Sunday 9 March, 2008

शेतकरी कर्जमाफीचे राजकारण!

मागिल महिन्याच्या २९ तारखेच्या अर्थसंकल्पात ५ एकर पेक्षा कमी जमिन असणार्‍या शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी रुपये ६० हजार कोटीची तरतूद करण्यात आली। ज्या शेतकर्‍यांकडे ५ एकर पेक्षा कमी जमिन आहे, ज्यांनी वित्तियसंस्थांकडून कर्ज घेतले आहे अशांनाच याचा फायदा होईल हे स्पष्ट आहे। मग तो शेतकरी विदर्भ किंवा इतर आत्महत्या करणार्‍या भागातील असो अथवा नसो. पण इथे मुख्य मुद्दा येतो सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांचे काय? विदर्भातील सर्वाधिक आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांनी सावकारांकडून कर्ज घेतली होती त्यांचे काय? किंवा असे बरेचसे शेतकरी आहेत ज्यांची जमिन ५ एकरपेक्षा जास्त आहे. पण त्यातील अर्धिअधिक नापिक आहे त्यांच्या कर्जाचे काय? कर्जमाफी दिली म्हणजे खुप मोठे काम केले असे महाराष्ट्रातील कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारला वाटत आहे.

कर्जमाफीची घोषणा होण्याअगोदर काही तासांपूर्वीच यांचे होर्डींग्ज तयार होते। कारण यांना भीती होती ती शिवसेनेची! शेतकरी आत्महत्यांवर शिवसेना आणि उध्दवसाहेब गेली दोन वर्षे रान उठवत आहेत. गावोगावी शेतकरी मेळावे घेऊन शेतकर्‍यांना एकजुटीचे आवाहन कले. आणि शेतकरी एकत्र यायला लागला याचा परिणाम व्हायचा तो झालाच आघाडी शासन असो किंवा युपीए असो शिवसेनेच्या झेंड्याखाली जमलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीची घोषणा करावी लागली.

सगळ्यात शरमेची बाब म्हणजे गेल्या ८ वर्षापासून शेतकरी आत्महत्या करताहेत आणि कॉग्रेस राष्ट्रवादी वाले श्रेय उपटण्याचे मेळावे घेत आहेत। यांना थोडीतरी लाज असायला हवी। एवढ्या आत्महत्या झाल्या काही महिन्यापुर्वी आमच्या कृषीमंत्र्यांना कोणीतरी विचारले तर ते म्हणत होते कर्जमाफी करणे शक्य नाही कारण सरकारी तिजोरीवर खुप मोठा भार पडेल. मग आता कर्जमाफी कशी दिलीत? वरून श्रेय कसले घेता. श्रेय लाटण्यासंदर्भात उध्दवसाहेबांना विचारले गेले तेव्हा त्यांचे उत्तर होते, शेतकर्‍यांच्या एकजुटीमुळेच कर्जमाफी झाली. याला म्हणतात माणुसकी!

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा!

1 comment:

  1. tujha blog chhan aahe. malaahi jara tips de ki kasa changala karayacha te. chaan posts aahet.keep it up

    ReplyDelete