Sunday 21 February, 2010

दादांना भावपूर्ण श्रद्धांजली!


शिवसेना नेते श्री. मधुकर (दादा) सरपोतदार यांचे काल संध्याकाळी हिंदुजा इस्पितळात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते. दादा हे बाळासाहेबांच्या ’अष्टप्रधान मंडळा’तील एक नेते म्हणून सर्वांना परिचित आहेत.

शिवसेनेच्या स्थापनेपासून आजन्म शिवसेनेत राहिलेले दादांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील आंजणारी गावात ३१ जानेवारी १९३४ साली झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते जॉन्सन कंपनीमध्ये पसोर्नेल मॅनेजर या पदावर रूजू झाले. याच काळात त्यांनी अनेक शिवसैनिकांना नोकरला लावले. यातील अनेक पुढे शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि नगरसेवक झाले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेचे उत्तम ज्ञान असलेल्या सरपोतदारांचे वक्तृत्वही उत्तम होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारलेल्या सरपोतदार यांनी पक्षाच्या कामात झोकून दिले. कामगारांविषयी तळमळ असलेल्या सरपोतदारांनी महाराष्ट्र श्रमिक सेनेच्या माध्यमातून अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला. कामगारांच्या मागण्यांसाठी दत्ताजी साळवी यांची भारतीय कामगार सेना एकीकडे रस्त्यावर उतरायची तर, कॉपोर्रेट क्षेत्रात उत्तम संबंध असलेले आणि फडेर् इंग्रजी बोलणारे सरपोतदार कंपन्यांच्या मालकांशी भांडून कामगारांना न्याय मिळवून देत.

आजन्म शिवसेनेत कार्यरत असलेले दादांच्या या पवित्र स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली!

1 comment:

  1. शिवसेना नेते श्री. मधुकर सरपोतदार दादांना भावपूर्ण श्रद्धांजली!

    ReplyDelete