Wednesday 3 March, 2010

शिवरायांचा सरकारला विसर!


आज फाल्गुन कृ. तृतिया म्हणजेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ३८० वी जयंती.

शिवाजी महाराजांची कीर्ति संपूर्ण जगाला माहिती आहे. तसा त्या वेळेचा उल्लेख इंग्रजांनी त्यांच्या वर्तमान पत्रात दिल्याचे काही महिन्यांपूर्वी स्पष्ट झाले. पण इथे आपले केंद्रसरकार अजून झोपा काढत आहे.

www.india.gov.in हि केंद्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे. याचे सर्व काम नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर (NIC) बघते. या संकेतस्थळावर हिंदुस्थानातील सर्व प्रकारची माहिती तसेच इतिहास दिलेला आहे. तसेच हिंदुस्थानात किती राजे होते त्याबद्दलची माहिती स्पष्टपणे दिलेली आहे.

याच संकेतस्थळावर मध्यकालीन इतिहास मध्ये बाबर, हुमायुन, अकबर, शहाजहान, औरंगजेब यांची माहिती देण्यात आलेली आहे. परंतु ज्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, अफजलखानाचा कोथळा काढला, त्यांचा इथे एकाही ओळीमध्ये उल्लेख केलेला नाही.

शिवछत्रपतींच्या आजच्या जयंती निमित्त आपण आपल्या सर्व मित्रांना ई-मेल, एसेमेस करतो, फोटोज पाठवून महाराजांची आठवण काढतो, हे सगळं केल्यानी शिवजयंतीची आठवण नक्कीच जागवतो पण ज्या हिंदुस्थानात आपण राहतो त्याच हिंदुस्थानच्या केंद्र सरकारला याची जाग येण्यासाठीही आपण प्रयत्न केले पाहिजेत. नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर (NIC) ला त्यांचे ईमेल indiaportal@gov.in आणि siomsu@hub.inc.in वर छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास लवकरात लवकर संकेतस्थळावर दिसले पाहिजे अशी विनंती करा.

नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर (NIC) चे संपर्क कार्यालयाचे पत्ते पुढीलप्रमाणे :

मुख्य कार्यालय दिल्ली : इंडीया पोर्टल सेक्रेटरी, तिसरा माळा, नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर, ’ए’ ब्लॉक, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली - ११०००३,

मुंबई कार्यालय : NIC स्टेट सेंटर, ११ वा मजला, नविन प्रशासकिय बिल्डींग, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

सुनिल मंत्री,
बॉस्टन, युनाइटेड स्टेट्स.

5 comments:

  1. शिवाजी महाराजांचा उल्लेख या संकेतस्थळावर नाही आहे हे स्पष्ट आहे आणि ते जर करणार नसतील तर मराठी माणसाने पुढाकार घेउन हे केल पाहिजे कारण शिवराय हे आपले नुसते राजे नव्हते तर जगण्याचा एक भाग आहेत.

    उठा मराठ्यानो या सरकारला धडा शिकवायला पुढे या!!

    ReplyDelete
  2. एन आय सी ने हे जाणून बुजून केलेली चूक आहे किव्वा ज्याकोणी ही माहिती अपडेट केली असेल त्याला महाराजाबद्दल स्वारस्य नसाव त्यांचा गौरावशाली इतिहास माहीती नसावा.
    मुघल साम्राज्य म्हणजे हिंदुस्थान हा फालतू गैरसमज त्यांनी करून घेतला आहे.
    श्री छत्रपती शिवाजी महाराज , श्री छत्रपती संभाजी महाराज , श्री छत्रपती राजाराम , पेशवे थोरला बाजेराव पहिले , महादजी शिंदे , होळकर घराणे , पराक्रमी गायकवाड घराणे , पानिपत चा रणसंग्राम , इंग्रजांविरुद्धची सरशी , महाराष्ट्रातले गड आणि किल्ले ही यादे न संपणारी आहे.
    हे सर्व एन आय सी च्या नजरेत आले नसेल ही बाब होऊच शकत नाही . त्यामुळे हे जाणून बुजून केलेले कृत्य आहे.

    ReplyDelete
  3. शिवरायांची शौर्यांचा इतिहास आम्ही शिवसैनिकाच्या मनात खच्चुन भरला आहे म्हणुन तर आमचे रक्त सळसळते आहे.जर डिवचन्याचा प्रयास काँग्रेसचा चालु राहीलातर अफजलखान पेक्षा भयानक हाल करुन टाकु.काँग्रेसला मी संगत आहे तुमचा षडयंत्र षंढ लोकांनाही माहीत आहे पण त्यांचा स्वाभिमान जागा होत नाही.कारण त्यांचे जिवन व्यभिचार,अत्याचार,जोडे उचलने,इटली बाईने थुंकल्यावर चाटने ह्यातच षंढाना अभिमान वाटतो.चाटा षंढानो जर तीची थुंकी संपली तर अंगावर कायतरी सोडेल त्यांनी आंघोळ करुन घ्या.इटालियन व्हाल.

    ReplyDelete
  4. इटालियन कांग्रेसी सरकारचा निषेध !!.... हे इटालियन कांग्रेसी सरकार आहे, ते एक मुस्लिम लोकांच्या गठ्ठा मतांसाठी काहीही करू शकते, हे सरकार येत्या ५ वर्षानी होणा-या निवडनुकित अफजल गुरुला लोकसभेचे टिकिट ही देऊ शकते, कांग्रेस युवराज (कशावरून युवराज काय माहिती?) राहुल गाँधी बरोबर कसाबलाही कांग्रेसचा युवा नेता बनवतील, देश विकून इटलीत जाऊंन राहतील, आपल्या देशातील गरीब लोक यांच्याकडून पैसे घेऊन यांना निवडून देतात, अश्या सरकारकडून आपण काय अपेक्षेने पाहणार, सोनिया म्हणते की महगाई वाढली ते बरोबर आहे आम्ही आलेल्या पैशातून विकास करणार मी म्हणतो कोणाचा विकास करणार तुमचे खासदार, मंत्री स्वत:चा? की जनतेचा? मागची पाच वर्षे तुमची होतीना तेव्हा काय तुमचे सरकार झोपले होते काय? शिवरायांचा इतिहास तुम्हाला माहित नाही तर या देशात राज्य करण्याची तुमची लायकी नाही.

    ReplyDelete
  5. ts म्हणजे - तेजस आडूळकर (TEJAS ADULKAR)

    जय महाराष्ट्र

    ReplyDelete