Wednesday 17 February, 2010

आता तपास सुरू झालाय.. पण फायदा काय?

शनिवारी हादरलेले पुणे अजुन पर्यंत सावरलेले नाही. लोकांमध्ये दहशत आहे. अशी वाक्य सध्या मिडीयामध्ये सुरू आहे. रोज नविन नविन रिपोर्ट्स बनत आहेत, दाखविले जात आहेत. पोलिस धागे-दोरे-सुया शोधत आहेत. प्रत्येक आतंकवादी हल्ल्यानंतर हेच होते.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी देशावर सर्वात मोठा आतंकवादी हल्ला झाला. पहिल्यांदाच एका आतंकवाद्याला आमच्या शहिद तुकाराम ओंबळेंनी पकडून दिले. आतंकवादी कसाबचा जिवंत चेहरा जगाने प्रथमच पाहिला. वरीलप्रमाणे सगळ्या गोष्टी इथेही घडल्या. पोलिसांना सगळे धागे-दोरे-सुया मिळाले. एवढेच नाही तर आता जवळ सव्वा वर्षे होत आली, कसाब मराठीही बोलायला लागला. पण आपल्या सरकारने काय वाकडे केले कसाबचे? कोर्टात खटला सुरू आहे. एका वर्षाच्या आत कसाबला शिक्षा होईल असे सगळेजण बोलत होते पण काय झाले का हो?

आतंकवादी सापडला आणि आपण त्याला शिक्षा देत नाही. अफजलगुरू घरच्यापेक्षा सुखाने तुरूंगात जगत आहे. कसाबने बाप जन्मी कधी सुख भोगले नसेल इतके आता भोगत आहे. आम्ही आपले अजुन धागे-दोरे-सुया शोधतोय. काय मुर्खपणा आहे हा?

पुणे हल्ल्याचा शोध सुरू झालाय. सरकारी पैसा यासाठी वापरला जाईल. पण याने काही फायदा होणार आहे का? आतंकवादी पळाले आणि आपण आपले आता शोधाशोध सुरू करतोय. ’माय नेम इज खान’ साठी २२००० पोलिस तैनात केले. कुणी विचार केला का की इतका फौजफाटा आपण कुणाला देतोय आणि का? लोकांच्या करोडो रुपयांच्या कर स्वरूपात आलेल्या रकमेची अशी उधळपट्टी फक्त खानावरच का? सर्व सामान्यांनी असे घाबरत आयुष्य जगायचे का?

आतंकवाद्यांना सजा झालीच पाहिजे. पण अफजल गुरू, कसाब यांना शिक्षा देऊन आपण आतंकवाद्यांना का दाखवून देत नाही की हिंदुस्थानवर हल्ला केलात तर कशी सजा मिळते. आज बाळासाहेबांनी सांगितले तेच बरोबर. कुणीही या इकडे आणि धिंगाणा घाला. कोण काहीही बोलणार नाही.

7 comments:

  1. congress sarkar nalayak hoti, nalayak aahe aani nalayak rahnaarach

    congress sarkar madhye dahshatvadi halyyanchi savay karun gyavi lagel

    ReplyDelete
  2. congress ni khana la suraksha ugach dili. rahul gandhi la pan dili.
    tevadhi common man la dyayla havi hoti.

    ReplyDelete
  3. are kadhi kadhi manat yeta,,direct jaun tya kasab la golya ghalavya...chyayla,,sagale paise kamvt ahet tychya navane,,

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. Maharashtrala aata savay zali aahe asha dahshadwadachi karan congress kahich karu shaknar nahi hyachi saravana kalpana aahe..te faky "KHAN" sathi kahi tari karu shaktat..laj vatat aahe aamhala maharashtrat rahnyachi..tyachi kalji jast aahe..pan maharashtrachi nahi.....

    ReplyDelete
  6. ya sarkarla jantechya jivachi ajibat kalji nahi,hyancha fakta muslim vote bankevar dola ahe.tar mag ase halle hotach rahnar

    ReplyDelete
  7. मला तर वाटते परत कोणाला तरी चापेकर बंधू, मदनलाल धिंग्रा, नथुराम गोडसे बनावे लागणार आणि या आतंक वादाला तसेच महाराष्ट्राच्या र्हासाला जे लोकं कारणीभूत आहेत त्यांच्या छाताडात गोळ्या घालाव्या..अरे हे काय चालले आहे या राज्यात? कोण ते टीचभर पाकिस्तानातून १० लोकं येतात काय २०० लोकांना यमसदनी धाडतात काय त्यात एका अतिरेक्याला कासाबला पकडण्यात आले..काय झाले त्याला पकडून? सामान्य जनतेपेक्षा आज तो खरा सुरक्षित आहे..आणि आता पुण्यला बोम्स्फोट झाला त्या मागे असणार्या अतिरेक्यांना पकडायला हे हिजड सरकार आता तयारी करत आहे.....काय लोणच घालणार पकडून!!!..पकडतील परत त्यांना शिक्षा होईस्तोवर अजून बॉम्ब स्फोट होतील ..आणि त्या अतिरक्यांना फाशी ची शिक्षा देऊन अफझल, कसाब च्या नंतर रांगेत उभे करतील....त्यांना फाशी होई पर्यंत हि रांग किती मोठी झाली असेल याचा विचार या सरकार ने केला आहे का....चिदंबरम म्हणतात जनतेने स्वत:ची सुरक्षा स्वत: करावी...आणि सुरक्षा देणार कोणाला कसाबला, अफझला!!! खरच या कॉंग्रेस सरकारच्या स्वत:च्या घरचे जो पर्यंत या बॉम्ब स्फोटात मरत नाहीत तो पर्यंत हि या अतिरेकी जो पर्यंत यांच्या घरात घुसून यांच्या मानसांना मारतील तेव्हा यांना संन्या जनतेच्या वेदना समजतील...पण तो पर्यंत खूप उशीर झाला असेल...

    ReplyDelete