Friday 18 January, 2008

गोविंदा सापडला एकदाचा!

उत्तर मुंबईचे मा. खासदार कम अभिनेता गोविंदा यांचा शोध लागला आहे. इतके दिवस त्यांच्या मतदार संघातील जनता शोधत असताना ते सापडले कुठे तर गोरेगांवच्या फिल्मीस्तान स्टुडियो मध्ये एका तरूणाला थोबाडात मारताना. त्या तरूणाची चुकी काय तर गोविंदा म्हणतात तो तरूण त्यांच्या महिला सहकारी कलाकाराची चेष्टा करत होता. छान गोविंदा!

मा. खासदार साहेबांना मला एक उत्तर मुंबईचा नागरीक म्हणून विचारावेसे वाटते कि त्या तरूणाने चेष्टा केली म्हणून त्याच्या तुम्ही कानफटात मारलीत पण तुमचे काय? गेली तीन वर्षे तुम्ही तुमच्या मतदार संघातील जनतेची चेष्टा केलीत त्याबद्दल तुम्हाला या जनतेने काय शिक्षा द्यावी? तुमच्या मतदारसंघातील रेल्वेने प्रवास करणार्‍या जनतेचे हाल कुत्राही खात नाही आहे. रोज सकाळी घरातून बाहेर गेलेला आपला माणूस संध्याकाळी घरात येताना कसा येईल याची खात्री नाही, त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला संसदेत पाठविले पण तुम्ही सुद्धा त्यांची चेष्टाच केलीत ना! मग तुम्ही काय प्रायश्चित्त घेणार आहात? जमत नसेल तर सोडून द्या खासदारकी! पण तसे होण्याची शक्यता कमीच कारण त्यागाचे सर्व अधिकार तुमच्या गॉडमदर (सोनिया ऑन्टी) यांनाच आहेत ना!

मित्रांनो तुम्हाला काय वाटते? प्रतिक्रिया नक्की कळवा.

1 comment:

  1. राजकारण म्हणजे याला, वेड-वाकड़ तोंड करुण जनतेला वेड बनाविन्या इतक सोप वाटतय की काय? कोण जाने?.. सोनियाच पिल्लू म्हणुन .. निवडून दिला तर तिथही पार्लामेट मध्ये बंक मारायला लागला, पार्लामेंटचा आपमान, केल्या बद्दल याला अध्यक्षाच्या हस्तेच थोबाडीत मारायला हवीये. ... कुनाही उपट सुम्भ्याना निवडून दयाल तर जनतेला ते असाच प्रसाद देणार .....

    ReplyDelete