Sunday 23 March, 2008

एक निस्वार्थी नेतृत्व - बाळासाहेब

बाळासाहेब ठाकरे - आमचे लाडके साहेब, राजकारणात असूनही राजकारणापलिकडे निर्णय घेणारे एकमेव निस्वार्थी नेते।राष्ट्रवादीचे दत्ता मेघे यांनी पक्ष सोडण्याची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती, तेव्हा त्यांनी सांगितले कि, शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उद्धवजींजवळ चर्चा झाली होती. उद्धवजींनी बाळासाहेबांना विचारून सांगतो असे म्हटले. बाळासाहेबांचे उत्तर आले, जर मेघे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला शरद पवारांची हरकत नसेल तर तुम्ही प्रवेश करू शकता.

इथे प्रश्न पक्ष प्रवेश करण्याचा किंवा शरद पवारांच्या हरकतीचा नसून एक पक्षप्रमुख एका नेत्याला प्रवेश नाकारतो कारण त्या नेत्याच्या पक्ष प्रमुखाला आवडणार नाही।आजचे राजकारण हे फक्त तोडफोडीचेच सुरू असताना शिवसेनाप्रमुखांनी घेतलेला निर्णय खरोखरच क्रांतीकारक आहे. इथे रोज कोणीतरी पक्ष सोडतोय आणि पत्रकार परिषदांमधून बोंबाबोंब करत सुटतोय.

दोन वर्षापूर्वी नारोबाला शिवसेनेतून हाकलल्यानंतर नारोबा रोज दोन-चार पत्रकारांना जमा करून छाती बडवून सांगत असे त्याच्यावर कसा अन्याय झाला आणि त्याच्याबरोबर सेनेचे ४२ आमदार आणि १० खासदार आहेत. पण आता प्रत्यक्षात किती गेले ते सर्वांना माहितच आहे. तसेच हि सगळी थेर केवळ काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री करावे यासाठी होती हे सुद्धा उघड आहे।

त्यानंतर काही महिन्यांनी राज ठाकरेनी शिवसेना सोडताना घोषणा केली, विठ्ठलाच्या आजुबाजुचे दोन-चार बडवेच शिवसेनेत राहतील बाकी सगळे शिवसेना सोडतील। झाले ते याउअलट! त्याच्याबरोबर शिवसेना सोडून गेलेले राजा चौगुले किंवा जितेंद्र जनावळे सारखे शिवसैनिक काही दिवसात परतलेच परंतु नंतर जवळजवळ ४०% लोक शिवसेनेत पुन्हा आले. त्यानंतर शिवसेनेने रामटेक लोकसभा, श्रीवर्धन विधानसभा, मुंबई, ठाणे, नासिक, पुणे, नागपूर अशा महानगर पालिका निवड्णूकांमध्ये प्रचंड यश मिळवून राज ठाकरेला त्याची जागा दाखवून दिली.

आताच काहि महिन्यांपूर्वी काँग्रेसचे कर्नल सुधिर सावंत यांनी पक्ष सोडताना ४० काँग्रेजी आमदार आणि ५ खासदार सोबत असल्याची घोषणा केली।(आकडे नारोबांच्या जवळपासचेच, कोकण पॅटर्न असावा!).

पक्ष सोडणार्‍या या तथाकथित पुढार्‍यांना वाटत असावे कि आम्ही पक्ष सोडला म्हणजे तो पक्ष संपला, आणि हे ज्या पक्षात जाणार असतात किंवा पक्ष काढतात तो एकमेव लोकांसाठी काम करणारा पक्ष असतो। प्रत्यक्षात अशा लोकांना जनता भिक घालत नाहीच कारण लोकांना माहित असते हे आपल्या पक्षासाठी काही करू शकले नाहीत आमच्यासाठी काय करणार?

पण दत्ता मेघेंनी पक्ष सोडण्याच्या पत्रकार परिषदेतच पक्ष न सोडण्याचा निर्णय सोडण्याचा निर्णय घेतला कारण त्यांचे त्यांच्या नेत्यावर असणारे प्रेम, आणि बाळासाहेबांनी घेतलेल्या क्रांतीकारक निर्णय हेच आहे। दत्ता मेघे सेनेत आले असते तर विदर्भात सेना आणखी मजबूत झाली असती कदाचित विरोधकाना विदर्भातून हद्दपारही केले असते याची साहेबांना पूर्णपणे कल्पना होती. पण जवळचा माणूस पक्ष सोडून गेल्याने ज्या वेदना होतात त्याची कल्पना असल्यानेच शरद पवारांचे ५० वर्षाचे सोबती दत्ता मेघेंना शिवसेना प्रवेश नाकारला असावा.

खरच साहेब तुम्ही महान आहात हे पुन्हा एकदा समोर आले. तुम्हाला लाख लाख सलाम!

2 comments:

  1. chhaan lekh lihilaa aahes tu. balasahebansarakha dusara politician akhya bharataat naahi.je manaat tech othaat asate tyanchyaa. tyamulech janatecha tyanchyavar prem aahe.

    ReplyDelete
  2. Mast re Amit ....
    Sahebana neet olakhanarech asa vichar karu shakatat.

    ReplyDelete