजकीय तडजोडी केल्या आणि पक्षासाठी आवश्‍यक असलेले यशाचे इंधन अधूनमधून पुरविण्यात यश मिळविले. शिवसेनेतून पूर्वीच बाहेर पडलेल्या नेत्यांशी झालेले कटू संबंध संपवून शुभसंकेतांचे नाते निर्माण केले. त्याचा फायदा त्यांना दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत झाला म्हणतात!

उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार फारादिवसांनी "मातोश्री'वर पोहोचले. ही भेट शिवसेनाप्रमुख आणि पवार या दोन ज्येष्ठ-जाणत्या मित्रांमधली होती हे मान्य केले तरी ते उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेशिवाय झाली असेल यावर राजकारणातला दुधखुळाही विश्‍वास ठेवत नाही. एकेकाळी एकट्या पडलेल्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या राजकीय मदतीवर ताकद कमाविणाऱ्या शिवसेनेची राजकारणातील जागा आता पूर्णपणे बदलली आहे. शिवसेनेशी हातमिळवणी क र ायला सगळे तयार आहेत आणि शिवसेनाही स्वतःचा चेहरा अधिकाधिक मित्रत्वाचा करते आहे. मराठी अजेंडा आता फार काळ टिकणार नाही हेच स्पष्ट असल्याने शिवसेनेची जागाही संकोचत जाईल हा राजकीय पंडितांचा अंदाज खोटा ठरविण्यासाठीच जणू उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं "पोलिटिकल पोझिशनिंग' बदलण्याचं शिवधनुष्य उचललेलं दिसतं!

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा देण्यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातले संबंध कमालीचे ताणले गेले होते. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी "घटस्फोटा'ची भाषा सुरू केली होती. पण, पाऊल पुढे टाकूनही उद्धव यांनी जीभेला मात्र लगाम घातला होता. एकेठिकाणी बोलताना ते म्हणाले होते, "मेरे पास संयम भी है, और समय भी!'

उद्धव यांनीच आपल्या यशाचं गुपित अनवधानाने असं सांगून टाकलेलं दिसतं.

Sunday 20 January, 2008

एक शांत वादळ!

सुचना : हा लेख दि. २० जाने. २००८ च्या ई-सकाळ.कॉम वरून घेतला आहे. मुळ लेखक जे. डी. पाटील आहेत.

तो काळ होता १९८५-८६ चा. त्या वेळी "मुंबई सकाळ'चे कार्यालय आणि प्रिंटिंग प्रेस प्रभादेवी येथे होती. शिवसेनेचे व्यंगचित्र साप्ताहिक "मार्मिक'ची छपाईही तेथेच होत होती. अनेकदा तेथे "मार्मिक'ची छपाई सुरू असताना हाताची घडी घालून उभे असलेले उद्धव ठाकरे दृष्टीस पडत. याच काळात महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती. पण आपण शिवसेनेसारख्या एका लढाऊ संघटनेच्या प्रमुखांचे, शिवसेनाप्रमुखांचे पुत्र आहोत, असा दर्प उद्धव ठाकरे यांच्या वागण्यात अजिबात नसे. त्यांच्याबरोबर कधीही कार्यकर्त्यांचा गोतावळा नसायचा. बहुसंख्य वेळा ते एकटेच असायचे. शिवसेनेच्या राजकारणापासून चार हात अंतर राखूनच ते वावरताहेत हे त्यावेळी स्पष्ट दिसत असे. "सकाळ' कार्यालयापासून जवळच असलेल्या बंगाल केमिकलच्या समोर "आकार' नावाचे कार्यालय होते. या कार्यालयात डिझाईनचे काम चालत असे. तेथेही ते नेहमीच दृष्टीस पडत. त्या वेळी कोणी भाकित केले असते, की शिवसेनाप्रमुखांचे राजकीय वारसदार उद्धव ठाकरे असतील, तर त्याला लोकांनी वेड्यात काढले असते. त्यांच्यातील ती नम्रता, साधेपणा, राजकारणापासून दूर राहणे यामुळे ते चित्रकार, छायाचित्रकार अशाच एखाद्या कलेतच रममाण होतील, त्यांच्या शांत स्वभावी प्रकृतीला राजकारण मानवणार नाही, असेच वाटत होते. पण पाच वर्षांपूर्वी महाबळेश्‍वर येथील शिवसेनेच्या शिबिरात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली. आणि त्यांच्याबद्दलचे सगळे आडाखे फोल ठरले. त्यानंतरच्या पाच वर्षांतही नेतृत्वगुणाच्या कसोटीवर ते ज्या प्रकारे उतरले, अनेक संकटांतही शिवसेनेचा रथ पुढे नेताना जी संयमी वृत्ती बाळगली हे सर्व राजकारणाच्या अभ्यासकांनाही अचंबित करणारे होते.

उद्धव ठाकरे यांचे पाच वर्षांपूर्वी कार्य ाध्यक्षपदासाठी सूचक म्हणून राज ठाकरे होते, तर अनुमोदक नारायण राणे होते. आज हे दोघेही शिवसेनेत नाहीत. तरीही मुंबई महापालिकेवर शिवसेना युतीची सत्ता आली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप सत्तेवर येण्याची आशा संपुष्टात आल्यानंतर खासगीत उद्धव यांच्या नेतृत्त्व कसे दुबळे आहे, याबाबत कुजबुज होऊ लागली. पक्षात काहीतरी शिजत असल्याची कुणकुण लागताच त्यांनी हा डाव अत्यंत शांतपणे उलटविण्याचे ठरविले. उद्धव यांच्या सान्निध्यातील सहकारी त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याबद्दल बोलताना सांगतात, की त्यांनी एकदा ठरविले की ते तडीस जाईपर्यंत त्याचा पाठपुरावा करतात. एखाद्या घटनेबद्दल सर्वांचे म्हणणे ऐकून घेतात. पण आपल्याला वाटते तेच अखेर करतात. हे करताना कोणतीही आदळआपट नसते. कोणालाही भाषणात शिव्याशाप नसतात. अत्यंत संयमाने ते परिस्थिती हाताळतात. राणे यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांतच (३ जुलै २००५) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: राणे यांच्या हकालपट्टीची घोषणा केली; मात्र त्यानंतर आपल्यावर झालेल्या अन्यायाचे भांडवल करून राणे यांनी शिवसेनेवर, विशेषतः उद्धव ठाकरेंवर हल्ला चढविला. जाहीर सभांमधील भाषणांतून त्यांनी उद्धव ठाकरेंवर बेछूट आरोपांचा सपाटाच लावला. राणे यांच्या आक्रमक वृत्तीवर कोकणी माणूस काहीसा विचलित झाला.

जो परंपरागत शिवसेनेचा होता. त्याचा फटका मालवण पोटनिवडणुकीत आला. तिथे शिवसेना उमेदवाराची अनामत रक्कमही जप्त झाली. त्यानंतर कोकणातील राणे समर्थक आमदारांच्या जागाही शिवसेनेच्या हातून गेल्या. श्रीवर्धन विधानसभेची जागा शिवसेनेने जिंकल्याने राणे यांच्या घोडदौडीला काहीसा लगाम बसला. राणेंच्या बंडाचा अनुभव पाठीशी असलेल्या उद्धव यांनी मात्र नंतर त्यापाठोपाठ झालेले राज ठाकरे यांचे बंड अगदी पद्धतशीरपणे हाताळले. राज ठाकरे यांनी थेट "विठ्ठला'भोवतीच्या कोंडाळ्यावर तोफ डागत केलेले आरोपही गंभीर होते. राज यांनी पक्षात नेतेपदावर असताना जाहीरपणे केलेले आरोप पक्षशिस्तीला तडा देणारे होते; तरीही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले होते. उद्धव यांनी त्यांची हकालपट्टी तर सोडाच पण साध्या कारवाईसंदर्भातही सूतोवाच केले नव्हते. राज ठाकरे यांना त्यांचा निर्णय घेण्यासाठी मोकळे सोडण्यात आले होते; मात्र त्याच वेळी "मातोश्री'चे दरवाजे त्यांच्यासाठी कायम खुले आहेत, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडून व्यक्‍त करून राज यांना राजकीय चक्रव्युहात घेरले. अखेर १८ डिसेंबर २००५ चा दिवस उजाडला. राज ठाकरे यांनी शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करीत आपल्या नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राणेंना मिळालेल्या सहानुभूतीपेक्षा जास्त प्रमाणात ती राज ठाकरे यांना मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती; तरी तसे घडले नाही. उद्धव यांच्या "राज'नीतीमुळे राज ठाकरे अपयशी ठरल्याचे मानले जाते. उद्धव ठाकरेंकडून याच "राज'नीतीचा प्रयोग भाजपवर करण्यात आला होता. राष्ट्रपतिपदासाठी भाजपपुरस्कृत अपक्ष उमेदवार भैरोसिंग शेखावत यांना डावलून संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्या प्रतिभाताई पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे व प्रदेशाध
्यक्ष नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या या भूमिकेवर जहाल प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या; मात्र त्यामुळे विचलीत न होता उद्धव यांनी अत्यंत संयमी भूमिका घेत आमचे युतीचे घर तुटणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. युतीच्या भवितव्याच्या निर्णयाचे अधिकार त्यांनी संपूर्णपणे भाजप नेत्यांनाच बहाल केले. युती तुटल्याचे पाप आपल्या माथी नको आणि युती तुटलीच तर तो मित्रपक्षाने घेतलेला निर्णय आहे, असे खा पर भाजपवर फोडणे सुलभ असल्याची नीती अवलंबिली. प्रतिभाताईंना पाठिंबा देऊन मराठी माणसांची मने जिंकून शिवसेनेने राज्यात भाजपच्या पुढे पाऊल टाकले. राष्ट्रपती निवडणुकीनंतर युतीसंदर्भात निर्णय घेऊ, अशी घोषणा मुंडे आणि गडकरी यांनी त्या वेळी केली होती. राणे व राज यांनी केलेल्या हल्ल्यापाठोपाठ भाजपच्या नाराजीलाही तेवढ्याच समर्थपणे त्यांनी तोंड दिले. त्यानंतर उद्धव यांनी स्थानिक भाजप नेतृत्वावर मात करीत थेट दिल्लीत जाऊन लालकृष्ण अडवानी यांची भेट घेतली. त्यावरही टीका झाली. आजपर्यंत शिवसेनाप्रमुखांना भेटायला लालकृष्ण अडवानी मुंबईत येत असत. यावेळी मात्र शिवसेनेने भाजपपुढे लोटांगण घातले येथपर्यंत टीका झाली. पण उद्धव यांनी कसबी राजकारण्याप्रमाणे खेळलेला तो डाव होता. तो त्यांनी जिंकला. पुढे अडवानी यांनी स्वतः मुंबईत येऊन शिवसेनाप्रमुख व उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने सर्वच विरोधकांची तोंडे बंद झाली. युती अबाधित राहिली. शिवसेना-भाजप महापालिका सत्तेवर आली. विदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्वच पक्षांनी तोंडाला पाने पुसल्यामुळे राजकीय पक्षांबद्दल त्यांच्या कमालीची नाराजी आहे. असे असूनही उद्धव ठाकरे यांच्या शेतकरी मेळाव्यासाठी मिळत असलेला प्रतिसाद थक्क करणारा आहे. एका कलाकारातून राजकारणातही उतरलेले कलागुण येत्या काळात सर्व पक्षाच्या नेत्यांना विचार करायला लावणारे आहे.

Friday 18 January, 2008

गोविंदा सापडला एकदाचा!

उत्तर मुंबईचे मा. खासदार कम अभिनेता गोविंदा यांचा शोध लागला आहे. इतके दिवस त्यांच्या मतदार संघातील जनता शोधत असताना ते सापडले कुठे तर गोरेगांवच्या फिल्मीस्तान स्टुडियो मध्ये एका तरूणाला थोबाडात मारताना. त्या तरूणाची चुकी काय तर गोविंदा म्हणतात तो तरूण त्यांच्या महिला सहकारी कलाकाराची चेष्टा करत होता. छान गोविंदा!

मा. खासदार साहेबांना मला एक उत्तर मुंबईचा नागरीक म्हणून विचारावेसे वाटते कि त्या तरूणाने चेष्टा केली म्हणून त्याच्या तुम्ही कानफटात मारलीत पण तुमचे काय? गेली तीन वर्षे तुम्ही तुमच्या मतदार संघातील जनतेची चेष्टा केलीत त्याबद्दल तुम्हाला या जनतेने काय शिक्षा द्यावी? तुमच्या मतदारसंघातील रेल्वेने प्रवास करणार्‍या जनतेचे हाल कुत्राही खात नाही आहे. रोज सकाळी घरातून बाहेर गेलेला आपला माणूस संध्याकाळी घरात येताना कसा येईल याची खात्री नाही, त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला संसदेत पाठविले पण तुम्ही सुद्धा त्यांची चेष्टाच केलीत ना! मग तुम्ही काय प्रायश्चित्त घेणार आहात? जमत नसेल तर सोडून द्या खासदारकी! पण तसे होण्याची शक्यता कमीच कारण त्यागाचे सर्व अधिकार तुमच्या गॉडमदर (सोनिया ऑन्टी) यांनाच आहेत ना!

मित्रांनो तुम्हाला काय वाटते? प्रतिक्रिया नक्की कळवा.