Saturday, 31 July 2010
’महाराष्ट्र देशा’ सामाजिक चळवळ
अख्ख्या जगाला आकाशातून महाराष्ट्र दाखविणारा ’महाराष्ट्र देशा’ या विक्रमी विक्री झालेल्या छायाचित्र पुस्तकाच्या माध्यमातून आलेली रक्कम ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत आणि मुंबईत मलेरिया आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या औषधांसाठी खर्च केले जातील असे शिवसेना कार्यप्रमुख श्री. उद्धवसाहेबांनी आज जाहिर केले.
’महाराष्ट्र देशा’ हे पुस्तक कसे बनले? याचा उलगडा आज उद्धवसाहेबांनी रविंद्र नाट्यमंदिर येथील प्रकट मुलाखतीत दिला. विक्रमी मुलाखतकार श्री. सुधीर गाडगीळ यांनी उद्धवसाहेबांना तसेच या सर्व प्रवासात त्यांना साथ देणाऱ्या सवंगड्यांना नुसते बोलते केले नाही तर छायाचित्रणाच्या दरम्यान घडलेल्या श्वास रोखून धरणारे आणि अंगावर रोमांच उभे राहणाऱ्या प्रसंगाचे अनुभव सांगितले.
वाघाच्या पोटी वाघच जन्माला येतो असेच उद्धवसाहेबांच्या बाबतीत म्हणता येईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब संपूर्ण आयुष्य वाघाप्रमाणेच जगले त्याच प्रमाणे उद्धवसाहेबांनीही वाघाच्या काळजाने अतिशय थरारक पद्धतीने केलेले छायाचित्रण ’महाराष्ट्र देशा’ पुस्तक रुपाने जगासमोर आणले.
प्रत्येक मराठी माणसाच्या घरी हा मराठी मुलाखाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांची साक्ष असलेल्या गड-किल्ल्यांचा मौल्यवान ठेवा असायलाच हवा, नव्हे तर मराठी माणसाने त्याच पध्दतीने आपल्या घरी जपण्याचा जणू विडाच उचलला आहे. मागच्या महिन्यात आलेल्या आकडेवारीनुसार या पुस्तकाच्या तब्बल १,७५,००० प्रती विकल्या गेल्या असून आजपर्यंत ४ आवृत्त्या निघालेल्या आहेत.
अशा या विक्रमी विक्री झालेल्या आणि होत असलेल्या पुस्तक विकत घेणाऱ्या प्रत्येक माणसाला हे पुस्तक घेऊन खुप मोठ्या समाजकार्यात सहभाग घेत असल्याचे अभिमान होणार आहे हे नक्की!
Subscribe to:
Post Comments (Atom)
nakkich sagalyani hya chalawalit samil zale pahije
ReplyDeleteThanks ....Maharashtra evadh sundar dusar kahich nahi ...apratim maharashtra
ReplyDeleteधरतीवर आकाश उतरले
ReplyDeleteत्यालाही आपल्या धरतीचे सौदर्य आवडले
उंचावरुन फोटो काढत असताना
प्रतीबींब आकाशाचे ऐटीत दिसु लागले
अश्या धरतीवर शिवाजी महाराज जन्मले
त्या इतिहासाची ओळख आज घराघरात पोचले\\
साहेबांची फोटोग्राफी अप्रतिम आहे .आणि मुखपृष्ठ तर फारच अप्रतिम आहे .
ReplyDelete