Sunday 14 March, 2010

विंदांना भावपूर्ण आदरांजली..


गोविंद विनायक करंदीकर ऊर्फ विंदा यांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध केले. त्यांच्या ‘अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी त्यांना साहित्य क्षेत्रात सर्वोच्च समजला जाणारा ३९ वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन २००३ साली गौरवण्यात आले होते. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे साहित्यिक ठरले. त्याशिवाय कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार, कोणार्क सन्मान, केशवसूत पुरस्कार तसेच विद्यापीठांच्या डी.लिटस् अशा पदव्यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

विंदांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात घालवण गावी झाली. विंदाचे वडिल 'विनायक करंदीकर' कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. रा.स्व. संघ ते मार्क्स असा त्यांचा वैचारीक प्रवास राहीला. पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाही. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्विकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१ सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पूर्ण लेखनासाठी घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले आहे. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्विकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली आहे. विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर आणि मुलगी सौ.जयश्री विश्वास काळे हे सुद्धा सामाजिक कार्यात सक्रीय असतात. तसेच त्यांना नंदू आणि उदय असे दोन मुलगे आहेत.

विंदांचे समग्र वाङ्मय

विंदानी मराठी काव्यमंजुषेत विविध घाटाच्या रंजक, वैचारीक, काव्यलेखनाने भर घातली. मराठी बालकवितेची मुहुर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करुन कविता जनसामान्यापर्यंत पोहचेल असे पाहीले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांचे कडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठी भाषेस परिचय झाला. हा त्यांचा साहित्यिक प्रवास त्यांनी इ.स. १९८१ साली लेखन निवृत्ती घेउन यशस्वीपणे पूर्ण केला.

स्वेदगंगा (इ.स. १९४९), मृद्गंध (इ.स. १९५४), धृपद (इ.स. १९५९), जातक (इ.स. १९६८), विरूपिका (इ.स. १९८१), अष्टदर्शने (इ.स. २००३) (या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार) असे त्यांचे अनेक काव्यसंग्रह गाजले. त्याशिवाय संहिता (इ.स. १९७५) (संपादन - मंगेश पाडगावकर), आदिमाया (इ.स. १९९०) (संपादन - विजया राजाध्यक्ष) या संकलित काव्यसंग्रहासाठीही त्यांनी योगदान दिले. विंदांच्या बालकविता खूपच गाजल्या. राणीची बाग (इ.स. १९६१), एकदा काय झाले (इ.स. १९६१), सशाचे कान (इ.स. १९६३), एटू लोकांचा देश (इ.स. १९६३), परी ग परी (इ.स. १९६५), अजबखाना (इ.स. १९७४), सर्कसवाला (इ.स. १९७५), पिशीमावशी आणि तिची भुतावळ (इ.स. १९८१), अडम् तडम् (इ.स. १९८५), टॉप (इ.स. १९९३), सात एके सात (इ.स. १९९३), बागुलबोवा (इ.स. १९९३) अशा बालसाहित्यातून त्यांनी मुलांचे मनोरंजन केले.

धन्यवाद महाराष्ट्र टाईम्स


3 comments:

  1. Vindana Shivsenetarfe Bhavapurn Adaranjali

    ReplyDelete
  2. जेष्ठ साहित्यिक - कवी विंदा करंदीकर यांचे आज १४/०३/२०१० रोजी निधन झाले. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली.
    ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते.
    महाराष्ट्राचा साहित्य तपस्वी हरपला.. हि पोकळी कधीच भरून निघू शकत नाही...
    त्यांच्या आत्म्यास शांती लाभो... हीच ईश्वर चरणी प्रार्थना...

    ReplyDelete
  3. एक घाव दोन तुकडे, पण निर्णय हा झालाच पाहिजे

    आदेशाची वाट पाहत बासु नका, अन्याय दिसेल तिथे लाथ मारा ..

    तोन्ड वाजवुन न्याय मिळत नसेल तर
    तोन्डात वाजवुन न्याय मिळवा,
    पण न्याय हा झालाच पाहिजे.

    ReplyDelete